Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे तीन ठिकाणी वाचायला मिळालं
हे तीन ठिकाणी वाचायला मिळालं. पण शोधूनही घोड्याच्या तोंडून ऐकायला मिळालं नाही. कधी कुठे बोलले ते असं?
the non-biological being has said that his biological father spent five years in a prison as a ‘freedom fighter’ in British ruled India; and that he was born just after his (biological) father came out of prison,
घामाचं रहस्य !
घामाचं रहस्य !
नॉनबायॉलॉजिकलच्या
नॉनबायॉलॉजिकलच्या म्हणण्याप्रमाणे दामोदरदास स्वातंत्र्यलढ्यात पाच वर्षे तुरुंगात होते. आणि त्यांची सुटका होताच यांचा जन्म झाला. त्यांची अधिकृत जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची तारीख १५ ऑगस्ट १९५०.
त्यांच्या थोरल्या भावंडांचे जन्म कधीचे आहेत माहीत नाही.
>>>>भारताला स्वातंत्र्य
>>>>भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची तारीख १५ ऑगस्ट १९५०>>>> ??????????
मोदींच्या नादी लागून गडबड
मोदींच्या नादी लागून गडबड झाली.
बिहारमधे मतदानाची टक्केवारी
बिहार निवडणुकीचा वेगळा धागा दिसला नाही.
बिहारमधे मतदानाची टक्केवारी वाढलीय.
२०१० मधे ५२.० टक्के
२०१५ मधे ५५.९ टक्के
२०२० मधे ५६.१ टक्के
२०२५ मधे ६४.६६ टक्के
९ टक्के म्हणजे खूपच वाढलंय. मला वाटतंय की गेली अनेक दशके मतदानापासून लांब राहिलेला मतदार सामील झालाय की काय.
तसे झाले असल्यास, केपी फॅक्टर महत्वाचा ठरला असे म्हणायला लागेल. पण यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल.
दुसरी शक्यता म्हणजे पहलगाम इफेक्ट. बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या हल्यामुळे जसा महाराष्ट्राच्या मतदानावर परिणाम झाला तसाच परिणाम बिहारमधे दिसायची शक्यता आहे. तसे झाले तर कॉंग्रेस व तेजस्वी हे दोघेही एकत्रीत ५० पेक्षा कमी आमदारांचे धनी होतील.
मला दुसरी शक्यता जास्त जाणवतेय. कारण गेल्या अनेक निवडणूकांत स्पष्ट बहुमत देण्याचे मतदारांचे कौल दिसून आलेले आहेत. मोदी + नितीश जोडी आणखीनच बळकट होताना दिसेल.
वेगळा धागा काढा की.
वेगळा धागा काढा की.
महाराष्ट्रा बाबतचा तुमचा अंदाक बरोबर निघाला होता. महायुतीला प्रचंड बहुमत मिळण्याची कारणं लाडकी बहीण योजना आणि मतदार याद्या आणि मतदान प्रक्रियेतले घोटाळे.
बिहारमध्येही तुमचा अंदाज बरोबर निघेल. तिथेही तीच कारणं असतील. महिलांना दहा दहा हजार रुपये वाटलेत. एस आय आर मुळे पात्र मतदारांची संख्या घटली आहे. त्यामुळेही मतदानाची टक्केवारी वाढली. गेल्या काही निवडणुकांपासून आयोग फक्त टक्केवारी जाहीर करतो. पडलेल्या मतांची संख्या सांगत नाही. ती शेवटी मतमोजणीनंतरच कळते.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी तुम्ही अंदाज बांधला होता का ते आठवत नाही.
बांगलादेशातील हिंदूवर
बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या हल्यामुळे जसा महाराष्ट्राच्या मतदानावर परिणाम झाला
>>
बाबोव!!!
काय त्या ठुसक्या!
अंदाज:
भाजप आघाडी: 243 पैकी 210
जन सुराज: 33
राजद आणि काँग्रेस: 0
मध्य प्रदेश - शालेय
मध्य प्रदेश - शालेय विद्यार्थ्यांना रद्दी कागदावर माध्यान्ह आहार
मतदानाची टक्केवारी ही
मतदानाची टक्केवारी ही शेवटच्या तासाभरात वाढली आहे का हे ही पहावे लागेल.
(No subject)
@भरत
@भरत
भाजपा का जिंकली याबाबत भाजप विरोधक निरनिराळी कारणे देतच असतात. ती खोडण्याचे काम भाजप समर्थक करत असतात. २०१४ पासून हे चालू आहे. पुढेही चालू राहील. त्यात मला रस नाही.
मी फक्त मतदान टक्केवारीचा दीर्घकालीन कल तपासायचा प्रयत्न करत असतो.
राजीव गांधींनंतर हिंदुत्वाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना मतदान जास्त होताना दिसत आहे. पेंटेगॉनच्याही हे लक्षात आल्याने १९९५ साली त्यांनी तिथे संशोधनासाठी भाजप सेल सुरू केला.
