भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा थंड का पडलाय?

आमचं ओडू बाळ आता कधी कधी इतकं समजूतदार वागतय की विचारू नका
आता काही दिवसांपूर्वी मला जरा कणकण ताप होता म्हणून मी झोपून होतो, त्याने आधी ग्राउंड ला जायचय वेळी हट्ट करून पाहिला पण मी म्हणलं दादू घेऊन जाईल तुला, मला होतं नाहीये
मग ऐकलं, आणि नंतर मग माझ्या उशाशी त्याचं टोटो कासव ठेऊन गेला, ही तुला असू दे हे खेळायला Happy
ते टोटो म्हणजे त्याचा जीव का प्राण आहे, त्याची पाठ, पोट, एक पाय सगळं उसवून चिंध्या झाल्यात, अंगणात लोळवून पार त्याची रया गेलीय, पण ते टाकून देता येत नाही
ते त्यानं आणून देणं खरंच खूप टाचिंग होतं

हो फेवरेट टॉय आणून देणं म्हणजे अल्टिमेट ट्रस्ट आणि प्रेमाचे लक्षण असते <<++११

ओड्या गोडच आहे. चँप गेट वेल्ल सुन

हो फेवरेट टॉय आणून देणं म्हणजे अल्टिमेट ट्रस्ट आणि प्रेमाचे लक्षण असते <<++११
ऑदिन क्यूट आहे .

हॅरीचा काल मांजराबरोबर किस्सा झाला . येडे आहेत दोघेही

वेरी स्वीट जेस्चर ओडीन.. फार गोड आहेस! गेट वेल सून आशूचँप!
हॅरीचा काल मांजराबरोबर किस्सा झाला>>>>> काय झालं

माझ्या उशाशी त्याचं टोटो कासव ठेऊन गेला, ही तुला असू दे हे खेळायला>>> फारच भावनीक ओड्याचे जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर.

सिंब्या त्याची चावायची हाडं देऊन जातो माझ्याकडे सांभाळायला. मी नाही म्हणालो तर मागे अंगणात जाऊन लपवतो. कधीतरी कुठे लपवले विसरला तर भुंकून घर डोक्यावर घेतो.

धन्यवाद सर्वांना
मी बरा आहे, जस्ट आपलं थोडं पावसाळ्यात सर्दी खोकला ताप असंच होतं, झालो बरा
आणि मग मी हिंडू फिरू लागल्यावर त्याने परत टोटो चा ताबा घेतलाय, झालं काम आता म्हणून Happy

आणि फार गुणी बाळ पण नाहीये ते

त्याची मज्जा येते जेव्हा त्याच्या आवडीचे काम करायला सांगतो तेव्हा

संध्याकाळी फिरून आलो की त्याची आवडती जागा अंगणात बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, माणस भुभु बघत बसणं
तासतासभर वेळ जातो त्यात आणि दरवाजा उघडा नसेल तर उघडायला लावतो भुंकून

पण जर त्याने सांगायचंय आधीच मी दरवाजा उघडून दिला आणि म्हणलं जा ओडिन दारात जाऊन बस, गाड्या वगैरे बघत
तर त्याला फुल संशय येतो की हे मुद्दाम का बरं सांगत असावेत?
मी बाहेर गेलो आणि दार लावून घेतलं तर? अशा अनेक शंकांचा किडा डोक्यात चावून गेल्याचे दिसतं चेहऱ्यावर त्याच्या आणि तो जातच नाही
शिक्षा केल्यासारखा घरात बसून राहतो
आणि मी मग वरच्या खोलीत निघून गेलो की सुमडीत येऊन बसतो बाहेर

म्हणजे माझ्या आवडी निवडी मी ठरवणार, मला एन्जॉय करायला फोर्स नाही करायचा, मी मला जेव्हा आणि जिथं वाटेल तेव्हाच ते करणार Happy

तर त्याला फुल संशय येतो की हे मुद्दाम का बरं सांगत असावेत?>>> तुम्ही त्याच्या डोक्याच्या कोड मधली लाइन चुकवता मग प्रोग्रॅम गन्डतोय त्याचा...इन्स्टा वर एक रिल पाहिल होत की पॅटिओच दार उघडच ठेवल तरी भुभु आत येइना शेवटी भुभु मॉमने ते लावल आणी परत उघडल तेव्हा आत आल..कारण काचेवर भुभु करुन मग ते उघडणार...आधिच उघडय म्हणजे प्रॉब्लेम आहे.

आशुचँप , हे म्हणजे घरात बिनधास्त उत्तरे सांगणाऱ्या आणि पाहुण्यांसमोर ऐनवेळी तोंडघशी पाडण्याऱ्या लहान मुलांसारखे झाले
Wink

अंजली , हॅरी नेहमी शांत असतो इतरांच्या बाबतीत . कॉलनीत फिरायला नेल्यावर शेपटी हलवत चालत असतो . एकदम गुणी बाळ टाइप . त्याचे तंत्र बिघडते ते मांजराला बघितल्यावर . त्याचे आणि कॉलनीत जी मांजरे आहेत त्यांचे मुळीच जमत नाही .

