भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि घ्या आमच्या मांजरांची वंशावळ
सगळ्यात छोटी : चिची
चिची mom: म्याऊ
चिची dad : कौतुक (तो सतत ' वॉव वॉव' असा आवाज काढायचा म्हणून)
चिची आजी : गोधडी (अंगावर ब्लँकेट सारखे डिझाईन होते)
चिची आजोबा : पतंगराव ( सतत अलर्ट मोड आणि नजर भिरभिरती)
चिची पणजी : बिट्टी ( अंगावर बिबट्या सारखे ठिपके)
चिची पणजोबा : अंटू
Lol

अफलातुन !!smiley36_0.gif
नावाची चर्चा भारी!!
माझ्या मैत्रीणीकडे डॉग होता त्याच नाव 'मोगॅन्बो' पण म्हणायचे मोगु
इथे एकिने तिच्या डॉगच नाव' काजु' ठेवलय.बाकी मोस्टली ब्राउनी,ब्रुनो.पोलो अशी इन्ग्लिश नावच आहेत.
भारतातल्या एका मैत्रीणिकडे डॉग होता त्याचे खाण्यापिण्याचे भयकर नखरे होते त्यामुळे तिचे वडील त्याला लाडाने' जावई" म्हणायचेsmiley36_0.gif
अर्थात तिच्याकडे जायच म्हणजे आधि फोन करुन त्याला बान्धुन ठेव बाई हे आमच असायचच..

आमच्या कडील काही पेटची नावं,

कुत्रा - झिपर्या - केसाळ होता म्हणून
- पिवळी
- लाल्या
- बंड्या
- झाबर - पॅामेरीयन कुत्रा
- गोगी - पॅामेरीयन कुत्री
- डूकर्या - गावठी कुत्रा
कासव - बंडू
मासा - झेंडू - माझ्या मुलीने लहान असतांना ठेवले होते

टीप - वरील सर्व पेट मी पाळलेले होते हा गैरसमज नको. हे सगळे माझ्या नातेवाईकांनी ठेवलेली नावं आहेत Happy

या सगळ्या गोड भुभ्यांची नावे आंग्लाळलेली का असतात?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 June, 2023 - 23:36

कदाचित मराठी नावे हि आपल्या आप्त स्वकीयांची असतात म्हणजे जर आपण अगदी नॉर्मल नाव जशी रमेश, सुरेश,धोंडोपंत, माणिकराव , रेवा , प्रीती , कमला , यास्मिन , जस्मिन , चिमणराव , गंगुबाई , हि नाव प्राण्यांना ठेवली तर कोणी चुकून रमेश म्हणून पाहुणा आला आणि आपला कुत्रा रमेश याला आपण त्यांच्या देखत काही कारणाने। 'ये रमेश , भुंकू नको' असे म्हणालो तर ते कसे वाटेल ?????? म्हणून बहुदा भारतात अशी नावे ठेवली जात नसावी काही नावांचे अर्थ तर देवाधिकांशी जोडले असतात मग तेही लिमिटेड प्राण्यांना वापरता येतात जसे लक्ष्मी हे नाव आपण गाईला किंवा म्हशीला ठेवू शकतो कारण गाईला आपण देवीसमान मानतो, पण तेच लक्ष्मी हे नाव एखाद्या कुत्रीला ठेवलेलं कुणाला रुचेल, पचेल नाही सांगू शकत . शिवाय हे पाळीव प्राणी कोणी सहसा रस्त्यावरून उचलून पाळत नाहीत तर कुत्रा आपण चांगल्या ब्रीड चा विकत घेऊन येतो मग तिथे तो ट्रेनिंग वैग्रे दिलेला असेल तर त्यांची नावे आधी पासून ठेवलेली असतात। आपल्या घरात एखाद्या प्राण्याने जन्म घेतला तर त्याचे नामकरण आपण करतो मग सहज उच्चरता येणारी आंग्ल नावे किंवा चिंकी , मिंकी, बंडू , विटू, गब्बू , झब्बू , रंगावरून लाल्या, काळ्या , सवयीवरून नावे ठेवतो। हि अशी नावे शक्यतो लहान मुलेच ठेवतात. हल्लीची लहान मुले इंग्लिश शाळेत शिकतात त्यामुळे त्यांना तीच नावे येतात .

