शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“विचक्षण” ला चाणाक्ष किंवा लौकिक जगात चतुर वागणारा अशी टिंज ऑफ मीनिंग आहे. नुसता विद्वान नाही तर जास्त अवधान असलेला, बोलचालीत थोडा “चालू” टाईप्स. (मला नीट मांडता आलेले नाही)

विलक्षण = निराळा, नाविन्यपूर्ण हा प्रमुख अर्थ. नेहेमी विलक्षण प्रतिभा वगैरे साठीच वापरलेला वाचलाय. Always with positive connotations. If anyone knows unflattering use of विलक्षण do write here Happy

Well..
त्याच्या अशा बोलण्याने मला विलक्षण दुःख झाले.
हा पराभव तिच्या विलक्षण जिव्हारी लागला होता..
??

‘विचक्षण’ मी meticulous, analytical, discerning या अर्थी ऐकला आहे. Negative only as in ‘overanalyzing’ maybe.

‘वि-लक्षण’ म्हणजे अ-भूतपूर्व म्हणता येईल. अशा प्रकारचा / इतका तीव्र अनुभव (चांगला किंवा वाईट) याआधी आला नव्हता, म्हणून हा विलक्षण.

डोळ्यांवर कातडे ओढून बसणे = जाणून दुर्लक्ष करणे हे माहिती होते.

“लक्ष नाही कामावर, डोळ्यांना भात बांधून बसले आहेत” असे प्रथमच वाचले. (लेखन वर्ष १९४४).

भाताचे काय लॉजिक असावे ?

नाही बुवा कधी ऐकला हा वाक्प्रचार.
खेरीज हा भात कच्चा की शिजलेला? भात बांधणार तरी कसा? पुरचुंडीत बांधून? Proud

लहानपणी आम्हाला आयाबाया 'पानातलं सगळं संपवलं नाहीस तर डोक्यावर बांधेन' अशी धमकी द्यायच्या, तेव्हा 'आमटी कशी डोक्यावर बांधतील?!' असा प्रश्न पडायचा. पण विचारायची प्राज्ञा नव्हती आणि प्रचिती घ्यायचं धाडस नव्हतं - त्याची आठवण झाली. Proud

आमच्याकडे ताटातला वरण, कढी, आमरस किंवा कोणताही पातळ पदार्थ 'टाकलास तर आडवे पाडून तोंडात नरसाळे घालून घशात ओतेन' म्हणायचे. असे घडल्याच्या वचक- दंतकथाही प्रसिद्ध होत्या. फारच ग्राफिक बोलायचे आमच्याकडे. Happy

छान चर्चा. Happy

कदाचित 'हात' बांधून बसले आहेत असं असू शकेल.

- हे लॉजिकल वाटतयं. त्या लेखकांचा काटेकोरपणा आणि दर्जेदार भाषा बघता त्यांची चूक होईल असे वाटत नाही

मी मित्राला विचारले अरे तिसरा कसोटी सामना चालू का होत नाहीये?
त्याने उत्तर दिले म्हणजे तुला माहित नाही? आज Friday the 13th आहे?
Friday the 13th बद्दल मनोरंजक माहिती इथे वाचा.
https://www.history.com/topics/folklore/friday-the-13th

शिजवलेल्या भाताऐवजी भाताच्या ओंब्या हा अर्थ घेतला तर त्या बांधता येतील. पण डोळ्यांवर / कपाळावर ओंब्या कोण्/कधी बांधतं?

या आयडी ला विपु करून विचारा.

भाजपचे एक प्रवक्ते मधु चव्हाण यांची पाद्यपूजाच केली पाहिजे. हा हलकट इसम कालच्या एका पॅनेल डिस्कशन मध्ये चक्क म्हणाला की मी चर्चगेट पासून अंधेरीपर्यन्त फिरलो मला कुठेही रांगा दिसल्या नाहीत. याच्या डोळ्यावर भात बांधला होता काय.? जिथे रांगा नाहीत तिथल्या बँका/ एटीएम मध्ये कॅश शिल्लक नसल्याने ओस पडल्यात हे ह्या ** याला समजत नाही काय?
काल व आज दोन दिवस रांगेत उभे राहून मला २ हजाराचे एकच नोट मिळाली आहे ती त्या मध्याच्या नाकात घालावी काय? ::राग:

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 9 December, 2016 - 07:39

भारीच हां मोरोबा! तो आयडी अ‍ॅडमिनना प्यारा झाला असावा. नवा आयडी काय ते आठवत नाही. त्यांच्याशी फेसबुक वा प्रत्यक्ष मैत्री असणार्‍यांनी विचारा त्यांना.

