Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्वी मी कधीही इंग्लंडला
पूर्वी मी कधीही इंग्लंडला सपोर्ट करत नसे पण हे "बाझबॉल" वाले इंग्लंड आवडते. शेवटची विकेट ब्रॉडने काढावी असेच वाटत होते. त्याने काढलेली दिसते.
त्यात दर बॉल नंतर क्रिकेट समजावणे सुरू होते. >> हो ते ठरवून करत आहेत. अमेरिकन पब्लिक करता. एमएलसी व स्थानिक लीग्जनी मार्केटिंग करून अमेरिकन्स आणले होते ग्राउण्ड मधे आणि टीव्हीवरही पाहात असतील.
शर्मा नसला की क्रिकेट बघू नये
शर्मा नसला की क्रिकेट बघू नये म्हणतात ते खरं आहे.
शर्माने न खेळता पण त्याच्या
शर्माने न खेळता पण त्याच्या हेटरची बोलती बंद केली
किती हरतोय आपण.. आज बीजी
किती हरतोय आपण.. आज बीजी असल्याने थेट स्कोअर बघितलं तेव्हा हरलो होतो
आक्ख्या वेस्ट इंडीज
आक्ख्या वेस्ट इंडीज सिरीजमध्ये फक्त टी-२० चा सेगमेंट एकतर्फी न होता रोचक होईल असं वाटत होतं आणि तसंच झालं. अक्षरला बॉलिंग द्यायची नसेल तर त्याच्या जागी यशस्वी ला खेळवता येईल. पूरन कमालीच्या फॉर्ममधे आहे.
हा पूर्ण दौरा आपण ना मॅच
हा पूर्ण दौरा आपण ना मॅच प्रॅक्टिस साठी वापरला ना नवे खेळाडू टेस्ट करायला
टेस्ट मधे जयस्वाल ला खेळवला पण त्याला टी२० मधे चान्स दिला नाही. गायकवाडला टेस्ट मधे मौका नाही दिला, वन डे मधे पण फक्त शेवटच्या सामन्यात खेळवला अन् ते ही त्याच्या नेहमीच्या ओपनिंग स्लॉट मधे नाही.
या दोन टी२० मधे आपलं टीम कंपोजिशन टोटल गंडलं आहे. ५ बॉलर्स मुळे टेल खूप मोठी झाली आहे. त्यात त्यांच्यापैकी कुणीही खात्रीशीर बरी बॅटिंग करत नाही. सॅमसन लोअर ऑर्डरला शक्यतो फेल जातो, पण तरीही त्याला वर न पाठवता खाली ठेवला आहे. थिंक टँक चा अप्रोच काय आहे कळत नाही.
ऑस्ट्रेलिया ने 2023 ODI
ऑस्ट्रेलिया ने 2023 ODI वर्ल्ड कपसाठी चे 18 जाहीर केले आहेत. यातील 15 फायनल स्क्वाड मध्ये खेळतील आणि
3 इंज्युरी स्टॅण्डबाय असतील.
कमिन्स (C), स्मिथ, वॉर्नर, हेड, मॅक्सवेल, स्टोइनीस, मार्श, स्टार्क, हेझलवूड, झम्पा, कॅरी (WK), ग्रीन, अगार, इंग्लीस (WK), अबॉट, एलिस, संघा आणि हार्डी.
महत्वाचे बदल म्हणजे लाबूशेन ला खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर काढले आहे तर नवोदित ऑल राऊण्डर एरन हार्डी आणि लेग स्पिनर तन्वीर संघा ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पहिला कॉलअप दिला आहे.
कमिन्स कर्णधार नाही. त्याच्या
कमिन्स कर्णधार नाही. त्याच्या मनगटाचे हाड मोडले. आता मार्श कर्णधार.
अँकी, पूर्वी काही कंपन्या आपल्या चांगल्या नोकरांना बक्षीस म्हणून दोन तीन आठवडे कंपनीच्या खर्चाने कुठेहि जा, कामाचे नुसते निमित्त.
