Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोदीसत्ता संदर्भ बीबीसीने
मोदीसत्ता संदर्भ बीबीसीने केलेली फिल्म आवडली नाही म्हणून युट्युबवरुन परस्पर काढायला लावली म्हणून होता. अर्थात नायिकेला सर्वगुणसंपन्न दाखवणे हा रोग आहेच.
बाकी आम्ही त्या राजाला मानतो, म्हणून अधिक राग. त्या चार्ल्सचं तोड क्वार्टरवर येईल. उद्या २० च्या नोटेवरही राणीच्या जागी येईल. त्याच्या आता....
जाऊद्या!
मोदीसत्ता संदर्भ बीबीसीने
मोदीसत्ता संदर्भ बीबीसीने केलेली फिल्म आवडली नाही म्हणून युट्युबवरुन परस्पर काढायला लावली म्हणून होता >>> ओह - काहीतरी अंधुक आठवते.
मी वरती फक्त त्या सर्वगुणसंपन्न पॅटर्नचा संबंध त्याच्याशी फारसा नाही इतकेच सांगतो होतो
बाकी हे लोक कॅनडाचे हेड ऑफ स्टेट वगैरे आहेत हे विसरलोच होतो 
हीरामंडी - सरप्रायझिंगली आय
हीरामंडी - सरप्रायझिंगली आय ऍम एंजोयिंग इट. आधी पहिला एपिसोड अर्धा बघून चक्क थंब्स डाऊन केली होती. पण नंतर बरीच टॉलरेबल होते.
चार्ल्स हा त्या कुटुंबातला
चार्ल्स हा त्या कुटुंबातला सर्वात हुकलेला (कमनशिबी अशा अर्थाने) माणूस होता की काय - असं आता ५ सीझन्स बघून झाल्यावर वाटतंय.
पण परक्या देशातल्या राजघराण्याच्या बाबतीत असं म्हटलेलं चालेल.
हे म्हणजे सिनेमा पाहून इतिहास समजला म्हणण्यासारखं आहे.
पूर्वी कधी मी त्या राजघराण्याच्या इथे येणार्या बातम्या फार फॉलो केल्या नव्हत्या. त्यामुळे तथ्यं माहिती नाहीत. (चार्ल्स-डायनाचं लग्न दूरदर्शनवर सविस्तर दाखवलं होतं ते आठवतंय.)
तरीही डायनाच्या अपघातापूर्वीचे पापाराझींचे सीन्स पाहून हताश वाटतंच. आजच्या बेताल न्यूज चॅनल्सची बीजं त्या प्रकारात होती.
प्राईड एँड प्रेज्युडाईस १९९५
प्राईड एँड प्रेज्युडाईस १९९५ बीबीसी सिरीज बीबीसी प्लेअरवर पाहिली. हे वर्जन मला पुस्तकाशी सगळ्यात प्रामाणिक वाटतं. आणि कॉलिन फर्थ ऍज डार्सी …डोळ्यात बदाम
सुनिधीने रेको केल्याने,
सुनिधीने रेको केल्याने, इन्स्पेक्टर ऋषी बघायला घेतली, चांगली वाटतेय, 3 एपिसोडस बघितले. मल्याळम असावी, मी हिंदी भाषेत बघतेय.
शेवटपर्यंत पहा. अनपेक्षित आहे
शेवटपर्यंत पहा. अनपेक्षित आहे शेवट.
हो शेवटपर्यंत बघणार.
हो शेवटपर्यंत बघणार.
गूड.
गूड.
प्राईमवर Harlan Coben ची ‘शेल्टर’ मालिका दिसली. इथे मध्यंतरी त्याची बरीच चर्चा झालेली त्यामुळे पहायला घेतली आहे.
गूड.
दोनदा आलं.
लुटेरे hotstar वर
लुटेरे hotstar वर
कैच्या कै आहे
बजेट चांगले होते, कलाकार चांगले पण फार ठाव नाही घेत. Story line चांगली असून माती खाल्ली.
त्यातले सोमालियन चाचे फार खतरनाक दाखवलेत.
ते ऍक्टर्स देखील चांगले आहेत.
कुंबे झालेला व्हिलन गॅंग मधील एक जण तर फारच विचित्र क्रूर आणि सनकी
हो लुटेरे मस्त होतं.त्यांनी
हो लुटेरे मस्त होतं.त्यांनी सिझन 1 लटकत ठेवला.
