भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंबा, ओड्या आणि सगळी गोंडस पिल्लं - काय क्यूट फोटोज आहेत सगळ्यांचे. मस्त वाटलं पहायला. ओड्याचे किस्से पण भारी आहेत एकेक.

आज थोडा वेळ मिळालं म्हणून एक वेगळाच विषय, तुमचे पेट काय खातात ?? म्हणजे नेहमीचे डॉग / कॅट फूड सोडून

मला कधी कधी सिम्बाची आवड जरा वेगळीच वाटते जसे कि,
बाकरवाडीचा पुडा उघडला कि पठ्ठा कुठंही असो समोर येऊन उभा, एक तरी तुकडा द्यावाच लागतो
किंवा मग घरी डोसे करायला घेतले कि केविलवाणा चेहरा करून १-२ तुकडे मिळवतोच
थालीपीठे हा आणखीन एक त्याचा आवडता पदार्थ
कच्ची अंडी तो उष्टावत देखील नाही पण तीच जर उकडून दिलीत तर मग मात्र एकदम एकदम तुटून पडतो
store मध्ये (home depot किंवा lowes ) दिलेली बिस्किट्स आजिबात उष्टावत नाही
गाजरं त्याची एकदम आवडती, एकवेळ घरात आम्हाला खायला नसली तरी चालेल पण सिम्बाला दिवसातून २ छोटी लागतातच
आईसक्रीम म्हणजे एकदमच आवडीचे साधा शब्द जरी उच्चारला तरी हा फ्रीझ जवळ Happy

तुमचे पेट असे काय खातात ते वाचायला आवडेल

तुमचे पेट असे काय खातात

>>>> office चे काम असेल तर १ वेळ डोग फूड आणि रात्रि भात अंड दही

वेळ असेल तर मिक्ष पीठाच्या भाकर्या कुस्करुन अंड दहि
,
उक्डलेल्या भाज्या अण्ड दही, चिकन भात, भाकरी करायचा कंटाळा आला कि त्याच पिठा ची पेज अंड,

मध्ल्य वेळात २, ३ वेळा ताक [ बिना मिठा च] डोग बिस्किट, पार्लेजि बिस्किट , चपाती .. पपई,,

कोकोला तिचं डॉगफूड सोडून सगळं आवडतं Uhoh
साजुक तुपातला शिरा, आंब्याचा रस, आंबे, मटण, कोळंबी, चकली, अनारसा, बेसनाचा लाडू, कुल्फी हे अतिशय आवडीचे पदार्थ आहेत. तिला अगदी थोड्या प्रमाणात आणि क्वचितच हे पदार्थ देतो.
बाकी कुठलंही फळ ती खात नाही. भाज्यांपैकी फक्त बटाटे आणि मटार. गरम पोळी, भाकरी आवडते. तीही माझ्या हातची. माझ्या सासूबाई किंवा आईने केली तर तोंड लावत नाही Uhoh
अंडं रोज दिलं तर खात नाही. चिकनचंही तसंच.

कोकोनट तीन वेळा पपी आयम्स डॉग फूड तीन कप. पपीजला तीन वेळा द्यावे लागते. मी अमेझॉन सबस्क्राईब केली आहे. प्रत्येक सहा आठवड्यांनी डिलिव्हरी होते. त्यावरचा चार्ट तंतोतंत पाळते.

ह्यूमन फूड शक्यतो देऊ नये म्हणतात कारण पोषणमूल्य नाही व वजन वाढते. तरीही ह्याला छोटी बिन तेलाची पोळी व कधी कधी दही भात देते. दही व पनीर म्हणजे जीव की प्राण आहे. दही रोज एखाददोन चमचा देते. कार्बोहाइड्रेट कमीतकमी देण्याकडे कल आहे. वजन वाढले की पाठीचे प्रॉब्लेम येतात. हेल्दी वेट कुत्रे दीर्घायुषी असतात. फिरायला नेतो, अंगणात व घरात खेळतो. तरीही अजून लवकर दमतो. भाज्या फळे चिरताना एखादा तुकडा किंवा सगळंच द्यावेच लागते, स्वयंपाकघरातच फिरत असतो. मटार, टोमॅटो, ॲपल, केळ वगैरे आम्ही खातो तेव्हा त्याला देतो. पण चिप्स, चिटोज, पिझ्झा, आपली बिस्किटे किंवा गोड अजिबात देत नाहीत.

