Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंबाचा गेम मध्ये चंचुप्रवेश
सिंबाचा गेम मध्ये चंचुप्रवेश करायचा प्लॅन दिसतोय
अस्मिता : काय पटापट मोठं झालंय लेकरू! जामच निरागस दिसतोय इथे. ते सिनेमातल्या सारखं लहानाचं मोठं दाखवायला मस्त फोटो टाकून स्लाईड शो करायला हवा
सिंबाची लूडबूड सगळीकडेच असते.
सिंबाची लूडबूड सगळीकडेच असते.
झाडं लावतांना बायको त्याचा ऊपयोग खड्डे करून घ्यायला करते. त्याला जागा दाखवून डीग डीग असं म्हटलं की पठ्ठया २-३ मिनीटात चांगला खड्डा करून देतो. त्याला खणायचा आनंद मिळतो आणी बायकोला मेहनत वाचल्याचा.
कुणी टेलिपथिक अनिमल
कुणी टेलिपथिक अनिमल कम्युनिकेशन केल आहे़ का आपल्या बाळान्च?
सध्या ऊन्हाळा खुप असल्याने
सध्या ऊन्हाळा खुप असल्याने मलापण गॅागल हवाच
सहीच
सहीच
सिंबा सही आहे मला खड्डे
सिंबा सही आहे मला खड्डे खणण्याचा उपयोग फारच आवडला आहे!! अर्थात आमचं बाळ असं काही ऐकेल असे वाटत नाही, तो म्हणजे नको तिथेच खणणार. उदा. सोफ्यावर वगैरे
अबोली, मी केलं आहे.
अबोली, मी केलं आहे.
सिंबा एकदम कूल गाय (
सिंबा एकदम कूल गाय ( इंग्रजीतला गाय, मराठीतली नव्हे )!
डीग डीग >>> हे भारीये!
नको तिथेच खणणार. उदा. सोफ्यावर वगैरे >>>
सिंबा = सिंघम :कुल लूक
सिंबा = सिंघम :कुल लूक
नको तिथेच खणणार. उदा.
नको तिथेच खणणार. उदा. सोफ्यावर वगैरे >>> Lol
धनवन्ती - तुम्ही का आणी कधी केलं ते सांगू शकाल का? याचा काय फायदा झाला?
“डीग डीग” कल्पना फारच मस्त
“डीग डीग” कल्पना फारच मस्त आहे.
सिम्बा ....हँडसम हिरो
सिम्बा ....हँडसम हिरो
ओडीन आणि बाकी भुभूज चे
ओडीन आणि बाकी भुभूज चे अपडेट्स नाही दिसले इतक्यात. उन्हाळा बराच आहे ना भारतात. भुभू मंडळी कसे डील करताहेत.
आमची कॉलेज गर्ल सुट्टिमुळे घरी असल्यामुळे माउई सध्या भलताच खूष आहे आणि लाड करून घेतो आहे. मधे रोड ट्रिप + बीच ट्रिप ला गेलो होतो. माउई ने त्याच्या पद्धतीने एंजॉय केले. त्याला पाण्यात जायचे अजिबात कौतुक नाही. बीच वर मस्त छत्रीखाली खुर्ची वर आरामात बसायचे, ट्रीट्स खायच्या, आणि सर्वात आवडता उद्योग म्हणजे खेकड्यांना ऑब्जर्व करणे. पूर्ण वेळ बारकाईने तेच काम. खेकडे कुठेत ते शोधणे आणि प्र त्ये क खेकड्यावर भुंकणे. दुसरे काही सुचत नवह्ते आम्हाला
सिंबा , एकदम रुबाबदार दिसतोय
सिंबा , एकदम रुबाबदार दिसतोय .
माऊई, क्यूट आहे
ओडीन आणि बाकी भुभूज चे
ओडीन आणि बाकी भुभूज चे अपडेट्स नाही दिसले इतक्यात. — +१
आहेत आहेत, सध्या कामात बराच
आहेत आहेत, सध्या कामात बराच बिझी आहे त्यामुळं फारसा मायबोली। वर येत नाहीये
आमच्या घरात गेले काही दिवस हलकल्लोळ सुरू आहे, मागच्या अंगणात दोन मांजरे आली आहेत, एक पांढरे आणि त्याला हिटलर सारख्या बारक्या मिश्या आहेत म्हणून आम्ही त्याचं नाव एडॉल्फ ठेवलं आहे ते पोराला फार आवडला आहे आणि तेही तो दिसला की त्याच्यापाशी येऊन अंग घासतं. आणि हा त्याला ओडिन च्या डब्यातले खाऊ देतो (अर्थातच गुपचूपपणे )
आणि एक पाळीव मांजर आलंय पळून कारण त्याच्या गळ्यात निळा पट्टा आहे आणि घुंगरू बांधलं आहे
पहिल्यांदा आम्ही तर इतके घाबरलो होतो, पत्र्यावर ते पळत जायचं तेव्हा नुसता घुंगराचा आवाज आणि इतकं काळंभोर आहे की अंधारात दिसत सुद्धा नाही, मला तर एकदा गच्चीत नुसतंच घुंगरु इकडून तिकडे जाताना ऐकू आलं, फुल भुताटकी
नंतर मग ते एडॉल्फ सोबत दिसलं तेव्हा कळलं, त्याचं नाव काळोबा
आणि आता जागेवरून का कशावरून माहिती नाही, पण दोघे इतके कडकडा भांडत असतात, फुल टिपेचा स्वर लावून, आणि त्याचा आवाज आला की ओडिन धावत जातो आणि जोरजोरात भुंकतो, तेही गप्प बसत नाहीत आणि हाही, अक्षरशः घरात एकमेकांना बोललेलेही ऐकू जात नाही
तिघांना गप्प बसा म्हणलं तरी ऐकत नाहीत माझा मग आवाज चढला की आई म्हणते तू तरी शांत बस
पोराने ओडिन आणि एडॉल्फ ची मैत्री घडवून आणण्याचा बराच प्रयत्न केला पण ते जवळ आलेलं ओडिनला मुळीच खपत नाही
तो म्हणजे या घरात मी असताना मांजर फिरकले तर याद राखा अशा आवेशात असतो
दोन वेळा तो पोरावरच चिडून भुंकला
त्ये क खेकड्यावर भुंकणे.
