Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माऊई आणि काकडी
माऊई आणि काकडी
मिनिला नेमके काय झाले हे बघण्यासाठी मागे स्क्रोल करून आले होते, आता कळाले. लवकर बरे वाटू दे. मादीचे spay आणि नराचे neuter असते. न्यूटर बाहेरून असते बऱ्यापैकी पण Spay करताना दोन्ही ओव्हरीज आणि गर्भाशय काढून टाकतात, Hysterectomy च असते एक प्रकारे म्हणून लेकींना जास्त त्रास होतो. पण लवकरच वाटेल बरं.
धन्यवाद प्रज्ञा , देवकी आणि
धन्यवाद प्रज्ञा , देवकी आणि अस्मिता..
हो हो, spaying च ते. पण इथे vet पण तिला न्यूटर केले असेच म्हणतात, त्यामुळे मी तोच शब्द वापरला.
नवीन पद्धत वापरली म्हणाले, पोटाच्या खाली नाही तर साईड ला कट आहे आणि खूपच छोटा कट आहे. विरघळणारे टाके घेतलेत.
साईड ला कट आहे आणि खूपच छोटा
साईड ला कट आहे आणि खूपच छोटा कट आहे. विरघळणारे टाके घेतलेत.
>>> किती बरं केलं. त्यांना सांगता येत नाही म्हणून आपल्याला काळजी वाटत राहते. कोकोनटचे न्युटरींग आठवले मला.
गेट वेल सुन, मिनी !
गेट वेल सुन, मिनी !
>>>>विरघळणारे टाके घेतलेत.
>>>>विरघळणारे टाके घेतलेत.
बरे झाले.
असाच रॅंडम फोटो … मी टिव्ही
असाच रॅंडम फोटो … मी टिव्ही पहातो आणी सिंबा माझ्याकडे :हाहा
एकदम हिरो दिसतोय सिंबा..!
एकदम हिरो दिसतोय सिंबा..!
Handsome Simba!
Handsome Simba!
पहिल्यांदा चेहऱ्यावर भक्तीभाव निथळताना वाटला.परत पाहिले तर अरे चला भावा खेळायला,पुरे कर तो t.v. टाईप भाव वाटले.
कसला क्यूट फोटो आहे. सिंबा
कसला क्यूट फोटो आहे. सिंबा एकदम देखणा आहे
मागचे माऊई आणि ऑस्करचे फोटोज पण मस्त.
कोकोनट दिसला नाही इतक्यात.
आज सगळ्यांचे इंस्टा फोटो
आज सगळ्यांचे इंस्टा फोटो व्हिडिओ पाहिले
माव्या आणि ओश्कु तर फुल्ल कॉमेडी कार्टून आहेत
ते रंगीबेरंगी बेल्ट घालून कसले हुंदडत आहेत
अंजली
अंजली


दोनचार दिवसांपूर्वी पाऊस येऊन गेल्यावर वॉकला जाताना गवतावर लोळण्याची हुक्की आली. सगळी पाठ ओलसर झाली.
१. आधी गवत चेक केले, म्हणजे काय ते त्यालाच माहीत.
२. मग पोझिशन घेऊन सुरू केले.

३. घरी आल्यावर- मेरा वचनही है शासन - बाहुबली पोझ.
आधी गवत चेक केले, म्हणजे काय
आधी गवत चेक केले, म्हणजे काय ते त्यालाच माहीत >> मला माहित आहे अनुभवाने!! ते सगळ्यात स्मेली( आपल्या भाषेत दुर्गंधीवाला) स्पॉट शोधतात आणि मग तिथे लोळतात! येताना तो घाणेरडा वास अंगावर घेऊन येतात. माउई असे वास घेऊन ठराविक जागी लोळताना दिसला की मी लगेच उठून ड्राय शँपू ची बॉटल शोधते. त्याची गरज पडतेच
धन्यवाद दीपांजली आणि सामो
धन्यवाद दीपांजली आणि सामो
मिनी बरीच बरी आहे आता.
कट च्या वर एक गाठ लागतेय हाताला, पण तिला दुखत नाहीय. सोमवारी vet ना दाखवते.
मिनी बरीच बरी आहे आता.....
मिनी बरीच बरी आहे आता..... छान!
>>>>>>कट च्या वर एक गाठ
>>>>>>कट च्या वर एक गाठ लागतेय हाताला,
आई ग्ग!!!
-------------------------
सिंबा हॅन्डसमच आहेच.
---------------------------
कोकुनट किती च्वीट!
>>>>>>>> ते सगळ्यात स्मेली( आपल्या भाषेत दुर्गंधीवाला) स्पॉट शोधतात आणि मग तिथे लोळतात!
हाहाहा
किती गोड तो आमचा नारळ ,
किती गोड तो आमचा नारळ , सोफ्यावरही मस्तं पहुडलाय!
ऑश्कु पण हेच करतो , माउवीही.. लोळून आले के they smell like shit , थोडक्यात ते परफ्युम मारून येतात आणि घरी आल्यावर दुष्ट आया तो परफ्युम पुसतात
>>>>>>>>>थोडक्यात ते परफ्युम
>>>>>>>>>थोडक्यात ते परफ्युम मारून येतात आणि घरी आल्यावर दुष्ट आया तो परफ्युम पुसतात Biggrin
हाहाहा सही. खरच असेलही तसे.
आमच्याकडे जेवण झालं की
आमच्याकडे जेवण झालं की सिंबाला आम्ही सांगतो जा बाहेर जाऊन तोंड पुसून ये, तो देखील बाहेर जाऊन लॅानवर तोंड पूसून येतो … फक्त पाऊस पडत असला तर मग त्याच्या कारपेटवर जाऊन पुसतो. सकाळी सकाळी त्याची आई ( माझी बायको) त्याचे तोंड पुसते ओल्या टिशूने … त्याला आवाज दिला की गुमान तीच्या समोर ऊभा राहून तोंड पुसून घेतो. तोंड पुसणे हा कार्यक्रम फक्त आईनेच करायचा, दुसरं कुणी प्रयत्न केला की टीशू घेऊन पळून जातो .
डोळ्यापुढे आले हे सगळे...
डोळ्यापुढे आले हे सगळे...