सगळे आफ्रिकन ओरिजिन कलाकार एक्सलंट!! कुंबे, बरकड, तो विक गांधीचा खुनशी प्रतिस्पर्धी, आणि बरकड चा भाऊ.
गर्ल इन द सिटी मधल्या अरीम खलनायिकेला इथे फार वाव मिळाला नाहीये.रजत कपूर पण 90%वेळ नुसताच हतबलपणे पाहत असतो.
लुटेरे चे पार्श्वसंगीत पण मस्त.
अनु लास्ट एपिसोड आला की
अनु लास्ट एपिसोड आला की गुरुवारी
अनु लास्ट एपिसोड आला की
अनु लास्ट एपिसोड आला की गुरुवारी>> त्यात पण लटकत ठेवले आहे. शेवट असा काही दाखवला नाही. स्टारच्या सगळ्या सिरिअल्सच असच असत.
इन्स्पेक्टर ऋषी आवडतेय. मेन
इन्स्पेक्टर ऋषी आवडतेय. मेन तिघे ऋषी, आय्यानार, सत्या छान आहेत. कॅथि मस्त आहे. काही त्रुटी आहेत आणि वेबसिरीजमध्ये उगाचच एक तरी chara होमो हवं हे काही पटत नाही.
नेफि - A Man in Full - मस्त
नेफि - A Man in Full - मस्त सिरीज आहे. एंगेजिंग एकदम. जेफ डॅनियल्स एकदम फेवरिट आहे - मात्र आता वय दिसते. सहज लावली आणि तीन एपिसोड्स बघूनच थांबलो.
वीन Submitted by अन्जू on 7
वीन Submitted by अन्जू on 7 May, 2024 - 04:02 >>> थँक्स रेकोसाठी.
सुनिधीने लिहिलं आधी, म्हणून
सुनिधीने लिहिलं आधी, म्हणून मी बघतेय रघु आचार्य.
विक्रांत मस्सी ची एक वेब
विक्रांत मस्सी ची एक वेब सिरीज युट्युबवर बघतेय. ब्रोकन बट ब्युटिफुल! बहुतेक २-३ सिझन आहेत.
केकता कपूरची आहे. त्यामुळे टिपीकल लव ब्रेकप ड्रामा, हाऊ टू मुव्ह ऑन वगैरे आहे. पण विक्रांतसाठी बघतेय. आवडतेय.
हल्ली बर्याचदा नोटीस होतंय की बॅकग्राऊंड म्युझिक इतकं लाऊड ठेवतात की डायलॉग्स पण ऐकू येत नाहीत नीट. एडीटींग वगैरे करत नाही का कोणी?
इन्स्पेक्टर ऋषी बघतोय.
इन्स्पेक्टर ऋषी बघतोय. पहिल्या दिवशी सुरूवातीची पाच मिनिटं काही न समजल्याने बंद केली होती.
इथे रेको वाचून पाहिली. संथ लयीत उलगडते. उत्कंठावर्धक आहे.
खटकलेल्या गोष्टी आहेत पण कमी आहेत. इग्नोर केल्या.
द क्राऊन - सहाव्या सीझनने
द क्राऊन - सहाव्या सीझनने पाचव्या सीझनचा कंटाळा घालवला.
विल्यमचं कास्टिंग झकास! कामही झकास.
स्पॉयलर असेल.
स्पॉयलर असेल.
र आ खटकलेली गोष्ट म्हणजे, लोखंड हातात ठेवलं की माणूस सेफ वनराचीपासून असं ती आजी सांगते, काहीजणांजवळ असतं तरी काही उपयोग नाही.
मला आधी वाटलं सर्व फॅट आणि दाढीवाले तिची शिकार
पण तसं काही नाही.
चांगली एंगेजिंग सिरीज आहे.
वेटरला पकडल्यानंतर त्याची
वेटरला पकडल्यानंतर त्याची कहाणी ऐकून त्याला सहजपणे सोडून देतात. पुढच्या प्रसंगात त्याचा विश्वास नसतो असे दाखवले आहे.
आता प्रतिक्शा ब्रिजर्टन सीझन
आता प्रतिक्शा ब्रिजर्टन सीझन ३ ची .
