Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्याची इंडिया टीम ही बंच ऑफ
सध्याची इंडिया टीम ही बंच ऑफ इंडिविजुअल प्लेअर्स आहे.
बड्या धेंडांनी मनाला येईल तेंव्हा सुट्ट्या मारून अन् भलत्या फिटनेस ट्रेनिंग पाई नसत्या इंज्युरी मागे लावून घेऊन सिंक मधे खेळायचं वाटोळं करून ठेवलं आहे.
वर्ल्डकप च्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणारी आपली प्लेईंग 11, त्या आधी किती सामने एकत्र खेळली आहे हे बघणं रोचक असणार आहे.
इंडिविजुअल परफॉर्मन्स वर आपण पुढे जाऊ अन् ऐन वेळी ठराविक खेळाडूंनी परफॉर्म नाही केलं की नॉक् आऊट मधे माती खाऊ. गेल्या 2 वन डे वर्ल्डकप आणि अनेक इतर स्पर्धांमध्ये हेच झालं आहे.
2003 प्रमाणे कंप्लीट चेंज ऑफ अप्रोच होणं मला तरी अवघड वाटतं आहे. आगे आगे देखो होता है क्या...
शाहीन अफ्रिदीनी रोहितला
शाहीन अफ्रिदीनी रोहितला गिऱ्हाईक करून ठेवलं आहे.
>>>
भारत पाक वर्ल्डकप २०१९
शर्मा वन man शो
शर्मा एखादा सामना ना खेळणे ही चिंतेची बाब आहे खरी.
तोच विजय पराभवातील मोठा फरक आहे.
मी याआधीही दोन तीन ठिकाणी हे
मी याआधीही दोन तीन ठिकाणी हे लिहले होते की राहुल द्रविडचा (तो कितीही आवडता खेळाडू असला तरी) एक कोच म्हणून ॲप्रोच हा भारताच्या मुख्य संघासाठी योग्य नाही!!
संघाच्या स्थिरतेपेक्षा नवनवीन खेळाडूंना सतत संधी देण्याला प्राधान्य; हॉर्सेस फॉर कोर्सेसचा नको तितका वापर आणि रिझल्ट्स पेक्षा प्रोसेसला दिलेले महत्व हे मुख्य संघासाठी योग्य डावपेच नाहीत
इतरही अनेक कारणे आहेत पण आधी यावर काम व्हायला हवे!!
अगदी रवी शास्त्री वगैरे नको पण धोनी; झहीर खान किंवा परत अनिल कुंवळेला ट्राय करुन बघायला हरकत नाही
द्रविड U-19 आणि अ संघासाठी एकदम आदर्श कोच आहे
भारत पाक वर्ल्डकप २०१९
भारत पाक वर्ल्डकप २०१९
>>
चार वर्ष झाली त्याला. त्या नंतर किती वेळा पाक शी खेळलो अन् काय परफॉर्मन्स होता ते बघ...
@स्वरूप >> पूर्ण पोस्ट ला +१
त्या नंतर किती वेळा पाक शी
त्या नंतर किती वेळा पाक शी खेळलो अन् काय परफॉर्मन्स होता ते बघ
>>>
खेळ ला ते काय तगडा खेळला बघा..
आणि फार नाही खेळलो पाकशी.. असेच अध्येमध्ये प्रेशर गेम मध्ये खेळतो. आणि त्यात जर नॉकआऊट असेल तर सारेच कोलमडतात.. जे मी आधीच वर लिहिले आहे. त्यात शर्माला सुद्धा मोजले होतेच.
असो, मी ती एक चिंतेचे बाब सांगितली. शर्मा जर एखाद्या पाकिस्तान सामन्यात लवकर बाद होत असेल ही चिंतेचे बाब असेल तर शर्मा खेळल्या शिवाय आपण जिंकू च शकत नाही असा त्याचा अर्थ झाला
मी याआधीही दोन तीन ठिकाणी हे
मी याआधीही दोन तीन ठिकाणी हे लिहले होते की राहुल द्रविडचा (तो कितीही आवडता खेळाडू असला तरी) एक कोच म्हणून ॲप्रोच हा भारताच्या मुख्य संघासाठी योग्य नाही!!
>>>>>
हे तर मी त्याच्या निवडीलाच लिहिले होते. हा विश्वचषक हरताच तो स्वताहून सोडेल ही अपेक्षा. २००७ होणार बिचाऱ्याचा पुन्हा..
