Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोंडस सॅमी. मांजरी असतातच
गोंडस सॅमी. मांजरी असतातच एन्टायटल्ड पण आमचं भुभू सुद्धा कमी नाही. ही कोकोनटची दिनचर्या -- एकदम नवाब आहे.
नदीकाठी फिरायला....
नेबरहूड वॉच- वजन वाढल्यामुळे हा फोटो कांगारू सारखा वाटतोय
अठरा तास डुलक्या - आम्हीच पकडून पांघरूण घालून मिठ्या मारतो.
कोकोनट मोठा झालाय आता
कोकोनट मोठा झालाय आता पांघरुणातला फोटो फार क्यूट. असे निरागस झोपलेले दिसले की आपल्याला आवळ चिवळ करायचा अटॅक येतो हा माझाही अनुभव आहे. तेही करून घेतात बिचारे.
हो मैत्रेयी. कुस्तीच खेळतो
हो मैत्रेयी. कुस्तीच खेळतो आम्हीही. घुसळून लोणी काढल्यासारखं करायचं मग मुके घ्यायचे, तो एकदम प्रगल्भ भाव आणून सहन करतो. 'घ्या बाबा घ्या पप्प्या' टाईप...
पांघरुणातला फोटो>>> काय हवय
पांघरुणातला फोटो>>> काय हवय आता? जरा म्हणून झोपु देत नाहित..
गोंडस कोकोनट!
गोंडस कोकोनट!
आता मांजरींबद्दल बोलणं चालूच
आता मांजरींबद्दल बोलणं चालूच आहे तर माझ्या मुलीचा बोका.
कसला ढालगज दिसतोय नाव काय
कसला ढालगज दिसतोय नाव काय याचं?
मीटबॉल. हावरट आहे एकदम.
मीटबॉल. हावरट आहे एकदम. आजच ती म्हणत होती की आपणच घराचे मालक असल्याच्या थाटात वावरत असतो आणि असं लिहील.
>> meatball would write some article saying he grew up homeless and now he has his own house and private bathroom with two live in chefs, and that his financial advice is important to listen to>>
नशीब काढलं मीटबॉलने. मऊ
नशीब काढलं मीटबॉलने. मऊ लुसलुशीत चेंडू आहे अगदी.
मीटबॉल दॅट लुक्स !
मीटबॉल दॅट लुक्स !
पुढचा जन्म कुत्र्या मांजराचा मिळावा (अमेरिकेतल्या)
माझी आई इथे आली होती तेव्हा ती सँमी मंकीचे लाड बघायची . त्यांचे वॅक्सिन्स, त्यांच्या वेट कडे नेण्याच्या कॅरियर्स, ट्रीट काय, टॉईज काय त्यामुळे ती हे वरचं वाक्य म्हणायची
हावरेपणाचं प्रूफ
हावरेपणाचं प्रूफ
असू दे हावरट! तरी क्यूटच आहे.
असू दे हावरट! तरी क्यूटच आहे.
बर झालं धागा वरती आला
बर झालं धागा वरती आला
अनेक गमती जमती लिहायचा आहेत
ओडिन चा बडी रिओ आता मोठा झालाय
आणि आता उलट झालं आहे तो अतीच हायपर असल्याने तोच आता ओड्यावर हम्प करायला बघतो
त्यामुळे सॉलिड कुस्ती सुरू असते
बघण्यासारखे डावपेच असतात, तुडतुडीत रेसलर आणि मातीतला पैलवान यांच्यात भिडत व्हावी तसा
ओडिन वजनाचा फायदा घेत त्याला दाबून ठेवायला बघतो
तर तो उड्या मारत चकवत राहतो
कधी पोटाखालून घुसतो कधी अंगावरून उडी मारतो
फुल फोकस मध्ये एकमेकांना दमवत राहतात त्यामुले आम्हला बाजूला उभं राहून फक्त लक्ष ठेवावे लागत अर्धा पाऊण तास मारामारी झाली की दोघेही ह्या ह्या करत मातीत पसरतात
की चला म्हणलं की घरी
मस्त व्यायाम होतोय सध्या
इतक्यात विचारणारच होते
इतक्यात विचारणारच होते धाग्याचा बच्चन कुठेय?