मी स्वतः एक महिना इंडोनेशिया नि चार महिने ऑस्ट्रेलियात जाऊन आलो आहे.
तसेच भारतीय क्रिकेट खेळाडूंना सुद्धा बक्षिस म्हणून वेस्ट इंडिजला पाठवले.
आक्ख्या वेस्ट इंडीज
आक्ख्या वेस्ट इंडीज सिरीजमध्ये फक्त टी-२० चा सेगमेंट एकतर्फी न होता रोचक होईल असं वाटत होतं आणि तसंच झालं. >> +१. पूरन ने मेजर लीगमधला फॉर्म कायम ठेवलाय. तिलक वर्मा कसला मॅच्युरिटी दाखवतोय . गिल, सॅमसन, किशन - काही तरी शिका रे.
या दोन टी२० मधे आपलं टीम कंपोजिशन टोटल गंडलं आहे. ५ बॉलर्स मुळे टेल खूप मोठी झाली आहे >> +१ फक्त ऑप्शन नाहीये ह्यात सिरीजसाठी तरी. ठाकूर नि चहल हे दोनच पर्याय होतात.
सॅमसन लोअर ऑर्डरला शक्यतो फेल जातो, पण तरीही त्याला वर न पाठवता खाली ठेवला आहे. थिंक टँक चा अप्रोच काय आहे कळत नाही. >> मला वाटते ५० ओव्हर्स च्या वर्ल्ड कपसाठी तयारी करून घेत असावेत. अय्यर नि राहुल दोघेही किती फिट असतील नि फॉर्म कसा असेल ह्यावर मोठे प्रश्नचिन्ह असल्यामूळे पर्याय शोधत आहेत असे वाटले. अशिया कप नि ऑस्ट्रेलिया सिरीज पर्यन्त पिक्चर क्लीयर होईल. नुसत्या टॅलेंटवर सॅमसन फिईट वाटतो पण जितेश शर्मा (बॅकप किपींग ) नि रिंकू ह्यांचा अनुक्रमे (राहुल नि अय्यर )च्या जागी विचार करून बघायला हवा - दोघेही पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळतात नि फॉर्म मधे पण आहेत. डोमेस्टीक मधे पण सध्या खेळले आहेत. परत बाकीच्या टिम्स नी जास्त बघितले नाहीये हा फायदा होईल.
किशन अगदी वाईट खेळत नाहिये नि किपर म्हणून फर्स्ट चॉईस आहे सध्या त्यामूळे जयस्वाल ला स्कोप नाही. ३-४ सूर्या नि वर्मा आपल्या नावावर बूक करतात.
जयस्वाल माला टीम मधे, नि
जयस्वाल आला टीम मधे, नि किशनलाच हाकलले,.
नाहीतरी किशन बायकोपळव्या आहे.
आज चिक्कार झोडपले भारताच्या गोलंदाजांना!
आता बघू गिल, नि यादव नि वर्मा काय करतात.
वर्माचे 50 होऊन द्यायला
वर्माचे 50 होऊन द्यायला पाहिजे होते. बरोबर नाही केलं पांड्याने
धोनीने कोहलीचे होऊ दिलेले ते
+786
धोनीने कोहलीचे होऊ दिलेले ते आठवतेय आज सर्वांना
असे का केले हार्दिक ने.. रन रेट वगैरे सीन नव्हता या मालिकेत.. राहिला असता शांत..
कोच द्रविडचा आदर्श का.. वैयक्तिक विक्रम नको होऊ देणे..
पांड्याचे गणित कच्चे आहे रे
पांड्याचे गणित कच्चे आहे रे
त्याला कोणाला किती ओव्हर्स दिल्या हे पण मोजता येत नाहित 
कोणाला किती ओव्हर्स दिल्या हे
कोणाला किती ओव्हर्स दिल्या हे पण मोजता येत नाहित
>>>
हे कशाबद्दल आहे. मी बघत नाही हे सामने.
