निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
स्वाती मधे मी एक आकडेवारी
स्वाती मधे मी एक आकडेवारी बघितली होती जिथे सँक्चुरी सीटी मधे होणारा क्राईम कमी होत आहे ( absolute as well relative figures). मला पटकन लिंक सापडत नाहिये. पण हे
https://www.congress.gov/119/meeting/house/118126/documents/HHRG-119-JU0...
बघितल्यावर (नि हे कुठून आले आहे हे बघितल्यावर) हा सारा खटाटोप नक्की सांगितल्या गेलेल्या कारणासाठीच आहे असे ठामपणे धरता येईल का ?
https://counciloncj.org/trends-in-the-lethality-of-crime/ ह्यात पुढे घुसले कि बरेच प्रश्न सुटत जातात.
असामी, जे काही सुरु आहे ते
असामी, जे काही सुरु आहे ते योग्य नाहीच आहे पण लंबक दुसर्या बाजूला टोकाला गेला होता हे देखील नाकारता येत नाही. आणि क्राईम म्हणजे केवळ व्हायलंट क्राईम असे नसते ना! नियम धाब्यावर बसवून बरेच काही चालते आणि चालवून घेतले जाते हे देखील सत्य आहेच ना. 'जे घडते ते चुकीचे' हे देखील बोलायचे नाही वर परत 'ते' कसे हार्डवर्किंग, ऑनेस्ट तर मग लोकांच्या मनातही आपल्यावर अन्याय होतो हे पक्के होते.
लंबक दुसर्या बाजूला टोकाला
लंबक दुसर्या बाजूला टोकाला गेला होता हे देखील नाकारता येत नाही. >> मान्य पण तो जेव्हढ्या वेळा गेलाय असे सांगीतले गेले तेव्हढा खरच गेला होता कि त्याचा बागुलबुवा दाखवून ह्या टोकाचे त्या टोकाला नेणे सुरू आहे ? एक उदाहरण देतो. इथे शेंडे नक्षत्र हा आय्डी बे अरीयामधल्या भयाण परिस्थ्तीबद्दल जे काही बोलत असतो तेच मी इथल्या एका स्थानिक भारतीयाकडून ऐकले आहे. रॅदर तात्याच्या पहिल्या टर्म दरम्यान वरचेवर ऐकत असे. कोव्हिडनंतर त्याने जॉब बदलला नि तो कंसल्टंट म्हणून फिरू लागला. तो गेले एक - दीड वर्ष महिन्यातून दोनदा बे एरीयामधे जातोय गेले एक वर्षभर नि त्याला अजून एकही वावगा अनुभव आलेला नाही. ह्या समरमधे तो पॅरेंट्स ना घेऊन सॅन फ्रॅसिस्कोमधे आठवडाभर काढून आला. त्याला ह्या विसंगतीबद्दल विचारल्यावर ह्यॅ ह्यॅ ह्यॅ करून वेळ मारून नेली. थोडक्यात त्याची ऐकिव माहिती नि अनुभव ह्यात प्रचंड तफावत होती. त्याच्यासारखे अनेज जण ह्या ऐईव माहितीवर विसंबून असतील ह्याचा गैर फायदा घेतला जातो असे वाटतेय.
Netflix चा काय घोळ आहे?
Netflix चा काय घोळ आहे?
एक पाप दुसर्^या पापाचे समर्थन
एक पाप दुसर्^या पापाचे समर्थन करत नाही
https://www.azcentral.com
https://www.azcentral.com/story/entertainment/life/2025/10/01/netflix-ca... लिबरल लोकांनी डिस्नी, abc इ. कॅन्सल केलं तर मागा लोकांना फोमो आला. मग २०२२ ला आलेल्या आणि २०२३ ला कॅन्सल केलेल्या शो वर मस्क बाबाने कमेंट केली. त्यात प्रोटेगनिस्ट ट्रान्स आहे, तो तसा असल्याने तुमच्या लहान मुलांना वाचवण्यासाठी तुम्ही Netflix कॅन्सल करा. काही मेंढरं गेली मागे. काही विशेष झालेलं नाही. २% शेअर डिप झालाय, संधी ही मानू शकता. अर्थात सध्या गगनाला आधीच भिडलेला आहे, त्यामुळे जपूनच.
त्यात रीड हेस्टिंग डेम सपोर्टर आहेच. कॅलि डिस्ट्रिक्ट रिस्टकचरिंगला त्याने २ मिलियन डोनेशन ही दिलं होतं.