आजमितीस हा वाढता कल ३५ वर्षे टिकून आहे. त्यामुळे जोपर्यंत तिथे सुरूंग लावण्याचे विरोधक मनावर घेत नाहीत तोपर्यंत मोदी व भाजप हरण्याची शक्यता मला कमी वाटते.
३५ वर्षांअगोदर डाव्या विचारांच्या लोकांनी हिंदुत्व विरोधाची ही बाजू जबरदस्त ताकदीने व हुषारीने सांभाळली होती. पण नंतर डाव्या चळवळीत दुसऱ्या फळीतील उमेदीचे नेते तयार झाले नाहीत व भाजपचं फावत गेलेलं दिसतंय.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास सेवादल ताकदीने उभं राहीलं होतं. चांगल काम करत होतं. पण नंतर नवीन निस्वार्थी नेतेमंडळी तयारच झाली नाहीत. मग महाराष्ट्रांतही हिंदूत्वादी पक्षांचं महत्व वाढत गेलं.
भाजप विरोधक कमकुवत होत जाण्यामागे त्याच्यात नेत्यांची दुसरी फळी निर्माण न होणं हे महत्वाचं कारण आहे, असं मला वाटतं. याउलट भाजप व संघात दुसरी फळी निर्माण होण्याची परंपरा जपली जातीय.
कोण बरोबर कोण चूक याबाबत बोलून वाद वाढवण्यांत मला रस नाही.
असो.
<भाजप व संघात दुसरी फळी
<भाजप व संघात दुसरी फळी निर्माण होण्याची परंपरा जपली जातीय.> म्हणूनच भाजपला इतर पक्षांतले आपणच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते वॉशिंग मशीनमध्ये घालून घ्यावे लागतात.
वॉशिंग मशीनमधले बरेच पार्टस
वॉशिंग मशीनमधले बरेच पार्टस आयात केलेले आहेत.
ये मेरा बिहार!
ये मेरा बिहार!
रस्त्याच्या बाजूला फेकलेल्या VVPAT स्लीप्स मिळाल्या.
संघाच्या नोंदणीबद्दल
संघाच्या नोंदणीबद्दल सरसंघचालकांनी जे म्हटलंय त्याचा अर्थ कोणाला लागला तर सांगा
https://www.loksatta.com/desh-videsh/mohan-bhagwat-says-even-hindu-dharm...
आम्हाला अशा हिंदू समाजाची निर्मिती करायची आहे जो जगाला धर्माचं ज्ञान प्रदान करू शकेल, जेणेकरून जग आनंदी राहील, जगात शांतता नांदेल
ष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कधी नोंदणी का केली नाही? यावर ते म्हणाले, “अनेक गोष्टी नोंदणीकृत नाहीत. हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही.”
आयकर विभाग व न्यायालयांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की आरएसएस हा एक व्यक्तींचा समूह आहे आणि म्हणून आरएसएसला करातून सूट देण्यात आली आहे.
आयकर विभाग व न्यायालयांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की आरएसएस हा एक व्यक्तींचा समूह आहे आणि म्हणून आरएसएसला करातून सूट देण्यात आली आहे.
राज कपूर आणि नूतन यांचा
राज कपूर आणि नूतन यांचा किस्सा. खरा खोटा माहीत नाही. नूतन चांगलीच उंच होती.तिच्यासोबत शूट करताना राज कपूरला कधी कधी लहानशा स्टुलावर उभं राहावं लागे. याला तो वैतागला. त्यावर नूतन म्हणाली , मग मी खड्ड्यात उभी राहते.
याचा राजकारणाशी काय संबंध?
भोपाळ मध्ये मेट्रो स्टेशन बांधले.
ते इतक्या कमी उंचीवर बांधले की बसेस, ट्रक्स त्याखालून जाताना वर घासतात किंवा जाऊ शकत नाहीत.
म्हणून आता त्या स्टेशन खालचा रस्ता खणून खोल करतायत.
दिल्लीमध्ये पार्क केलेल्या
दिल्लीमध्ये पार्क केलेल्या कार मधे स्फोट. 10 मृत्युमुखी
आणि प्रधान सेवक भूतान मध्ये
आणि प्रधान सेवक भूतान मध्ये
परिधान मंत्र्यांनी भूतान दौर्
परिधान मंत्र्यांनी भूतान दौर्यासाठी खास कपडे बनवून घेतले होते. भूतानच्या या आधीच्या राजाची जयंती होती. मुख्य उद्देश ए१ चा प्रोजेक्ट असेल.
पहलगामनंतर हे जसे आधी बिहार मध्ये प्रचाराला गेले आणि तिथून दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलले तसेच काल भूतानमधून.
