Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हाइट हाऊसच्या नाकावर
व्हाइट हाऊसच्या नाकावर टिच्चून रेमंड त्याचे साम्राज्य उभारतो तिथे पोचला असाल मग
मी पण पाताललोक काल बिंज वॉच
मी पण पाताललोक काल बिंज वॉच करून संपवली.
१ एपिसोड, १ एपिसोड करत पहाटेचे ४ वाजलेले पण थांबावस वाटलं नाही.
बाकी वर उल्लेख आलेले आहेतच, पण विर्क चा डायलॉग...
तु डूबती नाव को बचाने की कोशिश करता हैं..
त्यातच हाथीराम चौधरी च वेगळेपण सांगून जातो.
तो गुड्डू पण किती निरागस आहे, मस्तच.
बाकी, त्या नागा लँग्वेज मध्ये मराठी शब्द पण होते ना
भूक, नाय... अजून पण होते
नागालँड बद्दल पण खूप रिअल
पाताल लोक मध्ये नागालँड बद्दल पण खूप रिअल गोष्टी दाखवल्या आहेत. तिकडे खरेच असेच वातावरण आहे.
माणसाच्या जीवाला कवडीमोल किंमत. काही मूल्यं नाहीत, काही वैचारिक प्रगल्भता वगैरे नाही. फक्त पैसा महत्त्वाचा.
आपल्याला आपल्या सुशिक्षित, सुरक्षित जगात राहून काहीच कल्पना येत नाही.
मलाही पाताललोक सलग बघायची आहे
मलाही पाताललोक सलग बघायची आहे पण तेवढं होत नाहीये, त्यामुळे रोज एकेक एपिसोड बघतेय.
मला स्पॉयलर चालतात, रसभंग होत
मला स्पॉयलर चालतात, रसभंग होत नाही, आशु यांनी आवडणारे साईड chara मरते लिहिल्यावर डोक्यात पटकन जे नाव आलं, तेच स्मिता यांनी लिहिलेलं वाचून कन्फर्म झालं. अरे काय असं का केलं सिरीजवाल्यांनी, बघताना रडू येणार.
पाताललोक जबरदस्त... खरंच...
पाताललोक जबरदस्त... खरंच... Amazing घेतली आहे सिरीज. एकही मिन फॉरवर्ड ना करता सलग बघाविशी वाटते खिळवून ठेवते.
एक दोन सीन ला खरंच डोळ्यात पाणी येतं..आधी एवढे involve झालेलेच असतो आपण.. हाथीराम च त्या नंतर च वागणं, बायकोने समजून घेणं फार सुंदर दाखवल आहे..त्याने पण डोळे भरून येतात..
त्या दोघांची relationship इतकी छान आणि खरी दाखवली आहे की बस.. अती प्रेमात नाही..अती राग नाही.. खूप सगळं खऱ्या आयुष्यात आपल्या जोडीदाराबरोबर असत तसं अगदी..
परत परत बघू शकतो ही सिरीज .
पाताल लोक 2 म्हणजे हठीराम
पाताल लोक 2 म्हणजे हठीराम चौधरीचा चहा आणि फाटलेला स्वेटर दाखवायचे स्टेज आहे. तपास चालतो, पण इतका स्लो की गुन्हेगार स्वतः पोलिसात येतील. सिस्टीमचा काळा चेहरा दाखवण्याचा अट्टाहास एवढा की प्रेक्षक म्हणतात, ‘आता लाईट तरी लावा!’ शेवटी मिळतं काय? निराशा, अजून फाटलेला स्वेटर, आणि सबस्क्रिप्शन कॅन्सल करण्याची इच्छा”
शेवटी जेव्हा हाथीराम ची बायको
शेवटी जेव्हा हाथीराम ची बायको त्याला विचारते, की सिद्धार्थ की गर्लफ्रेंड का नाम क्या था...?
तर अगदी सहजपणे, अनन्या असे उत्तर देतो. तेव्हा ती म्हणते, एकदम हाथी जैसी याददाश्त है! तो सीन खूप आवडला . >>>> हे तुम्ही लिहीलेत तोपर्यंत तो भाग पाहिलेला नव्हता पण नंतर पाहिला. मस्त सीन आहे तो. "न घडलेल्या गुन्ह्याची कथा" हे एकदम चपखल आहे पहिल्या सीझन बद्दल.
