ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज सकाळी स्फोटाचा आवाज ऐकू आल्याची त्रोटक बातमी रॉयटर्सने दिली आहे.
हा स्फोट कसला होता, अपघात होता कि घातपात होता, घातपात असल्यास तो बी.एल.ए किंवा टी.टी.पी. ने घडवला की अन्य कोणी घडवला, का ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरु झालाय हे त्या बातमीत स्पष्ट केलेले नाही.

अपडेटः
"Pakistani news outlet Samaa TV now reports that an Indian drone was shot down near Walton airport in the city.
Local officials said the explosive-laden drone, measuring 1.5 to 1.8 metres (five to six feet), was being operated from across the border in India and was travelling towards sensitive buildings in the city."

काल पासुन वाट्टेल त्या थापा मारणार्‍या पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांवर अजिबात विश्वास नसल्याने ह्यात कितपत तथ्य असेल ह्याविषयी शंका आहे, पण तुर्तास तिथे कसलातरी स्फोट झाल्याच्या बातमीला दुजोरा तरी मिळाला आहे.

पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सीमावर्ती क्षेत्रावर बंदुका आणि तोफांनी मारा केला. त्यात ४ मुलांसह १२ नागरिक व १ सैनिक मरण पावले. ४० जखमी झाले.

Mukesh Ambani's Reliance Industries, Others Seek Trademark Registration Of #OperationSindoor

हल्ला यशस्वी करणाऱ्या आपल्या सैन्याचे व त्यांना या विशिष्ट हल्ल्यासाठी सर्वाधिकार देणाऱ्या आपल्या सरकारचे हार्दिक अभिनंदन!

उत्तम आणि समयोचित कामगिरी! अनेक पातळ्यांवर योग्य संदेश दिला गेला आहे. भारत सरकार आणि भारतीय सेनेचे हार्दिक अभिनंदन! जय हिंद! जय हिंद की सेना!

वंदे मातरम!
काल नवर्‍याच्या ऑफिसात सगळे ऑपरेशन सिंदूर बद्दल विचारत होते. लहान गावातल्या अमेरीकन लोकांना भारत सरकार आणि सेनेच्या कामगिरीचे फार कौतुक वाटले तसेच प्रेस कॉनफरन्समधे मुस्लीम लेडी ऑफिसर वगैरे ऑप्टिक्सचाही खूप पॉझिटिव परीणाम जाणवला.

Mukesh Ambani's Reliance Industries, Others Seek Trademark Registration Of #OperationSindoor >>> हे bid मागे घेतलं असं आत्ता वाचलं.

How many planes we lost finally? >> We did not thankfully.

काल रात्री हरमंदिरसाहिबवर झालेला हल्ला आपण यशस्वीरीत्या परतून लावलाय.
आत्ता साडेपाच वाजता परराष्ट्र मंत्रालयाची प्रेस कॉन्फरन्स आहे.

आज रॉयटर्सच्या बातमीत भारताच्या हद्दीत तीन विमानांचा मलबा आढळल्याचे हवाई दलाच्या अधिकार्‍याने सांगितले आहे. फोटोही आहे.
उलटसुलट बातम्या असतात . म्हणण्यापेक्षा नरेटिव्हज आहेत सर्व.

मला काय वाटतं कि पाकिस्तान सुद्धा गप्प बसणार नाही याचा अंदाज सर्वांनाच आहे /होता.
पण ही जी कृती आपण केली त्यातून जो मेसेज गेला तो महत्वाचा आहे. आता पाकिस्तानने विमानं पाडली काय, सीमेवर गोळीबारी केली काय.
त्यांची जी बेइज्जती झाली त्याला तोड नाही. दर वेळेला पुरावे देऊनही पाकिस्तानने कानावर हात ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा धाक दाखवणे, अमेरिकेच्या जिवावर कारवाई करायला प्रतिबंध घालणे हे सर्व भारत धुडकावून लावू शकतो आणि पाकिस्तानच्या बाजूने कुणीही येत नाही हा तो मेसेज आहे.

आता खरंच युद्ध पेटलं तरी त्याने काही फरक पडत नाही. युद्ध लांबले कि खूप कंटाळवाणे वाटते मला तरी. रशिया आणि युक्रेन युद्धाचा दोनच दिवसात कंटाळा आलेला.

फक्त इथे आपण स्वतः असल्याने दोन्ही देशांनी सम़्ंजसपणा दाखवून योग्य वेळी थांबणे गरजेचे वाटते.

>>>>दोन्ही देशांनी सम़्ंजसपणा
पाकिस्तानची आयडेंटिटीच भारताचा द्वेष आहे. त्यांचेकडेही विचारवंत आहेत परंतु जास्त करुन धार्मिक आणि मागासलेल्या विचारांचाच पगडा आहे.