... मला कुठेही रांगा दिसल्या नाहीत. याच्या डोळ्यावर भात बांधला होता काय.? ...

इतक्या अलीकडे २०१६ मध्ये कुणीतरी लिहिलेय म्हणजे 'डोळ्यावर भात बांधणे' हा वाक्प्रयोग त्यांनी कुठेतरी वाचला/ऐकला असावा.

टायपो (डोळ्यावर हात बांधून) की विस्मृतीत गेलेला ओरिजिनल वाक्प्रयोग ? कन्फयुज्ड नाऊ !

* डोळ्यांवर भात>>>
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवांकडून समजलेली ही माहिती. याला अंदाज समजावा; अधिकृत लेखी संदर्भ नाही :

भाताचे रोप कापणीस तयार झाल्यावर 2-3 फूट उंच होते. कापलेले भात डोळ्यांवर पट्टी बांधतात तसे बांधणे.

नात्यातल्या एका कडे बारसे होते. भेटवस्तू काय घ्यावी म्हणून विचार करत होतो. लहान बाळाला दूध पाजण्यासाठी एक thing वापरत असत. त्याचे नाव आठवेना. बोलणं असे काहीतरी आठवत होतं, पण खात्री नव्हती. घरात कुणालाही आठवेना.
शेवटी गाडगीळ सराफांच्या दुकानात गेलो. म्हटलं try करून बघू या, काऊंटरवरच्या युवतीला अडखळत सांगायचा प्रयत्न केला. ती म्हणाली तुम्हाला "बोळणं" पाहिजे आहे का? Great!
हा शब्द बृहद् कोशातही मिळाला नाही.
कुणाला आठवतो आहे का? नाही म्हणजे सध्या बाटलीचा जमाना आहे म्हणून म्हटलं.

बोंडलं !
हाच तो शब्द आहे. हरपा आभार.
मराठी बृहद्कोशात बघितलं तर "हा शब्द सापडला नाही, क्षमस्व. " असे आले.

OK
"बोंडलं" हा शब्द मिळाला नाही.
पण वरील प्रमाणे "बोंडले" शब्द मात्र दिसतो.

राष्ट्राच्या आणि समाजाच्या हितार्थ कधी साहसी तर कधी युद्धात प्राण गमावलेल्यांना वीर म्हटले जाते. अशा साहसी शूरवीरांची आठवण आपल्या पुढील पिढीला माहिती मिळावी यासाठी त्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींकडून अथवा कुटुंबियांकडून आदरपूर्वक व सन्मानपूर्वक उभ्या केलेल्या त्या शिल्परचनेला समाजातील व्यक्तीच्या समोर दिसणे महत्त्वाचे वाटते. युद्धात राजाज्ञाची कर्तव्य निष्ठेने पार पाडणारी व्यक्ती वीर होते वीर मधील गळ म्हणजे कानडी शब्दसमूहात दगड बोलतात (तुळपुळे, शं. गो. १९६३). वीरगळ हा शब्द कन्नड भाषेतील वीरगळ किंवा वीर कल्लू या शब्दावरून तयार झाला आहे. वीरगळ म्हणजेच वीरांचा दगड. युद्धात कामी आलेल्या योद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा वीरगळी उभारल्या गेल्या आहेत. संपूर्ण भारतात विविध प्रदेशात अशा स्मारकांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. केरळात या शिल्परचनेला तरी, कर्नाटकात कल्लू, उत्तर भारतात वीरब्रह्म, गुजरातीमध्ये पाळीया आणि इंग्रजीत Hero Stone म्हटले जाते. त्याचे शिल्परचनेवर पटकन काहींना न समजणारी दगडावर शूरवीर व काही युद्धचित्र व त्यातच सर्वात वरच्या बाजूस शिवपिंड, काही ठिकाणी सूर्य, चंद्र कोरलेले बघावयास मिळते, याच शिल्परचनेला वीरगळ म्हणतात. स्तंभरूपी वीरगळावर चौकटीमध्ये वीरांच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले असतात. साधारणतः खालच्या चौकटीत मरून पडलेला वीर व मधल्या खणात अप्सरा या वीराला सन्मानाने घेऊन जाताना दिसतात. सर्वात वरच्या कण्यात सूर्य-चंद्र, शिवलिंग कोरलेले असून याचा अर्थ जोपर्यंत सूर्य-चंद्र उगवत आहेत तोपर्यंत या वीराची किर्ती कायम राहिल हे यातून सांगायचे असते.

-------------आंतर जालीय संदर्भ.

Pages