Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टीना नाही जिंकायची, ती जुनी
टीना नाही जिंकायची, ती जुनी बहु आहेना कलर्सची. नवीन बहु प्रियांका ना, अजूनही मला प्रियांका शिव टॉप असतील असं न बघता वाटतंय.
आता मला वाटतंय दोन दिवस तरी गेस्ट म्हणून वीणाला आणायला हवं होतं, मराठी बिगबॉस मध्ये तरी ती लकी ठरलेली शिवसाठी. पहिला नेहा विरोधातला टास्क तिनेच जिंकून दिला होता त्याला.
निमरीत ला LSD2 मिळाला केकता
निमरीत ला LSD2 मिळाला केकता कपूर चा...
आणि बहुतेक सुम्बुल ला नागीन 7 साठी कास्ट करेल ती असं वाटलं..
प्रियांका - - मैं नहीं तो कौन
प्रियांका - - मैं नहीं तो कौन बे ! हैं कौन इधर !!!!
आहेच कॊण तिच्याशिवाय विनर बनण्यालायक?
शिवला साजिद आणि मग निमरीतमूळे स्वतःचा स्टॅन्ड घेण्यास खूप उशीर झाला.आता वेळ गेली. आज सलमाननेही समजावले की हा काही डान्स शो नाही . आता ह्यात प्रियांकावर चरफडून काय उपयोग ?
प्रियांका काही तरी कन्विनियन्स असेल तर आवाज उठवते पण शिवची तर तेवढीही हिम्मत नाही. साजिद जाताना त्याच्या पाया पडून त्याने खूपच लाज घालवली. तो छोट्या गावचा, कमी लोकांना माहिती म्हणून त्याला साजिदच्या छायेत राहणे सोयीचे वाटले असेल, शिवाय साजिदला चॅनेल सतत फेवर करते हे त्याने नक्कीच ओळखले, दोन रिऍलिटी शो करून तेवढे ओळखण्यात तो हुशार आहे, पण या सर्व चाटूगिरीत चॅनलने त्याला साइड लाईन केले, हे त्याला कळले नाही किंवा कळूनही तसेच राहण्यात समाधान मानले. इथेच तो मागे पडला. आज ज्या स्टॅन ला त्याने ढकलत ढकलत पुढे आणले तो स्टॅनपण काही ना करता २ नंबरवर येईल त्याच्यापुढे. साजिद त्याच्याशी कॅमेरापुढे गोड गोड बोलेल पण कामासाठी अब्दुलाच पकडेल. anyway शिवलाही काम मिळेलच, झलक, खतरों के खिलाडी, कदाचित एखादी शिवरीत भेटली तर नाच बलिये पण. मराठी सिनेमाही मिळेल कदाचित.
प्रियांका ही इतरांच्या तुलनेत लोकांना कमी माहिती होतीच. (तिचा शो कोणी पाहिला होता का ?)पुढे काम मिळेल का ही चिंता तिलाही होती, एकदम साध्या घरातून ती पण आली आहे,चॅनेलने तिला भरपूर बॅश केले, ती काही परिपूर्ण नव्हतीच. पण तिने स्वतःला बदलवले. साजिदचा धाक तिलाही वाटला पण साजिद विरोधी जो काही थोडाफार आवाज उठवला तो तिने व अर्चनानेच. म्हणून साजिद तिच्यावर राग ठेऊन होता. ती एकटी राहिली पण बाकीच्यांसारखा उगीच कोणाच्या ग्रुपमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न नाही केला. आज तर स्टॅन, शिव पण कबुल करतात कि ती चांगली आहे (कालचाच एपिसोड पहा). स्टॅन जो प्रियंकाला नावे ठेवायचा आज तिच्याबरोबर फ्लर्ट करत आहे. शिव तर तिला स्ट्रॉंग मानतोच. बिगबॉसचा प्रोमो तिच्यावरच असतो कारण टीआरपी शेवटी प्रियांकामुळेच मिळतो. साजिद तिला लीडर म्हणतो. आज सलमानला, फराहला पण ती हिरोईन मटेरियल वाटते.. सलमानला तर कोणीच हे म्हणण्यासाठी भरीस पडू शकत नाही की तू बाहेर ये मग तुझ्यासाठी काही ऑफर आहे. त्याच्याकडून हे बोलवण्याची एवढी कोणाचीच, चॅनेलचीही हिम्मत नाही. काहीतरी दिसले असेलच ना इतक्या लोकांना तिच्यात.
