भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती गोग्गोड आहेत ओड्याचे फोटोज .. किती बोलके डोळे ते !
मागच्या पेज वरचे त्याचे रात्रीचे अजारी पडणे वाचून फार वाईट वाटलं आणि एक्स रे नंतर टुणकन् उडी मारून शु करून आला वाचून माझाच जीव भांड्यात पडला !
शब्बास ओड्या, मस्तं ट्रिप एन्जॉय करतोय !

आईग्गं ओडू गोडू! तोंडचं पाणीच पळवलं की तुमच्या!
आता बराय वाचून छान वाटलं. फोटो पण देखणे.

बंड्या माऊ पण मजेशीर! सॅमीताई आल्या खबरबात घ्यायला .. बरे आहेत ना सगळे!!

unnamed (5)_0.jpg

आय्अ‍ॅम वॉssचिंग यूss!">>>हो मांजरं अशीच लूक देतात सतत लक्ष ठेवल्याचा आमचा बंड्या खिडकीत बसून बाहेर आत वॉच देत असतो.

अय्यूओ... खरंच फोरेव्हर बेबीज असतात हे! फार गोड
सॅमीचे लुक्स Lol आम्ही तिला आज्जीबाई म्हणतो घरात कसं एक सिनिअर सिटिझन कायम तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात तसंच

IMG_1224.jpeg

महाराज गडावर सुखरूप पोहोचेपर्यंत असंख्य वार शरीरावर झेलून, रक्तबंबाळ अवस्थेत जीव तगवून धरत खिंड लढवणारे बाजीप्रभू आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. महाराज सुखरूप पोहोचल्याची परवलीची खूण म्हणजे तोफेचा आवाज ऐकल्यावरच समाधानाने त्यांचे जखमांनी विदीर्ण झालेले शरीर जमीनीवर कोसळले.

त्यांच्या स्वामीनिष्ठेला शतश: नमन!

अगदी हाच मानवातला श्रेष्ठ गुण एखादा प्राणी दाखवून जातो तेव्हा मात्र आश्चर्य वाटते.

मध्यप्रदेशच्या बांधवगड अभयारण्यालगतच्या एका २५० घरे असलेल्या छोट्या खेड्यातल्या शिवमने १० वर्षांपूर्वी जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याचे पिल्लू सांभाळायला आणले. त्या पिल्लाशी शिवमची चांगलीच गट्टी जमली. शिवम जिथे जाईल तिथे ते पिल्लूही मागे मागे जायचे. शिवम आणि बेंथो, ते पिल्लू, शेताची राखण करायचे.

परवाही असेच पहाटे ते दोघे ४ वाजता शेतावर गस्त घालायला गेले. शेताला लागून असलेल्या जंगलातून अचानक एक मोठा थोरला वाघ समोर आला. शिवमची ते चमकदार पिवळे हिंस्त्र डोळे बघून दातखिळच बसली. भारल्यासारखा उभा राहून त्याच्या दिशेने येणाऱ्या त्या काळाकडे अनिमिष नेत्रांनी तो बघत राहिला.

बेंथोने भुंकून मालकाला शुद्धीवर आणायचा, पळून जा सांगायचा प्रयत्न केला. पण शिवमचा मेंदू बधिर झाला होता. बेंथोने परिस्थितीचा अंदाज घेतला. झाडामागून सावकाश पावले टाकत साक्षात यमदूत शिवमकडे जात होता. शिवम मुळात बारकुडा, किरकोळ शरीरयष्टीचा, त्यात आता घाबरून हातपाय गाळून बसलेला. त्याला वाचवण्याची जबाबदारी पूर्णपणे बेंथोवर आलेली होती... दिली कोणीच नव्हती.. बेंथोने आपणहून स्विकारली होती.

बेंथोने सूत्रे ताब्यात घेतली. स्वत:पेक्षा दहापट ताकदवान आणि वजनदार शत्रूपासून शिवमला वाचवायचे होते.

आधी त्याने वाघाच्या दिशेने जात जोरजोरात भुंकायला सुरूवात केली. वाघाने तुच्छतेने त्या एवढ्याशा क्षुद्र जीवाकडे बघितले. आजचे त्याचे भक्ष्य शिवम होता. बेंथो नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून वाघाने शिवमच्या दिशेने परत पावले टाकायला सुरूवात केली.

