भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडिन ने मध्ये बरेचसे कांड केलं म्हणून लिहिलं नाही
आता बरा आहे पण हवा टाईट केली होती

त्या दिवशी तो नेहमीच्या प्रमाणे बाहेरून हिंडून घरी येऊन झोपला, आजकाल तो बराच काळ झोपतोच त्यामुळे फार काय वेगळं वाटलं नाही पण नंतर आंम्ही आपापल्या खोल्यात निघालो झोपायला तरी हा काही उठेना म्हणल्यावर शंका आली कारण हा आधी तयार असतो आमच्या
म्हणलं चल रे सुस्त बाळा, तरी तो काही उठेना
एकदम पोटात गोळा आला, म्हनलं ओद्दु काय होतंय रे
तर फक्त मान उचलली आणि परत पडून राहिला
तरी मला वाटलं की सुस्तवलाय मस्त चिकन वगैरे खाऊन
म्हनलं चल रे बाळा

तर उठायला गेला आणि कोसळला तो निपचितच
आईशपथप जे काही वाटलं ना त्या वेळी शब्दात सांगू शकत नाही
मी हलवून हलवून त्याला उठवत होतो मला वाटलं झालं संपलं सगळं
आणि प्लिज प्लिज नको असे करू म्हणत त्याला पाप्या घेत, माया करत उठवायला लागलो
अक्षरशः त्यावेळी मी ओक्सबोक्शी रडत होतो
तर कुठंतरी त्याने निर्धाराने मान हलवली की आहे मी अजून
मी पोराला म्हनलं तातडीने डॉ ना फोन कर म्हणावं आम्ही घेऊन येतोय
तर फोन बिझी म्हनलं तसेच घेऊन जाऊ
त्याला उठवत नव्हतं आणि एकदा प्रयत्न केला तर परत कोसळला
मग आम्ही दोघांनी झोळीत घातला आणि मोपेड वर ठेवला
आमच्याकडे कार नसल्याचं पहिल्यांदा खूप फील झालं
डॉ कडे गेलो तर ते कुठंतरी बाहेर गेलेले असिस्टंट पण नाहीत
फक्त एक सिक्युरिटी वाला उभा होता म्हणे अर्धा तास थांबा
मग इथं कुठं रस्त्याकर थांबा म्हणून परत घरी आलो

वाटेत एक मित्राला फोन केला त्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे
त्याला सांगितले असे असे झालं आहे तू ये तातडीने
म्हणाला मी काय करणार येऊन मी डॉ दुसरे कोणी मिळतात ते बघतो

म्हणलं अरे त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी ये, मला कोणीतरी सावरायला हवाय नाहीतर मी कोलमडून पडेन आता
तो मग तातडीने आला
ओडिनला परत आम्ही उचलून हॉल मध्ये ठेवेलला आणी तो प्रयत्न करत होता पण कम्बरे पासून पूर्ण लुळा झालेला
मी म्हणजे इतका हवालदिल की आता मलाच ऍडमिट करायची वेळ आलेली
मित्राने एक इमर्जन्सी वाली गोळी सांगितली आणि म्हणाला अर्ध्या अर्ध्या तासाने अर्धी गोळी द्या, आणि सोबत ग्लुकोडी द्या, आता काही विचार करू नका, पहाटेपर्यंत सर्वाईव्ह व्हायला हवा
ते ऐकलं आणि मी जो काही खचलो
अगदी बालपणापासून कसं हा गोंडस जीव घरी आलेला सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं
माझा मुलगाच तो जणू
मग मी आणि पोरगा त्याच्या बाजूला बसून राहिलो अर्ध्या अर्ध्या तासाने गोळी घशात कोंवून गिळायला लावली
ग्लुकोनदीन पूड पूड तोंडात कोंबली
शेजर्सच्या काकूंनी एक होमियोपथी दिले तेही दिल
काहीच सुचत नव्हतं
अकखी रात्र आम्ही दोघांनी बसून जागून काढली
पहाटे पहाटे थोडा त्याने उठायचा प्रयत्न केला पण आखडला होता

