खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20230506_051017.jpg
.
IMG_20230506_051053.jpg

हे डायट ताट नाचणी धिरडं, दुधाची भाजी, स्टर फ्राय ब्रोकोली IMG-20230511-WA0013.jpg

मिलेट पोंगल आणि भजी फ्लॉवर , कांदा,मिरची चिमूटभर सोडा घातला कुरकुरीत झाली भजी IMG-20230511-WA0011.jpg

8DA31B25-1C4C-4CA2-98AF-0D75596BA23E.jpeg
झुकिनि स्पॅगेटी पास्ता भरपुर भाज्या घालुन आलमोस्ट नो कार्ब
6E83BC14-9271-42E1-A030-EB27DF954C15.jpeg
सिन्धी कोकी रोटी -छुन्दा
6F3D8083-153A-498E-9D71-91DB34D891DE.jpeg
डोसा-रस्सम-चटणी
0508CD4A-9937-4AC8-9264-B20F601503B6.jpeg
तेल-तिखटमिठ-पोहे

IMG_20230516_014144.jpg

अंडं आहे कि बटाटा..जे आहे ते तोंपासू.

प्राजक्ता सगळे पदार्थ मस्तच..

छंदीफंदी मदर्स डे स्पेशल डिश एकदम आकर्षक.. कोणता पदार्थ आहे?

PXL_20230515_0331542722_1500x1200.jpg

पास्ता पण बनवलेला, त्या दिवशी फोटो अपलोड होत नव्हता.

Mrunali आणि सामो धन्यवाद.

Pita bread वापरून, garlic bread सारखे toast करून त्यांनी ते basil Ani parsley chi pesto पास्ता साठी. बनवलेली. ती आणि टोमॅटो , असं बनवलेलं.

प्राजक्ताचे पदार्थ दिवसेंदिवस सुंदर होत चालले आहेत. टेबलक्लॉथही आवडला.
ऋ, छन्दिफन्दी, मंजूताई, अमुपरी मस्त फोटो.
हा कालचा मेनू फुलकोबी मटार भाजी, दहीभात, फोडणीचं मेतकूट, पालकाचे पराठे.
Screenshot_20230516_101404.jpg

किती मस्त आहेत सर्व फोटोज्! नेहमी लिहिणं होत नाही पण सगळ्याजणी सगळेजण सुगरण आहेत.
अस्मिता, तुम्ही रोजचे जेवण पण किती छान पद्धतीनं पेश करता, भारी दिसतं. मी तर पदार्थ शेगडीवरून ताटात ते पोटात इतक्या वेगाने करते की फोटो काढणे जमतच नाही!

फोडणी च मेतकूट कसं करावं? नेहमीच कोरड मेतकूट आहे माझ्याकडे.

छन्दिफन्दि, मुलांचं खूपकौतुक!
अस्मिता, मस्त मेन्यू. मेतकुटात कांदा टाकलाय ना …
प्राजक्ता, कच्चे पोहे फार आवडीचे. दाणे बाजूला ठेवायची आयडिया आवडली.
रुन्म्याचे मेन्यू नेहमीच भारी असतात . शाकाहारी मेन्यू आवडला.
मेघा, मेतकूट दह्यात कालवायचं वरून फोडणी द्यायची.

मृणाली बटाटा आहे. दम आलू.. असे नाव बायकोने तरी सांगितले.

सामो, हल्ली हे सलाड कोशिंबीर आमच्याकडे आठवड्याचे दोनचार दिवस असतेच. म्हणजे आठवड्याचे एकदोनदा बनवली की दोन दोन दिवस पुरते.

IMG_20230517_013703.jpg

वरचे सगळे नविन नविन अ‍ॅड झालेले फोटो भारी आलेत.
मेतकुट कान्दा दह्यात कालवलेल हा प्रकार सोलापुर साइडला पण फार पॉप्युलर आहे.

अस्मिता, तुम्ही रोजचे जेवण पण किती छान पद्धतीनं पेश करता, भारी दिसतं. मी तर पदार्थ शेगडीवरून ताटात ते पोटात इतक्या वेगाने करते की फोटो काढणे जमतच नाही!
>>>> तुम्ही डॉक्टर आहात हो, माझ्या वरण-भात-भाजी-पोळीचं काय कौतुक. तरीही धन्यवाद Happy मलाही नेहमी होत नाही , जेव्हा होतं तेव्हाचे फोटो आहेत. ते बोल्सही माझ्या भाचीला घर बदलायचे तेव्हा जास्तीचं सामान नको होतं तर तिने देऊन टाकले. पेश वगैरे करण्यापेक्षा नॉन-स्टिक मधून ताबडतोब काढण्याकडे कल आहे. Happy

फोडणी च मेतकूट कसं करावं? नेहमीच कोरड मेतकूट आहे माझ्याकडे.
>>> मी(सहसा) दही घालत नाही. कोरड्या मेतकूटात थोडं पाणी, बारीक चिरलेला कांदा, तेल+हिंग+मोहरी+जिरे +कोथिंबीर फोडणीला देऊन यावर ओतले. खूप सोपं आहे. मी पराठ्यांसोबत नेहमी करते.

धन्यवाद अस्मिता आणि मंजूताई. मेतकूट तूप भात वा मेतकूट दही भात पेक्षा वेगळा काहीतरी समजल.
मालवणी बहुतेक कुळीथ पीठी भात खातात त्यामुळे मला व आईला मेतकूट चे अन्य वापर माहीतच नाही.
@अस्मिता तुम्ही पदार्थ निगुतीने करता ते फोटोत दिसतं, जाणवतं म्हणून कौतुक, बाउल etc तर भौतिक गोष्टी

मेतकूटात मीठ व तेल घालायचे. पोळी लाटून त्यावर ते पसरवायचे त्यावर कोथिंबीर,तीळ व ओवा भुरभुरायचा. पोळीची गुंडाळी नंतर परत एक गुंडाळी ( लच्छा पराठा टाईप)करून गोल लाटायची. चारी बाजूने तेल सोडून खरपूस भाजायचा. मेथांबा व आज पहिल्यांदाच सवर क्रीम खाल्लं त्याच्याबरोबरही छान लागला.

भाजीचा झूम फोटो मला यमी चिकन दिसतंय.. त्यामुळे तोंडाला पाणी सुटले.
पण चिकन असताना ताटात साईडला लोणचं का घेईल कुणी म्हणून कन्फ्युज.. मनीम्याऊ, कशाची भाजी आहे?

अस्मिता, मस्त पदार्थ.

मंजूताई, भरलं ताट मस्तच.

चिकनच आहे.
बाजूचे लोणचे मुलीसाठी. Lol

Pages