पुढच्या वेळी आशिष नेहराला करा कोच..
मी याआधीही दोन तीन ठिकाणी हे
मी याआधीही दोन तीन ठिकाणी हे लिहले होते की राहुल द्रविडचा (तो कितीही आवडता खेळाडू असला तरी) एक कोच म्हणून ॲप्रोच हा भारताच्या मुख्य संघासाठी योग्य नाही!! >>>>सहमत
द्रविडचा प्लेअर्स ल संधी देण्याचा ॲप्रोच मुख्य संघासाठी घातक आहे.त्याचे परिणाम आपण काही मोठ्या स्पर्धेत भोगले आहेत. आता फक्त वर्ल्ड कप मधून बाहेर पडा आणि पायउतार व्हा , एवढेच बाकी आहे.
वर्ल्ड कप किंवा आशिया कप जिंकण या टीमसाठी शक्य नाही आहे.
"अगदी रवी शास्त्री वगैरे नको
"अगदी रवी शास्त्री वगैरे नको पण धोनी; झहीर खान किंवा परत अनिल कुंवळेला ट्राय करुन बघायला हरकत नाही" - स्टार स्टडेड आणि व्हीआयपी कल्चर असलेल्या भारतीय संघासाठी जॉन राईट, गॅरी कर्स्टन सारखे परदेशी कोचेस जास्त उपयुक्त आहेत असं मला वाटतं.
इंडिविजुअल परफॉर्मन्स वर आपण
इंडिविजुअल परफॉर्मन्स वर आपण पुढे जाऊ अन् ऐन वेळी ठराविक खेळाडूंनी परफॉर्म नाही केलं की नॉक् आऊट मधे माती खाऊ. गेल्या >> +१ रोहित ला कंफरटेबल वाटतोय ह्यापेक्षा सूर्या ला संजू ऐवजी निवडण्याचे कारण कळत नाही. ( असे नाही की संजू ने फार दिवे लावले आहेत पण कमीत कमी त्याला ग्रूम तरी करत होते त्या रोल साठी)
स्टार स्टडेड आणि व्हीआयपी कल्चर असलेल्या भारतीय संघासाठी जॉन राईट, गॅरी कर्स्टन सारखे परदेशी कोचेस जास्त उपयुक्त आहेत असं मला वाटतं. >> +१. शास्त्री बर्याच जणांचा नावडता असला तरी त्याचे आकडे वेगळे चित्र दर्शवतात हे लक्षात असू द्या.
पाकिस्तान च्या मॅच ने किशन ने प्रूव्ह करण्याव्यतिरिक्त ननीन काहिच समोर नाही - पाकिस्तान बॉलिंग समोर आपले ओपनिंग गंडणे, वन डे मधे इनिंग टी २० सारखी पेससारखी, सात नंतर शेपूट सुरू होणे, बॉलर्स ना बॅटींङ न झेपणे, पन्नास ओव्हर्स पूर्ण खेळणे. वगैरे नेहमीचेच प्रकार समोर आले.
नाबी पेटलाय
नाबी पेटलाय
अफगाण लंका बघा रे
चर्चा नंतर करा
असामी, शास्त्री चे आकडे
असामी, शास्त्री चे आकडे फेव्हरेबल असणं (त्यात कोहली च्या कॅप्टन्सीचा सुद्धा वाटा आहे हे सुद्धा काही लोकांना अप्रिय वाटू शकेल) आणि संजूला ग्रूम करत अर्धवट सोडून देणं (२०१९ वर्ल्डकप - अंबाटी रायडू) - दोन्ही मुद्द्यांना अनुमोदन.
काय घालवला चान्स अफगाण ने
काय घालवला चान्स अफगाण ने
अकरावा कसला मूर्ख
अकरावा कसला मूर्ख
फुलटॉस बॉल होता.. सिंगल नाही काढला.. त्यांना माहीतच नव्हते वाटते इक्वेशन.. ३७.१ नंतरही जिंकू शकत होते हे
मी अकराव्या नंबर वरच्या
मी अकराव्या नंबर वरच्या फारुकी ला अजिबात दोष देणार नाही.
हि चूक 100% अफगाणिस्तान चा कोच जोनाथन ट्रॉट आणि त्याच्या सपोर्ट स्टाफ ची आहे.