कलर्सचे फेस बाकी सगळेच आहेत. शो सुरु झाला तेव्हा सुमबुल आणि निमरीत चॅनेलतर्फे विनर, मेन प्लेयर्स ठरवल्या असणार, पण त्या लायक आहेत का हे काही बोलण्याची गरजच नाही.. प्रियंकाला अंकितशी लव्ह अँगल साठीच आणले असणार. पण त्या दोघांनी ते केले नाही. तरीही ती पहिल्याच आठवड्यात लोकांच्या डोळ्यात भरली आणि विनर मटेरियल दिसली आणि स्ट्रॉंग मताच्या मुली बरयाच जणांना आवडत नाही. अनेक स्त्रियांनाही. त्यामुळे ती बऱ्याच जणांना आवडणारही नाही. त्यामुळे तिच्या आवाजावर, हसण्यावर, रूपावर टीका होईल, जो पर्सनल pov आहे. आणि ठीक आहे प्रत्येकाचे मत असू शकते. ( मला तर personally ती सुंदर वाटते. कालच्या लेहेंगा मध्ये काय छान दिसत होती.) पण तीची संपूर्ण जर्नी बघता विनर तीच होणे लायक आहे.
अर्थात चॅनेलने अजून काही ठरवले असेल तर नाही पण होणार.. स्टॅन ला कितीही फॅन्स असले तरी खरोखर ते व्होट्स देतील का आणि मुख्य म्हणजे तो शो जिंकला तर काहीही न करता जिंकणारा विनर झाला हे चॅनेलला परवडणारे नाही. आणि ट्विटर वर पहिले तर सर्व पोल्स प्रियांकाच जिंकते. (डोन्ट फर्गेट शी वन माय ग्लॅम ऑन वोट्स ) स्टॅन पण पोल्स नाही जिंकत. मग खरेच त्याला मते आहेत का हा प्रश्न आहे. वोटिंग ट्रेंड बद्दल युटूबर्स वर अजिबात विश्वास नाहीए.
टॉप ६ माझ्या मते
टॉप ६ माझ्या मते
प्रियांका (विनर)
स्टॅन
शिव
सुमबुल
शालीन/अर्चना
निमरीत
अर्चनाला बॅग मिळू शकते
आता विकेंड वार कोण करणार,
आता विकेंड वार कोण करणार, सलमान नसेल ना.
आज एकता कपूर च्या ऑडिशन ला
आज एकता कपूर च्या ऑडिशन ला सगळ्या बहू एकदम होम पिच वर ब्याटिंग करत होत्या. सुंबुल पण एकदम नॅचरल वाटली.

अर्चना त्यात सरावलेली (निर्ढावलेली?) नाही हे कळत होते. शिव मात्र दगड. नको बाबा अॅक्टिंग च्या वाटेला जाऊ
स्टॅन ने तेवढ्यात तौकीर बाबाची अॅक्टिंग करून हसवले
बाकी शालीन चे बिबॉ, सलमान, येणारे जाणारे गेस्ट सगळ्यांनीच माकड केले आहे पार. तो ही त्याचेच पैसे घेत असल्यासारखा वाजवून घेतो सगळ्यांकडून !
शिव acting मध्ये फार नसेल तर
शिव acting मध्ये फार नसेल तर कठीण आहे करियरचं, एखाद दुसरा प्रोजेक्ट मिळेल, सारखे सारखे रियालिटी शोज किती करणार.
शिव डान्स चांगला करतो, बॉडी
शिव डान्स चांगला करतो, बॉडी पण छान आहे, ऍक्शन पण चांगली करेल. पण आवाज, डायलॉग डिलिव्हरी आणि एक्सप्रेशन्स मध्ये मार खातो. डिरेक्टरने मेहनत घेतली तर जमेलही त्याला. पण इतर इतके चांगले कलाकार असताना त्याच्यावर कोण वेळ घालवेल का हा प्रश्न आहे. मांजरेकरांनी म्हणूनच घेतले नसेल.
आज सुम्बुल -टिना अॅक्ट आवडले
आज सुम्बुल -टिना अॅक्ट आवडले, सुम्बुल खूपच नॅचरल आहे, मस्तं भराभरा बदलत होती तिची एक्स्प्रेशनन्स!
