T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्षदीपने मार खाला. पहिल्या ओवरल 13 धावा.

आर्षदीप पुन्हा प्रभाव टाकू शकला नाही.

उंच उडाला पण पंत खाली आला म्हणजे कॅच झालीच...
तिसरी कॅच
नववी विकेट

आणि शर्माने झेल घेत संपवला सामना...

>>
नावडातीचं मीठ ते हेच ना...

बुम बुम बुमराह!!

मध्येच हिंदी कमेंट्री लावली होती. सिद्धू चे बोलणे ऐकून जाम मजा आली. सरदार बडा असरदार

नावडातीचं मीठ ते हेच ना...
>>>>>

कोण नावडते?
माझे काही प्लेयर आवडते आहे हे मान्य..
नावडता कोणी नाही Happy
पांड्या सुद्धा नाही. स्पेशली जेव्हा तो देशासाठी खेळतो.
मुळात कोणी नावडते हा माझ्यासाठी कन्सेप्टच नाही. मला फक्त आवडत्यांचे कौतुक करायला आवडते. नावडत्यांवर टीका करत आयुष्य जाळन्यात मला बिलकुल रस नाही.. आणि क्रिकेटच नाही तर चित्रपट क्रीडा इतर सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींना हे लागू..
आणि हो,
कोणी आपल्या आवडत्या प्लेअरचे कितीही कौतुक केले तरी मला त्याचा शून्य त्रास होतो Happy

सिद्धू चे बोलणे.. अरे यार तो काय काय शब्द म्हणी वापरतो ते सगळे मला मुलीला समजावत बसावे लागतात.. बाकी मी हिंदीच कॉमेंट्री बघतो.. भारतीय असतात मजा येते..

माझे काही प्लेयर आवडते आहे हे मान्य..
नावडता कोणी नाही Happy
पांड्या सुद्धा नाही. स्पेशली जेव्हा तो देशासाठी खेळतो.
मुळात कोणी नावडते हा माझ्यासाठी कन्सेप्टच नाही. मला फक्त आवडत्यांचे कौतुक करायला आवडते. नावडत्यांवर टीका करत आयुष्य जाळन्यात मला बिलकुल रस नाही.. आणि क्रिकेटच नाही तर चित्रपट क्रीडा इतर सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींना हे लागू.. >> तळटीपा लावायचे काय ते कौशल्य. लेका वकिल झाला असतास तर जेठमलानी , सिबल वगैरेंची छुट्टी केली असतेस तर कधीच. Wink

आजच्यासारख्याच विकेट्स असतील तर एकंदर धमाल आहे. मागच्या विंडीज दौर्‍यावरून उघडपणे धडे घेतलेले दिसत आहेत.

आजच्यासारख्याच विकेट्स>> आपल्या बॅटिंगच्या वेळेसच माती उडताना दिसत होती. इथे पण बॉल खाली बसायला लागला तर मज्जाच होईल. अजून तरी हाय स्कोरिंग दिसत आहेत मॅचेस. खेळायला अवघड असले तरी अगदीच न्यू यॉर्क नाहीये हेच काय समाधान Lol

“ आजच्यासारख्याच विकेट्स असतील तर एकंदर धमाल आहे. ” - एकंदरीतच ह्या वर्ल्डकपमधल्या विकेट्स बॅलन्स्ड आहेत (हे मत न्यूयॉर्कच्या विकेट्समुळे इन्फ्ल्युएंस्ड आहे). बाऊंड्रीज सुद्धा लांब आहेत. त्यामुळे बॉलर्ससाठी काहीतरी आहे ह्या मॅचेसमध्ये.

आता दक्षिणायन सुरु झाले आहे. आपण सगळे वर्ल्ड कप उत्तरायण सुरु असताना जिंकलो आहोत. दक्षिणायनात आपली कामगीरी सुमार असते. ८३ चा जो कप जिंकलो तो पण जस्ट उत्तरायण संपताना जिंकलो. मॅच संपली आणि अर्ध्या एक तासात दक्षिणायन सुरु झालं होतं.

अरे, असं असतं होय क्रिकेटमधे?
मग आता क्रिकेट खेळणे बंदच करा, उरलेले वर्ष.
नाहीतरी फारच झालय. एकदम १४ जानेवारी नंतर पुनः चालू करा.

हे उत्तरायण दक्षिणायन आणि काँग्रेस काळात जिंकलो विरुद्ध मोदी सरकार असताना नाही वगैरे सारे धोनीचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न आहेत..
आताही आपण चांगली कामगिरी करत आहोत.. फक्त नॉकआऊट सामन्यात पसरत आहोत.. सचिन गांगुली काळात सुद्धा हेच होत होते.. फायनल हरायचो..
आताही केवळ तीच एक भीती आहे.. सेमी फायनल आपण खेळणार हे नक्की.. पुढे काय.. आय मीन तिथे काय.. बुमराह आणि पंत या दोघांवर विश्वास आहे माझा सध्या..

पुढे काय.. आय मीन तिथे काय.. बुमराह आणि पंत या दोघांवर विश्वास आहे माझा सध्या.. >> अरेच्चा, शर्मावर विश्वास नाही ?