माझा आणि माझ्या कुटुंबाचा
माझा आणि माझ्या कुटुंबाचा अनुभव हा मिडवेस्ट पुरता आहे. इथे लोकांचे म्हणणे - क्राईम वाढला नाही वगैरे बोलूच नका. लाच देवून परीक्षा वगैरे न देता ड्रायविंग लायसन्स मिळवली हा क्राईम नाही का? मध्यंतरी आमच्या भागात बरीच मंडळी कॅलिफोर्नियातून आली. काही काळ बरे चालले होते. मग त्यांचेच काही बांधव डंकी मार्गाने येवून भारत सरकार अन्याय करते असा क्लेम करुन स्थिरावले. मग एक लिगल व्यक्ती ओनर आणि बाकीचे कामाला इल्लिगल असे सुरु झाले. इतके दिवस स्थानिक ट्रकर चालत होते आणि नंतर एकाएकी ते सगळे निकम्मे आणि यांचे बांधव हार्डवर्किंग? इल्लिगल लोकं सीडीएल लायसन्स शिवाय मोठे ट्रक चालवत असतील तर जॉब नसलेले स्थानिक लोकं तक्रार करणारच ना! मग आईसच्या धाडी पडून पकडापकडी झाली. हॉस्पिटॅलिटी, वेअर हाऊस, हाऊसकिपिंग वगैरे सगळीकडे हेच आहे. एकेकाळी स्टुडंट मंडळीबद्दल आक्षेप नव्हता उलट मदतच करत मात्र आता हे लोकं कायदा मोडून ऑफ कँपस जॉब घेतात कारण मोटेल, सबवे , गॅस स्टेशन यांच्या भाईबंदांची, लिगल स्टुडंटना हायर करत नाहीत. इथे काय कुणी बाहेरचे नकोच म्हणत नाहीये. अगफगाण रिफ्युजींना सामावून घ्यायची तयारी सगळ्यांनीच दाखवली होती. आमच्या भागात ते म्यानमार रिफ्युजींना लिजने शेती वगैरेसाठी मदत वगैरे झाली आणि ते स्थिरावले तर कुणालाच प्रॉब्लेम नव्हता. पण कमी पगारावर इल्लिगल काम करतात आणि तुम्हाला लिगल रेटवर काम नाही, वर परत त्यांना ऑनेस्ट, हार्डवर्किंग म्हणून पाठिशी घातले जात असेल तर लोकं आईसची तळी उचलणार. ओबामा काळातली, बायडन काळातली रिमुवल ऑर्डर असताना देखील वेड्यासारखे निदर्शने होत असतील, डेमोक्रॅट्स कडून अधिकृत स्टेटमेंट येत नसेल तर जनमत अजूनच दुसरीकडे झुकते. त्याचा गैरफायदा घेतला जातो का? नक्कीच! पण मग हे थांबावे म्हणून एक पोलीटिकल पार्टी म्हणून समोरुन योग्य डावपेच का नाहीत? इंडीपेंडंट वोटर म्हणून मला तरी हताश वाटते.
स्वाती बाप रे!! हे सारे माहीत
स्वाती बाप रे!! हे सारे माहीत नव्हते. अज्ञानात सुख.
बाकी असायलमच्या नावाने बरेच भारतातून, लोक येतात व सुखेनैव अमेरिकन नागरिक बनतात - त्याचे करा काहीतरी. नक्की काय दमन आहे भारतात? फक्त आपली पोळी भाजण्याकरता, भारताला बदनाम करायचे. आणि जिथे खरच दमन आहे, तिथल्या लोकांना अमेरिकेत येण्याचे मार्ग आहेत का खरच?
लांड्यालबाड्या नुसत्या.
आय होप 'लांड्या' शब्द सामाज वाचक डेरोगेटरी शब्द नाही. असल्यास क्षमस्व.
स्वाती२, सहमत आहे. याच
स्वाती२, सहमत आहे. याच कारणासाठी एचवनवर जास्त निर्बंध घालण्याच्या निर्णयाला माझा ही पाठिंबा होता.
इथल्या मुलांना, नव्या पिढीला जॉब उपलब्ध करुन न देता बाहेरुन माणसे आणणे याचं जराही समर्थन नाही. इल्लीगल इमिग्रंट्सइबद्दल हळवा कोपरा नाही. जॉब मार्केटमधे गरज असेल तर एचफोरना वापरुन घ्यावे. अन्यथा अजिबात काही करायची गरज नाही. चीप लेबर म्हणून कधी, किती, कुठे आणि कसे आणावे हा मात्र मिलियन डॉलर प्रश्न आहे.