म्हनलं ठिके काहीतरी मसल किंवा बाकी आहे अगदी जिवावर येईल असं वाटत नाही
सकाळी मग डॉ ना फोन करून घेऊन गेलो
त्यांनी विचारलं कुठं मार लागला का, पडला का म्हनलं नाही
मग इंजेक्शन दिली, ब्लड टेस्ट करायला दिली

ते सांगायला हवंच की त्यांनी विचारलं की मझल लावू का चावेल का तो
म्हनलं अजिबात नाही
आणि ब्लड काढताना पोराने त्याचे तोंड अक्षरशः स्वतःजवळ धरलेलं
पण आम्हा दोघांना खात्री होती की काहीही झालं तरी तो चावणार नाही
तसच झालं कुई केलं पोराने पण बाकी काही नाही

डॉ म्हणाले आता एक एकसरे पण काढू, ते होतं दुसरीकडे
मग परत त्याला गाडीवर उचलून ठेवला आणि नेलं
तिकडही त्यानी विचारलं की चावेल का म्हनलं नाही
आणि त्यांनी मग आडवा झोपवून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने एकसरे काढायला सूर केलं
मला म्हणाले ब्लाडर पूर्ण भरलेलं आहे त्याला युरिन चा त्रास आहे का
म्हनलं काल रात्रीपासून हलला नाहीये जागचा, शु केलीच नाही

ते म्हणे हाडे व्यवस्थित आहेत कुठं काही प्रॉब्लेम नाहीये
जॉइन्ट्स वगैरे एकदम नॉर्मल

आणि कहर म्हणजे ते एकसरे काढताना त्याचे हात पाय ताणून धरावे लागले, ते मी आणि पोराने च केलं, आणि कुठंतरी त्याला जो स्पझम आलेला तो सुटला
कारण खाली उचलून ठेवताच भाई एकदम खुश, आणि कमालीचे प्रेशर आलेलं
तर पळत पळत बाहेर गेला आणि

बाहेर एक झाड होत त्यावर लिटरभर शु करून आला
म्हनलं हे रे काय ऑड्या
तर म्हणाला मला आता बरं वाटतंय चल घरी जाऊ
मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये

म्हनलं थांब आधी ते डॉ ना रिपोर्ट बघू देत
मग डॉ कडे गेलो, रोवर त्यांनी ब्लड रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले
लिव्हर किडनी सगळं व्यवस्थित
म्हनलं मग झालं तरी काय त्याला

मग म्हणाले सोनोग्राफी करू
म्हनलं ठिके ते तर त
आणि शेवटी सोनिग्राफी मध्ये कळलं की त्याला प्रोस्टेट ग्लंड चा त्रास आहे
एनलार्ज झाले आहेत आणि डॉ म्हणाले इतकेही खूप मेजर नाहींयव
एक महिना मेडिकेशन वर ठेऊ आणि त्यानंतर परत एकदा सोनोग्राफी करू
जर कमी नाही आलं तर मग त्याला न्यूटर करावं लागेल
म्हनलं बाकी काही त्रास यामुले तर म्हणे काही नऊ

म्हनलं मग झालं तरी काय
तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पॉटी करताना प्रोस्टेट वाढल्यामुळे तो कुंथत होता आणि जोर लावल्याने मसल आणि तिथल्या शिरा लॉक झाल्या
आणि हे त्याला कळलं नाही त्यामुले तो शॉक मध्ये होता

म्हनलं इतकंच
आम्हला वाटलं आता हा जातोय
फुल रडारड झाली
म्हणले काही नाही जात एकदम हेल्दी बाळ आहे तुमचं
वजन थोडं कमी करा बस

म्हनलं कारट्या जीव गळ्याशी आणलेला पार तू

मला आता पण खरोखरच माझी काळजी वाटू लागली आहे
ओडिन शिवाय चे जगणे हे फार भयानक आहे

Sad

अरे बाप रे! फारच घाबरवले ओडिन ने!! Sad तुमची अवस्था काय झाली असेल ते इमॅजिन करता येतेय! बर झालं थोडक्यात निभावलं.
न्युटर करायचा विचार केलात का मग आता ? पुन्हा असे काही त्रास होण्यापेक्ष न्यूटर ने त्रास जाणार असेल तर विचार करा!

