क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत यांच्या पोस्ट्स गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही, मायबोलीकरांनी त्यांचा विनाकारण गैरसमज करून दिला आहे की त्यांना उवरोधीक विनोद छान जमतो, प्रत्यक्षात असंबद्धते शिवाय काहीच नसते

बोकलत यांना उवरोधीक विनोद छान जमतो >>> धन्यवाद साधा माणूस. पण खरं सांगायचं तर हा मायबोलीकरांचा मोठेपणा. मी एव्हढा पण काय भारी नाही. Happy मला आपला साधा माणूसच राहू द्या.

ओके असामीजी तुम्ही म्हणताय तर तुम्हाला मी शिकवेन क्रिकेट. पण तुम्हाला बेसिकपसून सांगायला लागत असल्याने भरपूर वेळ जाईल. कारण क्रिकेट हा गहन विषय आहे. मला सांगा तुम्ही सध्या क्रिकेट खेळता का? >> सातवे असंबंद्ध पोस्ट. तुम्हाला मी क्रिकेट समजावा असे सांगितले नसून तुमचे हार्दिक पांड्याबद्दलचे मुक्ताफळ समजावा असे म्हणत आहे.

अहो असामीजी मी तुम्हाला बोलत होतो विषय सोडून द्या जरा किचकट आहे समजायला तर तुम्हीच बोललात की समजव. आता ते समजवायला जातोय तर तुम्हाला बेसिकपासून शिकवायला लागेल त्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारतोय तर ते पण नकोय तुम्हाला. काय करायचं नक्की ते तुम्हीच सांगा.

शर्मा यांना व्हाईटवोश द्यायचा
त्यामुळे हे दुबळे वाटायचे>>> +११११
आता पण दिला असता ते पण एकतर्फी जिंकवून. मग इथलीच काही मंडळी त्याच्यावर धावून गेली असती आणि खिल्ली उडवली असती दुबळ्या संघाला हरवलं म्हणून.

काय करायचं नक्की ते तुम्हीच सांगा. >> मी वर लिहिलय काय ते, तुम्हाला नसेल कळत तर नाईलाज आहे.

एकून आपल्याला जर बॅटींग मधे आक्रमक अ‍ॅप्रोच कायम ठेवायचा असेल तर सहा-सात आठ वर येणार्‍यांना कामचलाऊ पेक्षा अधिक बॅटींग - विशेषतः आक्रमक भूमिका घेणे शिकणे जरुरी होणार असे दिसतेय. एकून हाय स्कोरिंग पॅटर्न कडे टी २- जातेय तेंव्हा बॉलिग कमकुवत करून चालणार नाही. जेन्युईन ऑलराऊंडर मह्त्वाचे ठरतील. पण गमतीचा मुद्दा हा कि आयपील मधे सब अलाऊ केल्यामूळे ऑलराऊंडर ची गरज कमी होत जातेय. मूळातच जेन्युईन ऑलराऊंडर कमी होते नि आहे ते कामचलाऊ ऑल राऊंडर इंटर्नॅशनॅल लेव्हलचे नसतील तर चालणार नाही.

“विशेषतः आक्रमक भूमिका घेणे शिकणे जरुरी होणार असे दिसतेय.” - थोडक्यात म्हणजे अक्षरसारख्या बॅट्समनने ९/१० व्या क्रमांकावर बॅटींग करावी ह्या दर्जाचा लाईनअप असायला हवा. जाफरच्या सजेशनप्रमाणे दुबे, सुंदर, व्यंकटेश अय्यर सारख्यांचा विचार व्हावा.

जाफरच्या सजेशनप्रमाणे दुबे, सुंदर, व्यंकटेश अय्यर सारख्यांचा विचार व्हावा. >> मी ही ऐकले त्याचे पॉडकास्ट पण सिरीयसली त्यांना बॉलिंग म्हणून ऑप्शन म्हणून चार- चार ओव्हर्स टाकायला कितपत वापरता येईल ह्याबद्दल माझ्या मनात प्रश्न आहे. १-२ ओव्हर्स काढता येतील पण इतर जन तो कोटा पूर्ण करायला हवेत. आधि सेहवाग, सचिन, रैना, युवी असे भरपूर पर्याय असत. एकमेव (तोही अर्धामुर्धा) तिलक वर्मा वगळता बाकी आनंद आहे. एका लिमिट नंतर पार्ट टाईम फारसे उपयोगी नाहीत असे वाटते. तीन जेनुईन बॉलर्स मस्ट आहेत. उरलेल्या ८ ओव्हर साठी तीन-चार जण तरी हवेत (त्यातला एक परत तीन बॉल्रस मधल्या एखाद्याला बॅड डे असेल तर तिथे वापरला जाईल).