पण दुसऱ्या सामन्यात शेवटी फायनल स्कोअर कार्ड बघून समजले की त्याने चहलची ओवर ठेवून सामना घालवला..
पांड्या आयपीएलमध्ये ईतर संघात
पांड्या आयपीएलमध्ये ईतर संघात संघात खेळणाऱ्या खेळाडूंवर खार खाऊन असतो. विशेष करून मुंबईच्या आजी माजी खेळाडूंवर. काल 6 रन जिंकायला हवे होते तेव्हापासून तो वेडेवाकडे शॉट मारत होता जेणेकरून वार्माचे 50 होऊ नयेत. त्याने तीनदा प्रयत्न केला 6 मारण्याचा. पहिले दोन फसले आणि तिसरा 6 गेला. जेव्हा दुसरा प्रयत्न फसला तेव्हा पांड्याला 2 रन घेऊन स्त्राईक पाहिजे होती पण वर्माने दुसरी रन घ्यायला नकार दिला तेव्हा पांड्या त्याच्यावर नाराज झाला. मग वर्मानेच त्याला विचारलं काय करू एक रन घेऊ की जोरात मारू? तेव्हा पांड्या नाराजीच्या सुरात कर काय करायचं ते असं म्हणाला म्हणून वर्माने नमतं घेऊन त्याला फिनिश करायला दिलं.
पांड्याच्या डोक्यावर कोणाचा
पांड्याच्या डोक्यावर कोणाचा तरी हात असणार..
गुजरातचा कर्णधार आहे
पांड्या आयपीएलमध्ये ईतर संघात
पांड्या आयपीएलमध्ये ईतर संघात संघात खेळणाऱ्या खेळाडूंवर खार खाऊन असतो . विशेष करून मुंबईच्या आजी माजी खेळाडूंवर. > गिल वगळता पांड्याच्या संघातला कोण आहे भारतीय संघामधे ? ९ जणांवर खार खाऊन असतो ?
हे कशाबद्दल आहे. मी बघत नाही हे सामने. >> त्याचे धोनीसारखे आहे. आहेत ते सगळे रिसोर्सेस वापरणे जरुरी नाही असे.
जाऊ द्या असामीजी तुम्हाला
जाऊ द्या असामीजी तुम्हाला नाही समजणार या गोष्टी. आमच्या गाठीशी चार गावं फिरल्याचा अनुभव आहे म्हणून आम्हाला पटकन समजतात हे खेळातली राजकारण.
बघा - तुम्हाला मी किती गाव
बघा - तुम्हाला मी किती गाव फिरलोय ते माहित नाही पण तुम्ही मला कळणार नाही असे धरून मोकळे झालात. हे पण हार्दिक च्या खार खाण्यासारखेच दिसतेय बहुधा !
अहो असामीजी मला तसं नाही मला
अहो असामीजी मला तसं नाही मला म्हणायचं. मला म्हणायचं होतं की तुम्ही साधे भोळे आणि क्यूट आहात.
"तुम्ही साधे भोळे आणि क्यूट
"तुम्ही साधे भोळे आणि क्यूट आहात." - आता हा धागा भलतंच वळण घेतोय. असाम्या, संभाळून रे.