हा माझा प्रश्न---
महिन्याला एक Heartworm+flea+ tick preventionची गोळी देते. Samparica trio नाव आहे व वजनाप्रमाणे डोस आहे. हिची किंमत 27$ आहे. मला हा प्रश्न पडला आहे की तिन्ही वेगवेगळ्या किंवा एकत्र दुसरा पर्याय आहे का ? हे मला महाग वाटतेय. माझी vet महागडी आहे. अमेरिकेतील पेट पेरेंट्स सांगा बरं. Happy

कोकोला तिचं डॉगफूड सोडून सगळं आवडतं Lol Lol अगदीच पटलं सिम्बा पण तुम्ही काय खाताय ते मी पण खाणार, परवा आंबा चाखवला पण नाही आवडला अज्जीबात

माझ्या सासूबाई किंवा आईने केली तर तोंड लावत नाही Lol Lol

माउईला ह्यूमन फूड नेहमीच आवडते. पोळी, भात, नट्स, खोबरे, अ‍ॅपल ,पार्ले जी, दही, आइसक्रीम!! हल्ली दही आणि आइसक्रीम नाही देत, कारण लॅक्टॉज ने त्याचे पोट बिघडते असे लक्षात आले आहे.
बाकी तो अगदी पिकी इटर आहे. त्याला किबल कधीही आवडले नाहीत. सुरुवातीला किबल वर टॉपिंग म्हणून बॉइल्ड चिकन घालून दिले तर खायचा कसेतरी. नंतर ऑश्कु आला होता तेव्हा त्याचे वेट फूड बघितले आणि खाल्ले तेव्हा त्यालाही ते आवडायला लागले. आधी कॅन्ड वेट फूड ट्राय केले पण आता ते बंद करून वेट अप्रूव्ह्ड रेसिपी घेऊन घरीच त्याच्यासाठी फूड बनवायला सुरुवात केली आहे. त्यात ब्राउन राइस, चिकन, भाज्या ( कॅरट, सेलरी, स्वीट पोटॅटो, ग्रीन बीन्स वगैरे) , एग्ज, कोकोनट ऑइल असे असते, शिवाय मल्टिवायटॅमिन्स आणि प्रोबायोटिक अ‍ॅड करते.
एकदम १०-१२ दिवसांचे फूड बनवून ठेवले की सोप्पे जाते. २ दिवसाचे फूड बाहेर काढून उरलेले फूड २ -२ दिवसाच्या पोर्शन्स मधे फ्रीझ करते. आता हे फूड अगदी आवडीने खातोय.

हा माझा प्रश्न---
महिन्याला एक Heartworm+flea+ tick preventionची गोळी देते. >>>
महिन्याला???
नॉर्मली 3 महिन्यांत 1 असते वजनाप्रमाणे डी वोर्मची
आणि फ्लि टिक्स तर वर्षातून एकदा, जास्तीत जास्त सहा महिन्यात एकदा

व्हेट ने नक्की काय सांगितले आहे?

आम्हाला पण सिंपारिका ट्रायो महिन्यातून एकदा सांगितलेले आहे. महाग असतात ही प्रिस्क्रिप्शन मेड्स. डी वर्मिंग चे औषध नाहीये ते. हार्टवर्म वेगळा जीवघेणा डीसीज आहे.

flea+ tick prevention >>> ३ माहिन्यातुन एकादा

Heartworm >> महिन्यातुन एकदा

हरितात्या, कुठलं देता ? लिंक देऊ शकाल का ?

धन्यवाद मैत्रेयी.
आशु, इथं असंच रूटीन आहे. महिन्याला एकदा ही गोळी द्यायला सांगितलं आहे. वजन भराभर वाढतंय म्हणून दर दोन महिन्यांनी आणतेयं. तेव्हाच नखही तिथं कापून घेते.
simparica trio

आहारविषयक मस्त चर्चा .... माहितीत भर पड्ली... धन्यवाद
बाकी, आमची रोक्सी (Roxy) अजुन तीन महिन्याची पण नाही.
सध्या तरी दही भात , अंडी भात, चिकन भात व एक वेळेस N &D चे Puppy Stater ....
औषधे केल्शियम , मल्टीविटामीन दिवसातून दोन मि. ली. एकदा आणि डी वोर्म महिन्यातून एकदा वजना प्रमाणे मि. ली.

