भाग १ - एक उपेक्षित सम्राट

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 07:27

काश्मीरमध्ये फिरण्यासाठी थोड्या वेगळया जागा शोधायच्या असतील तर एक नाव हमखास समोर येते 'मार्तंड मंदीर'. त्यासाठी फार प्रवास करायला लागणार नसतो, हैदरमधल्या ‘बिस्मिल’ गाण्यात दाखवलं होतं आणि इन्स्टा रील्स बनवायला चांगली
पार्श्वभूमी मिळते. हटकणारं फारसं कुणी नसतंच. कारण फारसं कुणी इथे येतंच नाही. पाम्पोरवरून श्रीनगरला जाताना रस्त्याच्या कडेला अवंतिपुरचे अवशेष बघितलेले असतात ना.

तर जे कुणी जातं मार्तंड मंदिराकडे, त्याला ASI ची पाटी दिसते. हे मंदिर ललितादित्य मुक्तापीडाने बांधलंय अशी. काश्मीरमधला राजा होता म्हणे.

मग कुणीतरी विचारतं -

"हा राजा होता त्याची राजधानी कुठे आहे, निदान राजवाडा तरी असेल ना एखादा?"

"नाही, माहीत नाही".

"म्हणजे एक राजा होऊन गेला. त्याने एवढं भव्य मंदिर बांधलं आणि तो इतिहासातून गायब झाला?"

"गायब नाही झाला. राजतरंगिणीत उल्लेख आहे त्याचा."

"कशात?"

"राजतरंगिणी - कल्हणाने लिहिलेला ग्रंथ. "

शाळेत संस्कृत घेतलं असेल तर हे नाव कानावरून गेलेलं असतं.

एखादा वाचक सांगतो

"अरुणा ढेरेंनी अनुवाद केलाय राजतरंगिणीचा मराठीत."

"अरे वा! छान छान"

आणि विषय इथेच संपतो.

भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान सुरुवात.

१६ एप्रिलला मार्तंड मंदिर येथे होते तासभर. जेव्हा इथे उत्सव वगैरे होत असतील तेव्हा किती वैभवशाली असेल हे मंदिर असे वाटून गेले.