एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची तरुणाई रील्स बनवण्यात गुंतली आहे ; त्याचं श्रेय मोदींनी भाजपला दिलं आहे. त्यात तरुणांची सृजनशीलता ओसंडून वाहते आहे, असं ते म्हणतात.

यंदा बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून की काय मोदी आपल्या वाढदिवशी गया इथे आईसाठी पिंडदान करणार होते. केलं की नाही कळलं नाही. आता दिल्लीत यमुनेकिनारी छठपूजा करणार आहेत. त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याचा वेगळा जलाशय तयार करण्यात आला आहे.

जिथे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता तपासली जाते, तिथेच पाणी फवारणारे टँकर फिरवून निकालांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
https://indianexpress.com/article/cities/delhi/sprinklers-continue-round...

Pages