T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताचे कर्णधारपद सुद्धा त्याने निभावले आहे
>>
ते करताना त्यानी स्वतः बॉलर असूनही बॉलिंग युनिट नीट हाताळल नव्हतं... कुठेही त्याचे ऑन ग्राउंड निर्णय वाखाणण्यासारखे नव्हते...

आयपीएल मध्ये आयुष्यभर खेळाडू म्हणूनच खेळत राहायचे का
>>
काहीही...
या न्यायाने प्रत्येक खेळाडूला किमान एक मॅच तरी कॅप्टन करायला हवं का??
असं पाहायला गेलं तर जाहीर खान / नेहरा वगैरे लोकं पण हीच डिमांड करू शकली असती

आणि समजा केलंच बुमारा ला मुंबईचा कॅप्टन तर तुझ्यासारखे रोहित / पांड्या भक्त त्याच्या नावानी शिमगा करायला कमी करणार नाहीत कशावरून??

रोहितला श्रेय द्यायचे तुम्हा लोकांना इतके जीवावर का येते.
>>
रोहित खेरीज बाकी व्यवस्थापनाला श्रेय द्यायचं तुझ्या इतकं जीवावर का येतं???

वरच्या फोटोमध्ये सुद्धा उघड दिसत आहे की त्याचा पांड्या सोबत व्यवहार कसा आहे, यारोंका यार आहे तो.. आणि त्याचे परीणाम दिसत आहे
>>
कशावरून हे पांड्या नी इनिशिएट केलं नसेल??
यारोंका यार फक्त कॅप्टन असतानाच तसा असतो का? नसेल तर मुंबई कडून खेळताना त्यानी असं काही जेश्चर का दाखवलं नाही??
बुमरा इतका चांगला खेळाडू आहे तो काय आयुष्यभर नॉन कॅप्टन म्हणून खेळणार का? चला त्याला पण कॅप्टन व्हायची संधी देऊ हे यारों का यार का इनिशिएट करत नाही?
पांड्या रोहित गळाभेट होण्यापूर्वी बीसीसीआय/ द्रविड नी दोघांना बांबू दिला नसेल कशावरून?? (तुझ्या डोमेन मधलं उदाहरण देतो - चक दे मधे कोच कबीर खान फायनल च्या आदल्या दिवशी प्रीती अन् कोमल ला बाजूला घेऊन सांगतो की उद्या मैदानात भांडण संपवा)

रोहित खेरीज बाकी व्यवस्थापनाला श्रेय द्यायचं तुझ्या इतकं जीवावर का येतं?
>>>>
अच्छा असा गैरसमज आहे तर.
मी रोहितचे कौतुक करतो म्हणजे इतरांना श्रेय देतच नाही असे वाटते तर.. Happy जाओ पहले ऊस आदमी का कौतुक करके आओ..

चक दे मधे कोच कबीर खान फायनल च्या आदल्या दिवशी प्रीती अन् कोमल ला बाजूला घेऊन सांगतो की उद्या मैदानात भांडण संपवा
>>>>>>>>>
तिथे कबीर खान शाहरुख होता..
इथला शाहरूख खुद्द रोहीत शर्मा आहे Happy

असो, ज्याना जे जे प्लेअर आवडतात त्यांनी त्यांचे खुशाल कौतुक करावे. माझी काही हरकत नाही.
पण रोहीत शर्मा डीजर्व्ह करत नसलेले कौतुक मी कुठे केले आहे हे दाखवावे इतकाच प्रश्न आहे Happy

वर लिस्ट दिली आहे.. एक खोडून दाखवावे...

टीम्स सेटल झाल्यामूळे आता अपसेट्स होणार नाही असे वाटतेय. त्यामूळे ऑस्ट्रेलिया स्कॉटलंड विरुद्ध रन रेट अ‍ॅडजस्ट करून जिंकेल का कि जेणेकरून स्कॉटीश रन रेट फारसा हेलकावणार नाही ? त्यामूळे इंग्लंड चे काम कठीण होईल. मला फारसे वावगे वाटत नाही. भारतानेही तेच करावे असे वाटते.

जेणेकरून स्कॉटीश रन रेट फारसा हेलकावणार नाही ? त्यामूळे इंग्लंड चे काम कठीण होईल. मला फारसे वावगे वाटत नाही. भारतानेही तेच करावे असे वाटते.
>>>>>>

मला वैयक्तिकरीत्या नाही पटत हे.
फार चुकीचे स्पिरीट आहे.

अमेरिकेतले भारतीय कोणाला सपोर्ट करताहेत आज? भारताला सपोर्ट करावा तर पाहुण्यांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन पाहुण्याचं वाईट चिंतायचं पाप आणि अमेरिकेला सपोर्ट करा तर मातृभूमीशी गद्दारी केल्याच पाप. पापच पाप.