जोगी कडे रेड टाकतो तेव्हा गच्चीत झोपलेल्या कामगारांना टाकीत लपवतो.. आणि पोलीसांच्या हाती सापडायचं नसेल तर उद्या सकाळपर्यंत इथेच बसुन रहा म्हणतो....\अशा लहान लहान प्रसंगातुन त्याचं सहृदय मन दाखवलं आहे.. >>> सहमत.
वरती अनेकांनी लिहीलेले संवाद तर मस्त आहेतच. मला आवडलेले आणखी दोन - समोरच्या पैशांमधून पाच लाख काढून घेताना "उसके हक का इतनाही था" म्हणून निर्विकारपणे बाकी पैशाचा मोहही न होणे. तसेच वरती लिहीले तसे - एखाद्या सीनमधे आता मात्र इथे समोरच्याशी याला दबून बोलावे लागेल असे वाटत असताना याच्या डोक्यात एखाद्या बुद्धिबळाच्या खेळाडू सारखी पुढची मूव्ह - प्रत्युत्तर तयार असते - त्याचे भन्नाट उदाहरण नंतरही दिसले. भल्ला याच्याकडे आता कसा आलास परत माझ्याकडे मदतीला टाइप नजरेने बघत असतानाच "एक बालक की जिंदगी का सवाल है साहब. अगर मदद करोगे तो जिंदगीभर याद रखूँगा. और अगर नही करोगे तो भूलने का सवालही पैदा नही होता" दरडावून सीन खाउन टाकतो. त्याच्या मेव्हण्याला वाटत असते हा आता मान खाली घालून नोकरीकरता आलाय. याच्या डोक्यात तिसरेच काही असते
ह्या डायलॉग ला तर मी मनात जोरदार शीळ घातली. जब्बरदस्स्स्स्स्त! >>>
परफेक्ट टाइमला आलाय तो डॉयलॉग
आणि तो म्हणताना आपण काहीतरी स्वॅग वाला डॉयलॉग बोलतोय असा काहीही आविर्भाव नाही त्याच्या चेहर्यावर. एकदम मॅटर ऑफ फॅक्ट स्टाइलने म्हणून जातो तो.
त्याचा विर्कबरोबरचा एक संवाद मला जबरी आवडला. आता पुन्हा सस्पेण्ड व्हायचे नसेल तर जरा जपून वाग असे विर्क त्याला सांगतो. त्यात दिल्लीच्या/हरयाणवी बोलीभाषेतील चोडे की चौडे असा एक शब्द आहे तो मला माहीत नाही. "ज्यादा चोडे/चौडे मत कर" असे काहीतरी विर्कने म्हंटल्यावर "बिना चोडे/चौडेका चौधरी देखा है कभी आपने साहब" उसे उलट हाच त्याला सुनावतो
पोलिस स्टेशनमधली मंजू त्याच्या घरी जाते व त्याच्या बायकोला तिच्या आईची तब्येत कशी आहे विचारते तेव्हा मी टोटल फुटलो. पुढे नंतर मंजू त्यालाही तू खरंच बायकोच्या माहेरी गेला नव्हतास का विचारून जोरात हसते त्या सीनमधला त्याचा अभिनय पाहावा. अगदी फ्रेम न फ्रेम लक्ष देऊन पाहण्यासारखा आहे. स्क्रिप्टमधे "मंजू असे विचारते" असा संवाद लिहीलेला असेल. पण त्या आधी त्याच्या सिनीयरशी तो उभा राहून बोलत असतो. तो बॉस तेथून गेल्यावर मंजूने हे विचारायच्या आधी त्याची बॉडी लँग्वेज बघा. तो हे दोन्ही संवाद "अॅक्ट" करत नाही फक्त. त्या प्रसंगात तो पूर्ण घुसला आहे. मंजूने विचारल्या विचारल्या लगेच तिच्याकडे बघत नाही तो. अजून बॉसशी झालेल्या बोलण्यातच गुंग आहे व सावकाश खुर्चीवर बसता बसता मग तिने काहीतरी विचारले आहे याकडे त्याचे लक्ष जाते. रोल जगला आहे तो टोटली.
