लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Press Trust of India
@PTI_News
Biggest learning from elections is that poll process should be completed before summer: CEC Rajiv Kumar

निवडणू़ आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली एकदाची.

आज निवडणूक आयोगाचा एक्झिट पोल जाहीर होत आहे. जर या पोलचे आकडे टिव्ही चॅनेल्स आणि शास्त्रीय एक्झिट पोल सादर करणार्‍या संस्थांच्या आकड्यांशी जुळले नाहीत तर निवडणूक आयोगावर बंदी घालावी. हा पोल पुन्हा घेण्यात यावा. तोपर्यंत विविध संस्थांच्या पोलची सरासरी काढून सरकार बनवायला हरकत नसावी.

<< INDIA आघाडी टफ फाईट देत आहे NDA ला. ४०० पार काय होत नाही. >>

------- INDIA आघाडी टफ फाईट देत आहे NDA + ED + CBI + IT + EC अघाडीला.

विरोधी नेत्यांना तसेच पत्रकारांना कुठलेही ठोस पुरावे नसतांना, केवळ कपटी उद्देशाने अटक करवून जेलमधे सडवत ठेवण्याच्या षडयंत्राचा ED, CBI भाग होती हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. विजयाचे श्रेय स्वायत्त गमावलेल्या या संस्थांनाही द्यायला हवे.

केजरीवाल, संजय सिंग, महुआ मोईत्रा, संजय राऊत असे अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्या विरुद्ध काडीचे ही पुरावे नव्हते.

जबरदस्त फाईट! मजबूत विरोधी पक्ष मिळणार आता. चांगलं आहे हे लक्षण. आता फक्त जर INDIA विरोधी पक्षात गेले तर पुढेही ते एकत्र राहू देत.

<< Biggest learning from elections is that poll process should be completed before summer: CEC Rajiv Kumar >>

------- inompetent अकार्यक्षम, inept कशाला म्हणायचे याचे छान उदाहरण.

तापमानाचा, उष्माघाताचा आणि त्यामुळे होणार्‍या मनुष्यहानीचा किती जवळचा संबंध हे EC ला माहित असायला हवे होते.

तापमानाचा डेटा, मागच्या दहा / वीस वर्षांत उष्माघाताने किती लोकांचे बळी गेले आहेत याची आकडेवारी उपलब्द आहे. मे महिन्यांत अनेक ठिकाणचे तापमान ४०+ असते, कधी ४५, क्वचित ५० सें पर्यंत पण जाते.... सात फेर्‍यांमधे निवडणूका घेतल्यानंतरच हे कळाले असेल आणि याला biggest learning म्हणायचे असेल तर आनंद आहे.

जबरदस्त फाईट! मजबूत विरोधी पक्ष मिळणार आता. चांगलं आहे हे लक्षण. आता फक्त जर INDIA विरोधी पक्षात गेले तर पुढेही ते एकत्र राहू देत. >>> +१
सरकारात गेले तरी एकत्र राहू देत Happy

आता EVM hack झाले आहेत की नाहीत? Election rigged आहे की नाही? आता भारत democracy राहिला आहे की नाही? Lol

जबरदस्त फाईट! मजबूत विरोधी पक्ष मिळणार आता. चांगलं आहे हे लक्षण. आता फक्त जर INDIA विरोधी पक्षात गेले तर पुढेही ते एकत्र राहू देत>>>>

+१००००. हेच व्हायला हवेय. कोणाच्याही डोक्यात हवा जायला नकोच, गेलेली हवा जनता उतरवणार हे कायम लक्षात ठेऊन सर्व पक्षांनी वावरायला हवे.

अश्विनी Happy Happy अब तेरी भी चुप मेरी भी चुप…

कुणालाही कितीही जागा मिळाल्या तरी इव्हीएम हटली पाहिजे. जर २०० पेक्षा जास्त जागा येऊनही विरोधी पक्ष संसदेत सरकारला भाग पाडणार नसेल तर मग ते ही कधी कधी लाभार्थी असावेत असा संशय राहणारच.

जबरदस्त फाईट! मजबूत विरोधी पक्ष मिळणार आता. चांगलं आहे हे लक्षण. आता फक्त जर INDIA विरोधी पक्षात गेले तर पुढेही ते एकत्र राहू देत>>>>

+१००००. हेच व्हायला हवेय. कोणाच्याही डोक्यात हवा जायला नकोच, गेलेली हवा जनता उतरवणार हे कायम लक्षात ठेऊन सर्व पक्षांनी वावरायला हवे. >>> अगदी अगदी.

आता EVM hack झाले आहेत की नाहीत? Election rigged आहे की नाही? आता भारत democracy राहिला आहे की नाही? >>> सही.

भारतात डेमोक्रसी संपली असे कोणीच म्हणत नव्हते पण डिक्टेटरशिपच्या दिशेने वाटचाल चालू होती किंवा असेल हेही तितकेच सत्य आहे. सर्व एजेन्सी ताब्यात घेऊन, मीडिया विकत घेऊन, निवडणूक आयोगावर आपलीच माणसे लादून , विरोधकांची कोंडी करून, अतिशय खालच्या पातळीवर प्रचार करून सुद्धा जर स्वबळावर २५० मोठया मुश्किलीने पार करू शकत नसतील तर समजू यात का हे एका non biological चे अपयश आहे ?