IMG-20230512-WA0001 R .jpg

काल सकाळी घेतलेला फोटो

वाव

वाव

बापरे हे हार्टवॉर्म बद्दल कधीच ऐकलं नव्हतं
गुगल केल्यावर कळलं की हे अमेरिकेत स्पेशली मेक्सिकोच्या साईड ला जास्त आहे
तरी एकदा आमच्या व्हेट ला विचारलं पाहिजे, फारच डेंजरस आहे हे प्रकरण
आणि विशेष म्हणजे ते बॉडीत असताना कळत नाही हे जास्त रिस्की वाटलं मला Sad

खाण्याच्या बाबतीत ओड्या लॅब असूनही चोखंदळ आहे

दही भात सगळ्यात आवडीचा, आजीने दुपारी तिच्यासाठी घेतला की तिच्यासमोर शेपूट हलवत उभाच राहतो, तिने ताटातला एक घास त्याच्या बाउल मध्ये दिल्याशिवाय हलत नाही

सगळ्या प्रकारचे लाडू, स्पेशली पोळीचा गूळ तूप घालून केलेला लाडू
आईस्क्रीम तर त्याच्यासाठी आणणे कमी केलं।आहे, तो इतके डोळ्यात केविलवाणा भाव घेऊन बघत राहतो की त्याला न देता खाणे अशक्य आणि प्रत्येकजण त्याला आपल्या वाटचे देतो थोडे थोडे
त्यामुळे नाई म्हणत म्हणत भरपूर होते
शेवटी मला आता व्हेटो काढून घरात आईस्क्रीम आणणे च कमी करावा लागला आहे

आंबा फारसा आवडीने नाही खात पण आमरस दिला की मिटक्या मारत खातो

सध्या उन्हाळा सुरू आहे ते चिकन कमी करून दही भाकरी, कधी भोपळा कुस्करून वगैरे देत होतो, दोन दिवस विनातक्रार खाल्लं
आणि तिसऱ्या दिवशी असहकार पुकारला
एखादा दिवस ब्रेक म्हणून खाईन वेगळं पण चिकन च्या बदली हे देणार असाल तर नाही चालणार म्हणून एक अक्खा दिवस न जेवता बसून राहिला त्यामुळे आता दोन दिवस चिकन आणि एकदा दही भाकरी असं देतोय ते चालतं ठोंब्याला

काकडी खातो पण कलिंगड नाही, त्याला आधी ते लाल बघून चिकन वाटलं, उत्साहाने आला धावत आणि खाल्ल्यावर कळलं आपली फसवणूक झालीये, कारट्याने तोंडातून टाकून दिलं कलिंगडाचा घास, जबरदस्तीने पकडून त्याला खायला लावला तर तोंड वेडेवाकडे करत कसातरी खाल्लं

एका नातलगांची पोमेरियन कुत्री,कच्चा कांदा,पिठले आवडीने खायची.तिखट शेव आवडीचे.पण हे सर्व आपण हातात धरून तिच्या तोंडासमोर धरायचे,तर ती खाईल.तिच्या भांड्यात ठेवले तर अजिबात खायची नाही. आईस्क्रीम, alpenlibe एकदम आवडीचे.जेवताना चिकनच्या तुकड्यांपेक्षाचिकन लीवर,पनीर जास्त आवडीचे होते.

हार्टवर्म आपल्याकडेही नाहीये असे नाही, बहुधा साधनानेच लिहिले होते ना मागे तिच्या शेजारच्या प्लॉट वर राहणार्‍या डॉग बद्दल? विचारा वेट ला नक्की. अर्थात गरज असेल तर सांगितलेच असते त्यांनी आधीच.

आमची स्नोई माऊ फक्त आणि फक्त व्हिस्कस चे ट्युना फ्लेवरचे कोरडा खाऊ खाते. ताजा मासा, सुका मासा, चिकन, दूध, अंडी इ. इ. का ही ही खात नाही. उपाशी बसते... चपाती भात तर खूप लांबची गोष्ट...

मला हे लिहिताना "माझी मुलगी फक्त मॅगीच खाते, बाकी पोळीभाजी काही खात नाही...." असे सांगणाऱ्या आईचे फिलिंग येतेय.

Pages