तुम्ही त्यापेक्षा ९ जणांवर
तुम्ही त्यापेक्षा ९ जणांवर खार खाऊन असतो म्हणाजे काय ते समजावा कि ! म्हणजे असे बघा कि पांड्या संजूच्या पुढे आला - हेच पांड्याच्या जागी धोनी असता तर त्याने आउट ऑफ फॉर्म संजूला - समजा तो परत लगेच बाद झाला तर त्याच्या काँफिडन्स वर परीणाम नको म्हणून - पाठी ठेवले किंवा संजूची चाचपणी वर्ल्ड कपसाठी फिनिशर म्हणून सुरू असल्यामूळे त्याला पाठी ठेवले असा मास्टर स्ट्रोक झाला असता असे म्हणायला कमी केले नसते. पांड्या मूबई इंडीयन्स वर नाराज होता हे त्याने स्वतःच सांगीतले होते पण तिथून निघाल्यामूळे मी टायटन्स चा कप्त्तान झालो नि जिंकलो नि तिथून भारतीय कप्तान झालो तेंव्हा 'ऑल इज वेल" हे ही त्यानेच सांगितलेय. म्हणून खार खातोय म्हणजे नक्की काय हे समजावता ?
पांड्या ने ओव्हर मॅनेज न करणे वगैरे हा भाग वेगळा आहे.
आता गिल नि जयस्वालला बसवा नि
आता गिल नि जयस्वालला बसवा नि पृथ्वी शॉ ला बोलावून घ्या, आणि शर्माला पण.
जाऊ द्या असामीजी. पंड्याने 6
जाऊ द्या असामीजी. पंड्याने 6 मारून मस्त सामना जिंक्या.
तीन वेळा निरर्थक पोस्ट
तीन वेळा निरर्थक पोस्ट करण्यापेक्षा स्पष्टीकरण देणे सोपे नसते का ?
पृथ्वी शॉ ला एका इनिंगवरून बोलावणार नाहित अशी आशा धरूया.
अहो असामीजी मला म्हणायचं होतं
अहो असामीजी मला म्हणायचं होतं की जे लहानपणी क्रिकेट खेळले आहे, ज्यांनी खूप क्रिकेट पाहिलंय, जवळून क्रिकेट बघितलं आहे, जे क्रिकेटचे जाणकार आहेत त्यांना लगेच समजेल. तुम्हाला समजवायला मला बेसिकपासून सुरवात करायला लागेल. त्यामुळे नंतर कधीतरी सांगतो डिटेल्समध्ये तुम्हाला. ओके
जे लहानपणी क्रिकेट खेळले आहे,
जे लहानपणी क्रिकेट खेळले आहे, ज्यांनी खूप क्रिकेट पाहिलंय, जवळून क्रिकेट बघितलं आहे, जे क्रिकेटचे जाणकार आहेत त्यांना लगेच समजेल. तुम्हाला समजवायला मला बेसिकपासून सुरवात करायला लागेल. >> म्हणजे परत तुमचे गाडे त्याच रुळावर अडकलं ना ? तुम्ही मला लहानपणापासून ओळखत नाही, मी क्रिकेट किती पाहतो ह्याची कल्पना नाही. किती दूरून पाहतो किंवा किती जवळून पाहतो ह्याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही. चला मला कल्पना नाही असे समजून मी तुम्हाला तुम्ही ' पांड्या खार खाऊन आहे' असे रँडम पिंक टाकून मोकळे झाला ती समहावून सांगा असे दोन दिवस सांगतोय पण पाच पोस्ट नंतरही तुम्ही तेच लाईफ कोचिंग चे दळण दळता आहात. एव्हाना बेसिक कशाला असेंब्ली लँग्वेज मधे ही लिहून झाले असते.
जाऊ दे असामीजी झोपा आता गुड
जाऊ दे असामीजी झोपा आता गुड नाईट
सहावे असंबंद्ध पोस्ट ! आणि
सहावे असंबंद्ध पोस्ट ! आणि दिवसाढवळ्या झोपा काय ?
ओके असामीजी तुम्ही म्हणताय तर
ओके असामीजी तुम्ही म्हणताय तर तुम्हाला मी शिकवेन क्रिकेट. पण तुम्हाला बेसिकपसून सांगायला लागत असल्याने भरपूर वेळ जाईल. कारण क्रिकेट हा गहन विषय आहे. मला सांगा तुम्ही सध्या क्रिकेट खेळता का?
Pages