अमेरिकेत फेडरल मिनिमम वेज अजुनही जगात सर्वात कमी आहे. कॅनडात मिनिमम वेज १८ आहे, अमेरिकेत ते अजुनही ७.२५ डॉलर आहे. जे सस्टेनेबल नाही. आता त्या रेटवर लीगल मिळाले नाही म्हणजे त्यांना कामच नको आहे असं नाही, तो रेट सस्टेनेबल नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यावर टाको काही करणे शक्य नाही.
बहुतेक भारतीय रेफ्युजी माझ्या डोक्यात जातात, त्या प्रकाराला अजिबात थारा देऊच नये. भरपूर स्क्रूटिनी करावीच करावी. पण ती करायला वेळ आणि मनुष्यबळ लागते.
>>>>बहुतेक भारतीय रेफ्युजी
>>>>बहुतेक भारतीय रेफ्युजी माझ्या डोक्यात जातात, त्या प्रकाराला अजिबात थारा देऊच नये. भरपूर स्क्रूटिनी करावीच करावी. पण ती करायला वेळ आणि मनुष्यबळ लागते.
मान्य आहे.
Asylum and refugee programs are based on a well-founded fear of persecution due to factors like race, religion, nationality, political opinion, or membership in a particular social group, which include situations like war, violence, conflict, or serious human rights violations.
<<<क्राईम वाढला नाही वगैरे
<<<क्राईम वाढला नाही वगैरे बोलूच नका. लाच देवून परीक्षा वगैरे न देता ड्रायविंग लायसन्स मिळवली हा क्राईम नाही का? >>>
अर्थातच. इतकेच काय, काही काही लोक हायवेवर ६५ ची स्पीड लिमिट असूनाहि, ६६, ६७ इतकेच काय ६८ नेहि गाडी चालवतात!
या असल्या गुन्ह्यांना आळा घालायला रणगाडे, मिसायली, ड्रोन इ. सह लष्कराचे सात आठ बटॅलियन्स न्यायला पाहिजेत.
कारण, सध्याचे जे पोलिस वगैरे आहेत तिथे, त्यांना काही करता येत नाही. मला वाटते डोज आणून हे सर्व पोलिस हाकलून दिले पाहिजेत, पैसे वाचतील. सगळीकडे लष्करच पाहिजे.
डोंबलाचं लष्कर! १५-१६ आईसचे
डोंबलाचं लष्कर! १५-१६ आईसचे हट्टेकट्टे जवान एका सायकलचा पाठलाग करू शकत नाहीत. असलं फोफसं लष्कर आहे तुमचं!
माझ्या मते, हाउस नि सिनेट
माझ्या मते, हाउस नि सिनेट दोन्ही बरखास्त करावेत. नालायक नि निरुपयोगी लोक आहेत ते. आता शटडाऊन, मग लष्कराला सुद्धा पगार नाही, आईसला पगार नाही मात्र सोशल सिक्युरिटीला पैसे द्यायचे! काय हे?
राज्यकारभार धड करता येत नाही त्यांना.
शेवटी सगळे त्रंप्यालाच करावे लागते. मग करायचे काय पोलिस, काँग्रेस, शेरिफ वगैरे? खरे तर कोर्ट, न्यायाधीशसुद्धा नको, त्रंप्याला सगळे काही येते नि माहित आहे.
सगळीकडे लष्करच आणायचे. त्रंप्या म्हणेल त्याला पैसे, बाकीच्यांना नाही.
मेक अमेरिका ग्रेट (डिक्टेटर्शिप) अगेन!
"इल्लीगल इमिग्रंट्सइबद्दल
"इल्लीगल इमिग्रंट्सइबद्दल हळवा कोपरा नाही. " +१
माझा आक्षेप, 'इमिग्रंट्स' ना सरसकट 'इल्लीगल' म्हणण्याला किंवा 'इमिग्रंट्स' आणि 'इल्लीगल्स' हे इंटरचेंजिएबली वापरण्याला आहे. मधंतरी एक ट्रक अपघात झाला. तेव्हा फॉक्स च्या सगळ्या बातम्या आवर्जून 'इमिग्रंट ड्रायव्हर' असा उल्लेख करत होत्या. (तो लीगल होता किंवा नव्हता हे समजलंच नाही). त्यातून त्या अपघाताचा सगळा फोकस तो ड्रायव्हर इमिग्रंट असण्यावरच गेला. नंतर त्या रुबियो (?) ने ट्रक ड्रायव्हर्स ना व्हिसा देणार नाही अशी घोषणा केली. जर इल्लीगल इमिग्रंटने गुन्हा केला असेल, तर त्यावर उपाय म्हणजे लीगल इमिग्रेशन रोखणे हा कसा असू शकतो? इल्लीगल इमिग्रेशन रोखायलाच हवं, अपात्र ड्रायव्हर्स ट्रकमधे असायलाच नको - हे मान्य. पण आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी प्रकार नको.