माझ्या एका मैत्रिणीकडच्या बेटा फिशचं नाव तिच्या सासर्‍यांनी 'मच्छिंद्रनाथ' ठेवलं होतं त्याची आठवण झाली. Lol

किती थॉटफुल Lol
आमची मजल ' Shawn द श्वान' पर्यंत जाऊन गुपचूप परत आली

Lol

माझ्या सिम्बाच्या फिट्स येणे नेहमीच झालंय. कधी कधी २-२ रात्र जागाव लागतं. बेशुद्ध करण्यासाठी डॉक्टर ठराविक प्रमाणात इंजेकशन देऊ शकतात. त्याउपर देणे शक्य नसते. आणि लास्ट डोस देऊनही सिम्बा काही झोपत नाही. मध्यंतरी सगुणा बाग, नेरळ येथील काही ओळखीचे व्यक्ती भेटले होते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलं होता. त्यांच्या कडे डॉग्स ला फिट आल्यावर त्याचे डोळे आणि कान ५ एक मिनिट घट्ट झाकून ठेवतात. मी तो ही प्रयोग करून पाहिला होता पण फरक पडला नाही. कुणीतरी सांगितलं होत कानात जोरात फुक मारल्याने फिट थांबते. हा प्रयोग करून पाहिला अनेक वेळा पण जास्त काही फरक पडत नव्हता. या वेळी डॉक्टरांचे सर्व उपाय अपयशी ठरलेले आणि डॉक्टरांनी मुंबईला ऍडमिट करण्यासाठी सांगितले होते. परंतु मुंबईला जाणे येणे आणि उपचार करणे थोडे अवघड जाणार होते. म्हणून मग घरीच घेऊन गेलो. ऑफिस ला दांडी मारली आणि पूर्ण वेळ त्याच्याबरोबर बसून राहायचं ठरवलं. औषध इंजेकशनच्या हेवी डोस मुळे त्याचे मागचे पाय अर्धमेले झालेले, आणि त्यामुळे त्याला चालायला जमत नव्हते. परंतु एवढा अस्वस्थ होता कि एका जागेवर स्थिर राहणे त्यालाही जमत नव्हते. तो सारखा उठायचा, पळायचा प्रयत्न करायचा आणि धडपडायचा. जबरदस्तीने बसवून त्याला एका रूम मध्ये काळोख करून ac लावून दिली. जागरण आणि औषधांनी गुंगी होतीच. डोळे मिटायला लागले कि पुन्हा अस्वस्थ होऊन खडबडून जागा व्हायचा. हळूहळू गुंगी वाढत होती. थोडा डोळा लागला. आणि हा पुन्हा थरथरू लागला. कान हलु लागले. घाबरा घुबरा होऊन मान दोन्हीकडे वळवू लागला. दात वाजत होते. फिट पूर्वीची लक्षणे मी जाणून होतोच. काही सेकंद आणि याला फिट येणारच होती. मी तडक उठलो, दोन्ही कानांत खोलवर बोटे जातील तेवढी घुसवली. ५-६ वेळ रिपीट केल्यावर, दोन्ही कानांच्या जॉइंट्स वर प्रेस केलं. आणि मग छाती आणि पोटावर दाब देत राहिलो. तो लगेचच नॉर्मल झाला. हा उपाय त्यावर उपयोगी पडला होता. परंतु तात्पुरता. पुन्हा १५-२० मिनिट्सने त्याला फिट्स येऊ पाहत होत्या आणि माझ्या प्रयत्नांनी त्या थांबत होत्या. जवळपास १२-१५ वेळ हे असच होत राहील. इंजेकशन देऊन ६ तास झाले होते. त्यामुळे आता वेळ न घालवता २ गार्डिनल ६० आणि १ levetiracetam टॅबलेट दिली. उफ्फ फायनली १२ फिट्स आणि १२-१५ न आलेल्या फिट्स नंतर त्याच्या फिट्स थांबल्या. पण ....
फिट्स थांबूनही पुढील समस्या होतीच. ....
हो, फिट्स आणि औषधांच्या heavy डोस मुळे डॉग्स ची कार्यप्रणाली थांबते. तो रेस्टलेस फेऱ्या मारत राहतो. धडपडतो, ठोकरतो. काहीही न खाता पीता. झोप लागत नाही. लघवी आणि संडास कोंडते. अश्या अवस्थेत त्याला duphalac औषध द्यावं लागतं. सर्व बॉडी function नॉर्मल होईतोवर पुढील ३-४ दिवस हा नित्यनेम होऊन जातो. त्याचा मासूम चेहरा आणि ऑफिस मधून आल्यावर धावत येऊन मिठीत येणे. आजारी असल्यावर गाल चाटणे, उशीर झाल्यावर गॅलरीत वाट पाहणे हे सर्व पुन्हा पुन्हा डोळ्यासमोरून जाते. फिट्सनंतर च्या दिवसात hyperacidity ने तो त्रस्त होतो. तरीही जवळ घेतल्यावर मानेखाली तोंड खुपसून बसतो, मांडीवर डोके ठेऊन पाहत राहतो. कधी कधी केस खेचतो, तर कधी हातांची बोटे आणि कान हळूहळू चावत राहतो. बस्स यातच सर्व क्षीण विसरून जातो.

