भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरितात्यांनी हाक मारलेली बघून आले. Happy
कोकोनट उद्या सात महिन्यांचा होईल. दोन आठवड्यांपूर्वी त्याची न्यूटरिंग सर्जरी केली. पहिल्या दिवशी अस्वस्थ होता पण नंतर बरा झाला. आल्यावर मला वाईट वाटल्याने सरबरीत दहीभात दिला. स्वतःचा कोन काढून टाकला म्हणून ही ई-कॉलर घातली , जी पोहण्याच्या फ्लोटी सारखी असते ती चावून फोडून टाकली. कसं तरी दहाबारा दिवस काढले.
IMG-20230613-WA0000.jpg
मी न्यूयॉर्कला गेले होते तिथे मिसूचे फोटो काढले. कोकोनटची ताई मिसू. मिसूने कोकोनटला लेडी लिबर्टी बॉल भेट दिला आहे.
IMG-20230520-WA0000.jpg
मिसूताई एक कॉर्गी आहे. ही अतिशय शांत व गरीब आहे.

कोकोनटने परत आल्यावर मला अतोनात माया केली, इतकी की पडणार होते. अतिशय उपद्व्यापी झाला आहे म्हणून त्याला शाळेत घालणार आहोत. पेटस्मार्ट ट्रेनिंग स्कूल.
IMG-20230529-WA0017.jpg

क्युट दिसतोय नारळ.
पहिल्या फोटोत डोळ्यातले भाव 'दुखतंय मला, जरा विक्षिप्त वागेन काही दिवस, चालवून घ्या हां' असं सांगणारे वाटतायत.

अनु Happy

कोकोनट किती क्यूट दिसतोय Happy हा लेटेस्ट फोटो तर फारच गोंडस !!
माउईला काही दिवसांपूर्वी आम्ही मुलीच्या कॉलेज ओरिएन्टेशन ला गेलो तेव्हा सोबत घेऊन गेलो होतो. तिथे २-३ दिवस राहायचे होते. हॉटेल डॉग फ्रेन्डली, शिवाय रूम मधे किचनेट होते त्यामुळे खाण्या पिण्याचाही प्रश्न नव्हता. माउई मोस्टली जाम कन्फ्यूज्ड होता. बहुधा कार ने बाहेर गेलो की पार्क, किंवा ग्रूमर्स नाहीतर व्हेट विजिट हेच त्याला माहित. इथे पूर्ण प्रवासात गाडीतून उतरले की कायम कुठल्यातरी बिल्डिंग च्या दिशेने ( किंवा मग पुन्हा कार च्या दिशेने! )जाऊ म्हणून आम्हाला ओढायचा प्रयत्न करायचा. चला चला, धिस इज डेन्जरस, लेट्स टेक शेल्टर इन सेफ प्लेस!!! अशा सारखा आविर्भाव सतत Lol
किती त्याला सांगितले इट्स ओके, स्लो, वगैरे तरी तेच! नंतर कॉलेज मधे इनडोअर फिरताना मात्र खूष होता. येता जाता कोणत्याही लॅब, लेक्चर हॉल किंवा रूम च्या खिडकीतून, दारातून आत डोकावून बघण्याचा प्रयत्न करायचा. खूप स्टुडन्ट्स अणि स्टाफ कडून कौतुक करून घेतले. पण लांबून काय ते बोला, कोणी अंगाला हात लावू नका हा अ‍ॅटिट्यूड Happy
तर हा माउई'ज डे आउट @UMD Happy
IMG_61881.jpg

धन्यवाद अस्मीता, फोटो एकदमच गोंडस आहेत.

सातव्यातच न्युटर केलं??

सध्या आम्ही भारतात आहोत, सिंबा त्याच्या केअरटेकर कडे अमेरीकेत, रोज खुप मिस करतो त्याला Sad

या सगळ्या गोड भुभ्यांची नावे आंग्लाळलेली का असतात? >>>हो मला अ‍ॅक्चुअली आवडले असते एखादे मस्त मराठी नाव, पण मुलांना आवडणारे नाव घेतले शेवटी. आमच्या नेबरहुडात देसी डॉग्ज ची मस्त मस्त नावे आहेत, मिष्टी, चीनी, कुल्फी, उन्नी वगैरे

माऊईचे फोटो किती गोड आलेत. हसतोय मस्त.

बरा राहतोय का सिम्बा, हरितात्या. पहिलीच वेळ असेल नं. हो ,वेटने सहाव्या महिन्यानंतर केलं तर त्यांना कमी त्रास होतो असं सांगितलं होतं. आता वेळही होता. आणि त्याला काही त्रासही झाला नाही. फक्त पहिल्या दिवशी जरा अस्वस्थ होता. दुसऱ्या दिवशी नॉर्मल झाला.