"चार- चार ओव्हर्स टाकायला कितपत वापरता येईल ह्याबद्दल माझ्या मनात प्रश्न आहे" - ह्यातला सुंदर हा एकच प्लेयर असा आहे कि जो ४ ओव्हर्स टाकू शकेल (मोअर दॅन वन्स). बहूदा हे काँबिनेशनमधे खेळवून प्रत्येकी १-२ ओव्हर्स काढून घ्याव्या लागतील. तिलकपेक्षा यशस्वी जरा जास्त बरा ऑप्शन आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमधे बर्यापैकी रेग्युलरली बॉलिंग करायचा (पार्ट-टाईम म्हणूनच). अन्यथा आपला भर हा मुख्यतः पंड्या, जडेजा वरच असणार आहे.

तिलकपेक्षा यशस्वी जरा जास्त बरा ऑप्शन आहे >> मी वाचलेले पण मुंबई नि राजस्थान कडून हार्डली करतो त्यामूळॅ रोहित पेक्षाही कोहलीच्या टाईपचा पारट टाईम वाटलाय. सुंदर फिट राहिला तर संघात येईल ना Happy आपली परिस्थिती आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार अशी आहेस सध्या.

आश्विन चेन्नई मधे क्लब क्रिकेट खेळतो आहे
आयसीसी चा नंबर 1 बोलत अन् ऑलराऊंडर असूनही इगो मधे येत नाही.

राहुल वगैरेंनी शिकायची गरज आहे....

ब्रिटिशांचा खेळ आवडणाऱ्या क्रिकेटप्रेमींना कसल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहात>>>> चोप्रा बोलतो ना क्रिकेट को जन्म अंग्रेजो ने दिया लेकीन पाल पोसके बडा हमने किया म्हणून दिल्या शुभेच्छा Happy परवाच लास्ट 20 मॅच सुरू होती तेव्हा तो बोलला की पहिला सामना कॅनडा आणि अमेरिकेत खेळवला गेला. पण खरं तर चोप्रा पण चुकीचा होता. आपल्या पुराणात लिहलंय की श्रीकृष्ण मित्रांसोबत चेंडू फळी खेळत असताना चेंडू डोहात पडला आणि कालिया साप भडकला. सुट्टीच्या दिवशी दुपारी बायका पोरांसोबत झोपलेला माणूस घरात चेंडू आला तर भडकणारच, मग तो कोणीही असू देत. मी लहानपणी गल्लीत खेळताना किती लोकांच्या काचा फोडल्या असतील आणि किती लोकं भडकली असतील त्यांना कधी उलटं उत्तर नाही दिलं. श्रीकृष्णाने डायरेक्ट घरात जाऊन मारला बिचाऱ्याला.

इंग्लंड ने आपला वर्ल्ड कप साठीचा 15 जणांचा संभाव्य स्क्वाड जाहीर केला आहे. येत्या दीड महिन्यात काही इंज्युरी मुळे फेरफार झाले नाहीत तर हाच संघ भारतात उतरेल.

अर्थात, (अपेक्षेप्रमाणेच) स्टोक्स ने आपली ODI क्रिकेट मधली निवृत्ती मागे घेऊन पुनरागमन केले आहे.

सगळ्यात धक्कादायक निर्णय म्हणजे हॅरी ब्रूक ला 15 मध्ये जागा मिळाली नाहीये. जोफ्रा आर्चर अर्थातच अजून फिट नाहीये.

नवोदित गोलंदाज गस ऍटकिन्सन चं अनएक्सपेक्टेड सिलेक्शन झालं आहे. ऍटकिन्सन आता पर्यंत फारसं हाय लेव्हल क्रिकेट खेळला नाहीये पण तुफान वेगात गोलंदाजी (90-95 MPH) करायचं रेप्युटेशन आहे.

