शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्कृत मधून इंग्लिश मध्ये गेलेले काही शब्द
juggernaut “any large, overpowering, destructive force or object, as war, a giant battleship, or a powerful football team.” पण हा शब्द जगन्नाथाच्या - ओरिसा- रथा वरून आलेला आहे.

बरोबर.
या शब्दावर अंदाजे दोन वर्षांपूर्वी मागच्या भागांमध्ये चर्चा झाल्याचे आठवते.

आताच एका कथेची तयारी करत असताना गबरू गब्रू हा शब्द कोशात बघितला.
गब्रू वि. १ पठ्ठा; बहाद्दर. २ सुंदर; तरुण. ३ आढ्यता खोर; खोटा विद्वान. ४ गबरू पहा. [गवर. हिं. गब्रू किंवा गब्बर; तुल॰ हिब्रु. ग्याब्रिएल = बलाढ्य देव; हंगेरि. गबोर; इटालि. गब्रिएलो]
दाते शब्दकोश
मजा वाटली.

गब्रू ते गॅब्रिएल - भारीच. कधी लक्षात नाही आले त्या दोन शब्दात काही संबंध असेल.

साधारण कुस्तीपटूंना गब्रू जवान म्हणताना ऐकले आहे. पण ते सहसा सुंदर नसतात. आणि "तरुण जवान" ही द्विरुक्ती झाली. त्यामुळे २ क्रमांकाचा अर्थ नीटसा नाही पटला.

वामन अवतारात वामनाने बळीकडे तीन पावले जमीन मागितली. "त्रेधा निदधे पदम्" अशी संस्कृत ऋचा आहे. त्यात हा "त्रेधा" शब्द आला आहे.त्या वेळीही लोकांची धांदल उडाली.म्हणून त्रेधा = धांदल!
पहारा
प्रहर = तीन तास. पूर्वी दर तीन तासांनी पहारा बदलत असावेत!
शिल्लक
(स्त्री.) [अ. सल्ख् महिना अखेर; फा. सिल्क्-बन्दी मासिक आढावा] बाकी शिलकी उर्वरित.
फारसी-मराठी शब्दकोश

तलवार
मूळ शब्द 'तरवार' असा आहे आणि त्याचा अपभ्रंश पुढे 'तलवार' झाला. पण, वस्तुस्थिती मात्र तशी नाही. 'तरवार' आणि 'तलवार' या दोन्हीही संज्ञा बरोबर असून दोन्हीही मराठी नाहीत, त्यांचा उगम संस्कृतमध्ये आहे! याचा सगळ्यात जुना पुरावा मला अभ्यास करताना दहाव्या (१०) शतकातल्या 'हलायुधकोश' या ग्रंथात आढळला. हलायुध भट्ट हे इसवी सनाच्या दहाव्या शतकात राष्ट्रकूट राजवंशाचे राजे कृष्ण तृतीय यांच्या पदरी असलेले गणितज्ञ होते. या हलायुध भट्टानी अमरकोशाच्या तोडीचा 'अभिधान रत्नमाला' नामक दीर्घ शब्दकोश तयार केला जो पुढे त्यांच्याच नावे, 'हलायुधकोश' म्हणून प्रसिद्ध झाला. या कोशामध्ये तत्कालीन अनेक शब्द, संज्ञा यांच्या व्युत्पत्ती, अर्थ, लिंगभेद दिलेले आहेत. या कोशात 'तलवारि:' या संज्ञेचे 'तलं हस्तप्रहारं वारयति।' म्हणजेच 'हातात धरून ज्याचा वार केला जातो' असे स्पष्टीकरण दिले आहे.
गिरीजा दुधाट ह्यांच्या फेसबुक पेज वरून.

'हलायुधकोश" हे पुस्तक e-पुस्तकालय मध्ये आहे.

तिरपीट
मी शोधायचा प्रयत्न केला पण अजून मिळाले नाहीये.
रुमाल
मूळ "रु" म्हणजे तोंड. रुमाल म्हणजे तोंड पुसण्यासाठी. फारसी

मराठीत तर मला वाटतं (संस्कृत शब्दांपेक्षाही) जास्त फारसी शब्द असावेत.

मराठीत तर मला वाटतं संस्कृतपेक्षाही जास्त फारसी शब्द असावेत.>>> संस्कृतमध्ये फारसे फारसी शब्द नाहीत Lol

रुबरु म्हणजे समोरासमोर. +१

मराठीत संस्कृत शब्दांपेक्षाही जास्त फारसी शब्द… बरोबर. याचा संबंध मोठ्या भौगोलिक प्रदेशावर असलेल्या मराठी Footprint शी असावा, विशेषत: उत्तरेत.

ऋषींची नावे
ऋषी या व्यक्ती नसून संस्था असाव्यात, आणि त्यांची नावे म्हणजे ते करत असलेल्या कार्य ची पदनामे?
वसु+इष्ट= वशिष्ठ
वस्ती करत असलेल्या लोकप्रमुखांना गरजेप्रमाणे योग्य त्या वस्तू संशोधन करून बनवणारी संस्था?
मायबोली वरील तज्ञांकडून प्रकाश पडणे अपेक्षित.

तीर = बाण; शर.

तिर = उद्गा. शेळ्या, मेंढ्या यांना हांकण्याचा शब्द. [ध्व.]
दाते शब्दकोश

दोन्ही भिन्न .

तिर = उद्गा. शेळ्या, मेंढ्या यांना हांकण्याचा शब्द. [ध्व.]>>>>>> हे ऐकलंय.
पण ते तिर्रर्रर्र अस ऐकू येत.

Pages