Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिचारा बेंथो....किती ती इमानी
बिचारा बेंथो....किती ती इमानी जात... माणसानेच काही शिकावं यांच्याकडून!
फार निर्मळ निखळ प्रेम!
गोंडस पिल्लू! असं वाटतं उचलून आणावं>
किती गोड पपी आहे.
किती गोड पपी आहे.
कोकोनट काही तरी मागताना आलेला विचित्र फोटो

मनोज जोशीचा कचरासेठ आठवला.
राजेशाही थाट - जुना सोफा नखांनी फाटून गेल्यावर नवीन सोफ्यावर आराम चाललाय. एकदम सुखासीन प्रवृत्ती आहे.
सगळ्यात कंफ्टेबल जागा शोधून झोपतो, कुणी खेटलेलेही आवडत नाही. थोड्या वेळ माया करवून आपापल्या जागी निवांत आराम करतो.

मनोज जोशीचा कचरासेठ >>> अगदी
मनोज जोशीचा कचरासेठ >>> अगदी अगदी
राजस सुकुमार आहे आपला कोकोनट!
मला वाटलंच होतं 'कचरासेठ'
मला वाटलंच होतं 'कचरासेठ' तुला समजणार.
मनोज जोशीचा कचरासेठ >>> Rofl
मनोज जोशीचा कचरासेठ >>>
मनोज जोशींचा कचरासेठ>> अगदी
मनोज जोशींचा कचरासेठ>>
अगदी ,त्याचा गंजी हिरोईन वॉल फेमस सीन कोण विसरणार
कोकोनट ने तसाच चेहरा केलाय .
सुखासीन प्रवृत्ती हे खरंय ,आमच्याकडेही बंड्या आमच्यापेक्षा जास्त सोफ्यावर पडून असतो वरून डिस्टर्ब अजिबात करायचा नाही.झोपून उठल्यावरही मान खाजवायला माणूस लागतो आणि ते केलं की साहेबांचे परत डोळे मिटतात.अगदीच वाटलं तर उंट (ही मांजरांची आळस देण्याची पध्दत आहे ज्यात ते पोटाचा भाग उंच करून उभी ऍक्शन करतात आमी त्याला उंट झाला असं म्हणतो त्या ऍक्शन चा फोटो काढला तर टाकेन.)होऊन उठतात नाहीतर परत झोपतात आणि थेट रात्रीचे फ्रेश होतो .रात्रभर दुनियादारी करून सकाळी परत अंथरुणात गुरफटून झोपलेलं दिसतो.
पण झोपलेला अगदी गोंडस आणि क्यूट दिसतो
मंडळी तुमचे पेट्स सोफा, बेड,
मंडळी तुमचे पेट्स सोफा, बेड, खुर्ची या पैकी कश्यावर बसतात का? कि कायम खालीच बसता?
सिंबाने २ सोफे स्वतःच्या मालकीचे करून टाकले आहेत. एकटा असला तर त्याच्या ठरलेल्या जागी बसतो पण आम्ही सगळे हॅाल मधे बसलो तर यालापण वरच बसायचे असते. अगदीच ओरडलो तर मग मुकाट जाऊन बसतो नाहीतर अगदी मांडीला खेटून बसायचे असते. आमच्या प्रत्येक संभाषणात याला त्याच्या भाषेत त्याचे मत मांडायचं असत. मग बायकोला त्याला गप्प बस म्हणून सांगाव लागतं , नाहीतर अगदी लो आवाजात काहीतरी गुरगुरत असतो. मग मी त्याला म्हणतो कि तुझी भाषा शिकावी लागेल लेका आता.
^^मंडळी तुमचे पेट्स सोफा, बेड
^^मंडळी तुमचे पेट्स सोफा, बेड, खुर्ची या पैकी कश्यावर बसतात का? कि कायम खालीच बसता?^^
माझी दोन्ही मांजरे आपल्या मर्जीचे मालक ( खरे तर मालकीण) आहेत.
सोफा, बेड, फ्रिज काहीही चालते. सगळीकडे केस होतात आणि एकदम गडबडीत असताना आपल्या गडद कपड्यांना पांढरे करून टाकतात.
इथे आता गरम व्हायला लागले आहे, मग गार लागते म्हणून फरशीवर पसरतात.
आपणच मग रिकामी जागा बघून बसायचे.
^^मंडळी तुमचे पेट्स सोफा, बेड
^^मंडळी तुमचे पेट्स सोफा, बेड, खुर्ची या पैकी कश्यावर बसतात का? कि कायम खालीच बसता?^^
माझी दोन्ही मांजरे आपल्या मर्जीचे मालक ( खरे तर मालकीण) आहेत.