बाकी असायलमच्या नावाने बरेच
बाकी असायलमच्या नावाने बरेच भारतातून, लोक येतात व सुखेनैव अमेरिकन नागरिक बनतात ->>> +१
त्या हरजीत कौर आजी च्या मुलाखती बघुन असच वाटल...किती ती एन्टायलमेन्ट!! जस काय अमेरिकेत राहण हा याचा हक्कच आहे..७३ व्या वर्शी डिपोर्ट होताना जे काय हाल झाले त्याबद्दल निश्चित सहानभुती आहे पण बाकी सगळ्याला गोलमाल उत्तर येत होती..कधी गेल्या कशा गेल्या तर म्हणे नक्की आठवत नाही, सब जा रहे थे तब गये थे.
माझा आणि माझ्या कुटुंबाचा
माझा आणि माझ्या कुटुंबाचा अनुभव हा मिडवेस्ट पुरता आहे. >> स्वाती तुझ्या अनुभवातून फेफ म्हणतोय तसे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी प्रकार होतो हे दिसते आहे.
जर इल्लीगल इमिग्रंटने गुन्हा
जर इल्लीगल इमिग्रंटने गुन्हा केला असेल, तर त्यावर उपाय म्हणजे लीगल इमिग्रेशन रोखणे हा कसा असू शकतो?>>> शाळेत असताना पाठ्यपुस्तकात विंदाचा 'आतले आणि बाहेरचे' या शिर्षकाचा एक धडा होता. ज्यांनी कुणी तो वाचला त्याला अशा उपायांमागच्या मानसिकतेचे कोडे कधीही पडणार नाही.
फाविदडि - विस्कटून सांगता का?
फाविदडि - विस्कटून सांगता का? नाही कळलं. आपण लीगल इमिग्रंट आहोत, म्हणून इल्लीगल इमिग्रंट्सना विरोध करू नये अश्या अर्थाचं का ही आहे का?
आतले बाहेरचे म्हणजे आधी आलेले
आतले बाहेरचे म्हणजे आधी आलेले लोक त्याच मार्गाने नंतर आलेल्या लोकांना विरोध करतात. इ. इ.
विंदांच्या धड्यात ट्रेनचं उदाहरण होतं ते आठवतं. आपल्याला गाडीत शिरायला मिळेपर्यंत 'चला आत शिरा, होईल जागा' म्हणणारे आत शिरले की नव्या लोकांना 'आता जागा नाही पुढच्या डब्यात जा' सांगतात.
ते उदाहरण गंमत/ मानसिकता म्हणूनच ठीकच आहे. पण त्यात काहीही चूक नाही. ते स्केलेबलही नाही, आणि स्केलेबल करायचा प्रयत्न तर त्याहुन करू नये, किंबहुना ते तसंच हवं. नाहीतर मुंबई होते.
मी लीगन इमिग्रंट आहे, पण धरसोड - बेलगाम प्रकारे लीगल इमिग्रेशनला ही माझा विरोधच असेल. माझी मुळं इथे रुजली. मी आता आतला बनलो. अनसस्टेनेबल पगार देऊन चीप लेबर आणून इथल्या माझ्या मुलांना जॉब मिळणार नसेल तर माझा पाठिंबा असण्याचा सवालच निर्माण होत नाही. + मी आलो तेव्हा लोक असिमलेट व्हायची. आता हे माझ्या वयाचे/ म्हातारपणाचे लक्षण वाटू शकेल... पण हल्लीच्या इमिग्रंट्सना जबाबदारीची जाणिवच नसते. बेदरकार प्रकार करतात, कारण ते शिकलेले, सुसंस्कृत नसतात. अशा चीप लोकांना कशाला आणायचं?