कोकोनट तर एकदम आमिर खान >>> Happy पर्फेक्ट उपमा.

हा धागा स्ट्रेसबस्टर आहे. Happy
आमच्या शेजारच्या पंजाबी कुटुंबाच्या डॉगीचं नाव 'गब्रू' आहे, आणि आता दुसरा घेतला त्याचं 'गुल्लू'. Happy

ही अतिशय शांत व गरीब आहे>>> हे या धाग्यावर भुभु बद्दल आहे म्हणून ठीक, एरवी अस्मिताने लिहिलेलं हे वाक्य जितकं सरळ दिसतं तितकं ते नसतं Proud खासकरून चिकवा धाग्यावर लिहिलं असेल तर..

सगळी बाळं गोंडस.

एरवी अस्मिताने लिहिलेलं हे वाक्य जितकं सरळ दिसतं तितकं ते नसतं खासकरून चिकवा धाग्यावर लिहिलं असेल तर..>>>>
Lol आणि मला वाटायचं what happens in चिकवा stays in चिकवा... Wink Proud

ऊर्ध्वलाडोबासनाचे प्रात्यक्षिक करून नोकरांची कामे खोळंबवणारा #गुंडू
WhatsApp Image 2023-06-14 at 9.58.56 PM.jpeg

हाहाहा उर्ध्वलाडोबासन. किती गोड गं. काय पण पोझ आहे.
आम्हाला काम काय? ऊन खात खात मऊ मऊ गिरद्यांवरती लोळायचं, लाडात यायचं आणि लाड करुन घ्यायचे.

सो क्युट . मला खूप मांजरे पाळायची आहेत. पण घरातला डायनासोर परवानगी देत नाही. आज मला सकाळीच स्कॅन ला जायचे होते मग आमचे म्हातारे पिल्लू जे गाढ झोपले होते तिला साडेपाचलाच उठवून क्विक वॉक फिरवून आणले. उठली बिचारी. नाही तर रोज आठ परेन्त घोरत पडलेली असते. मला खरे तर काम होते पण आज सुट्टी घ्यायचे ठरवले कारण मी ऑड वेळेला बाहेर गेले की ती अस्वस्थ असते. घरी येउन तिचे लाड केले व ट्रीटोज दिल्या आत्त्ता लवकर फिरवून आणले कुत्र्या सोबत दुपारचे झोपण्या सारखे सूख नाही. नशिबाने कामाचा एकही फोन आला नाही.

या सगळ्या गोड भुभ्यांची नावे आंग्लाळलेली का असतात?

आमचं नाव आंग्ल असलं तरी त्याचा अपभ्रंश होऊन ओड्या झाल्याने ते कमालीचे देशीच वाटतं Happy

असेही त्याला सरळ नावाने कुणी हाक मारत च नाहीत
बायको तर त्याला ए माकडू, कधी बबड्या असे काय मनात येईल त्या नावाने हाक मारते
पोरगा त्याला पांढरा उंदीर म्हणतो, सतत खुडबुड करत खायला शोधत असतो म्हणून

मी त्याला ओडिन अशी पूर्ण हाक मारली की त्याला कळतं काहीतरी चूकलंय, आपण आता ओरडा खाणार Happy
एरवी मग ओडुली, गोडुली, ओड्या गोड्या, आळशी घोड्या Happy

या सगळ्या गोड भुभ्यांची नावे आंग्लाळलेली का असतात?

>>>>>>>>>

हॅरीचे नाव साबा साबुनी हरी ठेवलेले. हरीनाम तोंडीं येत राहील म्हणून पण कॉलोनीतील मुलांनी हरीचे हॅरी करून टाकले Lol
सगळी मुले हॅरी म्हणूनच हाक मारतात. फक्त साबा आणि साबू हरी म्हणून हाक मारतात.

तर पॉटर बुवा आता हॅरी आणि हरी अश्या दोन्ही नावाना प्रतिसाद देतात. Biggrin

कोकोनट क्यूट दिसतोय. ऊर्ध्वलाडोबा मस्त लोळतोय.

हरितात्या, सिंबाप्रमाणेच हॅरी पण हॉस्टेलमध्ये आहे , आम्ही बाहेर असल्याने. मजा करतोय तिथं पण घरी आणल्यावर जाम वैताग काढणार आहे आमच्यावर ..

सगळेच गोड गोड फोटो.. Happy
या सगळ्या गोड भुभ्यांची नावे आंग्लाळलेली का असतात? << नवीन पीढी ने ठेवल्यामुळे असेल..
पोरगा त्याला पांढरा उंदीर म्हणतो, सतत खुडबुड करत खायला शोधत असतो म्हणून << आम्ही गुगल(गुड गर्ल + सर्च ईन्जीन) म्हणतो हाहा...

Pages