भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिलेटेड हॅपी बड्डे सिंबा! टोपी घालून गोड दिसतोय.
मॅक्स पण मस्त दिसतोय!
कोकोनट किती गोड आहे..... क्यूट क्यूट क्यूट!

मॅक्स एकदम खुष दिसतोय…. काही विशेष कारण?

हो हि त्याची बाहेर खेळायची वेळ आहे सकाळची , तेव्हा खूप खुश असतात राजे , आणि घरामागेच शेत आहे मोकळं मग खूप पळायचं असत त्याला ६ महिन्याचा आहे पण त्याचा स्पीड, energy घरात कोणालाच cope up नाही करता येत मग तोच पळतो स्वतःचीच लिश तोंडात घेऊन . आणि दमला कि थांबतो जवळ येऊन ,थोडा आराम कि मग पुन्हा तोच खेळ शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोका पर्यंत पळणे.

तुमच्या सिम्बा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

>>>>>>>मॅक्स एकदम खुष दिसतोय
हरितात्यांनी बरोबर पकडलाय मॅक्सचा मूड. हे मला नसते जमले.
>>>>>>>थोडा आराम कि मग पुन्हा तोच खेळ शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोका पर्यंत पळणे.
किती सुंदर!

काल सिम्बाला घेऊन घराजवळील माळरानावर गेलो होतो. तसा तो पट्टा एकदम जंगल ट्रेक सारखा आहे आणि सिम्बा मस्त हुंदडत होता मोकळा सगळीकडे नुसती पळापळ सुरु होती. आम्ही एका ओढ्याजवळ गेलो तर झाडामागून एकदम भूंकण्याचा आवाज आला. नीट पहिले तर २ कॉयोटी आम्ही तिकडे येऊ नये म्हणून वॉर्न करत होते. सिम्बाची इतक्या जवळून कॉयोटी पहाण्याची पहिलीच वेळ होती , त्याला वाटले दुसरी कुत्रीच आहेत म्हणून पठ्या निघाला होता मान ताठ करून "कोण आहे रे तिकडे बघतोच" या आवेशात. त्या लगेच परत बोलावले आणि साखळी लावून तिथून निघून आलो, बहुदा कॉयोटीचे पिल्ले होती तिथेच जवळ म्हणून ते इतके अग्ग्रेसिव्ह झाले होते.

विडिओ केला आहे त्यांच्या भुंकण्याचा पण तो इथे अपलोड नाही करता येणार Sad

कायोटेच दिसतो आहे. बरे झाले जवळ नाही गेलात ते. तसे ते लहान प्राणीच उचलतात म्हणजे तुम्हाला किंवा सिंबाला धोका नव्हता पण घाबरले तर हल्ला करू शकतात ना

होय कायोटीच आहे. जोडी होती आणी दोन्ही बाजूने आमच्यावर नजर ठेऊन होते. कळप असता तर हल्ल्याचा धोका होता, पण २ असल्याने फक्त भूंकण्यावर निभावलं.

कायोटी हा कोल्ह्या हून मोठा आणी लांडग्याहून छोटा असतो, पण एक चांगला शिकारी असतो.

सिंबा काय ही पोज Lol
हो ना खूपच दिवसांनी हा धागा वर आला.
कालच आठवण आली होती या धाग्याची. सॅमीचा एक फनी पोज फोटो काढला तेव्हा.
या बघा आमच्या सॅमीगामी - माऊसाम्राज्याच्या अनभिषिक्त सम्राज्ञी Lol

unnamed (5).jpg

अतीशय युनीक अतीशय वेगळा असा आळस मला आलेला आहे.>>> हे रील मला सॅमीसाठी कधीचं बनवायचं आहे. पण कॅमेरा दिसला की पळूनच जाते. विडीओ कसा काढणार? Lol अशीच लोळत असते पोट दाखवत आणि जांभया देत.

Pages