एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://x.com/imnareshv/status/1997536602055491669
Naresh Vashistha | नरेश वशिष्ठ
@imnareshv
·
21h
इंडिगो एयरलाइन्स क्राइसिस: जिम्मेदार कौन? क्या कोई गहरी साज़िश थी?

भारत की सबसे बड़ी निजी एयरलाइन्स इंडिगो एक बार फिर चर्चा में है, और इस बार सवाल सिर्फ तकनीकी या परिचालन विफलता तक सीमित नहीं है। यह घटना ऐसे समय हुई जब दुनिया की निगाहें भारत पर थीं—रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन भारत दौरे पर थे, और नई दिल्ली अंतर्राष्ट्रीय कूटनीति का केंद्र बना हुआ था। इसी बीच एयरपोर्ट से यात्रियों की परेशानियों वाले वीडियो वायरल होना, कई तरह की चर्चाओं को जन्म देता है।
पुतिन के भारत दौरे जैसे रणनीतिक समय में इंडिगो की व्यवस्थाएं ढह जाना, एयरपोर्ट पर यात्रियों का फंसना, घंटों लाइनें और अफरा-तफरी…
इन सबने अंतरराष्ट्रीय मीडिया का ध्यान आकर्षित किया। लोगों के बीच यह चर्चा शुरू हुई कि जब भारत को अपनी दक्षता और मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर दिखाना चाहिए था, ठीक उसी समय एविएशन सेक्टर की सबसे बड़ी एयरलाइन का संकट सुर्खियों में आना क्या सिर्फ एक संयोग था?

जिम्मेदार कौन?
मैंने इस विषय पर Aviation experts, Pilot, Crew, एवं DGCA के कुछ पूर्व अधिकारियों से बात की, उन सभी का कहना है कि इसके लिए सिर्फ #indigo का management एव उनके #CEO पीटर एल्बर्स जिम्मेदार है.

#DGCA एवं सरकार की जिम्मेदारी :-
कुछ लोग सिर्फ और सिर्फ #dgca और सरकार को जिम्मेदार ठहरा रहे हैं, इस पर भी एयरलाइन्स के कुछ पायलट से हुई बात और Aviation experts का कहना है कि #DGCA ने जिस सम्वेदनशीलता से इस संकट को नियत्रिंत किया है अगर ये नहीं होता तो स्थिति और भयावह होती.
हाँ मै उन लोगों को भी जानता हूँ जो इसमे भी सरकार और #DGCA को बदनाम कर अपने व्यक्तिगत हित साध रहे हैं.
मेरा सरकार को सुझाव है अंतरराष्ट्रीय साजिश के एंगल से भी इसकी जांच करे एवं भविष्य में ये ना हो इसके लिए कडे नियम बनाए.

रेल्वे अपघातांमागे घातपात. SIR साठी जुंपलेल्या BLO चा विरोधी पक्ष खून करून आत्महत्या भासवतात. आता हे.

इंडिगोच्या शेअरचा समावेश ३ ऑक्टोबरपासून निफ्टीमध्ये झाला.

या कंपनीच्या संचालकांमध्ये एम दामोदरन आणि अमिताभ कांत आहेत. दामोदरन युनिट ट्र्स्ट ऑफ इंडिया आणि त्यानंतर IDBI restructure करून सेबीचे चेअरमन झाले. अमिताभ कांत निति आयोगाचे सी ई ओ होते.

इंडिगोचा मार्केट शेअर ६३% आहे.

In other news Adani Defence Boosts Pilot Training Capacity with ₹820 Crore Buyout of FSTC, India’s Leading Flight Training Provider

इंडिगोच्या संदर्भात मला एक प्रश्न आहे.....नवा नियम येऊन २ वर्षे झाली. ते पालन करत नव्हते.... मग अचानक पालन करण्याच्या प्रयत्नाचे कारण काय? त्यांना डिजिसिए वा अन्य एजन्सीने नोटिस दिली का ? नाहीतर स्टेट्स को म्हणजेच अनुपालन न करणे या मोड मध्ये ते चालू ठेवत शकते आणि हा गदारोळ न करता, त्यांच्या ६३टक्के मार्केट शेअर वर दादागिरी - अनुपालन न करण्याची- मुजोरी चालू ठेऊ शकत होते...