आता केवळ हाथीरामच्या मॅनरिजम, अभिनय व संवादांकरता दोन्ही सीझन पुन्हा पाहावेसे वाटत आहेत.
छान निरीक्षण, फा !
ती मंजू असे म्हणते की, ' मुझे लगा वहीसे पीट कर आ रहे हो..'..
तेव्हा तो नुसते तिच्याकडे रागाने पाहतो....एकदम सटल अभिनय केला आहे तेव्हा त्याने...खूपच मस्त.
लेखक कोण आहे कळले का?
ह्या वेब सिरीज मध्ये काही अवॉर्डस् नसतात का?
पाताल लोक शुअरली डिसर्व्हज् ऑल ऑफ देम!
पाताललोकचा लेखक = सुदीप शर्मा
पाताललोकचा लेखक = सुदीप शर्मा
उडता पंजाब ची कथा-पटकथा त्याचीच.
फारएन्ड आणि छला.. अगदी बरोबर.
फारएन्ड आणि छला.. अगदी बरोबर.. खरचं.
छान लिहिताय बरेच जण. मानायला
छान लिहिताय बरेच जण. मानायला हवं तुमच्या निरीक्षणशक्तीला.
मला ती थोम (हॉटेलमध्ये खून झालेला) त्याची बायको इंप्रेसिव्ह वाटली, तिला आहे का मोठा रोल, तिने तर नसेल खून केला असं वाटलं. असेल मोठा रोल तर बघायला आवडेल तिला.
नागेश कुकनूरला मी पहिल्या भागात ओळखलंच नव्हतं, खूप दिवसांनी बघितलं त्याला, महत्वाचा रोल दिसतोय त्याचा.
आवडत्या chara चा अंत तसा लवकर
आवडत्या chara चा अंत तसा लवकर केला, वाईट वाटलं जाम. शेवटच्या भागात वगैरे असेल त्याचं जाणं असं वाटलेलं.
द ब्लॅकलिस्टमध्ये आता
द ब्लॅकलिस्टमध्ये आता धक्कादायक वळण आलंय >> बहुदा ८-९ सिझन बघत असाल. धक्कादायक वळणं शेवटच्या सिजनमध्ये विशेष नाहीत. दहावा सिझन त्यामानाने थोडा रटाळ वाटतो.
पाताललोक - सिझन २, पहिल्या
पाताललोक - सिझन २, पहिल्या सिझन सारखंच वेगवान कथानक, उत्तम अभिनय. मालिका चालू असताना कुणी कुणाला मारले या रहस्यात पूर्ण अडकून पडायला होते. पण मालिका संपल्यावर का मारले याचा विचार करायला लागल्यावर काही ढोबळ चुका जाणवल्या
स्पॉयलर अलर्ट
हत्या तेंव्हाच करायची जेंव्हा ती केल्याशिवाय गत्यंतर नसते असे म्हणणारा माणूस इतक्या हत्या करतो - त्यातल्या काही उगाच - तेंव्हा ते पात्रच फसलेलं वाटतं. थॉमला मारल्यानंतर त्या हत्येची जबाबदारी स्विकारणार्या त्या तिघांना मारले असते तरी ती राजकीय हत्याच वाटली असती सगळ्यांना आणि डॅनिअलचा उद्देश सफल झाला असता.
रुबेनला मारण्यामागचे कारण नाही समजले. उद्या तो खूनाचा छडा लावत आपल्यापर्यंत पोहचेल या भितीपोटी मारले असेल तर मालिकेतली जवळपास सगळ्याच पात्रांना मारायला हवे. मुळात रुबेन बापाच्या खूनाचा सूड घेईल / त्याचा तपास करेल हेच पटत नाही. त्याच्या मनात बापाबाद्दल इतका राग (आणि घृणा) असते की तो बहिणीशेजारी त्याचे दफन करायलाही विरोध करतो. असा माणूस बापाच्या खूनाचा प्रतिशोध का घेईल.
रोझला मारण्याचा प्रयत्न तर मूर्खपणाचा वाटला (ती त्या प्रयत्नात मरत नाही हा भाग अलाहिदा). तिच्यावर थॉमच्या खूनाचा आळ आहे, लोकांच्या नजरेत तीच खूनी आहे. तिला मारून ती खूनी नाही आणि खरा खूनी कुणी वेगळाच आहे आणि अजून जिवंत आहे हेच नाही का सिद्ध होणार?