टीझर्स मध्ये , सैफीना , ब्रॅण्जेलीना सारखं , कॅन्थोनी , पॉलीन वगैरे दाखवतायेत
इथे वाचून इन्स्पेक्टर ऋषी
इथे वाचून इन्स्पेक्टर ऋषी पाहिली. ठीकठाक वाटली. जंगलाचे चित्रीकरण मस्त आहे, प्राण्यांचे अनिमेशन विशेष आवडलं नाही. सुरुवात आणि शेवट छान आहे पण overall खूप ताणली असं वाटलं. तीन चार भागांत खूपच क्रिस्पी बनवता आली असती हे वै म.
स्पॉयलर चालू–-------
शेवटी सत्याचा पराभव होतो असा विचार करून हसू आलं.
मुख्य पात्राचं नाव सत्या आणि त्या दुसऱ्याचं ऋषी चाललं असतं. शेवटी सत्याचा विजय झाला असं तरी म्हणता आलं असतं
----- स्पॉयलर समाप्त
एपिसोड ६ मी पुढे ढकलत बघितला.
एपिसोड ६ मी पुढे ढकलत बघितला. ती ऋषी आणि त्याची gf स्टोरी ऑलरेडी मध्ये मध्ये आलेली, एवढा वेळ त्यावर द्यायची गरज नव्हती. नुसतं पाच मिनिटांत सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
स्पॉयलर असेल.
सत्याचा मला संशय आला पण तो आधी नाही, तो आई बरोबर सस्पेन्स पिक्चर बघत असतो त्यामुळे, तेव्हा ऋषीही त्याच्याकडे संशयाने बघत असतो असं वाटलं . आता वरचं वाचून संशय खरा की काय वाटायला लागलं
असो उरलेले दोन भाग एक दोन दिवसांत बघेन.
कॅथी ओळखीची वाटते, याआधी कुठे बघितलं ते आठवत नाहीये.
ऋषिपेक्षा सत्या आणि अय्यनार जास्त इम्प्रेसिव वाटले मला.
ती ऋषी आणि त्याची gf स्टोरी
ती ऋषी आणि त्याची gf स्टोरी ऑलरेडी मध्ये मध्ये आलेली, एवढा वेळ त्यावर द्यायची गरज नव्हती. नुसतं पाच मिनिटांत सांगितलं असतं तर बरं झालं असतं. >> हो अगदी. बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी मूळ कथानकाच्या दृष्टीने अनावश्यक वाटल्या. हे इतरही बऱ्याच सीरीज मध्ये जाणवतं म्हणा.
सत्या हा जो कुणी अभिनेता आहे
सत्या हा जो कुणी अभिनेता आहे त्याचा खूप सहजसुंदर वावर आहे. अभिनय करतोय असं एकदाही वाटलं नाही.
कॅथीला आधी पाहिले आहे असे सतत वाटत राहते. कुठे ते आठवत नाही.
लेस्बियन लव स्टोरी विनाकारण घुसडल्यासारखी वाटली. काहीच गरज नव्हती.
आता खुलासे सुरू झालेत तर शेवटी कुठे त्याचा काही संदर्भ आहे का ते पहायचे.
स्पॉयलर :
सापाला पाणी पाजत असताना हा प्रसंग संशयपेरणी साठी असेल किंवा हेच रहस्य असेल असे वाटले होते. कॅथीवर संशय होताच.
तरी सुद्धा बर्यापैकी चकवले या मालिकेने. त्यामुळे मजा आली.
र आ तुमची बघूनही झाली.
र आ तुमची बघूनही झाली.
सापाला पाणी पाजताना मला विचित्र वाटलं पण मला संशय तो लहान असल्यापासून आई बरोबर जुने तमिळ सस्पेन्स हॉरर मुविज बघतो ते वर्णन करत असतो तेव्हा आला. Cathy ताईवर संशय आला नाहीये अजून पण मेन पोस्टर मध्ये ऋषी आणि तीच का असं सुरुवातीला वाटलं.
अरेरे , अंजू तुम्ही स्पॉयलर
अरेरे , अंजू तुम्ही स्पॉयलर वाचलात का ? क्षमस्व.
माझ्याकडूनही कधी कधी स्पॉयलर वाचले जातात.
Pages