बापरे, कशामुळे हे फिट्स यायला सुरुझाले का लहानपणापासून होते?
आता किती वर्षाचा आहे सिमबा

लवकर बरे वाटू दे त्याला, बिचारा किती त्रास होत असेल, बोलताही येत नाही मुका जीव Sad

ईकडे कोणत्यातरी धाग्यावर मांजराने बोचकारलं वगैरे तर घ्यायच्या इंजेक्शन ची चर्चा झाली होती. कोणी लिंक देऊ शकेल का ?

आमच्या पेट्स ची नावे
मोठा बाबा बोका- धनंजय माने
त्याची बायको- मनी (सुंदरा)
त्यांना २ पिल्लं, १ पूर्ण काळी मनी तिच नाव मोनालिसा आणि शुभ्र पांढरा बोका पिल्लू - बगळ्या
आमच्याकडे एक भूभू यायचा रोज- तो बबनराव
सध्या अजून एक भुभी यायला लागलीये-तिचं नाव गल्लीतल्या लहान मुलांनी स्कायलाईट ठेवलंय.
एक वेगळीच मांजर अचानक कुठू तरी आली- नॉर्मल मांजरींपेक्षा जरा वेगळी वाईल्ड वाटते त्यामुळे ती जंगली
आणि अजून एक जिंजर ती मॅक्स
माहेरी एक बोकोबा आहे तो तात्या
आणि माझ्या घरी आधी होते त्यात एक फुल काळा बोकोबा सतत डोळे वटारलेले असायचे म्हणून वटारु नाव
आणि दुसरा बोकू चा जन्म बजाज च्या बॉक्स मध्ये झाल्याने तो Mr. बजाज/बज्जु झाला Happy

सिम्बाला लवकर बरे वाटू दे त्याला, बिचारा किती त्रास होत असेल Sad गेट वेल सून सिम्बा!

सगळ्या भूभू माऊ बाळांचे फोटोज आणि किस्से खूप छान. आज खूप म्हणजे खूप दिवसांनी हा धागा पाहिला, छान वाटलं! ऑफिस मध्ये बसून माझ्या घरच्या ह्या सगळ्या बाळांची आठवण आली.
ओडिन ची मज्जा! फेमस झाला आता तो!

Pages