
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
* पळवा ! पळवा म्हणजे >>>> ही
* पळवा ! पळवा म्हणजे >>>> ही भारी पळतीय . . .
शब्दवेध व शब्दरंगच चालू आहे.
शब्दवेध व शब्दरंगच चालू आहे. अनवट नेहमीच्या प्रचारात नसलेले शब्द.
छान माहिती आहे.
दिवाळीच्या इतक्या पाकक्रिया
दिवाळीच्या इतक्या पाकक्रिया वाचल्या. पण कुणी "मोहन" वापरल्याचे वाचले नाही. का हल्ली "मोहन वापरात" नाहीये. का मी बरोबर वाचले नाही. गेले मोहन कुणीकडे?
* मोहन प्रत्यक्ष वापरले
* मोहन प्रत्यक्ष वापरले जाते पण तो शब्द वापरातून मागे पडला असावा !
“मोहन” आहे की “मोवन” ?
“मोहन” आहे की “मोवन” ?
माझ्यामते पीठ मळतांना मऊपणा आणण्यासाठी घातलेले तूप, तेल म्हणजे मोवन.
मोहन मुरलीवाला, तो वायला.
मोहन
मोहन
न. गूळ, खोबरें आणि वेलची वगैरे एकत्र करून ज्या करंज्या, मोदक इ॰ करतात त्यांत घालतात तें पुरण, चुकीनें तेल. मोवन, तूप. [मोवन]
दाते शब्दकोश
असाय होय ? मोहन ही मोवन निकला
असाय होय ? मोहन ही मोवन निकला !
गंगाधर ही शक्तीमान है.
दान नव्हे , कर्तव्य !
दान नव्हे , कर्तव्य !
"केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाऐवजी मतकर्तव्य या शब्दाचा स्वीकार करावा"
अशी मागणी परिवर्तन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे
(छापील मटा, 14 नोव्हेंबर)
महाराष्ट्रातील मतदारांना यंदा
महाराष्ट्रातील मतदारांना यंदा कर्तव्य आहे
महाराष्ट्रातील मतदारांना
महाराष्ट्रातील
मतदारांनामतकर्तव्यतत्परांना यंदा कर्तव्य आहे.. अजून अवघड करता आलं तर आणखीन पिवळं... सोन्याहूनहर्पा.
मोहन चर्चा मोहक.
मऊपणासाठीच असे नाही चकलीतले मोहन चकलीला खुसखुशीत बनवते.
बरोबर. आमच्या इकडे "मोहन"
बरोबर. आमच्या इकडे "मोहन" हलके पणा खुसखुशीत पणा आणण्या साठी वापरतात. बकिंग सोडा हे मोहन आहे का?
बेकिंग सोडा मोहन नाही, कारण
बेकिंग सोडा मोहन नाही, कारण मोहन म्हणजे मेद किंवा फॅटच असते सहसा. बेकिंग सोडा leavening agent आहे, ज्याने पिठ फुगते. मोहन न घालता नुसताच सोडा घातल्यास पदार्थ खुसखुशीत होणार नाही, कडकडीत होईल.
आणि मोहन घालणे म्हणजे उकळते
आणि मोहन घालणे म्हणजे उकळते/गरमागरम तेल घालतात ना.
तेलाला उत्कलन बिंदू नाही, ते
तुम्हाला माहिती असेलच तरीही सहज लिहितेय.
तेलाला उत्कलन बिंदू नाही, ते जळते. बॉयलिंग पॉइन्ट नाही, स्मोकिंग पॉइन्ट आहे फक्त. त्यामुळे गरम तेल म्हणता येईल. गोष्टींमधे नेहमी तसेच लिहून नाट्यमयता वाढवतात. मला अलिबाबा आणि चाळीस चोर आठवते.
Noted. कथा खुसखुशीत
Noted. कथा खुसखुशीत बनवण्यासाठी त्यात मोहन घालावे.
बरोबर अस्मिता.
बरोबर अस्मिता.
रच्याकने: पण आम्ही व्हॅक्युम टेक्नॉलॉजीवाले उकळवतो तेल व्हॅक्युम व्हेसल मध्ये. तेलाचा उत्कलन बिंदु (असतो पण स्मोकिंग पॉईंटच्यावर असतो.) त्याने खाली येतोच पण ऑक्सिजन फ्री वातावरण असल्याने स्मोकिंग होत नाही. (अत्यल्प प्रमाणात होते ही). खाद्य तेलाची शुद्धीकरणं, निर्गंधीकरणं प्रकिया.
इंट्रेस्टींग माहिती.
इंट्रेस्टींग माहिती.
इंडस्ट्रीयल कुकिंगच झाले हे.