मी जे वाचले ते असे:
१ नोव्हेंबर पासुन वैमानिकांच्या कामाच्या तासांबद्दलच्या नियमांचा दुसरा टप्पा लागु झाला.
यात दिवसातून, आठवड्यातुन , महिन्यातुन व वर्षातुन जास्तीत जास्त किती तास काम, किती तास सलग काम, व कमीत कमी किती तास सुटी व किती तास सलग सुटी असे विविध नियम आहेत. त्यात उड्डाणाचे तास व एकुण कामाचे तास याचेही नियम आहेत.
DGCA ने त्यात मुदत वाढ दिली नाही (कदाचित इन्डीगोने मागीतली असेल व मिळेल या आशेत असतील) किंवा वेळीच दिली नाही. मग हिवाळ्याचा पीक पिरियड सुरु झाला - नविन फ्लाईट्स सुरु केल्या, आणि हवामानामुळे होणारा विलंब यामुळे वैमानिकांचा महिन्याच्या तासाचा कोटा भरुन गेला, मुदत वाढ मिळाली नाही आणि विमाने रद्द होणे सुरु होऊन ३-४ डिसेंबरला त्यांचा उच्चांक झाला.
यात कंसात लिहिलेले माझ्या पदरचे आहे.

रशियाच्या अध्यक्षांना दिलेल्या मेजवानीला संसदेच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण नव्हतं. आपण किती कोते आहोत, हे भूषण वाटतं यांना.

शशी थरूरनी काँग्रेसचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप जॉइन करावं. राज्यसभेत घेतील त्यांना. मंत्रीपदही मिळेल. लेजर आइजला काम काही झेपत नाहीए. कोणत्या मंत्र्याला झेपतंय म्हणा?

प्रियांका गांधींचं लोकसभेतील वंदे मातरम् संबंधी चर्चेतील भाषण.
https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/1216293337128159

भाजप आणि त्यांच्या वैचारिक पूर्वजांनी १८९६ पासून नेमकं कधी वंदे मातरम् गायला सुरुवात केली?

१९३७ मध्ये संघ होता. त्यांनी तेव्हा फक्त दोन कडवी गाण्यावर आक्षेप घेतला होता का?

हे लोक जगाच्या जवळपास शंभर वर्षे मागे का असतात?

प्रियांकाने मुद्देसूद व चपखल प्रत्युत्तर दिले आहे.
देशात काय चाललंय याची अजिबात पर्वा न करता फक्त निवडणुक एके निवडणुक करत बसणे हेच भारताच्या पंतप्रधान पदाचे काम आहे हे अनेकवेळा सिद्ध झालेय.
कोव्हिडची दुसरी लाट ऑक्सिजनची कमतरता, जळणारे मणिपूर या सगळ्यांपुढे निवडणुक असणाऱ्या राज्यात जाऊन प्रचार महत्वाचा होता, तिथे इंडिगो कोलॅप्स व प्रवाशांचे हाल, बेरोजगारी, रुपयाचा दर असले क्षुल्लक प्रश्न किस झाड की पत्ती? आपण वंदे मातरम् वरून कांगावा करून चर्चा करू.

ज्यांच्या इंडिगो फ्लाइट्स रद्द झाल्या, रिफंड मिळाला नाही. लगेज अडकलं त्यांच्या मनात वंदे मातरम् वरची चर्चा ऐकून देशभक्तीची तीव्र लाट उचंबळून आली आणि त्यांना त्रासाचा विसर पडला.

# सेक्युरिटी चेक झाल्यानंतरही फ्लाइट्स रद्द केल्या गेल्या. प्रवाशांच्या बॅगा अडकल्या. हे महान आहे. कदाचित नोटाबंदी वा करोना लॉकडाउन पेक्षा जास्त.