इंग्लंडची बॉलिंग पेपरवर कसली मस्त वाटते वाचायला - आर्चर, वूड, टॉपली, अली/कुरान, रशिद. पण प्रत्यक्षात दणकून मार खाते आहे. बॅटींङ च्या जोरावर तरताहेत सध्या.

सारे धोनीचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न आहेत..>>>> धोनीच एक श्रेय आहे. धोनी जे वर्ल्ड कप जिंकला तेव्हाचा जो संघ होता तो फक्त नावाला होता. धोनी खेळाडूंच्या अंगात जायचा आणि त्याला पाहिजे तशी ओव्हर आणि बॅटींग करुन घ्यायचा. म्हणून त्याला थाला म्हणतात. चेन्नईच्या भाषेत थाला म्हणजे दुसऱ्यांच्या अंगात जायची शक्ती असलेला माणूस. आता हे सगळयांना माहीत झालंय म्हणून इतर देशातील खेळाडू त्याला भारतीय टीमचा कोच होऊन देत नाही.

नाही.. शर्मा कोहली दोघांवर नाही.. >> कोहली समजू शकतो पण शर्मा चांगला खेळलाय कि बर्‍याच फायनल्स मधे.

कुठे खेळले आहेत. जे जे चटकन आठवते ते अपयशच आहे. दोघेही त्यांच्या लौकिकाला साजेसे खेळत नाही की क्षमतेला न्याय देत नाहीत.. आता याला प्रेशर म्हणा किंवा मेंटल ब्लॉक तयार झाला आहे म्हणा.. तरी हे संघात उपयुक्त आहेत कारण फायनलला हरण्यासाठी आधी फायनल ला जावे लागते. आणि त्यासाठी यांची गरज भासते.

राहुल किंवा संजू हे प्लेअर सुद्धा मला मोठ्या सामन्यात न खेळणारे वाटतात. त्यामुळे यांच्यासोबत संघात नाहीये हे बरे वाटते. पंत वेगळाच खेळून जाऊ शकतो. रिंकू सिंग हवा होता तो नॉक आऊट सामन्यासाठीच. पण त्याला निवडलेच नाही.

*Rishabh Pant* breaks Adam Gilchrist’s all-time T20 World Cup record to register most dismissals in a single edition of T20 World Cup.

Pant has 10 dismissals to his name in T20 WC 2024

The youngster left behind several legends in the list such as AB de Villiers, Adam Gilchist, and Kumar Sangakkara among others who have nine dismissals each to their name.

Pant is also the leading run scorer for India in ongoing tournament.

ENG 50-2 (8)
RSA 163-6 (20)
Jos Buttler*: 16 (18)
Moeen Ali: 3 (3)
Keshav Maharaj 2-0-10-1
England need 114 runs in 72 balls

जिंकली पाहिजे आफ्रिका..
स्लो पीच आहे.. चान्स आहे.
इंग्लंडला सुरुवात फास्ट करू दिली नसल्याने गेम मध्ये पुढे आहेत.

शर्मा आणि कोहली या जोडगोळीचा मूळ उद्देश खेळणं नसून बाकीचे ९ आहेत त्यांच्याकडून चांगला खेळ करून घेणं आहे. कॅच सुटली, बॅटिंग करताना चूक झाली की कोहली रागे भरणार, मॅच जिंकली की शर्मा जेवताना वाढप्याला ए पोरांना अजून एक एक भाकर दे असं लाडात रागे भरून सांगणार, पंत जेवत नसला की त्याच्याजवळ जाऊन मायेने त्याला थोपटणार आणि प्रेमाने दोन घास भरवणार. बाकीच्या नऊ जणांना मायेची ऊब देऊन सामना जिंकणे हा जोडगोळीचा मूळ उद्देश आहे.

बांगलादेश..

Talking specifically in the ODIs, he has played 8 knockout fixtures, starting from the 2013 Champions Trophy. In the ODI World Cup, his first knockout match came against Bangladesh in 2015 where he scored a match-winning hundred.

In the Champions Trophy 2017 semi-final against Bangladesh, he smashed a century to help India book a date with Pakistan in the summit clash of the competition.

<<हे उत्तरायण दक्षिणायन आणि काँग्रेस काळात जिंकलो विरुद्ध मोदी सरकार असताना नाही वगैरे सारे धोनीचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न आहेत..>>

हे असे लिहिणे म्हणजे क्रिकेटबद्दल काहीहि कळत नसणे आहे.
मागल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामना हरलो, तो मुख्यतः मोदींची पनौति लागली म्हणून असे खुद्द श्री राहुल गांधीजी यांनीच जी सांगितले जी होते जी.

तर उगाच बॅटिंग, बॉलिंग फिल्डिंग याकडे लक्ष न देता, नक्षत्र तिथी वार, उत्तरायण की दक्षिणायन नि प्रेक्षकांत कोण आहे याकडे जास्त लक्ष द्या.

न च जमल्यास, पैसे चारा मॅच हरण्याचे पैसे द्या. इंग्लंडला म्हणून तर पैसे मिळतात, नाहीतर भारतापेक्षाहि गरीब राज्य ते!

Pages