पण चुक केली होती त्याने बेंथोला क्षुद्र समजून. त्या छोट्या शरीरात स्वामीभक्तीरूपी प्रचंड शक्तीचा संचार झाला होता. वाघाला थांबवण्यासाठी बेंथोने सरळ त्याच्या अंगावर उडी घेतली. वाघाला त्याच्या या कृतीची अपेक्षा नसल्याने दचकून तो दोन पावले मागे सरकला... मग चिडला...
जर्रे की ये जुर्रत?..
शिवमकडचा रोख बदलून त्याने बेंथोवर उडी मारली. बेंथोचा हेतू सुफळ झाला. शिवमवरचे वाघाचे लक्ष हटले होते. आता तरी तो त्या डोळ्यांच्या संमोहनातून मुक्त होऊन पळून जाईल वाटले बेंथोला. पण शिवम जागेवरून हलला नाही. वाघाने बेंथोला पकडून त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्याच्या मानेत सुळे रुतवले. जोरदार हिसडा मारत बेंथो उठला. परत वाघावर झेप घेत त्याला बोचकरण्याचा, चावण्याचा प्रयत्न करू लागला. ताकदवान वाघाने एकाच पंजाच्या रट्ट्यात त्याला जमिनीवर लोळवले. वाघाच्या तिक्ष्ण नखांनी बेंथोची कातडी चिरफळली. रक्त उसळून बाहेर आले. परत परत बेंथो वाघावर झेप घेत राहिला. परत परत त्याच्या पंजाने रक्तबंबाळ होत राहिला. बेंथोच्या मानेला असंख्य चावे घेतले वाघाने. त्याची मान जबड्यात धरून जंगलाकडे खेचून नेण्याचा प्रयत्न चालवला.

पण बेंथोने स्वतःला सोडवून घेत, जीवाच्या आकांताने त्या धूडावर आक्रमण चालूच ठेवले. शेवटी वाघच या आक्रमणापुढे नरमला. मागे मागे सरकत जंगलात निघून गेला.

त्याच्यावर भुंकत बेंथो आपल्या थरथरत्या पायांवर जेमतेम उभा राहिला. खरं तर त्याला वाघाचा पाठलाग करून जंगल पार पळवून लावायचे होते. पण..मनात जोर असला तरी अंगात त्राण नव्हते. वाघ जंगलात दूर निघून गेलाय, परत येणार नाही याची खात्री पटल्यावर मात्र त्याच्या लटलटणार्या पायांतलं अवसान गळालं. तो त्याच्याच रक्ताने लाल झालेल्या मातीत कोसळला.

पुतळ्यासारखा स्तंभित उभा शिवम आता भानावर आला. बेंथोला त्याने छातीशी कवटाळून धरलं. थोडी धुगधुगी होती त्याच्या शरीरात. तसेच त्याला हातांवर उचलून गावाच्या दिशेने त्याने धाव घेतली. झाडपाल्याचे तात्पुरते उपचार करून लगेच शहरातल्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली.
पण...
नाही वाचवू शकले त्या मुक्या जीवाला.
शिवमला आयुष्याचं दान देऊन गेला तो.

बेंथोला मानाचा त्रिवार मुजरा!

मेघा अविनाश कुळकर्णी
अंबरनाथ

वरील लेख आत्ताच वाचनात आला, खरच किती ईमानी जात …

बेंथोला श्रद्धांजली.
असे पाळीव प्राण्यांचे अनुभव अनेकांना येत असतील.खरच इमानी जात किंवा पालकाविषयीचं प्रेम म्हणू शकतो.

काल गार्डन ला एक छोटा भुभु दिसला चालणार्याच्यात इकडे तिकडे पळत होता .IMG_20250304_225623.jpg

मी फोटो काढायला जवळ गेले तर जवळ आला

IMG_20250304_225649.jpg

गोंजारलं तर मस्त बसून पोज दिली.क्यूट पपी .

IMG_20250304_225715.jpg

त्याचा अजून एक भाऊ चॉकलेटी रंगाचा होता पण होल वाल्या पाईप मध्ये लपून बसला होता. त्यामुळे त्याचा फोटो नाही काढता आला.

जर्मन शेफर्ड ची बातमी वाचलेली पण हा लेख अगदीच मस्त आहे
थोडं जरा नाट्यमय केलंय पण चित्र उभे राहिले डोळ्यासमोर

===

कसलं गोंडस पपी आहे Happy

आशुचँप — हा लेख माझा नाही, लेखकाचे नाव आहे खाली. सत्य घटना आणी या धाग्यावरील सगळे प्राणीप्रेमी मंडळी म्हणून शेअर केला.

Pages