फक्त इथे आपण स्वतः असल्याने दोन्ही देशांनी सम़्ंजसपणा दाखवून योग्य वेळी थांबणे गरजेचे वाटते. >>> तुला पाकिस्तानने समंजस दाखवावा असं म्हणायचं आहे असं समजते. कारण भारतानं वेळोवेळी समंजसपणा दाखवला आहे असं तुझ्या पोस्टमधून वाटतंय. ऑपरेशन सिंदूर देखिल फक्त अतिरेकी स्थळांवर हल्ले करून समंजसपणा दाखवला आहे. भारत इतकी वर्ष 'समंजस' आहे म्हणून पाकिस्तानचं फावलं आहे.

मला असं म्हणायचंय कि युक्रेन आणि रशिया हे युद्ध तार्किकतेच्या पलिकडे गेलेले आहे. युक्रेनचा सर्वनाश होऊनही इगो मुळे कुठे थांबायचे हे समजत नाहीये. रशिया महासत्ता असला तरी या युद्धात रशियाची प्रतिमा धुळीला मिळाली आहे. छोट्या राष्ट्राशी एव्हढे क्रूरपणे युद्ध करणे, त्यातूनही इतका काळ निर्णायक विजय न मिळणे आणि तरीही थांबायला ते तयार नाहीत.

आपले पाकशी युद्ध झालेच तर असे प्रदीर्घकाळ चालू नये. यासाठी दोन्हीही देश समंजसपणा दाखवून वेळेत थांबतील असे वाटते.

बातम्यात तर दाखवत आहेत, पाकिस्तानी ड्रोन्स का मिसाईल्सला आपले मिसाईल्स काउंटर अटॅक करताना.

हल्ला झाला त्याच दिवशी सकाळी माझ्याकडे आकाश मिसाईल्सची कामगिरी सांगणारे व्हिडीओज आले होते. पाकचे एफ १६ आणि एक चिनी फायटर जेट आकाश ने पाडले. काही मिसाईल्स हवेत नष्ट केली हे त्या व्हिडीओत स्पष्ट दिसत होते. पण मला ते इथे कसे द्यावे हेच कळत नाही.
व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्विस वापरून लिंक इथे देऊ असा विचार केला पण इकडे यायलाच जमले नाही.

लल्लनटॉपच्या वरच्या लिंकमधे बरंच अघळपघळ असलं तरी स्पष्ट सांगितलेय. बाकीचा देशी मीडीया पण बढा चढाके असल्यने त्याच्या लिंका देत नाही. रॉयटर, सीएन एन, बीबीसी वर खूप त्रोटक आहे. बोल भिडू गावरान भाषेत आहे पण त्यांचे रिपोर्ट्स बर्‍यापैकी न्युट्रल वाटतात.

आज एक व्हिडीओ आला. त्यात मोदीजी "युद्ध किसी भी समस्या का उत्तर नही है " असं काहीतरी पुतीन यांना सांगत आहेत.
हा सार्कस्टिक असावा. म्हणजे तसे म्हटलेत खरे. पण आता असे व्हिडीओ सर्क्युलेट करून तसे करणार्‍यांना काहीच फायदा होणार नाही.
सध्या मोदी हिरो झाले आहेत आणि असे चिमटे काढून त्यांना काहीही फरक पडणार नाही.
राजकारणासाठी संयम दाखवावा जरा.

रानभुली, MEA च्या नुकत्याच झालेल्या परीषदेच्या ब्रीफिंग वरून असं वाटतंय की पाकिस्तानने सीमा भागात हल्ले केले आहेत. नक्की आकडा माहित नाही. पण भारतानं ते हल्ले परतवून लावले आहेत. या हल्ल्यामधे १६ सामान्य नागरीकांचा मृत्यू झाला आहे. म्हणून भारतानं लाहोरमधल्या मिलीटरी रडारवर हल्ला केला.
https://www.youtube.com/watch?v=28Zbfv9W82o

अंजली, तेच आहे लल्लनटॉपच्या रिपोर्ट मधे.
मी शीर्षक अर्धवट दिलंय. मोबाईलवरून दिल्याने पुढचं टायपायचा कंटाळा केला.

हे प्रेस ब्रिफिंग ऐकतोय.
उत्तर आणि पश्विम भारतातील कितीतरी ठिकाणी पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. Sad जे हल्ले भारतीय सेनेसे निश्क्रिय केले आहेत. ऐकून व्याप्ती वाढत्येय हे दिसतंय.

Pages