टिना सरप्राइज्ड मी, तिनेही चांगले केले अॅक्ट !
शिवला अॅक्टिंग कॉमेडी होतं
शालीनचा जोकर झालाय, अर्चना गॉट कर्मा.. अन्कित गेल्यावर डान्स करत होती आज तिची मैत्रीण गेली सेम पद्धतीने .
शिवला वॉर्निंगची गरज होती , होपफुली काही चेन्ज दाखवेल.
माझ्या मते टॉप ३,
माझ्या मते टॉप ३,
शिव - मोस्ट डिजर्विंग पण कलर्सफेस नसल्याचा तोटा होणार. तसेच गेले काही आठवडे बॅकफूटवर गेलाय. हा मला मराठी बिबॉ मधे पण आवडचा पण हिंदीमधला वेगळाच आणि जास्त कॉन्फिडंट वाटतोय.
प्रियांका - हिला विनर करायची फुल्ल फिल्डींग लावलीये चॅनलने, त्यामुळे विनर हिच होईल असं दिसतंय. नाहीतर हिच्यासारखी लाऊड आणि मी-मी करणारी जास्तीत जास्त टॉप ५ मधे जाऊ शकते. विनर नाही.
स्टॅन - फॅन फॉलोईंग मुळे टॉप ३ मधे असू शकतो.
प्रियांका स्मार्ट प्लेयर आहे
प्रियांका स्मार्ट प्लेयर आहे पण फार कोल्ड आहे. नॉट पर्सनेबल ऑर लाइकेबल.
शालीन चा फुल्ल ड्रामा झाला या आठवड्यात. कालचे मेल्टडाउन खरे वाटत होते.
टीना सगळ्यात जास्त निगेटिव वाटते आहे. जाम फेक, खोटारडी. डॉग लवर असल्याचेही नाटक. त्या माहिम ने सुसू केली तर मी नाही क्लीन करत, बिबॉ कुणाला तरी पाठवा म्हणे. निम्मो त्या मानाने प्लेयर म्हणून कमी असली तरी व्यक्ती म्हणून , फ्रेन्ड म्हणून चांगली असावी असे वाटते.
अर्चनाही दिवसेंदिवस कॉमेडी / एन्टरटेनिंग कमी आणि इरिटेटिंग जास्त झाली आहे.
बॅकफूटवर गेले आहेत हे खरंय,
बॅकफूटवर गेले आहेत हे खरंय, कारण जरा काही झालं की बायकांचं वुमन कार्ड निघतंय , आज सुद्धा (अर्चनाच्या भाषेत) प्रेंका आणि टिना किती मीन आहेत दिसत होतं. शालीनची आता दया येतेय, निघावं बाहेर. डोक्याला त्रास होईपर्यंत राहूच नये. अर्चना मला नेहमीच इरिटेटिंग वाटते, एखादा दुसरा जोक सोडला तर ती आणि प्रियंका एकाच माळेचे मणी.
मी अगदी हेच लिहिणार होते, पेट
मी अगदी हेच लिहिणार होते, पेट लव्हर असण्याचा ड्रामा करते टिना, निम्रीत गेन्ड रिस्पेक्ट !

शालीनच्या आधी टिनाने गेले पाहिजे, बिबॉला तरी काय पुळका, टिनाचा पर्सनल व्हॅनवाला डॉक्टर वगैरे मागवला
शालीन जसा असेल त्या स्टेजमधे भरभरके कन्टेन्ट देतो, आज सकाळी उठून सीताराम भजन गात होता, हसु आलं
सध्याच्या स्टेजला माझ्यासाठी टॉप ३ शिव, स्टॅन, शालीन !
अर्चना वाटायची डिझर्विंग पण आता काहीही नवीन नाही उरल तिच्यात, नुसतीच अनॉयिंग !
टिना फक्त आणि फक्त drama च्या
टिना फक्त आणि फक्त drama च्या च जोरावर टिकली आहे....खूप च घाणेरडी मनोवृत्ती आहे तिची...
मला तिच्यासमोर प्रियांका बरी वाटायला लागलीय चक्क...
मंडळी लोकांना जरी ट्रॉफी मिळाली नाही तरी त्यांनी मित्र जोडलेत...
नॉन मंडळी लोकांना कोणी नाही
अर्चना, टीना, प्रेन्का ऑप्शन नाही म्हणून एकमेका सोबत आहेत असं वाटतंय....