कथा खुसखुशीत बनवण्यासाठी त्यात मोहन घालावे. >>
संस्कृत ही अत्यंत प्राचीन
संस्कृत ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. नंतर केव्हातरी पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहिले. तेव्हाच्या प्रचलित शब्दांनाच ते लागू होते. तेव्हाही बरेच शब्द जे वेदात आढळतात त्यांना ते लागू होत नाही. त्याला छांदस् असे म्हणतात. त्यावरून नियमबाह्य आचरण करणारा जो त्याला “छांदिष्ट” म्हणायचे.
आर्ष शब्दाचा तोच अर्थ आहे. जेव्हा आम्ही संस्कृत मध्ये चुका करत असू तेव्हा हे आर्ष रूप आहे असे म्हटल्यावरून फायरिंग खाल्ले आहे.
ref.व्युत्पत्तिप्रदीप.
माताय! हे फार भारी आहे.
माताय! हे फार भारी आहे.
जिम् नावाच्या धातूचा अर्थ आहे खाणे! जेवण शब्दाचे मूळ इथे आहे.
म्हणजे जिमला जाणे म्हणजे खादाणीला जाणे. म्हणजे जिमला जाऊनही वजन कमी का होत नाही त्याचे रहस्य कळते.
माझा असा गैरसमज होता कि "अननस
माझा असा गैरसमज होता कि "अननस" हा शब्द मराठी आहे. चूक. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे. हापूस, पायरी, बटाटा, तंबाखू हे पण.
“बटाटा” मूळ दक्षिण भारतीय कंदमूळ आहे. मराठीतील बटाटा, तसेच इंग्रजीतील पोटॅटो हे दोन्ही शब्द, बटाट्याचे स्पॅनिश नाव पताता वरून आलेले आहेत. अभ्यासकांच्या मते हे स्पॅनिश ‘पताता’ हे नाव, कॅरेबियन ताईनो भाषेतील ‘बटाटा’ आणि दक्षिण अमेरिकन कुचुआ किंवा रुनासिमी भाषेतील ‘पापा’ या शब्दांवरून निर्माण झाला. बटाटा ही भाजी भारतात प्रथम पोर्तुगीज लोक घेऊन आले. भारतात सगळ्यात आधी बटाट्याची शेती पश्चिम भारतात होऊ लागली.
स्रोत
शब्दयात्री
एक मंथन https://shabdyatri.com/marathi-etymology/%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%...
https://shabdyatri.com/marathi-etymology/
अननस, अनानास, अननास, अनाना
अननस, अनानास, अननास, अनाना (शेवटचा s उच्चारायचा नाही म्हणे) अशी अनेक भाषेत सारखी नावे आहेत असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
चामुंडराय
चामुंडराय
शक्य आहे कारण आम्ही डच टीम बरोबर एक प्रोजेक्ट करत होतो. तेव्हा त्यांनी पण सांगितले होते कि अननस हा शब्द त्यांच्या भाषेतला आहे!
तेलाला उत्कलन बिंदू नाही, ते
तेलाला उत्कलन बिंदू नाही, ते जळते >> हे खरंच इतक्या वर्षात सिंदबाद वाचताना लक्षात नव्हतं आलं - तेल जळताना बघितलं असलं तरी.
आईस्क्रीम ला संस्कृत मध्ये
आईस्क्रीम ला संस्कृत मध्ये पयोहिम म्हणतात!

… अननस, अनानास, अननास, अनाना.
… अननस, अनानास, अननास, अनाना..
+ १
जर्मन मित्रांना “अनानस” म्हणतांना ऐकले आहे.
chit ह्या इंग्लिश शब्दाचे
chit ह्या इंग्लिश शब्दाचे बरेच अर्थ शब्दकोशात मिळतील. पण etimo online काय म्हणतेय पहा,
chit (n.1)
"a short letter, note," 1776, short for chitty (1690s), from Mahrati (Hindi) chitthi "letter, note, memorandum," from Sanskrit chitra-s "distinctively marked"
तिथेच त्यांनी cheetah ह्या शब्दाची व्युत्पातीही अशीच दिली आहे.
इतक्यात मी चपाती साठी “मऊसूद”
इतक्यात मी चपाती साठी “मऊसूद” चपात्या असे विशेषण अनेक उत्तम मराठी लिहिणाऱ्या लोकांनी लिहिलेले वाचले.
ते “मऊसूत” आहे ना ? Soft as a thread ? कोणता शब्द बरोबर ?
किंवा दुसरा कोणता शब्द वापरता येईल ?
मऊसूत बरोबर
मऊसूत बरोबर
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A5%82%...
पडद्यावर अँग्री ॲक्शन हीरो
पडद्यावर अँग्री ॲक्शन हीरो असलेल्या सोनू सूद याला पडद्याबाहेर परोपकारी वर्तन करताना पाहून मऊसूद म्हणू शकतो.
Pages