आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काल एकंदर परागचा ॲटीट्यूडपण खुपच toned-down वाटला!! >> तो म्हणतोय कि त्याने बाकीचे काय बोलतात हे ट्युन्ड आऊट केले आहे. कालच्या मॅचच्या आधी आजारी होता म्हणून शांत होता का ?:) जे काय होते ते चांगले होते एव्हढे नक्की.

मयंक यादव खतरनाक फास्ट आहे. १५० च्या स्पीडने सातत्याने बॉलिंग करणं आणि बेअरस्टो, धवन सारख्या बॅट्समनना सतावणं सोपं नाहीये. ह्या स्पीडला सुद्धा अचूक आहे. अजिबात लेंग्थ आणि लाईनमधे भरकटत नव्हता. अक्षरशः एकहाती मॅच फिरवली पठ्ठ्यानं.

नाही बघितली कालची मॅच!!
पण वाचले मयंक यादव बद्दल,; हायलाईटस बघतो सहजी मिळाल्या तर!!

येतोय चुम्मा रंगात...
31 चेंडूत अर्धशतक मारून गेला..
आता सामना सुद्धा जिंकायला हवे

माही मार रहा है.. 16 बॉल 37.. चार चौके तीन छक्के..
एक ही तो दिल है माही.. कितनी बार जितोगे..

भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आज इमोशनल दिवस आहे!
मरणाच्या दाढेतून परत येऊन चुम्मा आज खेळला आणि दिल्लीला पहिला सामना जिंकून दिला Happy

धोनी जेंव्हा बॅटींगला आला तोपर्यंत मॅच चेन्नईच्या हातातून निसटली होती त्यामुळे dhoni was just playing to gallery Happy
नेट रनरेट जास्त बिघडला नाही इतकाच काय तो त्या खेळीचा उपयोग!!
धोनी जर खरच या प्रकारच्या फॉर्मंमध्ये असेल तर त्याने जडेजा, दुबे वगैरे लोकाच्या आधी येऊन स्वताला स्थिरावायला वेळ देऊन त्या फॉर्मचा संघासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यायला हवा!!

नॉर्कियाला शेवटची ओव्हर टाकायला बॅन केले पाहिजेल Wink

तर त्याने जडेजा, दुबे वगैरे लोकाच्या आधी येऊन ...
>>>>

कप्तान गायकवाड आहे ना..
धोनी कसा ठरवणार कधी यायचे ते Happy

>>कप्तान गायकवाड आहे ना..
धोनी कसा ठरवणार कधी यायचे ते Happy

बास्स का राव!! गंगाधरही शक्तिमान है ये पुरी दुनिया जानती है Wink

आज राजस्थान वि. मुंबई...... हाय व्होल्टेज मॅच Happy

राजस्थान-मुंबई मॅचच्या आठवणी काही फारश्या चांगल्या नाहीत..... आदित्य तरेने हातातून काढून नेलेली मॅच, वॉटसन-पोलार्ड टस्सल!!

आज बघू काय ड्रामा बघायला मिळतोय मॅचमध्ये Wink

राजस्थानची विजयाची आणि मुंबईची पराभवाची हॅट्रिक होऊ दे आज !!

आज वानखेडेवरचा माहोल बघायला सुद्धा मजा येईल.
जे लोक हार्दिक पांड्याला चिडवणार त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार असा मेसेज फिरत आहे. मेसेज बहुधा फेक असावा. पण त्याचा परिणाम किती होतो ते बघूया. अंबानी आणि कंपनी काळजी घेईलच आज..

"गंगाधरही शक्तिमान है ये पुरी दुनिया जानती है" - सहीं पकडे हैं||

“चेन्नईचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे धोनीच करत आहे” - २२ मार्च
"कप्तान गायकवाड आहे ना.. धोनी कसा ठरवणार कधी यायचे ते" - ३१ मार्च

सलग १० दिवस तरी एका मतावर ठाम रहा की.

"कप्तान गायकवाड आहे ना.. धोनी कसा ठरवणार कधी यायचे ते" - ३१ मार्च >> जोक्स अपार्ट पण सिरीयसली धोनीने स्टेप बॅक करून गायकवाडला स्कोप द्यायला हवा नाहितर पुढच्या सीझनमधे बोंब लागेल.

आज वानखेडेवरचा माहोल बघायला सुद्धा मजा येईल. >> रोहित बाद झाल्यावर खरच बघण्यासारखा होता माहोल. हाय ची दिशा पार चुकली रे आज Wink रोहित असा किती वेळा लेफ्ट हँड बॉलर्स ना बाद झालाय हे बघाय्ला हवे Sad

“चेन्नईचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे धोनीच करत आहे” - २२ मार्च
"कप्तान गायकवाड आहे ना.. धोनी कसा ठरवणार कधी यायचे ते" - ३१ मार्च

सलग १० दिवस तरी एका मतावर ठाम रहा की

>>>>>>

हा हा हा
ते मुद्दाम उलटे म्हटले होते.
त्यादिवशी धोनीच कप्तान आहे हे ज्याना पटले नव्हते त्यांची फिरकी घेत होतो.
कप्तान धोनीच आहे. हे एखादा बालक सुद्धा सांगेल Happy

व्वा!! कडक मारले पराग नी. व्हॉट अ कमबॅक बाय धिस लॅड!

कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि वाढत राहिल त्याचा. खुपच फर्म आणि शुअर शॉट होते त्याचे. चूक, डबल माईंड वगैरे नाहीच आजिबात. आय गेस त्याला फक्त पेशन्स, शांतपणा शिकायची गरज होती जे तो फायनली शिकला. ग्रेट फॉर हिम अ‍ॅन्ड रॉयल्स!

रियान परागने पुन्हा काही क्लास फटके दाखवले. यावेळी पहिल्याच सामन्यात त्याविषयी केलेला अंदाज खरा ठरतोय.. बच्चा बडा हो गया है.

राजस्थानची विजयाची आणि मुंबईची पराभवाची हॅट्रिक होऊ दे आज !!
^^^^^
इच्छा पूर्ण झाली.
शांत झोप लागेल Happy

काल सुद्धा चुम्मा खेळला. त्यामुळे दिल्ली जिंकली धोनीने सुद्धा हवा केली.. अगदी मनासारखे घडले Happy

येस्स्स..... एकदा मॅच पूर्ण आवाक्यात आल्यावर मस्त accelerate केले परागने Happy
मॅच्युअर ॲप्रोच..... Orange Cap मिळाली त्याला..... very impressive transformation!!

हार्दिक पांड्याला बघून सारखे मला "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" गाणे आठवतेय...... तो खुप कॅज्युअल कॅज्युअल असल्यासारखे दाखवतोय पण He is not comfortable हे अगदी क्लिअरली जाणवतेय!!

“ एकदा मॅच पूर्ण आवाक्यात आल्यावर मस्त accelerate केले परागने” - मस्तच खेळला रे. ती कव्हर्समधून मारलेली सिक्स अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी होती. टॉप शॉट!!

आय गेस त्याला फक्त पेशन्स, शांतपणा शिकायची गरज होती जे तो फायनली शिकला. >> हो ! आत्ता असाच खेळत राहिला तर १५ मधे येईल बहुतेक. शेवटच्या १५७ च्या बॉलला नि त्याने सहज हँडल केला.

तो खुप कॅज्युअल कॅज्युअल असल्यासारखे दाखवतोय पण He is not comfortable हे अगदी क्लिअरली जाणवतेय!! >> मी त्याच्या जागी असतो तर कसे रीअ‍ॅक्ट केले असते असा विचार करतोय.

हौ फेफ. जब्बरदत सिक्स होता तो. खुप लेट खेळतो तो!

शेवटच्या बॉल १५७ ला होता नि त्याअने सहज हँडल केला.>>>>> हौ! बुमराहला पण एक फोर मारली त्यानी बहुतेक.

काल टॉस उडवताना पब्लिक नेहमीसारखे रोहीत रोहीत करत होती आणि मांजरेकरने टॉसला पांड्याचे नाव घेताच पब्लिकने बूss केले तसे संजय मांजरेकर पब्लिकला म्हणाला behave Happy

संजय मांजरेकर पब्लिकला म्हणाला behave >> रोहित पण लोकांना तेच म्हणाला फिल्डींग करताना ! पण रोहितच्या सो कॉल्ड फॅन्स साठी पालथ्या घड्यावर पाणी होते. स्टेडियम्स अजूनही भरभरून ओसंडून जात आहेत असे दिसतेय तेंव्हा हे सो कॉल्ड फॅन्स नक्की काय बहिष्कार घालत आहेत बोंबाबोंब करण्यापेक्षा हे माहित नाही.

“मोहसीन खान ला त्याचा मोजो परत मिळाला तर काय धमाल येईल.” - असाम्याने गेली दोन-तीन वर्ष मोहसीनवर होप्स लावून ठेवल्यात. Happy Happy

हो रे. त्याला पहिला सीझन कसला खतरा होता. अर्शदीपच्या एंड ओव्हरपेक्षा पाच पट सरस होता (यमीपेक्षा पाचपट गोरी च्या चाली मधे वाच ) नंतर त्याला इंजरी मुळॅ सर्जरी करावी लागली. ऑलमोस्ट हात अँप्युटेट करायची वेळ आली होती वगैरे. रीहॅबिलीटेशन नुकतेच संपलेय. काय एव्हढ्या प्रॉमिसिंग तरूण पोरांची हि अशी वाट लागतेय रे. प्रसिद्ध, चहर, मोहसीन खान - लिस्ट वाढतीच आहे. बॅटस्मन पैशापासरी मिळतात पन बॉलर्स ची वानवा असते ना रे. यातही १४०+ पेसर नि तोही डावरा हे व्हाईट ग्लोव्ह मधे ठेवायची बाब आहे.

त्यावरून खलील ह्या सीझन मधे एकदम मस्त बॉलिंग करतोय - चांगला पेस आहे नि बाउन्स नि लॅटरल मूव्हमेंट मिळवतोय. मुख्य म्हणजे डोके वापरतो आहे.

रोहितच्या सो कॉल्ड फॅन्स साठी
>>>>
ते रोहितचे चाहते नाही तर भारतीय क्रिकेटचे चाहते आहेत. ज्याना योग्य अयोग्य याची जाण आहे. म्हणून निषेध व्यक्त करत आहेत.

मयंक यादव अजून एक..
आधी मॅक्सवेल आणि आता ग्रीन ला घेतला पेस वर

Pages