हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जुम्मेरात म्हणजे गुरूवार? मला वाटायचं शुक्रवारची रात्र.
याचाच अर्थ 'जुम्मा चुम्मा' गाण्याने मला आयुष्यभर mislead केलं.

हो , ट्यूब पेटली. इथंही ख्रिसमस ईव्ह म्हणजे ख्रिसमस पूर्वसंध्या...! जुम्मा ईव्ह म्हणजे आदल्या दिवशीची पूर्व संध्याकाळ.

जुमेरात = गुरुवार

काहीजण गुरुवारला “पीर” म्हणतात.

आश्चर्य वाटेल पण जुन्या पीढीतले hardcore मांसाहारी लोकं “पीर के दिन” शाकाहार करतात, अजूनही.

एम्पॉवर्ड बेगम Happy

फेसबुक फीड वर आधी काही हैद्राबादी हिंदी टोन मधील कॉमेडी विडिओ पाहिलेत, त्याची आठवण आली
शाहरुख नामक मुलगा होता

मी हिंदीतही तोच अर्थ समजत होते आत्ता पर्यंत Happy

तसाही, आपल्या एंपॉवर्ड बेगम च्या तोंडी म्हातार्‍या व्यक्तीचे भूत हाच अर्थ जास्ती शोभून दिसतो....

जुम्मेरात म्हणजे गुरूवार? मला वाटायचं शुक्रवारची रात्र.>>>> फार पूर्वी माझाही हाच समज होता. पण मग मी हे गाणे ऐकले

यात बाकी वार स्पष्टपणे आलेले असल्याने एलिमिनेशन लॉजिक लावून जुम्मेरात म्हणजे गुरूवार असणार असे लक्षात आले होते Happy

पण सिरीयसली - इस्लामी कॅलेण्डर नुसार दिवस आदल्या दिवशीच्या रात्री सुरू होतो असे काहीतरी वाचले होते. त्याचा संबंध असेल.

झकास. सात दिनों में हो गया सात जनम का प्यार Happy

रच्याकने इजिप्त आणि हिंदू calendars सुर्योदयाची तिथी/ दिवस/वार घेतात. अन्यत्र मध्यरात्रीला दिवस बदलतो.

हो पण ती तिथीची सुरूवात व संपते ती वेळ. या काळात ज्या दिवशी सूर्योदयाला ती तिथी असेल त्या दिवशी पौर्णिमा धरतात असे काहीतरी आहे. नक्की लक्षात नाही. उदा: उपास आपल्याकडे सूर्योदयापासून धरतात. आदल्या मध्यरात्रीपासून नाही. पण इस्लामी कॅलेण्डर मधे तसे काहीतरी आहे, त्यामुळे जुम्मेरात व जुम्मा हे इंग्रजी कॅलेण्डरप्रमाणे दोन वेगळ्या दिवशी आले तरी प्रत्यक्षात एकाच दिवसाचे/तिथीचे भाग असतात.

मला अचूक शब्द आठवत नाही म्हणून इस्लामी कॅलेण्डर म्हणतोय. प्रत्यक्षात काहीतरी वेगळा शब्द असावा.

उपास आपल्याकडे सूर्योदयापासून धरतात. आदल्या मध्यरात्रीपासून नाही. पण इस्लामी कॅलेण्डर मधे तसे आहे. जुम्मेरात व जुम्मा हे इंग्रजी कॅलेण्डरप्रमाणे दोन वेगळ्या दिवशी आले तरी प्रत्यक्षात एकाच दिवसाचे/तिथीचे भाग असतात.

+ १

जाणकार सांगतीलच, माझ्या माहितीप्रमाणे हिंदू पंचांगात “उदित तिथी” नामक प्रकार असतो. म्हणजे पौर्णिमा जरी दुपारी ४ ला सुरु झाली असेल तरी पुढील दिवशी सूर्योदयापासून पौर्णिमा-सणवार सुरु होतो.

इस्लामिक महिना अमावस्येच्या रात्री सुरु होतो. हिलाल=चंद्र कोर बघून पुढच्या दिवशी(रात्री) confirmation !

BTW इस्लामी कँलेंडरमधे ३१ दिवसाचा एकही महीना नाही.

असो, भरपूर अवांतर झाले Happy

रमझानचा उपास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असतो. सूर्योदय व्हायच्या अगोदर सेहरी आणि सूर्यास्तानंतर इफ्तार.

आपल्याकडे उपासासाठी सकाळपासून तीच तिथी मानतात हे बरोबर. पण जन्म , मृत्यूची वेळ नोंदवताना ती तिथी प्रत्यक्षात जेव्हा सुरू झाली ती वेळ पाहतात. दिवाळीत नर्कचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्हीच्या तिथी एकाच दिवशी आल्या तरी अमावास्या सुरू होण्याची वेळ पाहून लक्ष्मीपूजन करायचे असते.

मी आता शोधलं तर जुम्मेरात म्हणजे गुरुवार आणि जुम्मा म्हणजे शुक्रवार. मलाही जुम्मेरात म्हणजे ख्रिसमस इव्ह सारखं शुक्रवारच्या आधीची रात्र असं वाटत होतं. मिर्झा गालिब चित्रपटातही हा जुम्मेरात शब्द ऐकला होता.

तो उपवासाचा नियम झाला.

ईद कधी तर रात कू चाँद देख के. तिथी मध्यरात्रीच बदलते त्यांच्याकडे.

एम्पॉवर्ड बेगम सिरिज मे नया लतीफा सुनाताऊं :

इनो बोले : भोत प्यार करता मैं तुमकू. कल सीने पे टैटू बनवारा, तुम्हाराइच नाम लिखवारा बेगम !

उनो बोले : ज्यादा फिल्मीपना नक्को करो. नामां लिखारै तो प्रोपर्टी के पेपरां पेच लिखाओ !!!! Proud

Pages