आशुचँप, पूर्ण बरं वाटेल त्याला. पण अगदी सहमत, पोटचं लेकरूच होऊन जाते हे. मला कोकोनट नीट जेवला नाही तरी करमत नाही.

बापरे ओडिन ने सॉलिड घाबरवलं तुम्हाला हे असंच होतं ही बाळं नीट काही सांगूंही शकत नाहीत काय होतंय ते पण आता बराय ते बघुन हुश्श झालं.
बंड्यानेही पहिल्यांदा उल्टी केली होती तेव्हा आम्हीपण घाबरलो होतो dr विचारले तर नॉर्मल आहे म्हणाले होते काहीतरी बाहेर खाऊन आला होता उल्टीत ग्रीन ग्रीन बघून घाबरलो होतो dr म्हणाले गवत आहे मांजरं स्वतः च गवत खाऊन बाधलेलं उलटी करून बाहेर काढतात.दोन तास जीव टांगणीला लागला होता आणि नंतर हे साहेब घरी मस्त मजेत जेली चाटत होते जसं की काही झालंच नाही.

म्हनलं कारट्या जीव गळ्याशी आणलेला पार तू>>> बाप रे!! खरोखरच टेन्शन दिल ओडिनने पण फार मेजर नाहीये वाचुन जिव भान्ड्यात पडला...तुमच काय झाल असेल हे वाचतानाही जाणवत होत.

ओडीन होईल पूर्ण बरा. बाकी म्हणताय ते खरं आहे. हे मुके जीव पोराबाळांइतकेच महत्वाचे होऊन जातात. त्यांना जरा काही झालं की काळजीनं जीव एवढासा होतो.

बापरे! ओडीनचं वाचताना मी ही रडले

आपल्याला गोड वाटतात पण त्यांना वजन वाढले की वय वाढले की त्रास होतात म्हणून वजन कंट्रोल करायचा नक्की प्रयत्न कर आणि न्युटर करुन त्रास परत परत होणार नसेल तर त्याचाही विचार कर

अरे बापरे, वाचतांनाच अंगावर काटा आला. पण ओडीन सुखरूप आहे हे वाचून छान वाटले.

ओडीन किती वर्षाचा आहे? साधारणपणे अशी लक्षण वयस्कर पेट्स मधे दिसतात.

ओडिन बरा आहे आता, छान हसतोय खेळतोय बागडतोय
गोळ्या एक महिन्याच्या दिल्या होत्या त्या संपल्यात आता या आठवड्यात परत एकदा सोनोग्राफी करणार आणि मग त्यावर ठरेल काय करायचं पुढे
न्यूटर करायला व्हेत च फार इनसिस्ट करत नाहीयेत त्यांचं म्हणणं की नंतर लॅब जास्त सुस्त आणि जाडे होतात त्यामुळे अगदीच आवश्यकता नसेल तर नकोच असे म्हणाले

आम्हालाही आशा आहे कुठंतरी जमेल त्याचं एकदा आणि पोराचं चाललंय की ओडीचं पिल्लू च घरी आणायचं सांभाळायला सोबत एकत्र
म्हणलं एक डोक्याला आळशी धोंडा आणलाय त्यात धोंड्याचा छोटा धोंडा कुठून आणतो अजून

ओडिन आता 5 वर्षाचा आहे, डॉ म्हणाले साधारणपणे या वयात नॉर्मल आहे आणि खूप जास्त नाही वाढलेले नाहीतर मग लगेचच ऑपरेशन करायला सांगितलं असतं