अमली पदार्थांची तस्करी करणार्या कपिलला सपोर्ट करणारा अंकल जेंव्हा विकासाची भाषा बोलतो तेंव्हा हसू येते. अशा तस्करांच्या जोरावर केलेला विकास हा जरी तात्पुरता चांगला वाटला तरी पुढे जाऊन त्याचे किती भयानक परीणाम होतील हे अंकलला समजत नाही का? आणि हे समजणारा आणि "power corrupts. absolute power corrupts absolutely" हे चांगलेच ओळखून असलेला हाथीसिंग अंकलला पकडत नाही ही सगळ्यात मोठी चूक वाटली.
पण या चुका असल्या तरी मालिका बघताना क्षणभरही कंटाळा येत नाही. बहुतेक सगळी पात्रे छान उभी केली आहेत - आणि त्याहून सुंदर आहे ती त्या पात्रांत असणारी केमिस्ट्री.
लोकहो, पाताल लोक च्या
लोकहो, पाताल लोक च्या चर्चेसाठी धागा वर काढला आहे.
https://www.maayboli.com/node/74854
पाताललोक २ ऑल अबाउट हाथिराम..
पाताललोक २ ऑल अबाउट हाथिराम...जयदिप अहलावत ने सिझन पुर्ण खान्द्यावर पेललाय..माधव याच्याशी सहमत कथानकात फ्लॉज आहेत तरी फ्लो चान्गला आहे.
जयदिप अहलावत ची बॉडी लॅग्वेज, निरिक्षण शक्ती, साधेच पण इफेक्टिव्ह सवाद .. डोळ्यानी बोलतो हा माणुस.
स्पॉयलर अलर्ट
दोन प्रसन्ग अगदी अविस्मरणीय
अन्सारी ची डेडबॉडी येतो तेव्हा त्याच्या डोळ्यात दु;ख्,करुणा, सन्ताप, हताशा सगळ सगळ दिसत.
सगळ्यात शेवटी २ कोटी समोर असताना फक्त ५ लाख घेणारा आणी उसके उतनेही बनते है म्हणणारा!!
बाकी बारिक सारिक डॉयलॉग पण जबरी आहेत पण हे ठळक उठुन दिसतात.
ऐशीच्या दशकात आलेली 'कच्ची
ऐशीच्या दशकात आलेली 'कच्ची धूप ' मालिकेची आठवण आली म्हणून youtube वर परत बघायला सुरवात केली.
सिरीयल गोडच आहे.
ही सिरीयल 'लिटल विमेन ' वर आधारित आहे पण श्रेयनामावलीत तसा उल्लेख मात्र नाही. लेखिका म्हणून चित्रा पालेकरचं नाव आहे. (की मी miss केलं?)
कच्ची धूप त्यावेळी जाम एन्जॉय
कच्ची धूप त्यावेळी जाम एन्जॉय केलेली.
पाताललोकच्या सेकंडलास्ट भागाचा शेवट चटका लावून गेला, हे गरजेचं होतं का. असा विचार मनात आला.
पाताललोक पाहिली , आवडली.
पाताललोक पाहिली , आवडली.
नागालॉण्डची पार्श्वभूमी आवडली पण गंभीर समस्यांचे वर वर चित्रण वाटले.
रोझ , थोम, पासवान , रूबेन , डानिअल , तो फळांचा व्यापारी सगळ्यांचा एकमेकांशी संबंध जरा ओढून ताणून वाटला. पण त्या त्या वेळी सगळं इतक वेगात घडत की आपण त्यातच गुंततो.
तो वरातीचा दिल्लीतला सीन रोझची पहिली भेट आहे.
केस वर काम करत असताना चौधरीला वेळोवेळी आधी घडलेल्या गोष्टी आठवतात आणि क्लू सापडतात.
तो "हाथी जैसी याददाश " वाला सीन ते अधोरेखित करते.
जयदीप ला १०० पैकी 200 गुण.
मला सौ थोम आणि सौ रेड्डी दोघीही आवडल्या.