तर काल फिरायला नेल्यावर त्याचे जानी दुश्मन नंबर १ मांजर दिसले . हॅरीने बघितल्याबरोबर लगेच आक्रमक पवित्रा घेतला . नवऱ्याने पण बघितले होतेच त्यामुळे लीश घट्ट धरून ठेवलेली . ते मांजर पण डांबीस ! माघार घ्यायला तयार होईना . हुल द्यायच्या फुल तयारीत . शेवटी नवऱ्याने मांजराला जा इथून असे दरडावाले आणि
दमदाटी करुन हॅरीला बाजूला घेतले आणि त्याच्या नेहमच्या जागेवर बसायला सांगितले . हॅरी बसला खरा पण आतून धुमसत होताच . सौम्य भुंकून निषेधपण नोंदवला त्याने .

तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधले एक काका प्रकट झाले . नवरा त्यांच्याशी बोलण्यात गुंतला . बोलायच्या नादात लिशवरची पकड ढिल्ली झाली आणि तेवढ्यातच ते मांजर तिथे पुन्हा आले . हॅरीने यावेळी अजिबात वेळ न दडवता धूम ठोकली त्या मांजराकडे आणि दोघांचा पकडा पकडीचा खेळ चालू झाला . ह्या दोघांच्या पाठोपाठ नवरा आणि ते काका पण पळाले . एकदम टॉम आणि स्पाइक्स सीन ! मजेशीर सीन Rofl

मांजराने हॅरीला घुमवून कंपाउंड वॉलच्या दिशेने सुर मारला आणि पटकन वर चढून पळाले . आमचे येडे वॉलवर नख्या रुतवत बसले . नवऱ्याने पटकन पळत जाऊन लिश पकडली आणि हॅरीला दम भरला . पण हॅरीभाऊ ऐकायच्या मनस्थितीत नव्हते . वॉलच्या दिशेने जोरदार भुंकून “परत भेट , दाखवतो तुला “ असा इशारा दिला. ते मांजर वॉल वर चढून हॅरीला वाकुल्या दाखवत होतं आणि हा इथे गुरगुर्त होता Biggrin

या दोघांच्या रेसमध्ये नवरा आणि त्या काकांचा चांगलाच व्यायाम झाला . Wink
शेवटी एक फटका खाऊन हॅरीभाऊ घरी परत आले .

तुम्ही त्याच्या डोक्याच्या कोड मधली लाइन चुकवता मग प्रोग्रॅम गन्डतोय त्याचा>>>>हा हा हा अगदी

शेवटी एक फटका खाऊन हॅरीभाऊ घरी परत आले >>> भारी किस्सा पण नका हो बिचाऱ्याला फटका देऊ त्यांच्या जीन मध्येच असतं मांजर द्वेष Happy
आमच्या कडे नुसतं मांजर असं म्हणल, आणि नसलं तरी अंगणात जाऊन त्या अदृश्य मांजरावर भुंकून येतो

हॅरीचा किस्सा फनी आहे Happy सर्व सीन डोळ्यासमोरच आला एकदम. मांजरे तर असतातच ढालगज. पण आमच्याइथे सेम असेच सीन माउई आणि खारींचे होतात. बॅकयार्डात २ मोठी झाडे आणि २-३ लठ्ठ खारी आहेत. त्या सरळ सरळ उचकवतात त्याला. त्याचा एक आवडता स्पॉट आहे तिथेबरोबर बसून मस्त ऊन खात बसतात. मग माउई चिडून माझ्या मागे लागतो मागचे दार उघडून द्यायला. दार उघडले की नुसता जिवाच्या आकांताने धावतो माउई. त्या पण तो जवळ येई पयन्त मस्त बसून राहतात आणि हा ओरडत धावत जवळ पोहोचला की कुंपणावर चढून आजू बाजूने धावतात त्याच्या. मुद्दाम समोरून जमिनीवर थोडे जातात आणि मग झाडा वर जातात सुर्र. माउई आपला "अशा कशा येत नाहीत हातात" अशा अविर्भावात त्या गेल्या तरी जोरजोरात भुंकत झाडाभोवती गोल गोल धावत रहातो Lol

अय्यो जाई Lol :हहपुवा:
डोळ्यासमोर आला सीन.
हो फटका नका देऊ बाबा..
गंडलेला प्रॉग्रॅम Lol
वेडू गोंड्स भुभू सगळे

एक फनी रिल बघितलं. एक भूभू बाहेरून फिरून आलं की त्याच्या मालक लीशची गुंडाळी करून त्याच्या तोंडात देतो मग ते भूभू खुंटीला अडकवतं. त्याच्या शेजारीच बेसिन आहे तिथे शिस्तीत नळ वगैरे सुरू करून पुढचे आणि उल्टं होऊन मागचे पण पाय धुतं स्वतःच आणि मालकाला तिथेच अडकवलेला टॉवेल देऊन आता पाय पुस म्हणून भुंकायला लागतं. Lol

हॅरीचा किस्सा एकदम चित्रदर्शी! वाचुन मजा आलि, तू व्हिडियो रेकॉर्ड करायला पाहिजे होता..
माउई पण भारी
अदृश्य मांजरावर भुंकून येतो>>>smiley36.gif

भारी किस्से आहेत नवीन
चित्रदर्शी वर्णन करता तुम्ही लोकं, त्यामुळे मजा येते.

हे त्याचं टोटो, आणलं तेव्हा इतकं गोंडस कासव होतं

आता तर अगदी केविलवाणं झालं आहे.

Pages