त्या ड्रायवर बद्दल बातमीत
त्या ड्रायवर बद्दल बातमीत इल्लिगल असे सांगत होते की! ज्या व्यक्तीला अमेरीकेत काम करायला परवानगीच नाही तिला कॅलिफोर्नियाने सीडीएल दिले म्हणजे धन्यवादच. आता हायवे वर युटर्न घेतल्याने अपघात झाला, मृत्यू झाले तर त्याला फेअर ट्रीट करा, दया दाखवा म्हणून सह्यांची मोहिम तर त्यात २ की ३ मिलीयन लोकांनी पाठींबा दिलाय. काय तर म्हणे इंटेंशनल नाही ट्रॅजिक अॅक्सिडेंट. हायवेवर कोण यू टर्न घेतं ? ते देखील मोठ्या ट्रकचा?
न्युजर्सीमध्ये असेच काही
न्युजर्सीमध्ये असेच काही काळात आलेल्या इल्लीगल लोकांना ड्रायव्हर लायसन्स (सीडीएल बद्दल माहित नाही) मिळालेलं आहे. आणि ते रिन्यू ही होतं.
बाकी अमेरिकेचे ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम एकुण धन्यवादच आहेत. माझ्या कॅनडाच्या लायसन्सवर मी कितीही काळ (एकावेळी ६ महिने) गाडी चालवू शकतो. पण मी टीएन नॉन इमिग्रंट व्हिसावर आलो तेव्हा रिडिक्युलससी कमी वेळ (काहीतरी सात दिवस का काही) फक्त कॅनडाच्या लायसन्सवर गाडी चालवू शकतो. अमेरिकेत येऊन एसएसएनला अप्लाय करुन एसएसएन मिळे पर्यंतच महिना जातो. डीएमव्ही एसएसएन आल्याशिवाय उभं ही करत नाही. कॅलिफोर्नियात तरी कॅनडाचे लायसन्स एक्चेंज करुन कॅलिफोर्नियाचे मिळत नाही. अनेक मिडवेस्ट राज्यांत मिळते. त्यामुळे कॅलिफोर्निया डिएमव्ही मध्ये नॉलेज टेस्टची अपॉइनमेंट एसएसएन नंतर घ्या. मग बिहाईंड द व्हील ची मिळेल तेव्हा घ्या आणि मग तुम्हाला लायसन्स मिळते. त्यात मला आठवतं, त्याप्रमाणे तीन एक महिने गेले. तोवर माझी कॅनडाची गाडी ही आली न्हवती, त्यामुळे मी कॅनडाचय लायसन्सवर रेंटल घेऊन कॅनडाचं लायसन्स दाखवून तीन महिने गाडी चालवली. गाडी शिवाय रहाणे शक्यच न्हवते. कॅनडाचे लायसन्स दाखवून माझा इमिग्रेशन स्टेटस कळणे तेव्हा तरी दुरापास्त होते. ब्राऊन रंगाच्या माणसांनी पासपोर्ट घेऊन फिरा वगैरे तेव्हा सांगत नसत. त्यामुळे ती रिस्क घेणे तेव्हा तरी ठीक वाटले. आत्ताच्या काळात डिपोर्टेशनच झाले असते.
(No subject)
<<नव्या पिढीला जॉब उपलब्ध
<<नव्या पिढीला जॉब उपलब्ध करुन न देता बाहेरुन माणसे आणणे याचं जराही समर्थन नाही. >>
हे सगळे मायबोलीवर न लिहिता. गूगल, अमॅझॉन, मायक्रोसॉफ्ट इ. अमेरिकन कंपनीच्या मालकांना (डायरेक्टर बोर्डस, शेअरहोल्डर्स इ. ना) सांगा. तेच लोक त्यांना नोकर्या देतात.
तुम्हाला जेव्हढा अमेरिकन लोकांचा पुळका येतो, तेव्हढा त्यांना येत नाही, त्यांना फक्त पैसे मिळवणे हेच करायचे आहे. देश, देशातील बांधव गेले खड्ड्यात!
उगाच कुणी भारतीय कंपनी जबरदस्तीने आपले लोक या कंपन्यांत कामाला लाऊ शकत नाहीत.
आणि बेकायदेशीरपणे घुसणार्या लोकांना एखादा कायदेशीर अमेरिकनच नोकरीवर ठेवतो. तेंव्हा तो असा विचार करत नाही की काम मागणारा माणूस बेकयदेशीर आहे की कायदेशीर. तो फक्त कमी पैशात कोण काम करेल ते पहातो.
आंतर्देशीय समुद्रात जाऊन
आंतर्देशीय समुद्रात जाऊन दुसर्या देशाच्या बोटी बुडवण्यापेक्षा, स्वतःच्या देशातील लोकांना सांगा ड्रग्स घेऊ नका.