एक्झिट पोल निकाल आले तेव्हाच बोललो हे निकाल खरे नाहीत रागा येणार. चित्त्याची चाल, गरुडाची नजर आणि बोकलतचा अंदाज.

व्हीवीपॅड मधली १००% स्लिप्स मोजण्यासाठी आणि त्याचे आकडे डिजिटल काउंट सोबत पडताळणी करण्यासाठी या पुढे ही पाठपुरावा करायला हवा...आमचा कोणत्याही राजकारण्यावर याबाबतीत बिलकुल विश्वास नाही आहे.

चंदिगड महापौर निवडणुकीतही काहीही गडबड झाली नव्हती, सुरत, इंदूर मध्येही काहीही विपरीत घडलं नाही, मेन स्ट्रीम मीडियाने कसलाही पक्षपात केला नाही, मुलाखती स्क्रीप्टेड नव्हत्या, आयटीने काही पक्षांची बँक खाती फ्रिज करणे आणि त्याच वेळी निवडणुका तोंडावर येणे हा फक्त एक योगायोग होता आणि अशा आणखी कितीतरी गोष्टीही आता पूर्णपणे सिद्ध झाल्या आहेत. शंका घेणारे तोंडावर आपटले आहेत. त्यांना बरनॉल सॉरी, तोंडाला लावायला बँडेज, पेनकिलर मलम आणि गोळ्या देण्यात येत आहेत. पेनकिलर गोळी घेण्याच्या अर्धा तास आधी पॅन-डी घ्या मग काही तरी खाऊन पेनकिलर घ्या. मी आताच घेतली.

ईव्हीएम वर विश्वास टाकणे म्हणजे लालकृष्ण अडवाणी, जी व्ही एल नरसिंह राव (तत्कालीन भाजपाध्यक्ष) यांनी देशाला खोटं सांगितलं असे म्हणणे. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देशाची फसवणूक केली असे म्हणणे होय. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शंका घेणे होय.

म्हणून कुठल्याही पक्षाचं नाव न घेता ईव्हीमे रद्द करा असे म्हटले आहे. हीच वेळ योग्य आहे ईव्हीएम रद्द करण्याची कारण कुणालाही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळं २००९ पासून जे काही चालू आहे कि विरोधात असताना ईव्हीएम भ्रष्ट असतात आणि सत्तेत आल्या कि त्या पवित्र होतात त्याला आळा बसेल. ईव्हीएम हॅक होतात नाही, त्यात बदल केले जातात नाही हा प्रश्नच नाही.

माझं मत कुठे जातं हे पर्सनली मला समजत नाही. देशातल्या असंख्य अशिक्षितांना समजत नाही. त्यामुळे ज्या सिस्टीमवर मतदारांचा विश्वास नाही ती नसावी. प्रगत देशात ईव्हीएम वापरत नाहीत म्हणून त्यांचा विकास खुंटलेला नाही.

नितीशकुमार पलटी मारण्यात तरबेज असले तरी overall जनतेमधे त्यांची प्रतिमा सभ्य, स्वच्छ अशी आहे. माझ्या एक-दोन बिहारी मित्रांकडून ऐकलं आहे की त्यांनी विकासकामेही चांगली केली आहेत. तसेच दुसरे बिजू पटनाईक. ओडिशामधे ते लोकप्रिय आहेत आणि एकूण तशी सभ्य प्रतिमा आहे.
अर्थात हे वासरात लंगडी गाय शहाणी असं असलं तरी या दोघांपैकी कोणीतरी एक पंतप्रधान व्हावा ही माझी सुप्त इच्छा आहे Happy . मी आधीही एका धाग्यावर यासंबंधी लिहिले होते.

मोदी होणार नाहीत या कुजबुजीत पण काही दम नाही.
मोदी होणार नसतील तर गडकरी होईल, व्हावेत. इतर कुठल्याही पक्षाचा पीएम होणे शक्य नाही कारण सर्वच मित्रपक्ष आमचा का नाही म्हणून अडून बसतील.

पूर्ण बहुमत असताना कारभार करणं आणि इतरांचा सपोर्ट घेऊन मनमानी न करता कारभार करणे हीच तर टेस्ट आहे.
ईश्वरी अवतार, गंगामैयाचा अवतार असा शेपुट घालेल! शक्यच नाही ते!

इव्हिएम ला विरोध हे झेपत नाही. नव्या पद्धती येणे आणि जुन्या पद्धती मोडीत निघणे हे होतच असते. का़ळासोबत पुढे जावेच लागते.
आणि ज्या अर्थी तेच तेच पक्ष न जिंकता निकाल बदलत आहेत त्या अर्थी कुणी एक पार्टी त्या मशीन्स न कन्ट्रोल करताहेत ही भीती अनाठायी आहे
असे म्हणायला हरकत नसावी.
निकाल नक्कीच इन्टरेस्टिंग आहेत. राम मंदिर, खटाखट वगैरे कामी आले की सुट्ट्या, हीट वेव्ह इ. मुळे अनपेक्षित निकाल आले हे जाणून घेणे अजूनच इन्टरेस्टिंग असेल! Happy

चीकूंना कदाचित इंडिया गटाने त्यांना पंतप्रधानपद बहाल करून एनडीएतून वेगळं करावं असं सुचवायचं आहे का?

Pages