>>जॉन राईट, गॅरी कर्स्टन
>>जॉन राईट, गॅरी कर्स्टन सारखे परदेशी कोचेस
त्यांच्यासारख्यांचे पण आता आयपीएल मुळे अतिपरिचयात अवज्ञा टाइप्स झाले आहे
हि चूक 100% अफगाणिस्तान चा
हि चूक 100% अफगाणिस्तान चा कोच जोनाथन ट्रॉट आणि त्याच्या सपोर्ट स्टाफ ची आहे.
>>>
तेच हो.. लिहिले आहे की पुढे.. इकवेशनाच माहीत नव्हते.. आणि हे आपल्याला कळले त्याच्या एप्रोच वरूनच म्हणून त्याचे नाव घेतले इतकेच.
बाकी एक प्लेअर म्हणून माहीत
बाकी एक प्लेअर म्हणून माहीत असायला हवे ही अपेक्षा केल्यास ती देखील काही चुकीची नाही. जर मला एक प्रेक्षक म्हणून माहीत होते तर क्रिकेटरला माहीत असण्यात काय हरकत आहे. कोणी फलंदाजीला अकरावा येतो म्हणून त्याची क्रिकेटची जाण अकरावी होत नाही.
बाकी एक प्लेअर म्हणून माहीत
बाकी एक प्लेअर म्हणून माहीत असायला हवे ही अपेक्षा केल्यास ती देखील काही चुकीची नाही. >> +१. सपोर्ट स्टाफ बरोबर प्लेयर वर पण जबाबदारी आहे असे मला वाटले.
अतिपरिचयात अवज्ञा टाइप्स झाले आहे >> मान्य !
काही पण. म्हणजे तुझी अपेक्षा
काही पण. म्हणजे तुझी अपेक्षा आहे सगळ्या फलंदाजांनी ड्रेसिंग रूम मध्ये बसून नेट रन रेट चे कॅल्क्युलेशन करत बसायचे किंवा DLS ने रिव्हाईस टार्गेट काय असेल हे नंबर काढत बसायचं.
तुला / मला प्रेक्षक म्हणून कल्पना होती कारण कंमेंटेटर्स दर ओव्हर ला ते आपल्याला सांगत होते.
ह्या लॉजिक ने बौचर आणि पोलॉक ना क्रिकेटची अक्कल नव्हती असं म्हणशील.
"अतिपरिचयात अवज्ञा टाइप्स
"अतिपरिचयात अवज्ञा टाइप्स झाले आहे" - ते सुद्धा खरंय. पण तरिही एक कल्चरल फरक पडतो. आपल्या-आपल्यात एक 'चलता हैं अॅटिट्यूड लवकर येतो. सोनारानं कान टोचलेले बरे असतात.
"तुला / मला प्रेक्षक म्हणून कल्पना होती कारण कंमेंटेटर्स दर ओव्हर ला ते आपल्याला सांगत होते." - हे खरंय. सपोर्ट स्टाफची (अॅनलिस्ट्स वगैरे) जवाबदारी जास्त आहे. किंबहूना तो त्यांच्या कामाचा भाग आहे.
तुला / मला प्रेक्षक म्हणून
तुला / मला प्रेक्षक म्हणून कल्पना होती कारण कंमेंटेटर्स दर ओव्हर ला ते आपल्याला सांगत होते.
>>>>
मुंबई सामन्यात हे घडल्याने जगाला माहीत होते.
आणि मला तर त्या मुंबई सामन्याच्या आधीही याची कल्पना होती. कारण माझा हा छंद आहे. माझे डोके यात जास्त चालते.
सपोर्ट स्टाफची जबाबदारी जास्त हे मान्य आहेच. किंबहुना त्यांचा गुन्हा तर अक्षम्य आहे या बाबतीत. पण खेळाडूकडूनही अपेक्षा केल्यास गैर नाही असे म्हटले आहे. शेवटी तुमचे कामाचे क्षेत्र आहे ते.
तसेच तुम्ही वर अकरावा फलंदाज असा स्पेशल उल्लेख केला ते देखील याबाबतीत चुकीचे वाटले. कारण याची माहिती असायला जे ज्ञान लागते त्याचा फलंदाजीच्या क्रमांकाशी काही संबंध नाही. माहिती नाही ठिक आहे. पण मी अकरावा फलंदाज आहे म्हणून मला माहीत नाही हे कारण नाही होऊ शकत.
