Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Stockings असेल >> +१
Stockings असेल >> +१
हो..तेच लिहायला आले होते.
हो..तेच लिहायला आले होते. स्टॉकिंग्ज - ईश्टोकिंग्ज - इष्टाकण्या
@इष्टाकण्या
@इष्टाकण्या
मला शब्दापेक्षा जास्त आश्चर्य 'ते' घातल्याचं वाटलं.
बाबूराव आहे का अमरीश पुरी. उष्णकटिबंधीय देशात स्टॉकिंग्ज ..!
'सराई' चर्चा आवडली.
>>>>>इष्टाकण्यालॉन्ग जोन्स?
>>>>>इष्टाकण्या
लॉन्ग जोन्स?
बाबूराव पोलीस असेल. हाफ
बाबूराव पोलीस असेल. हाफ पॅन्ट आणि इष्टाकणी - पोटरी पर्यंतचे मोजे - जुना पोशाख.
आता आलं लक्षात.
आता आलं लक्षात.
धन्यवाद मंडळी. मला मोजे वाटत
धन्यवाद मंडळी. मला मोजे वाटत होते.
इष्टाकण्या
मला आता दादा कोंडकेचे पांडू
मला आता दादा कोंडकेचे पांडू हवालदार मधले 'बाई गं केळेवाली मी 'आठवले. त्यात तंतोतंत पोषाख आहे.
असा हा उंटाचा भाषिक प्रवास !>
असा हा उंटाचा भाषिक प्रवास !>>>>>>
रोचक, आवडला.
कारवान हा शब्द पर्शियन आहे? शनिमहात्म्य स्तोत्रात हा शब्द आहे.
असे मग कोण एके दिवशी ॥ दोन प्रहरांच्या समयासी ॥ कारवानवेषें उज्जनीसी ॥ घोडे विकावया आला शनिदेव
सराई हा शब्द सुगी, हंगाम या अर्थाने माहीत होता.
तावून सुलाखून.. कुठून आले
तावून सुलाखून.. कुठून आले असावे?
तावून तर ठीके..
तापून अशा अर्थी.
पण सुलाखून म्हणजे काय?
सुलाखूम म्हणजे पारखून.
सुलाखून म्हणजे पारखून.
सोनं तापवून आणि पारखून शुद्ध असल्याची खात्री करतात त्याचा संदर्भ.
अच्छा!
अच्छा!
इतका छान शब्द सुलाखून..
पण उगीचच तावून च्या जाचात अडकला आहे.
आपण तसा कधी वापरतच नाही.
ते कलिंगड तेव्हढे चांगले सुलाखून आण रे.
एन सी सी म्हणजे...एकेक उमेदवार अगदी सुलाखून घेतलेला असतो !!!
@ऋतुराज.कारवान हा शब्द
@ऋतुराज.
कारवान हा शब्द पर्शियन आहे? >>> होय !
https://www.etymonline.com/search?q=caravan
via Arabic qairawan from Persian karwan "group of desert travelers" (which Klein connects to Sanskrit karabhah "camel").
मराठी कारवा ( अन्त्य
मराठी कारवा ( अन्त्य अनुस्वार नाही ) = स्त्रीचा वेष घेऊन डोकीस पागोटें व कमरेस तलवार लावणारा सोंगाड्या
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%...
हा वेगळाच !
धन्यवाद कुमार सर
धन्यवाद कुमार सर
मराठी कारवा माहिती नवीनच...
गेल्या दहा तासांमध्ये वर
गेल्या दहा तासांमध्ये वर आलेले सर्व शब्द उत्तम ! इथल्या चर्चेत अगदी सुलाखून निघाले आहेत
..
कारवान, तांडा, काफिला हे तिन्ही साधारण समानार्थीच आहेत. काहींचे एकाहून अधिक अर्थ आहेत.
या निमित्ताने,
समूह शब्दाचे ४५ समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत :
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%...
अनुरणत
अनुरणत
हा शब्द कोशात नाही सापडला.
कोणत्या क्रियापदापासून तयार झाला असावा ? नक्की समजले नाही.
ही दोन वाक्ये वाचनात आली :
1. ‘कोलाहलातही अखंडपणे अनुरणत राहणार्या जगण्याच्या आदिम स्वराला’ अर्पण
2. त्याचे अदृश्य व्यक्तिमत्व नाटकभर तिच्या माध्यमातून अनुरणत राहते.
मी 'अनुरणन' नावाचा एक बंगाली
मी 'अनुरणन' नावाचा एक बंगाली सिनेमा बघितला होता. त्यावेळी 'स्पंदन' अर्थ असावा असे वाटले होते. अनुरणत म्हणजे स्पंदित किंवा कंपित असावे. गूगल केल्यास reverberation/ resonance असं आलं.
>>>>>>>
मनोध्वनिकी तथा ध्वनिकी में अनुरणन (reverberation) का अर्थ है ध्वनि उत्पन्न होने के बाद उसका बहुत देर तक बने रहना। अनुरणन तब उत्पन्न होता है जब ध्वनि अनेकानेक बार परावर्तित होने के कारण जुड़ती चली जाती है।
इति विकिपिडिया.
अनुरणन म्हणजे reverberation
अनुरणन म्हणजे reverberation असं म्हणतोय गूगल ट्रान्स्लेटर.
मराठी शब्द दिसत नाही हा. कॉन्टेक्स्टनुसार गुणगुणत, किणकिणत, गुंजत वगैरे म्हणता आलं असतं कदाचित.
स्पंदित, गुंजत >>> +१
स्पंदित, गुंजत >>> +१
संदर्भाने तसेच वाटले होते. संस्कृत शब्द असावा की काय ??
अनुरणन: 1. Echoing or echo.
अनुरणन: 1. Echoing or echo.
2. The lingering sound of a instrument (after the performer has ceased) - मोल्सवर्थबाबा
https://twitter.com
https://twitter.com/MisraNityanand/status/1111558452927713281
हे एक सापडलं, यात 'प्रतिध्वनी' असाही दिसतोय. खूप वेळ घुमत रहाणारा ध्वनी, ज्याचा कंप जाणवतो. हा संस्कृतोद्भव(?) बंगाली शब्द आहे बहुतेक.
पडसाद?
पडसाद?
प्रतिध्वनी नाही वाटत. त्या
प्रतिध्वनी नाही वाटत...?त्यात पुन्हा आहे यात पुन्हा नाही तर कमी होत जाणारी संतता दिसतेय
गुंजत बरोबर वाटतय
गुंजत बरोबर वाटतय
इथे दिसतो आहे अनुरणन.
इथे दिसतो आहे अनुरणन.
अनुध्वनी असाही समानार्थी शब्द दिसला तिथे.
आता स्पष्ट झाले. धन्यवाद
आता स्पष्ट झाले. धन्यवाद सर्वांना !
छान. नवीन शब्द कळला.
छान. नवीन शब्द कळला.
ध्वनीकंपन असा अर्थ वाटतो आहे.
ध्वनीकंपन असा अर्थ वाटतो आहे.
Pages