Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉल मी बे कधीपासून बघायची आहे
कॉल मी बे कधीपासून बघायची आहे, विसरुन जाते. अमा असताना बघून त्यांना कळवायचं होतं खरं तर, राहून गेलं.
माझेमन आता ब्लॅकलिस्ट किंवा
माझेमन
आता ब्लॅकलिस्ट किंवा बॉस्टन लीगल पाहताना तेच आठवेल 
मीसिंग यू: नेटफ्लिक्स >>>
मीसिंग यू: नेटफ्लिक्स >>> धन्यवाद अमितव. Friday night ची सोय झाली. Castमध्ये तो नेहमीचा हिरोपण दिसतोय. Harlen Coben ची एखादी सिरीज वगळता बाकीच्या पाहिल्या आहेत. आवडल्यात.
हो. रिचर्ड आर्मिटेज आपला
हो. रिचर्ड आर्मिटेज आपला स्ट्रेंजर वाला आहे.
रोजलिंड एलिएझर लीड अभिनेत्री आहे ती फार मस्त आहे. काम पण छान केलंय आणि दिसते पण हॉट. आणखी पण ओळखीचे चेहरे दिसतात.
ब्रिटिश क्राईम ड्रामा असल्याने एक फारतर दोन गोळ्या सुटतात. अमेरिकेत एफबीआय करून पाऊस पडला असता.
मिसिंग यू नोट केली आहे.
'मिसिंग यू' नोट केली आहे. हार्लेन कोबेनची फॅक्टरी ओळखीची आहे. पण ही सिरीज लिमिटेड आहे म्हणून बघेन.
सध्या One hundred years of Solitude सुरू केली आहे. चार एपिसोड झाले आहेत. फेसबुकवर माहितीसह पोस्ट आली होती. त्यामुळे मूळ पुस्तकाविषयी माहिती वाचून घेतली. मूळ पुस्तक स्पॅनिश आहे, मला इंट्रेस्टींग वाटले. पुष्कळ प्रसिद्ध कादंबरी आहे म्हणे. ही डब्ड सिरीज आहे. खूप इन्टिमेट सीन्स आहेत, अगदी तपशीलवार दाखवले आहे. काही तरी जादूटोणा, रिअलिझम व थोडी अभद्र आहे. सोने तयार करणे, जंगलात फिरणं, भुतंखेतं वगैरे आहे. सध्यातरी विचित्र वाटत आहे. पूर्ण झाली की लिहेन. Alchemy ला मराठीत काय म्हणतात माहिती नाही, तेही आहे यात.
Alchemy >>> तस्साच शब्द नसावा
Alchemy >>> तस्साच शब्द नसावा पण गोळाबेरीज अर्थ म्हणून परिसस्पर्श चालावा (अर्थात तो वाट्टेल तिथं वापरून गुळगुळीत करून टाकलाय.)
थॅंक्यू माझेमन.
थॅंक्यू माझेमन.
मला हा शब्द केमिस्ट्री - धातू - मॅटर रिलेटेड वाटायचा. जास्त विस्तारित. पण हे चालेल.
किमया. किंबहुना किमयाला 'अल्
किमया. किंबहुना किमयाला 'अल्'चं अरेबिक प्रेफिक्स लागून अल्केमी शब्द तयार झाला - आणि इंग्रजीतला 'केमिस्ट्री'ही.
इंट्रेस्टींग स्वाती. किमया
इंट्रेस्टींग स्वाती. किमया आहे त्यात, केमिस्ट्री बेस्ड जादू.
किमया >> बरोब्बर.
किमया >> बरोब्बर. अल्केमिस्टला किमयागारच म्हणतात...पण तोही शब्द कसाही वापरला गेलाय .
हो - इथे अधिक माहिती वाचता
हो - इथे अधिक माहिती वाचता येईल.
अगं, पूर्ण प्रबंध आहे हा. मी
अगं, पूर्ण प्रबंध आहे हा. मी फोनवरून उघडून बघत होते.
नो वरीज, तशीही लिंक वाचायला
नो वरीज, तशीही लिंक वाचायला नव्हती दिली, घाबरवायलाच दिली होती.
