
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
*गुरुकुलातील शिक्षण संपल्यावर
*गुरुकुलातील शिक्षण संपल्यावर>>>
https://www.wisdomlib.org/history/essay/education-in-ancient-india/d/doc...
समवर्तना किंवा दीक्षांत समारंभ
..
अर्थात वरील संदर्भातील मराठी भाषा गुगल भाषांतरासारखी थोडीफार विनोदी आहे. स्नातकाचे अजून काही प्रकार तिथे दिले आहेत
ज्ञान मिळवल्यामुळे लग्न न
ज्ञान मिळवल्यामुळे लग्न न करणारा
पदवीधर माणसाला अंघोळीचे महत्व समजावे अशी नक्कीच अपेक्षा आहे !!
म्हणजे गुरू शिष्याला शब्दशः धुवून काढत
>>>>>>
ज्ञानाचा आणि स्नानाचा काही तरी संबंध आहेच, मुंजीतही बटुला स्नान घालून उपनयन करतात. चटके बसतात त्यांच्या 'नव्या' डोक्यावर पण कोणी दाद देत नाही.
लग्न न करणारा आणि ज्ञानी ही
लग्न न करणारा आणि ज्ञानी ही द्विरुक्ती आहे
लग्न न करणारा आणि ज्ञानी ही
लग्न न करणारा आणि ज्ञानी ही द्विरुक्ती आहे Wink+१
आता ह्यावर काय बोलणार? हे हे म्हणजे फारच झाले. एकच ज्ञानी ते म्हणजे नारायणराव ठोसर!
चर्चा आणि सर्व प्रतिसाद
चर्चा आणि सर्व प्रतिसाद सुंदर !
आता ज्ञान आणि लग्न या जोडीचा उल्लेख झाल्याने विजय तेंडुलकर यांच्या ‘लग्नांचे दिवस’ या ललितलेखातील दोन वाक्ये लिहिणे अपरिहार्य झाले आहे :
. . . “पण एवढे खरे की कुणीही स्वाभिमानी आणि सुबुद्ध माणूस त्याला लग्नाचे दुष्परिणाम आगाऊ अनुभवण्याला मिळतील, तर लग्न करण्याला कालत्रयी तयार होणार नाही. लग्न ही अनवधानाने आणि अज्ञानापोटीच घडणारी गोष्ट आहे”. . .
लग्न ही अनवधानाने आणि
लग्न ही अनवधानाने आणि अज्ञानापोटीच घडणारी गोष्ट आहे”. . .
>>>
शादीका लड्डू, जो खाये वो पछताये जो ना खाये वो भी पछताये.
बऱ्याच गावांच्या नावात न्हावे
बऱ्याच गावांच्या नावात न्हावे हा शब्द येतो. उदा. डोंगरन्हावे, देवन्हावे, ठाणेन्हावे, न्हावा शेवा, इ. बराच शोधून देखील त्याचा अर्थ कळला नाही.
कऱ्हा, कऱ्हे
कऱ्हा, कऱ्हे
= . मडके; मातीचा लहान घडा;
उंट; उंटाचे पिलू [सं.करभ]
‘उंट’ अर्थाचा संदर्भ ज्ञानेश्वरीत :
: ‘अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसें ।’ − ज्ञा ११·४१४
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
. . .
संस्कृतमधील करभ ( उंट) व रासभ (=गाढव)
या दोन शब्दांमधील साम्य कुतुहलजनक आहे.
रोचक.
रोचक.
करभ हत्तीच्या पिलासाठी वापरतात का?
हत्तीसाठी असाही करिन हा शब्द आहे.
करभ >>> बरोबर !
करभ >>> बरोबर !
= हत्ती, उंट किंवा इतर पशूंचें लहान पिलूं; छावा. [सं.]
दाते शब्दकोश
हत्तीसाठी असाही करिन हा शब्द
हत्तीसाठी असाही करिन हा शब्द आहे.…
“करीना” चा उलगडा झाला. आभार !
