भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हबिबी Lol
लाना हसतेय का एकदम फोटोसाठी? तसंच वाटतंय.

सॅमी सारखी पक्ष्यांवर नजर ठेवून असते. घरासमोर झाड आहे ख्रिसमस ट्री त्यात ते पक्षी बसलेले असतात. सॅमी घुसते दबकत पण पकडलेला एक सुद्धा पक्षी नाही आजपर्यंत, नुसती हुल देते बहुतेक. तरी ते उडून जातात. नंतर ती बाहेर उन्हं खात बसली असते तेव्हा येतात कठड्यावर बसून चिवचिवाट करत. एकदा तिला घाबरवलंच त्यांनी तिच्याकडे झेप घेऊन. पळून आत आली लगेच घाबरू.
काल साबणाच्या फुग्यांना पण घाबरली का आवडले नाहीत कोण जाणे. तिला चिलटं वगैरे बघत बसायला आवडतं. मॅडच आहे. Lol

मीटबॉलच्या फरचा कलर सुपर्ब आहे. फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे असतील खरंच.

>>तिला चिलटं वगैरे बघत बसायला आवडतं. मॅडच आहे.
Lol खूप हसले.
ऑनलाईन सर्व सोशल मिडीया मध्ये असलेल्या नजरेस पडतील तेवढ्या सगळ्या मांजर क्लीपा/रील्स अजिबात चुकवत नाही मी त्यातही बहुतेक वेळा असंच दिसतं की तुम्ही मुद्दाम जे कराल (किंवा गोष्टी आणाल) मांजरांसाठी त्याकडे मांजर ढूंकूनही बघणार नाही. Proud
अंजली तुझ्या सॅमीला रिकामे बॉक्सेस आवडतात की नाही? जाऊन बसायला कितीही लहान मोठा असला तरी Happy

नाही गं ते काम मंकीचं होतं, प्लॅस्टीक आणि कागदी पिशव्या, बॉक्सेस ही त्याची आवडती ठिकाणं होती.
तुम्ही मुद्दाम जे कराल (किंवा गोष्टी आणाल) मांजरांसाठी त्याकडे मांजर ढूंकूनही बघणार नाही. Proud>>>>>>>>> Lol हो कॅट टॉवर आहे पण मी आता त्याच्यावर झाडं ठेवली आहेत कारण सॅमी अजिबात बसत नाही.
तिच्यासाठी बॅगपॅक सारखी कॅरियर बॅग आणली फ्रंट फेसिंगची त्यात पण बसत नाही. प्रचंड हलते त्यात असली की.

सॅमी सारखी पक्ष्यांवर नजर ठेवून असते. घरासमोर झाड आहे ख्रिसमस ट्री त्यात ते पक्षी बसलेले असतात. सॅमी घुसते दबकत पण पकडलेला एक सुद्धा पक्षी नाही आजपर्यंत, नुसती हुल देते बहुतेक. तरी ते उडून जातात. नंतर ती बाहेर उन्हं खात बसली असते तेव्हा येतात कठड्यावर बसून चिवचिवाट करत. <<<>>>>>> अगदी सेम. आमचा थिओ पण भूक तहान झोप सोडून पक्षांच्या मागे असतो . आत्ता ऊन्हाळ्याचं पाणी आणि खाऊ ठेवत होते टेरेस ग्रीलला अडकवून तर हा दबकत, जमिनीवर घासत जायचा, कुंड्यांच्या मध्ये लपून काही करता येतं य का ते बघत असतो. टेरेसच्या कठड्याला, तोच बाहेर जाऊ नये म्हणून जाळी ला वली आहे ती कामी येते. पक्षी बाहेरुन निवांत खाऊन जातात.

किंवा गोष्टी आणाल) मांजरांसाठी त्याकडे मांजर ढूंकूनही बघणार नाही. <<>>>>> ह्या ला तर अगदी +१००००० . कॅट ट्री, स्क्रॅचिंग बोर्ड, इतर खेळणी धुळ खात पडली आहेत. आणि हे साहेब शू लेसेस, कबुतरांची पिसं ह्यातच मग्न असतात. रिकाम्या खोक्यांकडे तर बघत पण नाही. खरं मांजरांना किती आवडतात खोकी.

कॅट ट्री कुंड्या ठेवायला वापरणे आयडीया मस्त आहे. लगेच अमलात आणते.

धनश्री Happy

परवा एका कॅट कॅफे मधे मी आणि मुलगी गेलो होतो असंच तिथल्या (अजून) मांजरींशी खेळायला. छोटंसच आहे. १०-१५ होत्या ...किटन्स पासून मोठ्या अ‍ॅडल्ट कॅट पर्यंत सगळी व्हरायटी होती. तुम्ही बसा, खेळा, ट्रीट्स द्या, गोंजारा, मांडीवर येऊन बसलं तर बसतं एखादं, फक्त आपणहून उचलायचं नाही .. एखादं वाटलं छान तर अ‍ॅडॉप्ट करू शकता. एक बारकुसं पिल्लू फार खेळत होतं अगदी बॅटरी ऑपरेटेड असावं इतका वेळ न दमता उड्या मारणं चालू होतं. मजा वाटली जरा वेगळा अनुभव!