डोळ्यावरची काकडीच गायब झाली >
डोळ्यावरची काकडीच गायब झाली >>
अरे, ते स्मेलचे असे शास्त्र
अरे, ते स्मेलचे असे शास्त्र आहे का ? मला वाटायचं आपलाच वास शोधत असतात आणि सापडला की लोळतात. कोकोनटला सुगंधाचा कुत्र्यांचा स्प्रे ही आणला आहे, कोकोनट सेंटच आहे योगायोगाने. शाम्पूही कोकोनटचा होता तो संपला हल्लीच. तो स्प्रे मारला की तो वेड्यासारखे कार्पेटवर लोळून वास पुसून काढतो. त्यांना आपल्या गंधाचा फार अभिमान असतो. वेड्यांचा बाजार बघायला मिळतो.
स्नान झाल्यावर तर zoomies येतात. कुठेही सैरावैरा पळायचे.
खारूताईचे निरीक्षण -

हो आंघोळ केल्यावर तर लगेच दार
हो आंघोळ केल्यावर तर लगेच दार उघडून दे म्हणून मागे लागतो माउई. कधी एकदा बाहेर जाऊन लोळतोय आणि हा साबणाचा बेकार वास घालवून गवतात ससे- खारींच्या सुगंधी लेंड्यांमधे लोळून येतो असे झालेले असते.
हो त्यांना कुठलाही कृत्रीम
हो त्यांना कुठलाही कृत्रीम वास नको असतो… सिंबाला पण freshness spray मारला कि आधी लॅान वर जाऊन लोळून तो वास पुसायचा असतो. मला वाटतं हे कॅामन आहे मग ब्रीड कुठली का असे ना.
सगळ्या पोस्टी वाचून प्रचंड
अर्थात या बाळाच्या आईबाबांना जामच त्रास होत असणार बाळांच्या असल्या सवयींचा याची जाणीव आहे.
रमड +१ मीही अगदी हाच विचार
रमड +१ मीही अगदी हाच विचार करत होते.
कोकोनट चे फोटो बघून "दूध सी
कोकोनट चे फोटो बघून "दूध सी सफेदी, निरमा से आये," हे गाणे माझ्या मनात वाजू लागते...
माऊ इ, सिंबा , ऑस्कर डोळ्यासमोर आले, आया परफ्यूम घेऊन मागे पळत आहेत आणि ते चिखल शोधत पुढे पळत आहेत...
देवकी, धन्यवाद, मिनी आता एकदम ओके आहे..
माऊ इ, सिंबा , ऑस्कर
माऊ इ, सिंबा , ऑस्कर डोळ्यासमोर आले, आया परफ्यूम घेऊन मागे पळत आहेत आणि ते चिखल शोधत पुढे पळत आहेत...>>>
आया परफ्यूम घेऊन मागे पळत
आया परफ्यूम घेऊन मागे पळत आहेत आणि ते चिखल शोधत पुढे पळत आहेत. >>
सगळी बाळे मस्त आहेत एकदम गोड गोड!
मला वाटते ते त्यांचे नॅचरल इन्स्टिंक्ट असेल. शिकारी प्राण्यांपासून वाचण्यासाठी
हो त्यांचा नॅचरल वास ही
हो त्यांचा नॅचरल वास ही त्यांची आयडेंडीती असते
आणि ती आपल्याला नकोशी वाटली तरी त्यांना हवी असते
इतर भुभ्यंशी कम्युनिकेशन करायला
आपले सेंटेड भुभु इतरांच्यात गेल्यावर ते म्हणत असतील काय वास मारून राहिलाय बे
जा जरा चिखलात मातीत लोळून घे की
>>>आपले सेंटेड भुभु
>>>आपले सेंटेड भुभु इतरांच्यात गेल्यावर ते म्हणत असतील काय वास मारून राहिलाय बे Happy
जा जरा चिखलात मातीत लोळून घे की
कसली हसले
Pages