करीना हे नाव 'Corrina Corrina
रणधीर, बबीताकडे बघता ते
रणधीर, बबीताकडे बघता ते भारतीय नाव असू शकेलच.
अनिंद्य, अस्मिता
अनिंद्य, अस्मिता
लै भारी
लै भारी
कऱ्हेचे पाणी - याचे वेगवेगळे
कऱ्हेचे पाणी - याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात
>“करीना” चा उलगडा झाला. आभार
>“करीना” चा उलगडा झाला. आभार !>>>
हपा अत्रेंचे खरे वारसदार:)
क-हा, क-हे , करिन, करभ = ज्ञान+
क-हेचं पाणी याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात
*वेगवेगळे अर्थ निघू शकतात. .
*वेगवेगळे अर्थ निघू शकतात. . .
आणि
त्यानुसार वेगवेगळी आत्मचरित्रे लिहिता येतील !
1) करिणा, करिना kariṇā,
1) करिणा, करिना kariṇā, karinā (p. 139)
करिणा kariṇā, करिना karinā m ( A) A statement or representation, esp. a written one (as of one's cause or case before a पंचाईत).
मोल्सवर्थ.
शेतकरी
शेतकरी
या अर्थाचे काहीसे अपरिचित शब्द :
करदा, कर्षक
खेत्रा, लोधा
मुजारी, थळवाईक
* * * * *
अडाण /अडाणकबाड
= शेतकरी नव्हेत ते खेड्यातील कारागीर
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
पण अशा कुशल लोकांना अडाणी म्हणणे पटले नाही.
पन्हाळी
पन्हाळी
=
आणि . . .
विशेषनाम देखील : रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव
. . . .
एका कथेमध्ये ‘वक्षस्थळांमधील पन्हाळी’ असे वर्णन वाचले आहे.
…..
मणीघोळणीचे चित्र पाहण्याची उत्सुकता होती परंतु सापडले नाही.
परवाच आदित्य बिर्ला च्या
परवाच आदित्य बिर्ला च्या "इंद्रिय ज्वेलरी" चे बॅनर पाहीले!
नवीन आहे बहुतेक मार्केट मधे !
ऐंद्रिय शब्द पाहीजे ना ?
इंद्रिय चा मराठी अर्थ तर फारच विचित्र आहे!!
मला तरी ठीक वाटलं ते नाव. पाच
मला तरी ठीक वाटलं ते नाव. पाच इंद्रियं आपण म्हणतो त्यातलं एक असेल असं वाटलं. किंवा इंद्रियांना शोभा आणणारे दागिने - डूल, नथ वगैरे.
या धाग्यातील क्रमांक २ चा
या धाग्यातील क्रमांक २ चा नियम सर्वांनी एकदा पहावा ही विनंती
धन्यवाद !
छतावर पडणारे पावसाचे पाणी
छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करुन वाहुन नेण्यासाठी छताच्या कडांना जे अर्धगोलाकार पाईप बसवलेले असतात त्यालाही पन्हाळी असे म्हणतात. इन्ग्रजीत त्याला eavesdrop हा शब्द आहे. त्यावरुन eavesdroppers never hear good for themselves ही म्हण आली. eavesdropping म्हणजे घराच्या इतके जवळ उभे राहुन चोरुन ऐकणारे…
>>> इंद्रिय ज्वेलरी
>>> इंद्रिय ज्वेलरी
किमती अतींद्रिय ज्वेलरीसारख्या असणार.
(नियम २ पाहिला, पण इतका पांचट विनोद करायला वीस तास थांबणं अशक्य आहे.
)
खरंय स्वाती..
खरंय स्वाती..
(No subject)
(No subject)
* अर्धगोलाकार पाईप बसवलेले
* अर्धगोलाकार पाईप बसवलेले असतात>>>
छान.
* eavesdropping ऐकले होते.
Pages