पकडलेला एक सुद्धा पक्षी नाही आजपर्यंत>>>>>>>>>>> हे माझंच वाक्य माझ्या घशात घातलं काल पोरीनं Sad

बर्‍यापैकी मिडीअम साईझचा पक्षी काल पकडून आणला होता तिने. मी किचनमधे काम करत असताना दार उघडं ठेवते तिची जा ये चालू असते.
काल एकदम पळत आत आली आणि म्हटलं काय झालं बघावं तर तोंडात पक्षी Sad मी जाम किंचाळले मग तिने सोडून दिला तो थोडावेळ उडला इकडे तिकडे पण नंतर मेलाच बिचारा. चोचीतून आणि मानेतून रक्त आलेलं दिसत होतं. पाणी वगैरे ठेवून पाहिलं. थोडा वेळ फडफड झाली पण नाही वाचला. फार वाईट वाटलं डोळ्यादेखत असं काही बघून.
मंकीने पण असं केलं होतं एकदा. निदान तो पक्षी उडून तरी गेला होता नंतर. असं हंटींग करून म्हणे गिफ्ट आणतात मालकांसाठी पण त्या पक्षाला काल जिवानीशी जाताना बघवलं नाही. सॅमीने जरा जास्तच दात रुतवले की काय माहित नाही. तिच्याच पंजाला थोडं रक्त बिक्त बघून यक वाटलं पहिल्यांदाच. आता जाळीचं दार लावूनच ठेवत जाईन. तिला बाहेर सोडलं नाही तर फार त्रास देते सकाळी म्हणून थोडा वेळ जाऊ देत असतो किंवा उन्हं पडल्यावर. काल काय झालं अचानक कोण जाणे.
ज्यांच्याकडे माऊ आहेत त्यांना सोडत असाल ना बाहेर? की पूर्णपणे हाऊस कॅट्स. त्या बाहेर जायला मागतात का? सतत म्यांव म्यांव करत दाराशी बसते ही बया तर. मंकी तर उंडारायचाच बाहेर. पण जनरल त्यांच्या नॅचरल इंस्टींक्ट नुसारच ते वागत असतील ना? पाळायची आपली हौस झाली खरं.

पण जनरल त्यांच्या नॅचरल इंस्टींक्ट नुसारच ते वागत असतील ना? पाळायची आपली हौस झाली खरं...... खरंय.

कालच नेटवर एका घुबडाची क्लीप पाहिली.त्या घुबडाला एका माणसाने वाचवून शक्ती येईपर्यंत सांभाळले.नंतर आधी मधी ते घुबड तोंडात उंदीर घेऊन त्या माणसाकडे यायचे.तो माणूस पहुडलेला आणि छातीवर घुबड,त्याच्या तोंडात उंदीर...पाहून यक् झाले.पण तो माणूस एकदम कूल.नंतर आपल्या पिल्लाला भेटीसाठी घेऊनही घुबड आलेले.

आज इथला सगळा बॅकलॉग भरुन काढला.

सिम्बा प्रचंड फोटोजेनिक आहे. सगळेच फोटोज मस्त.
नारळोबा एकदम क्यूटनेस ओव्हरलोड आहे Happy
सॅमी किलकिल्या डोळ्यांतून कॅमेरा कधी जातोय समोरून अशी वाट पाहतोय असं वाटलं Happy
मीटबॉलची एक्स्प्रेशन्स खतरनाक! Lol मांजरं अशी पहायला लागली की आपण त्यांना उपाशी मारतोय की काय असं फीलिंग यायला लागतं. माझ्या बहिणीकडे आहे एक माऊ. ती करते अधूनमधून असं.
बाकी फोटो पण एकदम झकास. मजा येते या धाग्यावर खूप.

काय सुंदर, गोड फोटो सगळे!!!
सायोचा हावरा मन्या फारच गोंडस दिसतोय त्या फोटोत. सिम्बाचा वरचा झकास.

रमड मावशी किती दिवसांनी आली, ही लेकरं हिंदी पिक्चर मधल्या (पळत -पळत) सीनसारखी लहानाची मोठी झाली. ही भरभरंच मोठी होतात. Lol
सुप्रभातचा फोटो घ्या -
IMG-20240609-WA0000.jpg

मस्त फोटो आहेत सर्व भुभु आणि माऊ बाळांचे.(परवा एका वाघ बाळाचे रील पाहिले, ते बेडवर पोट वर करून झोपले होते आणि त्याची पालक चबी बेबी चबी बेबी करून पोटाला गुदगुल्या करत होती.खूप क्युट.)

<<मांजरं अशी पहायला लागली की आपण त्यांना उपाशी मारतोय की काय असं फीलिंग यायला लागतं. >>
एकूणच मांजरं फारच guilt trips देतात. स्नोई तर तज्ञ आहे त्यात. तिला एकटीला ठेवून 10 मिनिटे जरी बाहेर गेलो तरी आल्यावर अशी ओरडते मलाच.. बरं घरी असले तरी किमान 5 फूट अंतर ठेवून असते. खायला घालायला 2 मिनीटे उशीर झाला तरी 2 दिवस उपाशी असल्यासारखे भाव असतात तिचे.

मस्त मस्त फोटो, सगळी बाळं मोठी झाली आहेत. तो फॅमेली रील चाललाय हल्ली. कोणी केलाय का? फॅमेली मेम्बर्स नी हातावर हात ठेवला डॉगी समोर की तो ही हात ठेवतो. आमचा तर वेडा आहे अज्जिबात करणार नाही.

सिम्बा Lol

हा धागा वाचायला आवडतो.

सध्या सिंबा सिकवेन्स गेम शिकतोय..... याला मीठ लायां माका खाया (मालवणी...थोडक्यात सगळ्यात माझी लुडबुड)

Pages