हे पुरेसे नाही म्हणून त्याच महिन्यात एकदा हॉल मध्ये इतक्या जोरात शिंकला आणि एकदम रक्ताचा सडा, आजी एकटीच होती घरी
ती जाम घाबरली पण फोनवरून मला सांगितलं आणि माझं बीपी शूट झालं तर कशाला म्हणून तिने मी घरी येईपर्यंत काहीच सांगितले नाही
फारशी पुसून त्याला पुसून गप बसवून ठेवलं आणि मग मला आल्यावर सांगितलं
मी परत गॅसवर, तसाच त्याला गाडीवर घालून डॉ कडे
त्यांनी नाकपुड्या, घसा, जीभ दात सगळं टॉर्च लावून तपासून पाहिलं तर काहीच नाही
उष्णतेने घोळणा फुटला असावा
मला डोक्यात गोळ्यांचा साईड इफेक्ट्स हेच डोक्यात
मग त्यांनी बसून त्या गोळ्या त्यांचे कंटेंट वगैरे संगितले म्हणले यात काही नाहीये इतका इफेक्ट होण्यासारखे
मग ते तेवढ्यावरच निभावले

आता त्याचे चिकन कमी करून फायबरचे प्रमाण वाढवलं आहे म्हणजे कुंथायला होणार नाही
दही ताक पण जास्त देतोय
आजीच्या लाडाला तर सीमाच नाही, त्याला आवडतात तसली लाल गाजरं, भोपळा आणून ठेवते, पॉटी ला मागे अंगणात गेला तर जाऊन बघते सगळं ठिके ना

मग भाज्या जास्त झाल्याने गॅसेस झाले, धामधूम करून खोलीचे गॅस चेंबर करून टाकतो
मग सतत थोडं हे थोडं ते असा चेंज करत आता एक सुवर्णमध्य गाठलाय
म्हणजे असं वाटतंय तरी

त्यात एक चांगला झाला की सगळं चेकअप झालं त्या निमित्ताने
लिव्हर किडनी शुगर हिमोग्लोबिन वगैरे सगळंच एकदम ओक्के
जॉइन्ट्स, कम्बरेचा पोर्शन वगैरे हाडं पण एकदम ओक्के
कारण यांना हा त्रास खुप असतो असं वाचलेलं
वजन पण आटोक्यात आणलं आहे, पूर्वी बसल्यावर असा गोलाकार भोपळा दिसायचा आता कंबर पोट वगैरे आत गेल्यामुळे जास्त हँडसम वाटायला लागलं आहे

पण बायकोने सक्त ताकीद दिली आहे अजिबातच त्याचे फोटो इंस्टावर टाकायचे नाहीत नजर लागते म्हणे
त्यामुले त्याच अकाउंट सध्या बंद च आहे

इथे टाकीन गुपचूप, सगळे आपलेच आहेत आणि पोस्टवरून कळतायच की तुम्हा सर्वानाही किती काळजी आहे

ओड्याकडून सर्वांना थँक्स Happy

हँडसम वाटायला लागलं आहे < वाचल्यावर फोटो टाका म्हणणार होते पण आता तुम्हाला वाटेल तेव्हा टाका.... Happy

वरचे सगळ्याण्चे किस्से धमाल आणि मांजरे तर वल्ड क्लास..

आमची स्पॉटी आम्हाला त्यागुन गेली. बाहेर जाऊन तिने पोरे घालायचा सपाटा वर्षभर चालवला आणि आता ती दिसेनाशी झालीय. तिच्या तिन मुलींपैकी एकच आमच्या आजुबाजुला दिसते.

दोन साया माया मांजरी आणलेल्या त्या वर्षभर राहुन पळाल्या. एक मोठा काळु बोकुडी येतो त्याला खुप घाबरायच्या. त्याने पळवुन लावल्या.

सध्या एक लहान काळु घरात आहे जो आता मस्त मोठा होतोय. सध्या नवी मांजरे नकोत असे ठरवलेय. बघु किती दिवस निश्चय टिकतोय.

मला कुत्रा हवाय पण तो खुपच अवलंबुन राहतो आणि कुठे जायचे तर प्रॉब्लेम होतो म्हणुन अजुन आणला नाही.

जेम्स हॅरियेट ह्या ब्रिटिश वेटर्नरी सर्जनचे वेट इन स्पिन पुस्तक नुकतेच वाचले. मोठ्या प्राण्या-गुरांचे मस्त अनुभव तर आहेतच सोबत कुत्री मांजरे पण आहेत.