तसेच आहे. अर्चनाशी जमवून घेणे
तसेच आहे. अर्चनाशी जमवून घेणे त्यांनाही टफ जाते आहे
तिघींमधे कोणाचा कसलाच बाँड दिसत नाही.
त्यामुळे टास्क जिंकता आला नाही की म्हणतात आप बस दोस्ती निभा रहे हो. अरे दॅट्स द हार्श रिअॅलिटी ऑफ द शो. सपोर्टर्स नसतील तर कसे जिंकणार?! अन तुम्हाला कोण नाही म्हटले होते का अलायन्सेस बनवायला!
तसेही बिबॉ कोणत्याही स्थितीत मॅनिप्युलेट करू शकतातच गेम. नव्हे, करतात. त्यांनी तसा बहुमत वाला टास्क आणला आहे म्हणजे त्यांना माहितच आहे काय होणार ते. सब उनका खेल है..
प्रियंकाकडे कुठलीच लॉजिक
प्रियंकाकडे कुठलीच लॉजिक नसतात, एकदम चीप लेव्हलचा गेम खेळते, हिपॉक्रसी अॅट इट्स बेस्ट !
वुमन कार्ड खेळण्यात नं.१. ती आणि टिना कित्येकदा मुलांवर येताजाता कॉमेन्ट्स करतात, स्टॅनला कपडे बदलताना पाहून रिमार्क्स पास करतात , चेष्टा मस्करी करतात, हेच पुरुष सदस्यांनी केले तर मग तांडव !
टास्क करायचा होता तर १० मुद्दे मांडून निम्रीतच्या रिंग्ज काढायचे निदान ट्राय करायचे , पण इतकी ती बोलण्यात मुद्देसूद नाही , काय बोलायचे ते विसरून भरकटत शिव कडे येते फुटेज घ्यायला.
अर्चना काय खोटारडी आहे, असं
अर्चना काय खोटारडी आहे, असं दरवाज्यात एखाद्या मुलाने अडवलं असतं तर काय गोंधळ घातला असता. वर स्टोरी पण खोटी सांगितली, झाली बाईची किंचाळायला सुरुवात. वाटच बघत असते केव्हा घसा फोडता येईल याची. इकडे शालीन टिना भांडत असतात आणि हीचं मध्ये मध्ये, माझ्याशी भांडा माझ्याशी भांडा. आता अशीच दुसर्याच्या खुसपट्यात जाऊन किंचाळत बसणार. या आठवड्यात एलिमिनेशन नसेल, कारण टिना गेली तर बहु एकटी पडेल.
काल तर अर्चना ने रस्ता अडवला
काल तर अर्चना ने रस्ता अडवला आणि खोटं बोलली.... आणि मग प्रेन्का ला तर हवं च असतं..
खूप चिप आहे ती.... टीना आणि तिची चिपनेस हाय वर आहे सध्या...
उगाच धिंढोरा पिटते आहे... मी एकटी च्या दम वर आले वगैरे.... ऑप्शन च काय होता तिला, होतं च कोण तिला ???
काल चा एपी तर हाईट होता... किती बोलायचं एखाद्या माणसाने , टिना पण मी नाजूक, सॉफ्टस्पोकन वगैरे म्हणत किती घाणेरड्या लेव्हल ला जाते.... आणि सोयीस्कर पणे पलटी मारतात या.... काल त्या शालीन च परत एकदा माकड झालेलं।
सुम्बुल ने मस्त सुनावलं टिना ला....
शुक्रवारी लागणार आहे या तिघींची बरोबर
ट्युलिप बहू ला असंही जर
ट्युलिप बहू ला असंही जर जिंकवणार असतील तर कसली एकटी पडते..नाहीतरी इतक्या चिप लोकांना पण बिग बॉस विनर होता येतंय हेच बिगबॉस ला दाखवून द्यायच आहे तर काय करणार.... .
बिग बॉस चा बायस अजूनही जात
बिग बॉस चा बायस अजूनही जात नाही. १० रिंग्स काढण्यासाठी १० नियम बिग बॉसकडे तरी आहेत का ? सरळ सरळ सांगा ना की निमरीतलाच फिनाले तिकीट द्यायचे आहे. कोण काय करू शकणार आहे. असले टास्क जे कधीच कोणी जिंकणार नाही ते ठेवायचे नाटक तरी कशाला?
