भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकोनट सुंदरच आहे. पण फोटोग्राफर ने त्याच्या सौंदर्याला जस्टिस दिलेला नाही असे नम्र मत आहे या ठिकाणी Proud एका फोटोत पायच कापलेत बिचार्‍याचे अन दुसरा फोटोत चेहरा नीट दिसत नाही. Happy

Lol अगं, त्याचा फोटो काढणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. माझ्या मागेच येतो, आहे तेथे उभं राहत नाही. त्याचा काढायचा नसेल तेव्हा मात्र बरोबर मधे येतो. Proud

हेमात्र खरं आहे, पेट्स त्यांचा फोटो काढत असताना नीट काढू देणार नाहीत आणि आपला काढताना मध्ये मध्ये येणार Happy भुभु तरी ट्रेन होतात किंवा इन्स्ट्रक्शन फॉलो करतात .बोके काय शिकत नाहीत आपल्याला हवं तेच करतात.

Happy हो, आणि मी काही झाले तरी हातातले लीश सोडत नाही. त्यामुळे इनडोअर फोटो बरे येतात. दुरून काढता येतात.

हत्तीला चड्डी घालण्यासारखं >
नेमकं हे एकच वाक्य माझ्या लेकीने वाचलं आणि "केवढी मोठी चड्डी लागली असेल ना.. आणि ती घातली कशी असेल?" असे दोन वरकरणी निरागस सरळ दिसणारे बॉम्ब टाकले Lol

ओडिन बाळ असल्यापासून आम्ही त्याला सोफा गादी वर कधीच चढू दिल नाही त्यामुळे आता ते इतकं अंगवळणी पडलं आहे त्याच्या की तो येऊन बेड किंवा सोफ्यावर डोकं टेकवून प्रेमाने बघेल पण वरती कधीच चढून येणार नाही
खाली गादी टाकली तरी नाही, तो असा खाली झोपून फक्त डोकं गादीवर टेकवून झोपतो

त्याची म्हणून एक जुनी गादी आहे त्यावर मात्र मस्त झोपतो आणि ती घातलेली नसेल तर तिथं जाऊन असा ताटकळत बसतो की मला झोप आलीये लवकर गादी घालून द्या. ती जुनी गादी आणि एक रया गेलेली उशी त्याला माहितीय त्याची आहे ती घेऊन मस्त माणसासारखा कुशीवर झोपतो.

Lol पण फोटोमस्त आहे आणि सिंबा च्या चेहर्यावरचे भावही.

मी असा फोटो, अश्या भुभु सोबत काढायचा विचार स्वप्नातही करू शकत नाही इतकी भिती वाटते लहानपणापासून . कधी कुत्रा चावला नाही पण अंगावर आला की चावेल असंच वाटायचं म्हणून लांबूनच जे काय प्रेम ते. मोठे भुभु ची भीती ,छोटे पप्पीज ची भिती वाटत नाही.
एकदा सोसायटीतला मोठा सेम ओडिन सारखा भुभु त्याच्या ताई बरोबर लिश सोडून खेळत होता.आणि अचानक माझ्यावर झेपावला होता उड्या मारून झेपावताच होता आणि मी चालता चालता ओ नो ,ओ नो करत फ्रीझ झाले होते 2 मिनिटं ,मग त्याची ताई घेऊन गेली तोपर्यंत माझी भीतीने वाट लागली होती .नंतर समजलं त्याची ताई आणि मी सारखे ट्रॅक टीशर्ट घालून होतो आणि तो मला ती समजून खेळण्यासाठी तसा करत होता.तरीच मी विचार करत होते कुत्रे एव्हडी सलगी कसे करायला लागले नाहीतर मी कुत्रा दिसला की रस्ता क्रॉस करून दुसरीकडे पळणारी .पण या इंन्सीडन्ट नंतर मात्र थोडी भीती कमी झाली.

हे फक्त आम्ही घरचेच करू शकतो .. बाहेरच कुणी जास्त जवळीक करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे गार्डींग सुरू होते. त्याला मी पेट शॅाप मधे नेलं आणी कुणी बाहेरील माणसाने ट्रीट दिली तरी तो खात नाही, तीच ट्रीट घरच्यांनी दिली तर लगेच खातों. हे त्याला शिकवलेलं नाही ईनबिल्ट आहे. माझ्या मुली बाबात बाहेर तर जरा जास्तच जागरूक असतो.

त्याला मी पेट शॅाप मधे नेलं आणी कुणी बाहेरील माणसाने ट्रीट दिली तरी तो खात नाही, तीच ट्रीट घरच्यांनी दिली तर लगेच खातों. हे त्याला शिकवलेलं नाही ईनबिल्ट आहे>>> हुशार आहे पोरगा!

अगदी, हरितात्या. कोकोनटही खात नाही अनोळखी लोकांच्या हातून. एवढंच काय तर वेटच्या ऑफिस मधे टोपल्यात ठेवलेले ट्रीटही मी दिले तरी खात नाही कारण तिथून घरी आल्याशिवाय त्याला रिलॅक्स वाटत नाही.

हो माउई पण लहान ब्रीड आहे तरी त्याची गार्ड करण्याची जन्मजात वृत्ती आहे. तो पण अजिबात कुणी दिलेली ट्रीट घेत नाही की कुणा स्ट्रेन्जरला उगाच लाड करू देत नाही. आम्ही वॉक करताना समोरून कोणी रनर किंवा इतर अनोळखी येताना दिसले तर हा लगेच समोर जातो , माझ्या पुढे उभा राहतो! मी म्हणते काय तुझा लूक, काय तुझा साइज. पण अ‍ॅटिट्यूड गार्ड डॉग चा.

होना. आमचा ही अगदी चवताळुन भुंकत अस्तो त्याच्या ४ पट साईज वाल्यांवर.... पण ते फक्त बन्द खिडकीच्या आत असतांनाच...

तुमची सगळ्यांची बाळं बाहेरच्या कुणाकडून काहीही खात नाहीत हे वाचून अगदीच पाणी आलं डोळ्यात Happy
आमच्याकडे बघा
भटक्या भुबुना बिस्किटं घालणारा कोणी दिसला तरी त्याकडेही जाऊन एखादं बिस्कीट मटकावून येतो
त्याला जर मी असं म्हनलं की बाहेरच्या लोकांनी दिलेलं काही खाऊ नये तर ते आकलनाच्या पलीकडे असेल त्याच्या
खाणं आहे मग ते खाल्लंच पाहिजे मग ते कुठेही कसेही कुणीही दिलेलं ठेवलेलं असो
लॅब म्हणजे आयुष्यभराचे उपाशी जीव, कितीही खायला द्या कधीच नाही म्हणत नाहीत Happy

कोकोनट ची फर फोटोत पण चमकती आहे. तू छान काळजी घेते आहेस.
इथे सर्वच भुभू माऊ पालक फारच छान सांभाळतात या बाळांना.

Happy मी काही वेगळी अशी काळजी घेत नाही. दीडदोन महिन्यात एकदा स्नान असते. एकदोघांनी तर विचारले 'तुम्ही रोज स्नान घालता का, हा इतका स्वच्छ कसा दिसतो?'
फारच शुभ्र, दाट आणि शॉर्ट फर आहे. अंधारात पण दिसतो तो. पण थॅंक्यू, थॅंक्यू.‌ Happy

Pages