हात दाखवून आपलं थोबाड फोडून घेण्याची हौस भाजपाच्या सगळ्या नेत्याना का असते ?

राजद च्या नेत्याने मोदीना चॅलेंज दिलं आहे की तुम्ही संपूर्ण वंदे मातरं टेलिप्रोंप्टर न वापरता म्हणून दाखवा Lol

HRDS नामक संस्थेने वीर सावरकर इंटरनॅशनल अवॉर्ड साठी शशी थरूर यांची निवड केली. थरूर म्हणतात मला नक्को जा.
संस्था म्हणते आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा तर असं काही बोलले नाहीत.
(भेटीचे फोटो बिटो नाहीत का?)

संस्थेच्या संकेतस्थळावर about us वर क्लिक केलं तर काहीच होत नाही. डोनेट बटण मात्र हायलाइट होतं. सेट केलेल्या व्होटिंग मशीनसारखं आहे की काय?

जयवंत दळवींच्या परममित्र पुस्तकात एक कर्तारसिंग थत्ते नावाच्या मनुष्यावर लेख (दळवींनी त्यांची मुलाखत घ्यायचा केलेला प्रयत्न) आहे.
१९३० साली बीए एलएलबी झालेला, सुरुवात काहितरी उदात्त हेतूने समाजकार्य करायचे म्हणून कार्यकर्ता झालेला आणि पुढे पार गंडलेला हा मनुष्य. हिंदू महासभेचा कार्यकर्ता.
साधारण १९३०-१९७५ हा काळ पाहिलेला, काम केलेला. या माणसाचे विचार आणि आज जे हिंदुत्ववाद्यांचे विचार आहेत त्यात काहिही अंतर नाही. तेच नेहरुंना शिव्या देणे, काहितरी इम्प्रॅक्टिकल सोलुशन्स असणे, अखंड भारत, पाकिस्तानला एक दिवसात संपवू, लष्कराबद्दल काहितरी ब्रोमान्स, - अगदी वाचनीय लेख आहे.
एके काळी याच लोकांत वावरलेला मी :रागः

> एके काळी याच लोकांत वावरलेला मी :
यात नवल नाही. जावा मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतो तसा पश्चिम महाराष्ट्रातील ममव ब्राह्मण मुलगा लहानपणी संघात जाणार व नंतरही त्याच विचाराने वागणार असे असते. त्यातल्या काही मोजक्याच लोकांना विचाराअंती फोलपणा जाणवतो व तो प्रांजळपणे मान्य करण्याइतका पोक्तपणा असतो.

माझ्यावरही लहानपणी 'सोबत' वगैरे साप्ताहिकांचा '५५ कोटींचे बळी' चा वगैरे प्रभाव होता.

बाळपणी मीही संघात गेलेलो (यावर एक निबंध लिहिन नंतर). ती प्रार्थना अजुनही पाठ आहे. ज्यांना पाठ असायला हवी त्यांना आहे का माहिती नाही.

आदर्णीय मोदीजींनी MGNREGA महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना केले.

गांधी नावाची इतकी अ‍ॅलर्जी?

https://www.facebook.com/tushar.gaikwad.376043/posts/pfbid0sfm7aqho6RtJX...

धुरंधरमुळे नोटाबंदी आणि फेक करन्सीबद्दल पुन्हा कंड्या पिकवल्या जाऊ लागल्यात.
https://www.pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=170379&reg=3&lang=2

२०१६-१७ च्या वार्षिक अहवालातून

The study done by RBI shows that the rate of FICN detected per million pieces of notes processed at the currency chest level at 7.1 pieces for Rs. 500 denomination and 19.1 pieces for Rs. 1000 denomination,

म्हणजे दर १० लाख नोटांमागे ५०० च्या ७ फेक नोट्या आणि १००० च्या १९ फेक नोटा निघाल्या.

currency in Rs.1,000 and Rs.500 denomination in circulation was at Rs.15.44 lakh crore. [6857.82 million notes of Rs.1000 and 17165.06 million notes of Rs.500 amounting separately to Rs. 685782 crore and Rs. 858253 crore]. Taking into consideration, the value of SBNs now reported to have been counted, approximately 98.96% of SBNs in value terms have come back to the RBI after demonetization. In other words, only an estimated Rs.16000 crore worth of SBNs have not come back to the RBI so far.