त्ये क खेकड्यावर भुंकणे. दुसरे काही सुचत नवह्ते आम्हाला .....मस्त.
सिंबा एकदम रुबाबदार दिसतोय.
ओडीनचा किस्सा एकदम भारी.
ओडिन आणि मांजराचे आधीचे
ओडिन आणि मांजराचे आधीचे किस्से आठवले आता घरातच आणले तर नो वंडर ओडिन चे डोके सटकले असणार
सिंबा एकदम हिरो, आणि माऊई
सिंबा एकदम हिरो, आणि माऊई क्युट.
एडॉल्फ नाव आवडले मांजराचे.त्याला आवडलेय का?
मस्त वाटलं बऱ्याच दिवसांनी किस्से वाचून.
माझा मग आवाज चढला की आई
माझा मग आवाज चढला की आई म्हणते तू तरी शांत बस —->>
तू तरी शांत बस
तू तरी शांत बस
क्रॅब पकडणारा माऊई किती क्यूट
ओडीन अॅडॉल्फ गम्मतच सगळी
काल रात्री सॅमी खिडकीत बसली होती. खालून एक ऑरेंज मांजर चालली होती. ते बघून हिने काही वेगळेच आवाज काढायला सुरू केले कुत्र्याच्या हॉउलिंग टाईप्स जे कधीच मी ऐकले नाहीयेत. एकदोन क्षण त्या मांजराने वर बघितलं आणि पुढे गेलं तर ही पठ्ठी खाली पळत गेली तिकडे आहे का
चेक करायला बहुतेक पण ती मांजर नाही दिसली. पण एकदम लाऊड आवाज काढत होती वेगळेच. हे काय असतं टेरिटरी मार्क कि अटेंशन सिकिंग माहित नाही.
बहुतेक मांजरीचं विव्हळणं तो
बहुतेक मांजरीचं विव्हळणं तो रोमान्स चा पहिला चरण असतो.अर्थात नक्की माहीत नाही.तो ऑरेंज बाबाजी त्यांच्यातला कबीर बेदी असेल.
अनु.. बहुतेक बोका असेल असा
अनु.. बहुतेक बोका असेल असा आमचा अंदाज. विडीओ बघ एवढा क्लिअर नाहीये त्या दुसर्या मांजराचा व्ह्यू तरी.
https://youtube.com/shorts/fRYfRVlxyJE?feature=shared
https://youtube.com/shorts/rwcUK71e7mA?feature=shared
तसंच दिसतंय.रोमिओ खाली उभा
तसंच दिसतंय.रोमिओ खाली उभा आहे.ज्युलियट बाल्कनीत वरून 'एक मुंडा मेरी उम्र दा हाये मेरी उम्र दा' वाले गीत गातेय.फक्त रोमिओच्या पंज्यात गिटारीची किंवा व्हायोलिन ची उणीव आहे.
माझा मग आवाज चढला की आई
माझा मग आवाज चढला की आई म्हणते तू तरी शांत बस>>.
ओडिन आणी माजर
माउइ आणी खेकडे
सॅमी चे प्रणयाराधन सगळेच किस्से भारी
सिम्बा गॉगल घालुन काय भारी दिसतोय.
सॅमी चा रोमिओ
सॅमी चा रोमिओ इमर्जन्सी व्हेइकल्स सारखा आवाज काढतेय
सगळे नवीन किस्से धमाल आहेत.
सगळे नवीन किस्से धमाल आहेत.
खेकड्यांच्या मागे लागलेला माउई गोडोबा दिसत असणार अगदी.
आशुचँपः ओड्याचा खाऊ तुम्ही माऊला देता, ये ना चालबे कसा खपवून घेईल तो?
एक मुंडा मेरी उम्र दा >>>
मुंडा
मुंडा
सॅमीचे बहूतेक लवकरच एकाचे दोन
सॅमीचे बहूतेक लवकरच एकाचे दोन आणी दोनाचे ५-६ होणार बहूदा. बधाई हो
हरितात्या विपु बघा.
हरितात्या विपु बघा.
Pages