एक स्ट्रे ओरेंज मांजर रस्त्यावर जखमी मिळते, बोका असतो. तो गेलेलाच असतो, भोके पडलेले आतडे बाहेर आलेले असते पण अगदीच टाकवत नाही म्हणुन देवाचे नाव घेऊन उपचार करतात आणि तो चक्क बराही होतो. आठ दिवस राहिल्यावर एका संध्याकाळी गडप. खुप शोधुनही मिळत नाही. खुप रात्री एकजण घरी येतो बोका घेऊन. म्हणे आमच्या क्लबमध्ये होता. पुढच्या आठवड्यात परत तेच. हे नवरा बायको हैराण होऊन शोधताहेत आणि रात्री एकजण घेऊन येतो, आमच्या पार्टीत येऊन बसलेला. तिसर्‍यांदा जेव्हा गडपतो तेव्हा हे गप्प बसतात. नेहमीसारखा एकजण बेल मारतो. म्हणे मी थेटरातुन बाहेर पडलो तर हा पण माझ्यापुढेच बाहेर पडला, तो बरोबर घरीच आला, मी फक्त बेल मारली तो आलाय हे तुम्हाला कळावे म्हणुन. नंतर यांनी चिंता करायची सोडली आणि बोका नियमित पार्टी, क्लब, गॅदरिण्ग असे सोशल कार्यक्रम अटेण्ड करत राहिला.

अजुन काही दिवसांनी त्याच्या मुळ मालकाला कळले बोका इकडे आहे ते. तो व त्याची दोन मुले येऊन त्याला घेऊन गेली. ह्हॅरियेट एकदा त्या बाजुला गेला असता त्याने व बायकोने जाऊन बोक्याला भेटायचे ठरवले. घरी गेले तर बोका घरी नव्हता. थोड्या वेळाने आला, यांना बघुन खुश, बायकोच्या मांडीवर चढुन लाड वगैरे करुन घेतले. जातांना यांनी विचारले, कुठे गेलेला हा? शेतकर्‍याच्या बायकोने थोडा विचार करुन सांगितले, आज गुरवार ना? गुरवारचा तो योगा क्लासमध्ये असतो.

अजुन एक शेतकरी दोन कुत्रे घेऊन येतो. एक कुत्रा म्हातारा असतो जो तरुण कुत्र्याच्या मागे मागे असतो. तरुणाला डॉक्टर चेक करायला टेबलावर घेतो तेव्हा म्हातार्‍यालाही वर घ्यावे लागते. पुर्ण वेळ तो त्याचा पाय, कान वगैरे चघळत राहतो. दोघेही नंतर खेळतात.

दुर्दैवाने तो तरुण कुत्रा काही आजाराने मरतो. ते शेतकरी जोडपे चाइल्ड्लेस असते, ते याला परत बोलावते, म्हातारा खंगलाय म्हणुन. हा जातो तर म्हातारा खंगलेला, रया गेली, डोळ्यात चमक नाही, वजन घटलेले, कुत्ता गेल्यापासुन् अन्नत्याग. मालकिन म्हणते तो आधीचा गेला त्याचे वाईट वाटतेय याला. डॉक्टर चेक करुन म्हणतो, असेच काही नाही, हा म्हातारा झालाय,थोडे दिवस उरलेत. हा जाणार आता. अजुन काही दिवसांनी परत बोलावणे येते. पुर्णच गेलाय, अस्थिपंजर उरलाय. डॉक्टर मनाची तयारी करुन जातो. खरेच गेलेला असतो. आता याला उगीच त्रास काढत ठेवायचे त्यापेक्षा इन्जेक्शन देऊन कायमचे झोपवलेले बरे हा सल्ला देतो जो मालक मानतो. हा तयारी करत असतो तर एक छोटे पिल्लु,सेम त्या तरुण कुत्र्यासारखे तिथे येऊन बागडायला लागते. मालक म्हणतो कुत्र्याशेवाय जगणे आम्हाला शक्य नव्हते म्हणुन आधीचा जिथुन आणलेला त्या ब्रिडर कडुन आत्ताच हे पिल्लु आणले. डॉक्टरने इन्जेक्शनची तयारी केली, आता देणार तोच म्हातारा कुत्रा पिल्लाला बघतो आणि कधी नव्हे ते मान उचलुन त्याच्या टोपलीच्या कडेला ठेऊन टक लाऊन सगळीकडे धावणार्‍या पिल्लाकडे पाहात राहतो. मग हळुहळु सगळी ताकद गोळा करुन टोपली बाहेर येतो, पिल्लाकडे पडत पडत जातो आणि त्याचा वास घेऊन त्याचा कान चावायला लागतो. पिल्लु आधी केकाटते पण त्यालाही नंतर आवडते आणि ते पडुन राहुन चावुन घ्यायला लागते. काहीतरी खायला आणा म्हणुन डॉक्टर ओरडतो. मालकिण खायला आणते आणि म्हातारा कुत्रा हळुहळु खायला लागतो. मालक आनंदाने वेडा होतो, एका महिन्याने आज याने खाल्ले म्हणुन. इन्जेक्शन परत बॅगेत ठेऊन डॉक्टर जातो. १५ दिवसांनी मालक दोघांना घेऊन दवाखान्यात येतो तर म्हातारा परत पहिल्यासारखा दणदणीत धट्टाकट्टा झालेला असतो आणि दोघेही एकत्र खेळत असतात.