सोफा, बेड, फ्रिज काहीही चालते. सगळीकडे केस होतात आणि एकदम गडबडीत असताना आपल्या गडद कपड्यांना पांढरे करून टाकतात.
इथे आता गरम व्हायला लागले आहे, मग गार लागते म्हणून फरशीवर पसरतात.
आपणच मग रिकामी जागा बघून बसायचे.
कोकोनट खुर्चीवर बसत नाही बाकी
कोकोनट खुर्चीवर बसत नाही बाकी सगळीकडे रान मोकळे केले आहे. आम्ही मारे ठरवलं होतं की त्याला बेडवर, सोफ्यावर बसू द्यायचे नाही पण त्याला आमचं घरं आमच्यापेक्षा एन्जॉय करता येतं. माझ्या आसपासच असतो सहसा.
माउई पण सोफे, बेड, खुर्च्या
माउई पण सोफे, बेड, खुर्च्या त्याला वाटेल तिथे चढून बसतो. आम्ही त्याला लाडावून ठेवलेले असल्यामुळे त्याला अमूक इथे बसू नको असे काही शिकवलेले नाही. मोस्टली आम्ही टिव्ही वगैरे बघत असलो तर त्याला माझ्या मांडिवर नाहीतर बाजूला खेटून बसायला आवडते. त्याच्याही फेवरेट जागा आणि ब्लँकी आहेत. तिथे तो झोपलेला असताना कितीही गैरसोय झाली तरी त्याला सरकवायची इतरांची हिंमत नसते! कधी कधी मांडिवरचा लॅपटॉप सुद्धा बाजूला सरकव असे त्याने हुकूम देताच मी निमूट बाजूला ठेवते
सोफा, बेड, खुर्ची>> सॅमी नाही
सोफा, बेड, खुर्ची>> सॅमी नाही बसत सोफ्यावर वगैरे अजिबात. पिल्लू असताना लेदर सोफा /खुर्च्यांना भरपूर ओरखाडे पाडलेत. पण तेव्हा स्क्रॅचर वगैरे पाहिजे हे काही माहित नव्ह्तं आम्हाला.
.. आपणच लाचार सारखे इकडे तिकडे बसतो, ते बसले की हलायचं नाही की काही करायचं नाही... लगेच उठून जाणार 
तिला बसायच्या फार ओपन स्पेसेस आवडत नाहीत. अपवाद फक्त मुलीच्या रूममधे. ती जरा कोझी रूम आहे. तिचं दार बंद असेल तर पंजे घालून घालून तिथल्या कारपेटला एक मोठा खड्डा पाडलाय सॅमीने. मुलीच्या स्टडी चेअर आणि बेडवर कायम कब्जा असतो. मुलगीच खाली बसते मग अभ्यासाला. बेडवर पण तिच्या शेजारीच फर ब्लँकेट वर बसेल नाहीतर झोपेल नाहीतर बिस्किटं करत राहिल.
काय राजेशाही कारभार असतो नाही का मांजरांचा
माझ्या बहिणीकडे मांजर आहे.
माझ्या बहिणीकडे मांजर आहे. तिने कॉम्प्युटर टेबलची खुर्ची ढापली आहे. त्यामुळे आता घरातल्यांना इतर खुर्च्या वापराव्या लागतात. अजून लॅपटॉप ढापला नाहीये हे आमचं नशीब.
बिस्किटं करत राहिल. >>>>
बिस्किटं करत राहिल. >>>> बिस्कीटं फार गोड वाटतात पाहायला.
अजून लॅपटॉप ढापला नाहीये हे आमचं नशीब.
जायचं ऑनलाईन आणि यायचं माबोवर. स्वतःचे फोटो टाकायचे येथे.
>>>>
बिस्कीटं फार गोड वाटतात
बिस्कीटं फार गोड वाटतात पाहायला. >>> अगदी अगदी.
जायचं ऑनलाईन आणि यायचं माबोवर. स्वतःचे फोटो टाकायचे येथे >>>
तेवढं झालं की सुडोमि! पुढच्या वेळी गेले की तिला इथे आयडी काढून देते.
सोफा, बेड, खुर्ची
सोफा, बेड, खुर्ची
<<<
घर ऑश्कुचं आहे, त्याला वाटेल तिथे आणि उडी मारून चढायला जमेल तिथे बसतो, आवडते स्पॉट्स म्हणजे सोफ्याचे कॉर्नर स्पॉट्स आणि मास्टर बेडरुमचा बेड, रात्री आणि दुपारची झोप बेडवरच लागते !
बिस्किटं करत राहिल. >>>
बिस्किटं करत राहिल. >>> म्हंजे?
आधी मला खात राहिल च्या ऐवजी करत राहील असे चुकून लिहिले आहे असे वाटले. पण मग अस्मिताने ते गोड वाटते पहायला लिहिले, म्हणजे हे काहीतरी वेगळे प्रकरण असावे - एक अडाणी मांजर्/भूभूप्रेमी.