(No subject)
अलकेमिस्टला 'किमयागार' असंच
अलकेमिस्टला 'किमयागार' असंच रसायनशास्त्रात शिकवलं होतं.
आणि इथरचा माग घेणारे लोक.
परिस, फिलॉसॉफर्स (सॉर्सरस) स्टोन.. म्हणजे निकोलस फ्लमेल
तशीही लिंक वाचायला नव्हती
तशीही लिंक वाचायला नव्हती दिली, घाबरवायलाच दिली होती. >>>
मी "सॉलिट्यूड" वरती कोणालातरी विचारणारच होतो कशी आहे म्हणून. अस्मिताने प्रबंधांचे वार अंगावर झेलत आम्हाला संक्षिप्त परिचय दिला त्याबद्दल आभार
कादंबरी वाचलेली नसली तरी त्याबद्दल खूप वाचलेले आहे. ममव वाचकांसमोर इंग्रजी लेखकांची नावे मारणे ही अॅडल्ट लेव्हल असेल तर नॉन-इंग्रजी युरोपियन/रशियन्/जपानी लेखकांची नावे मारणे ही लेजेण्ड लेव्हल आहे. पण अशी नावे अधूनमधून फेबुवर थोर व्यक्तींकडून ऐकली आहेत. त्यात हे एक (हा लेखक व ही कथा कोलंबियातील आहे इतके माहीत आहे)
ब्रिटिश क्राईम ड्रामा असल्याने एक फारतर दोन गोळ्या सुटतात. अमेरिकेत एफबीआय करून पाऊस पडला असता. >>>
अरे सिरियसली! एकदा तिच्या
अरे सिरियसली! एकदा तिच्या घरात कोणी शिरलाय असा तिला संशय येतो. ती पोलिसांत डीएस आहे. हॉलिवुड मध्ये लगेच ड्रॉवरमधुन बंदुक बाहेर काढली असती. ती स्वयंपाक घरात जाऊन सुरी घेऊन येते. आणि त्या आगंतुकाला अजिबात यमसदनास पाठवत नाही. भरुनच येतं मला.
बंदुकीशी मला अजिबात रिलेट होता येत नाही.
ती पोलिसांत डीएस आहे. हॉलिवुड
ती पोलिसांत डीएस आहे. हॉलिवुड मध्ये लगेच ड्रॉवरमधुन बंदुक बाहेर काढली असती. ती स्वयंपाक घरात जाऊन सुरी घेऊन येते.
>>>>
ह्यॅ स्वयंपाकघरीत जाऊन सुरी आणण्यात काय मज्जा? इथे दिवसा बीडमधली पोरं देसी कट्टा घेऊन फिरतात…
दिवसा ड्रॉवरमध्ये व रात्री डायरेक्ट उशीखाली पिस्तुल पाहिजे… नाहीतर स्मिथ & वेसन, कोल्ट वगैरे कंपन्यांचा धंदा कसा चालायचा?
बंदुका, एफबीआय, ब्रिटिश पोलीस
बंदुका, एफबीआय, ब्रिटिश पोलीस - सगळ्या पोस्टी
सलील कुलकर्णीची ‘कवितेचं गाणं
सलील कुलकर्णीची ‘कवितेचं गाणं होताना’ ही यूट्यूबवरची मालिका नुकतीच पाहण्यात आली. अतिशय सुंदर आहे - मराठी काव्याची, संगीताची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पाहावी, आणि तशी खास आवड नसणाऱ्यांनी मुद्दाम पाहावी अशी शिफारस करेन! जुनीच दिसते आहे - मला नुकताच शोध लागला!
नो गुड डीड, मिसिंग यू, मून
नो गुड डीड, मिसिंग यू, मून वॉक - नोटेड.
डेड टू मी बघितली होती. त्यातील योगायोग बघून प्रियदर्शन त्यावर एक चांगला सिनेमा बनवू शकेल असा विचार मनात आला होता.
मून वॉक मध्ये जामतारा मधला नट आहे का? जाहिरातीत त्याच्या सारखाच कोणीतरी दिसतोय.