मला आता पण खरोखरच माझी काळजी वाटू लागली आहे........ खरंय.
ओडीन बद्दल वेळेत उपचार झाले हे महत्त्वाचे.तो चांगल्या घरात पडला आहे.

साधना,भारी किस्से!

मध्ये फमिलीसह वाईच्या इथं एक फार्महाऊस वर गेट टुगेदरला गेलेलो, ओड्याने मस्त एन्जॉय
केलं, मोकळा वारा, शेत, पाटाचे पाणी, गाई बैल. अक्षरश कानात वारं गेलेल्या वासरासारखा हुंदडला दोन दिवस.

तिथल्या केअरटेकरचे एक राखणीचे भूभु होते, जाताच त्याने ओड्याला भुंकून पळवून लावले मग आम्ही कशीतरी माडवली केली. पण ते काही ऐकेना. रात्री उगाच राडा नको म्हणून ओड्याला आमच्याच खोलीत झोपवलं. ते इतकं बरं झालं, रात्री आवाज आला म्हणून उठून पाहिलं तर ते भूभू तिथली ५-६ जणांची गँग घेऊन आलेलं आणि व्हराड्यांत, खिडकीत डोकावून बघत होते ओड्या कुठं सापडतोय का...

मी ओड्याला म्हणलं, बाहेर असतात तर आज फुल गेम होता तुझ्याव::))

मग तिथे असेपर्यंत आम्ही त्याला नजरेआड होऊच दिला नाही.

हे व्हेटच्या टेबलवर अशा काही थाटात बसलेला की जणू वाटावं की आम्ही काय उगाच काळजी करतोय, मला तर काहीच नाही झालेलं...

म्हणलं हो ना, हे व्हेट माझ्या गेल्या जन्माचे देणे लागतात ना म्हणून द्यावे लागतात त्यांना पैसे

जोक्स अपार्ट, हा नंतरच्या व्हिजीटचा फोटो आहे, तोवर तो बऱ्यापैकी नॉर्मलला आलेला. आणि दादूच्या हातात ट्रिटची बॅग होती त्यामुळे पूर्ण सहकार्य

मस्त फोटोज पहिला फोटो तर सुंदर
माणसांचे इतके फोटोजेनिक आणि पोजवाले फोटो येत नाहीत जीतका हा आलाय.दृष्ट काढा मात्र ओडिनची.

रात्री उगाच राडा नको म्हणून ओड्याला आमच्याच खोलीत झोपवलं. ते इतकं बरं झालं, रात्री आवाज आला म्हणून उठून पाहिलं तर ते भूभू तिथली ५-६ जणांची गँग घेऊन आलेलं आणि व्हराड्यांत, खिडकीत डोकावून बघत होते ओड्या कुठं सापडतोय का...>>>>>>>>>>>मोठ्ठ गॅंगवॉर झाले असते . हा हा हा हा

Pages