अँडरसन गेला..
जिथे कॅच उडते तिथे ऋषभ पंत खाली पोहोचतो..

[उलटी आणि अवघड होती. कोणी मरत मरत तिथवर पोहोचला असता. पण याची रनिंग आणि अथलेटिजम इतके भारी आहे की त्याने सोपी आहे असे दाखवले

पंतच गेला च्यायला..
बॉल बराच खाली राहिला..
आता सूर्याने मारायला हवे काही फटके..

आता सूर्याने मारायला हवे काही फटके..
>>
काही गरज नाही
टिकून राहून धावा गोळा करा, सिंगल डबल घेत रहा
उगाच मोठे फटके मारायला जाऊ नका

इंडियन ग्राउंड वर आयपीएल खेळत नाही आहोत. न्यू यॉर्क च्या ड्रॉप इन पिच वाल्या ग्राउंड वर वर्ल्डकप खेळतोय हे लक्षात असूद्या...

त्यामूळे ऑस्ट्रेलिया स्कॉटलंड विरुद्ध रन रेट अ‍ॅडजस्ट करून >> मुद्दामहून तसे केले तर आयसीसी मार्शला बॅन करू शकते २ मॅचेस साठी. पण मुद्दामहून केले हे सिद्ध करणे कठीण आहे. आता कोहली पहिल्या बॉल ला बाद झाला नि भारतीय केयरफुली खेळले तर कोणाला दोष कसा देणार ?

आज सिरज ने रन आऊट केला तेंव्हा अंपायरला एव्हढा नीट व्ह्यू होता नि कॉल पण अजिबात क्लोज नव्हता पण तरीही लगेच थर्ड अंपायर रीव्ह्यू घेतला . हे आजकाल फार होतेय. थर्ड अंपायर वर डीपेंडन्सी वाढतेय.

वाचला सामना..
फार गचाळ खेळपट्टी

फटके खेळू लागलो तेव्हाच खेळपट्टी सोपी वाटू लागली. माईंड गेम आहे हा Happy

आत्तापर्यंतच्या सामन्यात मला ऑस्ट्रेलियाचा संघ सगळ्यात उजवा वाटला.
>>>>

सुपर आठ ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे सेमीला भेटणार नाहीत.

मला चिंता आहे ते आता सगळे सामने इथे खेळून वेस्टइंडीजला जाऊन पुन्हा नव्याने ऍडजस्ट करावे लागणार...

आज लवकर बाद होऊन सूर्या नि दुबे ला मॅच प्रॅक्टीस देण्याची ब्रिलियंट मूव्ह केल्याबद्दल रोहित ला मानले पाहिजे Lol

कोहलीचे काय सुरू आहे बाबा !

अशा पोस्ट टाकून रोहित जे डिझर्व करतो ते श्रेय नाकारणे गमतीशीर आहे..
असो.. नावडतीचे मीठ अळणी Happy

रोहित जे डिझर्व करतो ते श्रेय नाकारणे गमतीशीर आहे.. >> अरेच्चा मी तर तू न दिलेलेही श्रेय दिलय तरी टीका ? नावडतीचे वगैरे वगैरे कि काय Wink

कोहलीचे काय सुरू आहे बाबा>> मला पण हा प्रश्न पडला आहे. आता ३ सामने झालेत पण कोहली मात्र लवकर बाद होतोय.

सूर्या चांगला खेळाला आज. आधी थोडे सावध मग शेवटी मारामारी

आता ३ सामने झालेत पण कोहली मात्र लवकर बाद होतोय. >> ओपन करून आक्रमक होण्याच्या चेंजच्या मेटमॉर्फसिस मधून जात असेल अशी आशा धरूया. रोहित चे झाले तसेच त्याचे रुपांतर लवकरच होईल अशी आशा ठेवूया.

“ सूर्या नि दुबे ला मॅच प्रॅक्टीस देण्याची ब्रिलियंट मूव्ह केल्याबद्दल” - Lol

चांगला खेळला सूर्या. अर्शदीप तर वेगळ्याच लेव्हलवर बॉलिंग करत होता. कोहलीच्या बॅटमधून रन्स निघावे लवकर.

आहे ते श्रेय द्यायला नको म्हणून अतिशयोक्ती करायची याला एक प्रकारचे ट्रोलींगच म्हणतात.

अजून एक चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे धोनी तिन्ही आयसीसी चषक जिंकला आहे. त्या पश्चात आपण एकही नाही. याचे श्रेय धोनीला जाऊ नये म्हणून मुद्दाम खवचटपणे म्हणायचे की धोनीनेच लहानपणी कपिलदेवला सल्ले दिले होते म्हणून ८३ जिंकलो.

असो, हार्दिक पांड्याची बू करून ट्रोलींग करणारे एकवेळ उघडपणे निषेध करत होते असे तरी म्हणता येईल.. पण टोमणे बघून मात्र Happy Happy

Pages