देशाचे गृहमंत्री सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात बिझी.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दोभाल अवघे ऐंशी वयमान. गुरुदासपूर , पठाणकोट, उरी, पुलवामा, पहलगाम अशी यांची देदीप्यमान कारकीर्द .
रविवारी दिल्लीत शुद्ध हवेसाठी काढलेला मोर्चा पोलिसांना त्यात बिझी ठेवून दहशतवाद्यांना वाट मोकळी कर ण्यासाठी काढला होता, इति आयटी सेल मधले सेक्युरिटी एक्स्पर्ट आणि कॉन्स्पिरसी थियरिस्ट्स.
फरिदाबादला सापडलेली विस्फोटकं
फरिदाबादला सापडलेली विस्फोटकं जम्मूच्या नवगाम पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवली होती.
फोरेन्सिक आणि केमिकल अॅनालिसिस साठी त्यातली सँपल काढत असताना रात्री ११:२० ला स्फोट होऊन तिथे काम करणारे ९ लोक मरण पावले , ३२ जखमी झाले , त्या व शेजारच्या इमारतींचं नुकसान झालं.
https://x.com/ANI/status/1989556947453182100
फरीदाबाद हून काश्मीर मध्ये
फरीदाबाद हून काश्मीर मध्ये एवढ्या लांब नेताना बरं काही झालं नाही.
ही बातमी तेव्हा नजरेत आली
ही बातमी तेव्हा नजरेत आली नव्हती.
https://www.ndtv.com/india-news/madhya-pradesh-couple-dies-by-suicide-10...
यांच्या मुलाने राहुलच्या न्याय यात्रेत त्याला भेटून आपली पिगी बँक दिली होती.
A five-page suicide note was recovered, allegedly highlighting allegations against ED officers.
In the note, Manoj Parmar accused ED assistant director Sanjit Kumar Sahu of harassment, physical assault, and vandalism during the raid. The note alleged Mr Sahu coerced Manoj Parmar to make his children join the BJP and record statements against Rahul Gandhi.
त्याचा मुलगा बोलतानाची एक रील आज दिसली, तेव्हा कळलं.
10 years after Akhlaq
10 years after Akhlaq lynching, UP govt seeks to withdraw case against accused
फरिदाबादला सापडलेली विस्फोटकं
फरिदाबादला सापडलेली विस्फोटकं जम्मूच्या नवगाम पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवली होती.
>>

नुसती ठेवली नव्हती. रात्री
नुसती ठेवली नव्हती. रात्री उशिरा त्यातून फॉरेन्सिक साठी सँपल्स घ्यायचं काम चालू होतं, तेव्हा स्फोट झाला.
अमोनियम नायट्रेटचा
अमोनियम नायट्रेटचा डेटोनेटरशिवाय स्फोट होऊच शकत नाही. हा घातपातच आहे. पुरावे नष्ट करणे हाच हेतू आहे. तसे नसेल तर ह्यांनी अतिरेक्यांकडून स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घ्यायला हवे.
बिहार मध्ये अदाणीच्या पॉवर
बिहार मध्ये अदाणीच्या पॉवर प्लांट प्रकरणात ६०००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांना भाजपने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं.
# A1
# न खाउंगा न खाने दूंगा
मौनी पंतप्रधानाच्या काळात असे आरोप झाले तर त्यांची चौकशी व्हायची, ज्याच्यावर आरोप झाले, त्याला राजीनामा द्यावा लागायचा. किती बुरे दिन होते ते. आणि बावळट पंतप्रधान.
Disclosures to US Senate
Disclosures to US Senate claim lobbyists with links to Pakistan also hired for RSS
State Street Strategies, a public affairs firm in the US, has hired Squire Patton Boggs (SPB), a Washington-based legal firm that also does some work with the Pakistan government, to lobby on behalf of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), lobbying disclosures submitted by SPB to the US Senate show.
नवगाव स्फोटाची जबाबदारी
नवगाव स्फोटाची जबाबदारी पाकिस्तानमधल्या एका गटाने घेतली. त्यावर गोदी मीडियाने, नाही नाही, त्यांचा काही संबंध नाही, असं लगेच स्पष्ट केलं. वर हा ट्रॅप आहे असं म्हटलं.
भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की आधी पाकिस्तानचं नाव घेणार्यांनी आता का घेतलं नाही?
ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. पाकिस्तान ने पुन्हा आगळीक केली तर त्याची पुढची पावलं उचलली जातील, असं आधीच म्हणून ठेवलंय.
यातला धोका राहुलने लोकसभेतल्या भाषणात दाखवून दिला होता. शिवाय तिकडे तातोबा आहेतच.
त्यामुळे ऑपरेशन कंगन इ. होईल का ते सांगता येत नाही. याबद्दल मागच्या वेळ सारख्या हाय लेव्हल मीटिंगा झाल्याच्या बातम्या नाहीत. तेव्हा मंडळ बिहार निवडणुकांत आणि अदाणीच्या प्रकल्पात बिझी होतं.
Pages