मिसिंग यु पाहिली. १० पैकी ६/७
मिसिंग यु पाहिली. १० पैकी ६/७ स्टार्स देईन. त्यातला तो डॉग ब्रिडर काहीही कारण नसताना घुसडलेला आहे गोंधळ वाढवायला. काहीही संबंध नाही. तशी फास्ट पेस असल्यामुळे कंटाळवाणी नाही झाली.
हो, मलाही खास वाटली नाही.
हो, मलाही खास वाटली नाही.
हार्लेन कोबेनच्या अशाच असतात.
हार्लेन कोबेनच्या अशाच असतात. बी ग्रेडच वाटतो. फॅक्टरी आहे ती, धडाधडा काढतात. The stranger, Stay close, Fool me once वगैरे मला सगळ्याच मध्यम वाटल्या होत्या. बघणेबल कॅटॅगरी.
धन्यवाद फा. पहिल्यांदाच हा शब्द उपयुक्त वाटला.
यावर्षी बघितलेल्या पैकी सगळ्यात बेस्ट मला The fall of the house of Usher, The Queen's gambit, The sandman या तीन वाटल्या होत्या. जॉन्राचा आग्रह नसेल तर फुल रेको घ्या.
१० सिरीजचे कॉन्ट्रॅक्ट आहे ना
१० सिरीजचे कॉन्ट्रॅक्ट आहे ना. त्यामुळे मिळेल ते कलाकार घेऊन कमी वेळात काढलेल्या सिरीज. फार विचार न करता मजा आली पाहिजे.
स्पॉयलर**********"***
हो, तो ब्रीडर गोंधळ माजवायला आहे. कॅट फिश मिळालंय ना, वापरून टाकू. असं आहे. पण ठीक आहे. लेखन शैली ही परवलीची खूण वापरून एआय लाच ओळखायला लावणे भाग आवडला मला.
Missing you -- मला एक कळलं
Missing you -- मला एक कळलं नाही , सगळा उलगडा शेवटी होतो , ठीक आहे. पण crime scene वरून पण केट ला काही संशय येत नाही ???? की deadbody कुठे दुसरी कडे सापडते. ?
केट तेव्हा पोलीस झालेली नसते/
केट तेव्हा पोलीस झालेली नसते/ नसावी ना?
>> ब्रिटिश क्राईम ड्रामा
>> ब्रिटिश क्राईम ड्रामा असल्याने एक फारतर दोन गोळ्या सुटतात. अमेरिकेत एफबीआय करून पाऊस पडला असता.>> एफबीआयच नाही तर प्रत्येक कॅरेक्टरकडे बंदूक असती. अगदी ती छोटी मुलगी सेडी दाखवली आहे तिच्याकडे सुद्धा.
Missing you पाहिली. ओक ओकेच
Missing you पाहिली. ओक ओकेच आहे. साधारण कल्पना येत जाते. पार्कर कोण निघणार हे ही लक्षात आलं.
मुळात साडी भरजरी नाहीये त्यात तिला डॉग ब्रीडरचं ठिगळ लावलंय आणि ते लगेच कळू नये म्हणून बळंच ॲक्वा रंगाच्या दोऱ्याने शिवलंय.
हिरवीण मात्र एकदम बोले तो झक्कास!
मिसिंग यू पाहिली. एका दिवसात
मिसिंग यू पाहिली. एका दिवसात बिंज वॉच केली. वरचे पॉइन्ट्स मान्य केले तरी बघताना एन्गेजिंग आहे .
मला पूर्वी वाचलेले एक हा. को. चे पुस्तक आठवत होते त्यात फोकस त्या मिसिंग पीपल आणि तो फार्म वगैरे त्यावरच होता. अजून डीटेल मधे त्या किडनॅपिंग, टॉर्चर आणि मग सुटकेची प्रोसेस असे होते. क्रीपी होते एकदम. यात केट ची स्टोरी अजिबात वाचल्याचे आठवले नाही मला. त्यामुळे बहुतेक दोन वेग वेगळी पुस्तके एकत्र करून २ पॅरलल ट्रॅक्ची स्टोरी तयार केली की काय असे वाटते आहे. ते ट्रॅक जोडायला मात्र फारच अवघड गेले आहे त्यांना
Pages