स्टॅनला पैशाचा प्रचंड घमंड आहे. mcp आहे . शिवला सलमानने सांगितल्यानंतर त्याचे प्रियंकाला टार्गेट करून सतत किंचाळणे असह्य झाले आहे. पण त्याच्याकडून भरपूर चुका होत आहेत.
सॉरी गाइझ ! मी जर तुमच्या
--
आरती सगळं फार पर्सनली घेताय
आरती सगळं फार पर्सनली घेताय तुम्ही...
तुम्हला जसे व्युज आहेत तसेच बाकी लोकांना पण आहेतच... तुमच्या फेवर मध्ये बाकी लोकांची मते नाहीत म्हणून तुम्ही लिहिणार नाही ह्यात काय मजा....
आणि तुम्ही लोकांच्या फेवरीट
आणि तुम्ही लोकांच्या फेवरीट वर टीका करताय तसे बाकी लोक पण प्रियांका वर टीका करतच आहेत... मग बाकी लोकांनी पण सॉरी गाईज म्हणत लिहिणं सोडायचं का????
नाही नाही पर्सनल नाही घेत पण
नाही नाही पर्सनल नाही घेत पण मला खरंच शो आता खूप बोर होत आहे.(बोरही होत आहे आणि मी खूप नेगेटिव्ह होत आहे आहे इथे लिहीताना असे वाटत आहे, जे मला आवडत नाही ) १५ जानेवारीलाच शो संपवायला हवा होता. नवीन काहीच होत नाही. मी कसेबसे पाहत आहे एपिसोडस. कालचा तर पाहिलाच नाही. आता किंचाळणे (सर्वांचेच) असह्य होत आहे.
हम्म मग बरोबर आहे... त्रास
हम्म मग बरोबर आहे... त्रास होतोय तर नका लिहू फक्त वाचा.. पण इथे कोणी कोणाविरुद्ध लिहिलेलं चालत नाही हे मी तरी इतक्या वर्षात पाहिलं नाही...
कोणी ही लिहू शकतो कशावर ही....
ठीके एडिट केले
ठीके एडिट केले
प्रियांका टीना चीपच आहेत..
प्रियांका टीना चीपच आहेत.. शिव चुका करतो पण .. प्रियांका जिंकली तर अशी घाणेरडी मनोवृत्ती जिंकेल..
आनंदी प्लस वन
आनंदी प्लस वन
आणि मला एक कळत नाही , समोरून जर सतत टार्गेट केलं जात असेल तरी शिव ने मनशांती न ढळू देणे अपेक्षित आहे का लोकांना?????
काल प्रियांका सुम्बुल शी भांडताना हललेली मात्र.... कशाला मग उंगली करत फिरते इथे तिथे... मग कोणी काही म्हटलं की फुकटचा dramaa
कालच्या भांडणात शिवने भारी
कालच्या भांडणात शिवने भारी मुद्दे मांडले, 'लडकीयोंके बारे में गंदी बातें' वरचा त्याचा मोनोलॉग भारी होता, 'फिर क्यों आते हो गले लगने, डान्स करने, इ.'. कोणी ऑब्झर्व केलं का, निम्रितचं लक्ष नसताना ती शॉर्ट्स मधे बघून गुपचूप पिलो पास केली त्याने, काहीही न बोलता. या छोट्या छोट्या जेश्चर मधून Decency दिसून येते त्याची. आता हे तो जाणून बुजूनही करण्या इतका हुशारही आहे पण काहीही असलं तरी त्याला स्वतःला चांगलं प्रोजेक्ट करता येतं.
येस्स, शिव एक शब्द खाली पडु
येस्स, शिव एक शब्द खाली पडु देत नाहीये, विकेन्डचा फीड्बॅक एकदम सिरीयसली घेतलाय , क्यूं आते हो डान्स करने, ब्लाउजका झिप लगवाने !
शालीनने पण मजा आणली आज, स्टॅनचे वन लायनर्स आणि टायमिंग पण भारी !
प्रियंका इतकी अनॉयिंग आहे, तिच्या पेक्षा अर्चना बरी आहे मग, निदान कधीतरी काजीतरी सेन्सिबल बोलते, घरात कॉन्ट्रिब्युशन तरी देताना दिसते !
Pages