सगळ्या फलंदाजांनी ड्रेसिंग
सगळ्या फलंदाजांनी ड्रेसिंग रूम मध्ये बसून नेट रन रेट चे कॅल्क्युलेशन करत बसायचे किंवा DLS ने रिव्हाईस टार्गेट काय असेल हे नंबर काढत बसायचं. >> मी फलंदाज असेन तर ह्या सामन्याचे मह्त्व नि DLS ह्याची कल्पना असल्यामूळे सपोर्ट स्टाफ देत नसेल तर ती माहिती विचारणे जरुरी समजेन. अर्थात तसे केले नसेल असे मी म्हणत नाही फक्त फलंदाजावर पण उत्तरदायीत्व आहे असे मला वाटते.
मुंबई सामन्यात हे घडल्याने
मुंबई सामन्यात हे घडल्याने जगाला माहीत होते.>>> बरोबर. ज्यांना क्रिकेट खरोखर कळतं, जाण आहे त्यांना हे आधीच माहीत होते. त्यासाठी कॉमेंटेटरची गरजच न्हवती.
अफगानिस्तानच्या कोच नि सपोर्ट
अफगानिस्तानच्या कोच नि सपोर्ट स्टाफ ने थेट मॅच ऑफिशियल कडे बोट दाखवले आहे. त्यांना फक्त ३७.१ मधे जिंकले तरच क्वालीफाय होतील असे सांगितले होते. पुढच्या गणिताची कल्पना दिली नव्हती. एका अर्थाने दोष मॅच ऑफिशियल आहे हे पटते . शेवटी नियमांची अंमलबजावणी हि त्यांची जबाबदारी आहे. जसे कॅमेरॉन ग्रीन चा गिलचा वादग्रस्त कॅच मॅच ऑफिशियल नी स्पष्ट केला तसेच हे. फायनल इंटर्प्रीटेशन मॅच ऑफिशियल चे असल्यामूळे हि माहिती त्यांच्याकडून स्पष्ट पणे व्यक्त होणे जरुरी आहे.
सध्याचा पाकिस्तान संघ बघून
सध्याचा पाकिस्तान संघ बघून आशिया कप आणि वर्ल्ड कप चे प्रमुख दावेदार मानयाला हरकत नाही. अतिशय समतोल संघ बांधणी आहे.
अतिशय समतोल संघ बांधणी आहे. >
अतिशय समतोल संघ बांधणी आहे. >> +१. फक्त इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया च्या डीप रन असलेल्या नि अती आक्रमक फलंदाजी समोर टीकाव धरू शकतील का हे अनप्रोव्हन आहे.
करंट फॉर्मवरून ठरवायचं तर
करंट फॉर्मवरून ठरवायचं तर ऑस्ट्रेलिया (नेहमीच असतात), इंग्लंड आणि पाकिस्तान हे वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार वाटताहेत. अर्थात, मोठ्या टूर्नामेंटमधे बर्याच गोष्टी घडू शकतात.
आतापर्यंतचा अनुभव पाहता,
आतापर्यंतचा अनुभव पाहता, विश्वचषकाच्या भाकीतांमध्ये संभाव्य विजेत्यांइतकंच ' डार्क हॉर्स ' कोण असू शकतं हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं ! भारत ?
डार्क हॉर्स ओळखू लागलो तर
डार्क हॉर्स ओळखू लागलो तर डार्क हॉर्स ही कन्सेप्टच गंडली नाही का
तरी मला श्रीलंका तशी वाटते. सध्याची त्यांची स्थिती पाहता ती कधी कोणाच्या चर्चेत नसते पण भारतीय उपखंडात खेळताना ती तितकी कमजोर टीम नाही. एखादा दुसरा सामना फिरवायची क्षमता असलेला तीक्षणा आणि त्यांचे स्पिनर सोबत पथिराना हे गोलंदाजी युनिट आणि त्याच्या ठीकठाक फलंदाजीला स्पर्धेत सूर गवसला तर ते सेमीला येऊ शकतात.
*डार्क हॉर्स ओळखू लागलो तर
*डार्क हॉर्स ओळखू लागलो तर डार्क हॉर्स ही कन्सेप्टच गंडली नाही का * - अनपेक्षित असुनही कोण जिंकू शकतो, याचा अंदाज बांधणे याने 'डार्क हॉर्स ' कन्सेप्टच गंडली असं होत नसाव. किंबहुना, अनपेक्षितपणे जिंकतो किंवा जिंकू शकतो त्यालाच डार्क हॉर्स म्हणतात.
Pages