इंग्लंड चा संघ - बटलर (C) (WK), रूट, स्टोक्स, बेअरस्टो (WK), रॉय, मोईन अली, रशीद, लिविंगस्टन, मालन, सॅम करन, वूड, वोक्स, डेव्हिड विली, टॉपली, ऍटकिन्सन

सगळ्यात धक्कादायक निर्णय म्हणजे हॅरी ब्रूक ला 15 मध्ये जागा मिळाली नाहीये. >> मला धक्कादायक नाही वाटला हे. आयपील मधे तो जसा खेळला होता ते बघता भारतीय पिचेस मधे तो वन डे कसा खेळेल ह्याबद्दल प्रश्नचिन्ह वाटू शकते ह्या कारणामूळे इतर अनुभवी खेळाडूंच्या पाठी जाणे साहजिक होते.

अ‍ॅटकिन्सन सोडून सगळे आयपीएल खेळले आहेत. बटलर, मोईन, बेअरस्टॉ, करन वगैरे तर भरपूर खेळले आहेत. इंग्लंडला त्याचा भरपूर फायदा व्हायची शक्यता आहे.

“मला धक्कादायक नाही वाटला” - मलाही. तेच कारण कि आयपीएलमधे अगदीच फिश आऊट ऑफ वॉटर वाटला होता (एक सेंच्युरी वगळता).

इंग्लंडला त्याचा भरपूर फायदा व्हायची शक्यता आहे. >>>

इंग्लंड माझ्या मते सगळ्यात प्रबळ दावेदार आहेत, त्या खालोखाल पाकिस्तान मग ऑस्ट्रेलिया आणि आपण.

ह्या कारणामूळे इतर अनुभवी खेळाडूंच्या पाठी जाणे साहजिक होते. >>

इंग्लिश मीडिया हि असंच म्हणत आहे कि मालन ला त्याच्या अनुभवामुळे ब्रूक च्या आधी प्रेफर केलं गेलं.

रोहितच्या नेतृत्वाखाली तयार झालेला बुमरा आज कशी कल्पक कॅप्शनशिप करेल बघा. पांड्या पण रोहितच्या नेतृत्वाखाली तयार झाला पण ईगो मध्ये आला आणि वाट लागली त्याची.

वर्ल्ड कप शेड्यूलिंग बाबत तुफान छपरीपणा चालू आहे.

दोनदा शेड्युल बदलून झाल्यावर (अहमदाबाद मध्ये नवरात्री मुळे आणि कलकत्त्यात दुर्गापूजा मुळे) बद्दल आता तिसऱ्यांदा शेड्युल बदलायची पाळी येणार आहे.

आता हैद्राबाद ने सांगितलं आहे कि त्यांना दोन मॅचेस (9 आणि 10 नोव्हेंबर) च्या डेट बदलून हव्या आहेत, कारण सलग दोन दिवस त्यांना सेक्युरिटी अरेंज करायला जमणार नाहि.

हे सगळे स्टेट असोशिएशन आणि पर्यायाने BCCI गेले 2 वर्षं झोपले होते काय ? जसं काय यांना नवरात्री / दुर्गापूजा कुठल्या वेळी पडते हे माहितीच नव्हतं ?

शिवाजी महाराज म्हणायचे की लढाई जिंकायची असेल तर शत्रूचे पहिले मानसिक खच्चीकरण करा लढाई आपोआप जिंकाल. जसं शेडुल बदलतंय तस पाकिस्तान आणि ईतर देश हायपर होताहेत. त्यामुळे हा छपरीपणा नसून मास्टर स्ट्रोक आहे

गायकवाड द्रविडसारखा टुकुटुकू खेळून वाट लावणार आहे. तिकडे धोनी जडेजा होते म्हणून याचं चालून जायचं. हा स्वतः चे रन करेल आणि संघाला हारवेल बरोबर नाही हा खेळाडू.

आज ऋतुराज रहाणे सारखी इनिंग खेळला. करियरचे सुरूवातीचे दिवस, स्थान पक्कं करण्याचं दडपण, समोर तुलनेनं दुबळा प्रतिस्पर्धी वगैरे गोष्टींचा विचार करता ह्या इनिंगकडे अपवाद म्हणून बघता येईल. पण हा ट्रेंड व्हायला नको. उगाच एका प्रॉमिसिंग करियरची माती व्हायची.

बुमराह आणि प्रसिध ला लय सापडण्याचा हेतू पूर्ण झाला. त्यातल्या त्यात अर्शदीपला अपेक्षित यश मिळालं नाही (विंडीज आणि आयर्लंड दौर्यात).

Pages