येस्स स्वस्ति.
येस्स स्वस्ति.
वरातीचा सीन.
पण ती रोज जखमी का असते आणि कुठे निघालेली असते ते कळले नाही...!!
बिचाऱ्या त्या रोज ला चांगले असे दाखवले नाहीये पूर्ण सिरीज भर..सदा आपली मास्क लावून अथवा जखमी अथवा नशेत.

बिचाऱ्या त्या रोज ला चांगले
बिचाऱ्या त्या रोज ला चांगले असे दाखवले नाहीये पूर्ण सिरीज भर..सदा आपली मास्क लावून अथवा जखमी अथवा नशेत. >>
I know . म्हणूनच मला ज्या प्रकारए तिचे कॅरेक्टर उभे केले आहे , त्याबद्दल आश्चर्य वाटले . सगळे तिच्या मागे का लागले असतात .
ती जखमी नाही , नशेत असते .
मधे तो रघु आणि रोजचा काय
तो रघु आणि रोजचा काय संबंध. तो पैसे का घेत असतो, हे ऐकलं एका एपिसोडमधे पण मला काहीच समजलं नाही. कोणीतरी सांगेल का.
नेफिवर गर्लबॉस कोणी पाहिली
नेफिवर गर्लबॉस कोणी पाहिली आहे का? काल मी २-३ भाग पाहिले. इंटरेस्टिंग वाटत आहे. कॉमेडी आहे. आपला ब्रेबॅ मधला हँक (डीन नॉरिस) आहे त्यात पण अजूनतरी छोटा रोल आहे. लीड अॅक्ट्रेस ओळखीची नाही. (तिच्या बापाचा रोल त्याने केला आहे)
सध्या काही म्हणजे काही बघणं
सध्या काही म्हणजे काही बघणं होतच नाहीये. आम्ही आपापल्या फोनवर पॉडकास्ट्स बघत असतो त्यामुळे पूर्वीचा एकत्र टिव्ही बघायचा वेळ ऑलमोस्ट संपल्यात जमा आहे. हे बंद व्हायला हवं आहे.
पाताललोकचा शेवटचा एपिसोड
पाताललोकचा शेवटचा एपिसोड राहीलाय. नवऱ्याला आणि मला एकत्र वेळ असेल तेव्हा बघू. त्याने निदान शेवटचा तरी बघावा ही माझी इच्छा आहे. तो साय फाय मुविज, सिरिज, साऊथ डबड असं बघत असतो बरेचदा. पाताललोक सीझन वन मात्र दोघांनी बघितलेला. आता म्हणाला तू बघ पूर्ण सिरिज, मी फक्त शेवटचा एपिसोड बघेन.
झाली बघून पाताललोक, बरेच
झाली बघून पाताललोक, बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले. काही गोष्टी पटल्या नाहीत. नवऱ्याला वेळ होता तेव्हा शेवटचा भाग बघितला, त्याला थोडक्यात सांगितलं आधीचे.
मी सुद्धा इथे भरभरून चर्चा
मी सुद्धा इथे भरभरून चर्चा चाललेली बघून पाताल लोक बघितली ( मगच चर्चा वाचली). जयदिप अहलावतचा अभिनय उत्तम आहे! कुठेही मालिका रटाळ वाटत नाही. काही गोष्टी पटल्या नाहीत. बऱ्याचदा विर्क प्रॅक्टीकली बरोबर वाटला; विशेषतः शेवट बघता, एवढा आटापीटा करून, स्वतःचा जीव धोक्यात घालून, सहकारी आणि इतर निरपराधी लोकांचा जीव गमावून एवढं असं काय साध्य झालं, असा विचार आला.
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.
या कादंबरीवर आता "The Secrets of Shiledars" अशी मालिका Hotstar वर आलेली आहे. पहिला भाग ठीक ठाक वाटला.
आधी मला वाटले 'शोध' नावाची एक
आधी मला वाटले 'शोध' नावाची एक कान्दबरी आहे त्यावर आधारीत आहे. सुरते ची लुट नाशिक च्या आस पास कुठल्या तरी डोन्गर रान्गात लपवली आहे त्यावर. ‘प्रतिपश्चंद्र’ वाचायला पाहिजे आता.
Pages