पुढ च्या वार्षिक अहवालात म्हटलंय
The SBNs received were verified, counted and processed in the sophisticated high speed CVPS for accuracy and genuineness and shredded and briquetted in the Shredding and Briquetting system.

The total SBNs returned from circulation is `15,310.73 billion.
The total value of SBNs in circulation as on 08.11.2016 was Rs. 15417.93 billion.

धुरंधर मुळे इतरही अनेक कॉन्स्पिरेसी थियरीज ना प्रतिष्ठा मिळाली.

असो, ये नया भारत है. प्रोपगंडा ! बालपणी पुना ओकांच्या पुस्तकाची खिल्ली उडवताना एक दिवस या पुस्तकावर वर सिनेमा येइल आणी त्यात अगदी टॉप चे अभिनेते असतील असे वाटले नव्हते.

एखादे लहान मूल खेळताना स्टूल ला धडकून पडले व रडू लागले तर आपण 'अलेले , लागलं वात्त बालाला, आपन स्तूल ला मालू हं' असे म्हणून स्टूल लाच दोन चार फटके लावल्याचा अभिनय करतो व मूल खुष होते तसे काहिसे अनेक भारतीयांना 'सिन्दूर' नंतर हा सिनेमा पाहून झाले असावे.

पी चिदंबरम देशाचे अर्थ मंत्री होते, ते नोटांच्या छपाईची यंत्रे परदेशात पाठव्पून खोट्या नोटा इम्पोर्ट करण्याचे सव्यपसव्य का करतील ? आणी त्यांनी इतका गंभीर गुन्हा केला असेल तर गेल्या दहा वर्षात साधा एफ आय आरही का नाही ?

असो धुरंधर वर आणखी लिहिले तर 'प्रशासनाला हे मान्य आहे का ? ' अशी ओरड होईल.

विकु, खरंय. भक्तुल्ल्यांना ऑर्गॅझमसाठी अशा (च) गोष्टी लागतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये अर्धवट राहिलेला आता पूर्ण करताहेत.
---
andaman.jpg

काश्मीर आणि केरळपाठोपाठ लदाखही आता अँटी नॅशनल झोनमध्ये आलंय. सुभाषजींचा वेगळा काय भूगोल होता माहीत नाही, पण दवेजींच्या भूगोलात लदाखला समुद्रकिनारा आहे. बरं , अंदमानात गेल्यासरशी सेल्युलर जेलमध्ये टाकलेल्या इतर राजबंद्यांची माहिती देणार आहेत का?

इथे याद्या आहेत. त्यातल्या कितिकांनी माफी मागितली? आणि किती तिथेच मेले? यात मुस्लिमांची नावेही आहेत.

यातला शेवटचा भाग जपानी सैन्याने छळलेल्या आणि मारलेल्या भारतीयांची , त्यात आझाद हिंद सेनेतले सैनिक , अधिकारीही आहेत. यांची शासकीय नोंद आहे, हे माहीत नव्हतं. मागे एका दिवाळी अंकात दुसर्‍या महायुद्धातल्या जपानी सैन्याच्या क्रौर्याबद्दलचा गोविंद तळवलकरांचा लेख वाचला, तेव्हा याबद्दल कळलं. विकिपिडियावरचं वर्णन वाचल्यावर या जपानी अधिकार्‍यांपुढे सावरकरांच्या वेळचा ब्रिटिश जेलरसुद्धा दयाळू वाटावा.

केरळ , काश्मीर , लदाखला जाऊ नका. पण आमच्या सोबत दुबईला चला. इतर ठिकाणांत काय काय असतील?

Pages