सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
महाराष्ट्र शासन अनुदानित
महाराष्ट्र शासन अनुदानित शिक्षण संस्था सर
ओके, धन्यवाद.
ओके, धन्यवाद.
सर म्हणण्याची गरज नाही.
फक्त मराठी भाषा येते असे
फक्त मराठी भाषा येते असे जनगणनेत सांगावे अशी एक पोस्ट फिरते आहे. ती फेक आहे असं माहिती व जनसंपर्क कार्यालयाने फेसबुकवर लिहिलं. त्यावरच्या कमेंट्स वाचा.
६ व्हिडीओ कॅमेरे आणि शिवाय ४
चुकून इथे पोस्ट झाले.
जो पक्ष आणि त्याचे पाठीराखे
जो पक्ष आणि त्याचे पाठीराखे एक विशिष्ट अजेंडा ठेवून वाटचाल करीत आहेत आणि जो वेळोवेळी उघडही झाला आहे, , ज्यांचा खोटेपणा अनेकवार प्रत्ययास आला आहे, त्यांच्यावर पुनः पुन्हा विश्वास ठेवत राहणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेण्यासारखेच आहे याची खूणगाठ मराठीची काळजी असलेल्या प्रत्येकाने आताच बांधणे गरजेचे आहे.
"देशाच्या सर्वांगीण
"देशाच्या सर्वांगीण विकासांसाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठीत पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्वाची"
याचा पहिलीपासून त्रिभाषेचा काय संबंध? तसेच पहिली पासून किंवा पाचवी पासून, उरलेल्या भाषांचे संवर्धन याने कसे होईल?
आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या त्रिभाषा सूत्राचा हिंदीची सक्ती असा विपर्यास का करत आहेत? मुख्यमंत्र्यांनीच आता फडणवीसांना समजावून सांगितले पाहिजे की हिंदीची सक्ती नाही, नाही, नाही. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणुन निवडता येते, तेव्हा विपर्यास न करता फक्त त्रिभाषासुत्रावर बोला.
मातृभाषा आणि भारतीय भाषा एका
मातृभाषा आणि भारतीय भाषा एका पिशवीत भरल्यात. हिंदीला विरोध म्हणजे जणू मातृभाषेला विरोध. मूळ भाषण ऐकून नक्की काय म्हणालेत ते शोधता आलं तर पाहतो.
मी शिक्षणक्षेत्रातल्या गमतीजमती धाग्यात सगळ्यात आधी याबद्दलच लिहिलंय.
भारतीय भाषांतून पुढे जाण्यासाठी लागणारे कोणते ज्ञान मिळणार आहे?
किमान दोन भारतीय भाषा शिका. यात हिंदी सक्तीचा भाग आलाच. पण विदेशी भाषा शिकणारे देशद्रोही असं म्हणायची ही पहिली पायरी आहे.
फडणवीसांना पहिली पासूनच हिंदी
फडणवीसांना पहिली पासूनच हिंदी का शिकवायची ते समजतं नाही. नको त्या गोष्टीचा अट्टहास चालू आहे.
फडणवीसांची मातृभाषा कोणती हा
फडणवीसांची मातृभाषा कोणती हा प्रश्न आधी सोडवा. हिंदी असावी म्हणून ते मातृभाषा आणि भारतीय भाषा एका पिशवीत भरत असतील.
ते भाषण कुठे केलय हे वाचल्यावर ते असे का बोलले असतील ते उघड आहे.
अण्णा आंदोलन चालू असताना
अण्णा आंदोलन चालू असताना अण्णांचे जनलोकपाल नको म्हणून एक आंदोलन दिल्लीत चालू होते. त्या आंदोलनाची दखल फक्त एका इंग्रजी वाहिनीने घेतली. हिंदी वाहिन्या बिलकुल फिरकल्या नाहीत.
इंग्रजी वाहिन्या त्या वेळी 2% जनता पाहतात असे निरीक्षण होते. हिंदी वाहिन्या बहुसंख्य लोक बघायचे. आताचे माहिती नाही.
हिंदीच्या सक्ती मागे कदाचित हे देखील एक कारण असे शकते.
Pages