अर्थात हे होणे शक्य नाही कारण दोन्ही पक्षाच्या राष्ट्राध्य्क्षांची मुले ड्रग्स घेतात, भयानक मोठ्या प्रमाणावर लोक ड्रग्स घेतात.
हे न बघता सरळ बेकायदेशीरपणे ड्रग्स आणणार्यांना नावे ठेवायची.
त्यांना पकडणे कठिण, कारण कायदेच असे केले आहेत की कँपेनला पैसे देणार्याचे कितीहि गुन्हे असले तर त्यांना राष्ट्राध्यक्ष माफी देतात, पोलीस लाच खातात.
असे आहे गोर्या लोकांचे की आपले दोष नि त्याची जबाबदारी घेण्यापेक्षा दुसर्याला दोष द्यायचे.
मग लवकरच, लॅटिनो, भारतीय, चिनी वगैरे लोकांना पकडून अलिगेटर अल्काट्रॅझ मधे टाकायचे! जर्मनीत असेच झाले - ज्यू लोकांविरुद्ध एव्हढे भडकवले जनतेला की नंतर होलोकॉस्ट झाला.
आतले आणि बाहेरचे हा निबंध
आतले आणि बाहेरचे हा निबंध अनंत काणेकरांचा होता बहुतेक. विंदांचा नक्की नाही.
बाकी चालू द्या
आतले आणि बाहेरचे हा निबंध
आतले आणि बाहेरचे हा निबंध अनंत काणेकरांचा होता बहुतेक. विंदांचा नक्की नाही.>>> https://www.youtube.com/watch?v=BUmNebtD67U
ओह. चुकलं माझं.
ओह. चुकलं माझं.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/19ajheZjDi/
इल्लिगल इमिग्रंट्सना हाकललं की अमेरिकन लोकांसाठी जॉब्स वाढतील का?
उलट होतंय. इल्लिगल इमिंग्रट्स पैसे कमवतात आणि खर्च करतात, त्यामुळे अमेरिकन उप्तादनांसाठी मागणी निर्माण होते. त्यांना हाकललं की ही मागणी घटेल आणि त्यामुळे उलट जॉब्स कमी होतील.
हे लोक कॉम्प्लिमेंटरी कामं करतात. उदा : रेस्टॉरंटमधला किचन स्टाफ. ते गेले आणि त्यांच्या रिप्लेसमेंट मिळाल्या नाहीत की रेस्टॉरंट बंद. त्यामुळे वेटर्स इ. अमेरिकन लोकांच्याही पोटावर पाय.
असं अभ्यासातून दिसलं.
इल्लिगल इमिग्रंट्सना ठेवावं की हाकलावं यासाठी नाही, पण प्रत्येक गोष्टीचे इकॉनॉमीवर रिपल इफेक्ट्स होतात, ते असे.
---
नोटाबंदीच्या चांगल्या परिणामांची , उदा: काळा पैसा बाहेर येणे ; आम्ही पण खूप वाट पाहिली. त्याच्यामुळे डिजिटल व्यवहार , UPI वाढले हा फायदा सांगितला जातो. UPI e एप्रिल २०१६ मध्ये आलं. गुगल पे सप्टेंबर २०१७ मध्ये याकडे दुर्लक्ष करू.
त्यांना इतर कुणा कुणाची जरुरी
त्यांना इतर कुणा कुणाची जरुरी नाही.
सगळे लीगल इलिगल ब्राऊन स्किन ब्लॅक स्किन गेले की भ्रमाचा भोपळा फुटेल.
भरतने लिहिलेली परिस्थिती निर्माण झाली की एकतर इथल्या लोकांना पगार द्यावे लागतील किंवा लीगल लोक आणावे लागतील. अमेरिकन लोकांना जोवर त्रास होत नाही तोवर ऑरेंज बफून बदलणार नाही. आपण मज्जा बघायची.
<<असं अभ्यासातून दिसलं.>>
<<असं अभ्यासातून दिसलं.>>
आजकाल असा अभ्यास कुणि करत नाहीत. जे वाटते ते बोलायचे. टक्केवारी म्हणजे काय ते कुणाला कळत नसल्याने, १५० टक्के, १००० टक्के असे आकडे फेकायचे. अहो, अर्ध्याहून अधिक जनता महामूर्ख! नुसते पैसे देतो म्हंटले तरी मते देतील.
मग करायचा कय अभ्यास?
Pages