भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडिन आणि दादाचे वाढदिवसाचे फोटो मस्त शुभेच्छा . माउई कोकोनट सगळीच माऊ आणि भुभू बाळं क्यूट आहेत .सिंबा चा वरचा फोटो तर कसला रुबाबदार एकदम टॉल डार्क हॅण्डसम.
मी चिन्मयी तुम्ही माऊ बाळ आणा फार आनंददायी असतं पिलू घरात असणं. मांजराचं फार काही करावं लागतं नाही तुम्ही फक्त प्रेम द्या मग बघा तुमच्यावर ते किती भरभरून प्रेम करते. एकदा का लळा लागला की तुम्हाला आधीच मांजर पाळायला हवं होत असं वाटेल.

माझ्याकडे बोका आहे . पाळला म्हणत नाही कारण त्याला आम्ही पाळत नाही तोच आम्हाला पाळतो असा atitude आहे त्याचा.हा आमचा लाडका बंड्या उर्फ बंडल

IMG-20250119-WA0000.jpg

तशी त्याची खूप नावं आहेत घरण्याची परंपराच आहे खूप नावांची माझीच पाच सहा टोपणनाव आहेत.तर त्याला आम्ही बंडल .बंडलू, बंजू ,साहेब,विनायक अश्या अनेक नावांनी हाक मारतो विनायक का तर वडील त्याला प्रेमाने त्यांच्या मुलांप्रमाणे नालायक बंडू असं हाक मारायचे सारखेच म्हणायला लागल्यावर मीच त्यांना म्हणाले चाइल्ड सायकलॉजी नुसार हे योग्य नाही त्याला सारखं असं म्हणू नका त्याच्या मनावर परिणाम होईल मग त्यांनी नालायक चं विनायक हाक मारायला सुरुवात केली.तर नाव जरी बंडल असलं तरी आमच्या घराचा बंडल ऑफ जॉय आहे
आता तो चार वर्षाचा आहे जन्मापासून म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आमच्याकडे आहे त्याच्या जन्माची स्टोरी पण मस्त आहे ती नंतर कधीतरी सांगेन.
सद्या खाणे पिणे उंडारणे झोपणे ही दिनचर्या आहे .अमेझॉन चे पार्सल आले की बाकीच्यां पेक्षा आमालाच जास्त आनंद होतो त्याचे खोके खेळायला मिळते नाहीतर त्यात झोपणे आमचं सर्वात आवडतं काम.

IMG-20250119-WA0001.jpg

विनायक थोडं अजीब वाटतं मांजरासाठी पण गणपतीचं आहे म्हणून मला आवडतं . तसाही बाप्पाचा आशीर्वादच वाटतो बंड्या मला. पण विनायक सहसा आम्ही घरातल्यानसमोर बोलतो तेही जास्तकरून वडील नाहींतर बाहेरच्यानसमोर बोलून उगाच गोंधळ व्हायचा कोण आहे हा विनायक .

काल रात्रीपासून साहेब गायब होते म्हंटल कुठे तोंड काळं करायला गेला तर सकाळी लिट्रली तोंड काळं करून आला होता .हे असं

IMG-20250212-WA0000.jpg

तरी हे जरा पुसलंय .पुसू देईल तर ना, कुठे घुसून ,काय काळं लावून आला होता देव जाणे .नशीब ग्रीस नव्हतं . नाहीतर रिक्षांमध्ये जाऊन तेलकट ग्रीस चे डाग लहानपणी लावून यायचा आणि महाशयांना पाण्याची एलर्जी त्यामुळे कसं बसं पुसून घ्यावं लागतं नाहीतर ओरडा पडला की मग हे असं भोळे डोळे करून आज्ञाधारक असल्याचं नाटक करायचं.

IMG-20250212-WA0001.jpg

बंड्याचा गिल्टी फेस पण मांजराच्या जातीला एक्सेप्शनच म्हणायला लागेल >>> Lol टोटली. हे उद्योग भूभीमंडळींचे.

बंड्याचा गिल्टी फेस पण मांजराच्या जातीला एक्सेप्शनच म्हणायला लागेल >>> Lol गोग्गोड आहे.

मी पण खूप दिवसांत फोटो दिला नाही येथे म्हणून-
उच्च अभिरुची चित्रपट बघताना कोकोनट Happy IMG-20250212-WA0000.jpg

उ अ नाही पण 'बंदिश बॅंडिट्स' बघताना एकदा डोकं वर केलं होतं. Happy

मोठा दिसतोय, मिलियन डॉलर फेस इनोसन्स कायम आहे पण...यावर फिदा होवुन खुप भुभु गर्ल्स लाइन मारणार..
बन्ड्या नावाला जागुन उद्दोगी दिसतोय

उ अ नाही पण 'बंदिश बॅंडिट्स' बघताना एकदा डोकं वर केलं होतं.>>> Lol आमच्या बंड्याने अमलताश च्या बॅकग्राऊंड म्युझिक ला घाबरून पळ काढला होता त्यालाही झेपला नसावा चित्रपट Proud बंड्या टीव्हीवर चं म्युझिक समुद्रासारखे आवाज आणि व्हायोलिन साऊंड ला खूप घाबरतो पळून लपून बसतो.

हो मांजरं एक्सप्रेशन्स लेस असतात भुभु च्या मानाने फोटोत तो आज्ञा धारक फेस त्याच्या बोल कडे ग्रानुल्स देताना झालाय नाहीतर मै कौन तू कौन असेच एक्सप्रेशन्स असतात.

आमचं चक्रम बाळ
IMG_3126.jpg
खोलीतल्या कोपर्‍यात ठेवलेल्या टॉय बॉक्स मधुन काहीतरी ओढून काढायचा प्रयत्न करत होता आणि त्या नादात बॉक्स आणि कपाटामधल्या जागेत अडकला! आणि मग अजिबात आवाज पण न करता तसाच तिथे बसून राहिला Lol मला दिसलाच नाही आधी खोलीत. दिसला तेव्हा हहपुवा झाली त्याचा कन्फ्युज्ड चेहेरा पाहून.

सिमरन, बंडल एकदम मस्त. ऑरेंज कॅट जरा एक्स्ट्रा असतात ना सर्वच बाबतीत Proud
ऑरेंज कॅट्सचे कारनामे बघत असते मीपण सोमिवर. आजच एक - ज्यात त्या मांजराने चक्क ट्रेडमिल सुरु केली आणि धावायला सुरुवातही केली Rofl

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

Pages