मीटबॉल चे हे वरचे फोटो भारी
मीटबॉल चे हे वरचे फोटो भारी आहेत!!
अस्मिता, कोकोनट केवढा मोठा
अस्मिता, कोकोनट केवढा मोठा झाला. आणलास तेव्हा केवढा लहान वाटत होता.
मीटबॉल नशिबवान आहे, पुढचा
मीटबॉल नशिबवान आहे, पुढचा जन्म अमेरिकेन पेटचा मिळावा झाला
पांघरुणातला फोटो एकदम मस्त
पांघरुणातला फोटो एकदम मस्त कोकोनटचा
मीटबॉल एकदम ऐटदार आहे … मालकाला आपणच पाळलं आहे असा लूक आहे.
मीटबॉल मस्त आहे.
मीटबॉल मस्त आहे.
कोकोनट बऱ्याच दिवसांनी दिसला. गब्रू जवान झालाय.
मस्त आहेत सगळे माऊ आणि भुभु
मस्त आहेत सगळे माऊ आणि भुभु.कोकोनट,मंकी,वाढलेला ओडिन(याचा फोटो दाखवा आताचा)
मीटबॉल चे फोटो कसले मस्त आलेत.एकदम पोस्टर फोटो आहेत.एखादी पावडर ची तीट लावा.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/C7TVN7NJ_Fo/?igsh=MWp3Nm0wbDFncWkwdw==
ओड्याचा लेटेस्ट फोटो
एसी ची मज्जा, रात्री बेडरूममध्ये एसी लावलेला असतो
पण दिवसभर नसतो ते त्याला काही कळत नाही
सारखा बेडरूममध्ये जाऊन बघतो की गार झालंय का
नसेल झालं तर कन्फ्यूज होतो आणि मग त्याला कळत नाही हे असं काय होतंय
बिचारा जागा बदलून बदलून झोपून बघतो कुठं तरी गार वारा येईल अशा आशेने
किती दिवसांनी सगळी पिल्ले
किती दिवसांनी सगळी पिल्ले दिसली ... cute बाळे सगळी
मागच्या आठवड्यात पहिल्यांदाच
मागच्या आठवड्यात पहिल्यांदाच दोघाना एकत्र फिरायला घेऊन गेलो होतो
सुंदर लोकेशन आणि सुंदर भुभु
सुंदर लोकेशन आणि सुंदर भुभु बाळं आहेत मृणाल.एलॉन आणि कोण?
.एलॉन आणि लाना
.एलॉन आणि लाना
<<हावरेपणाचं प्रूफ>> हेच
<<हावरेपणाचं प्रूफ>> हेच फोटो मीटबाॅल त्याच्या म्यावबोलीवर पण टाकू शकतो - बघा, मी समोर असून पण मला न देता खाल्ले, घे घ्या प्रूफ.......
खरंय.
खरंय.
वा! इलॉन आणि लाना मस्त
वा! इलॉन आणि लाना मस्त दिसतायत! सध्या तिकडे उन्हाळा जबरदस्त ना. पेट्स ना त्रास होत असणार. त्यात लांब केसांच्या ब्रीड्स ना तर फारच.
एलॉन एकदम सुंदर
एलॉन एकदम सुंदर
इलॉन आणि लानाचा फोटो फार छान
इलॉन आणि लानाचा फोटो फार छान आला आहे.
मीटबॉल मान तिरकी करतेय ते अतिच गोंडस आहे.
ओडीनचा दुबई शेख हबिबी लूक बघून आले.
धनवन्ती,
म्यावबोलीवरील मीटबॉलचा कोतबो
Pages