T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टार्क टू शर्मा ६६४६०६
मजा आली..
तिसरा समोर मारलेला सिक्स.. दादागिरी होती.

आता कमिन्सला.. हा तर फार बेक्कार
आधीच्या सिक्सला खाऊन टाकले याने..

ढगाला जाऊन लागला वाटते.. च्यायला पाऊस आला

कमिन्स ला मारलेला सिक्स - एव्हढी मेहनत एखाद्या शॉट साठी रोहित ने केलेली मी आधी कधी आठवत नाही. नुसता ऑफ च्या बाहेर नाही गेला तर खाली बसून अजून बाहेरचा बॉल लेग कडे खेचलाय. पावसाचे आपण काय घोडे मारलय ? नेहमी चुकीच्या वेळी येत असतो आपल्या सामन्यांमधे.

चौथी ओव्हर, भारत 37-१ . तिसऱ्या षटकात रोहितच्या 28 धांवा !! पावसाचा व्यत्यय.

५ ओवर ५२-१
शर्मा १९ बॉल ५०
पुन्हा एकदा पावर प्ले मध्ये अर्धशतक

बाबो! शर्माजी का बेटा ऐक्कत नाही आज! दुसरी ओवर सॉलिड खतरनाक होती. जणू कोहली ( पुन्हा एकदा) स्वस्तात आउट झाल्यामुळे चिडून शिव्या दिल्यासारखी Happy

झंपाला सेटल होउ द्यायचे नाही अशा स्टाईलमधे खेळताहेत, मजा आहे. पिच स्ट्रोक प्ले ला सूट होणारे दिसतेय. आपल्या इनिंगनंतर थोडा पाऊस पडावा नि बॉल मस्त स्विंङ व्हावा हेड बॅटिंग करताना - मजा येईळ बघायला. Wink

झंपाला पहिला बोलला पुढे येऊन सिक्स.. ऑस्ट्रेलियाचे पर्याय संपत आहेत. आणि हे ठरवून करत आहेत. कोणाला सेटल होऊ देत नाहीये.. आता स्टॉईनिस

आता. पंत पण चवताळला! पावसामुळे सामना कमी षटकांचा झालाच तर सरासरीचा वांदा नको म्हणून चौके, षटकार मारूनच धांवा करण्याचा निर्णय असावा. रोहित at his aggressive best!!

आता ऑस्ट्रेलियाला हरवतील की आपला बदला पूर्ण झाला. चुकून माकून परत फायनलला भेट झाली तर आपण नव्याने हरायला मोकळे. त्या हारचा बदला घेऊ परत दिपक्षीय मालिकेत.

हार्दिक चा स्टोनिस ला मारलेला सिक्स काय पॉवरफुल होता ? नि परत तो ऑफ च्या बाहेरून ऑफ बॅलॅन्स उचललेला होता - चाबकासारखा गेलाय - अबब !

आज आपण एक रेकॉर्ड केला.
८.४ ओवर १००-२
आज ट्वेंटी वर्ल्डकप हिस्टरी मधील Fastest team १०० झाले.
यात शर्माचे ७८ इतरांचे २० आणि २ extra होते.

पीचच हाणामारीची आहे कशीही बॅट फिरवा फोर सिक्स गेलाच पाहिजे. तरीच बोललो एव्हढे २०० कसे केले आपण. तुम्ही पण साधे भोळे आहात उगीच मी तुम्हाला माहेरच्या साडीतली अलका कुबल नाही बोलत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन लगेच खुश होता आणि कमेंटी टाकून जगाची एंथलपी वाढवता. तुम्हाला आधीच बोललो होतो पाकिस्तानला हरवलं त्यात समाधान माना जास्त अपेक्षा ठेऊ नका.

येस्स! गेला हेड पण. काय वेडी वाकडी बॅट फिरवत होता. फार भारी वाटतं ऑसीजना डॉमिनेट केलेलं पहायला. रेअर मोमेन्ट्स!
हिंदी कॉमेन्टेटर्स अशा वेळी फार कॉमिक बडबड करतात Happy

हेड गेला वेड आला वेड गेला

Pages