ऑश्कुचे फोटोज भारीच
ऑश्कुचे फोटोज भारीच
पहिल्या फोटोत नजरेनेच सांगतोय 'बेड माझा आहे, तू इथे काय करतेयस?'
माधव, लहान बाळ जसं आपल्याच
माधव, लहान बाळ जसं आपल्याच दोन हातांशी खेळताना लाडू करतोय म्हणतो आपण. तसं मांजर आपलेच पंजे घेऊन एकमेकांंवर गोल गोल फिरवत बसते. बाळासारखेच गोड दिसते ते.
ऑश्कुचे फोटो फारच गोड.
मांजर आपलेच पंजे घेऊन
मांजर आपलेच पंजे घेऊन एकमेकांंवर गोल गोल फिरवत बसते >>> ओके.
ऑश्कु मस्त. शेवटचा फोटो भारीच आलाय - कभी कभी लगता है अपुन ही भगवान है |
! कधी कधी मांडिवरचा लॅपटॉप
! कधी कधी मांडिवरचा लॅपटॉप सुद्धा बाजूला सरकव असे त्याने हुकूम देताच मी निमूट बाजूला ठेवते Lol
चला म्हणजे फक्त मीच व्हीक्टीम नाही हे वाचून बरं वाटलं … दुपारी ४ः३० नंतर लॅपटॅाप बंद म्हणजे बंद नाहीतर साहेब येऊन पायाने बंद करतात. कधीतरी व्हीडीओ टाकेन
क्यूट फोटोज कोकोनट आणि
क्यूट फोटोज कोकोनट आणि ऑस्करचे.
आमच्याकडेपण सोफा आणि बेड ह्या तिच्या जागा आहेत. तिचे केस गळत नाहीत त्यामुळे ठिक आहे. सुरवातीला खूप शिस्त लावायचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावर यायचं नाही, सोफ्यावर बसायचं नाही इत्यादी. पण ज्या पद्धतीनं ती आमच्याकडं बघायची, त्या डोळ्यांकडे बघून आम्ही विरघळायचो. अजूनही तसंच आहे. तिच्या पॉ भोवती आम्हाला गुंडाळून टाकलंय
काही पेट पेरेन्ट्स फार
अगदी अगदी अंजली ! काही पेट पेरेन्ट्स फार शिस्तीचे वगैरे असतात. एखाद्या खोलीत , किचन मधे अॅक्सेस न देणे किंवा सोफा / खुर्च्या , बेड वर चढायला बंदी वगैरे. जे अगदी चूक असे नाही पण आम्हाला तसले काही कधी जमलेच नाही. लाडावून डोक्यावर बसलेल्या शेंडेफळाचे त्याचे स्टेटस आहे घरात.
ह्युमन बाळांसोबत एक वेळ
ह्युमन बाळांसोबत एक वेळ स्ट्रीक्ट होता येतं पण या मुक्या प्राण्यांबरोबर जमतच नाही. डोळे सगळं काम तमाम करतात.
दुपारी ४ः३० नंतर लॅपटॅाप बंद म्हणजे बंद नाहीतर साहेब येऊन पायाने बंद करतात. कधीतरी व्हीडीओ टाकेन>>>>>>>>> ही ही एक रील पाहिलेलं. मिटींग बंद चा एक स्पेसिफिक आवाज ऐकला की डॉगी लगेच लिश घेऊन येतं. चल फिरायला
माधव फॉर यु
https://www.youtube.com/shorts/GWrkC--yoxo
ज्या पेट्सचे केस गळत नाहीत ते
ज्या पेट्सचे केस गळत नाहीत ते ठीक आहे.
पण ज्यांच्या केसांचे शेडिंग होते अश्यावेळी काय उपाय करत आहेत? especially लहान मुल घरात आहे तेव्हा ?
जाई — शेडींगवर सारखं
जाई — शेडींगवर सारखं व्हॅक्यूम करणे हाच एकमेव ऊपाय आहे. माझ्याकडे जर्मन शेपर्ड आहे जो जास्त नाही वर्षातले फक्त १२ महिनेच शेड करतो आणी त्याला एकमेव ऊपाय म्हणजे व्हॅक्यूम करणे हाच आहे
जो जास्त नाही वर्षातले फक्त
जो जास्त नाही वर्षातले फक्त १२ महिनेच शेड करतो /em>
आज नदीकाठी कोकोनटचे फोटो सेशन
आज नदीकाठी कोकोनटचे फोटो सेशन केले.
*
शाणं लेकरु
शाणं लेकरु
गोडच दिसतोय कोक्या
गोडच दिसतोय कोक्या
सुंदर लोकेशन आहे !
Pages