हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

घरगुती वापराच्या विजेची चोरी हे हैदराबादचेच नाही तर पूर्ण देशातले वास्तव आहे.

"लैटमीटर में सेटिंग' असे त्याचे हैदराबादी नाव. त्याबद्दलच्या फुशारक्या :-

हैदराबादी १ :- हमारे घरमे लैटमीटर ऐसा सेट किये की लैटबील आधा होगया देखो.

हैदराबादी २ :- ये तो कुच्च नै. हमारे अब्बा लैटमीटर में ऐसा सेटिंग किये बिल तो नै आरा, उलटा लैटवाले हर महिने पैसे देको जारे देखो Happy

मागच्या महिन्यात हैदराबादच्या जुन्या भागात जाणे झाले. छोट्या दुकानांमध्ये पाय ठेवला की मालकाचे - 'क्या होना?' एकदम फिस्सकन हसायला आले. हे असेच 'क्या होना' विदर्भात आणि औरंगाबाद शहरात हमखास ऐकायला मिळते.

कुठलाही पत्ता सांगतांना 'सिधा जाको एक्कीच रोड है' नाही तर 'दो लेफ्टां आते, फिर दो राईटां आते' असे सांगण्याची पद्धत ! प्रचंड करमणूक झाली Happy

सुप्रसिद्ध बिरीयानी-नल्ली-पाया-हलीम व्यतिरिक्त जुन्या हैद्राबादच्या काही खासमखास खाद्यपरंपरा आहेत. दर भेटीत काही खास खायला मिळेल असे बघतो Happy

एका मित्राकडच्या लग्नानिमित्त नुकतीच हैद्राबादची वारी घडली आणि मेजवानीत 'बदाम बोबट्लु' खाण्याचा योग आला. थोडक्यात बदामाचे पुरण भरलेली पुरणपोळी Happy स्वर्गीय चव.

0D1930AC-546F-48D7-AF96-4FFC179F5C38.jpeg

नंतर बघितले, एका प्रसिद्ध मिठाई दुकानात पण विकायला होती, पण इथली चव अगदीच यथातथा Sad

आपल्याकडे साटोर्‍या असतात तसाच प्रकार फक्त साटोर्‍या खव्याच्या असतात बहुतेक. बोबाटलु छानच असणार ते वर्णनावरुनच कळतय.

आपल्या पुरणपोळीचे हुलीगे, पुरण पुरी, ओबट्टू, बक्शामुलू आणि बोबट्टलु असे अनेक भाऊबंद दक्षिणेत आहेत.

ऋतू / सण / प्रसंगाप्रमाणे सारण बदलते. हरभरा डाळीचे पुरण, सुके-ओले खोबरे, केळी, रताळी, बदाम, काजू, चारोळ्या असे वेगवेगळे पुरण असते.

मी खाल्लेले बोबटलु बहुत करून कोरडे होते खुप. त्यावर दूध तूप घेणे गरजेचे होते.
एका लग्नात पंगत सुरू झाली लाडु होते, आम्हाला वाटले एवढेच गोड. आणि शेवटला भात, घेतला ताक घालून खायला तेव्हा बदाम बोबटलु आले. खायचे म्हटले तर भात टाकावा लागला असता, मग बोबटलुला नाही म्हणावे लागले नाईलाजाने.

ऋतू / सण / प्रसंगाप्रमाणे सारण बदलते. हरभरा डाळीचे पुरण, सुके-ओले खोबरे, केळी, रताळी, बदाम, काजू, चारोळ्या असे वेगवेगळे पुरण असते. >>>>>> बेंगलोर (सेक्टर 4) मधे एक पुरणपोळी स्पेशल दुकान आहे, तिथे ही सगळी व्हरायटी मिळते. याचीच ठाणे आणि आता पुणे मध्येही दुकाने चालु झाली आहेत ' पुरणपोळी घर ,' नाव आहे. इथेही भरपूर व्हरायटी आहे.

... बोबटलुला नाही म्हणावे लागले नाईलाजाने...

अरेरे. ऐसा कायकु किये ? निवाला दो निवाला खा लेते ना, रोज मौका किधर मिलता यारों ? Happy

... खाल्लेले बोबटलु बहुत करून कोरडे होते ...

होय मानव, वरून तूप घेतात भरपूर. आपल्या पुरणपोळीपेक्षा कडक असते, थोडे साटोरी सारखे टेक्श्चर.

बदामाचं खवा आणि साखर घालुन सारण ...

होय, बदाम भिजवून त्याचे पुरण. झकास लागते. असेच मी चारोळ्या भिजवून केलेल्या पुरणाच्या पोळ्याही बघितल्या - खाल्ल्या आहेत.

....बंगळुरु, पुणे, ठाणे इथे पुरणपोळी घर ?

रील्स बघितल्यात त्यांच्या. अजून पायधूळ नाही झाडली तिकडे, त्यांचे पुण्य कमी पडतेय Happy Happy हैद्राबादला काही मिठाईच्या दुकानातून मिळतात, त्या ट्रायल्या, नाही आवडल्या. Was an apology of बोबटलु.

खुप उशिरा बघितला बाफं. तुफान करमणूक झाली अनिंद्य तुमच्या पोस्टी वाचून! पुर्वी पण हैद्राबादी फार गमतीशिर वाटायची आणि नंतर द अंग्रेज बघितला. अक्षरशः तोंडपाठ होता अख्खा पिकचर! Happy टॅगमंड, अ‍ॅबिड्सके फुटपाथ, बंजारा हिल्स. लो बजेट असून सलिम फेकू, इस्माईल भाई आणि जहांगिरनी टोटली उचलून धरला पिकचर. कुंटा निखिल पण दाद दिली पाहिजे.

नै बोले तो सुनते नै एकून पण फूल ह ह पु झाली! Lol

अमितव Lol

पण बदाम पुरणपोळी नक्कीच अफलातुन असेल.

बेंगलोर (सेक्टर 4) मधे एक पुरणपोळी स्पेशल दुकान आहे >> होळ्ळिगे मने? त्यांची चेन आहे. तिथे बर्‍याच प्रकारच्या गोड पोळ्या मिळतात. पुरण पोळी त्यातली एक. मला तिथल्या नारळ पोळ्या (कायी होळ्ळिगे) जास्त आवडल्या. चॉकलेट होळ्ळिगे पण मिळते म्हणे तिथे. माझी हिंमत नाही झाली, पण पुतण्या आवडीने खातो.

अच्छा! मला आधी तो शब्द वाचून वाटलं की तेलगूत त्याला हुलिगे म्हणतात की काय. दोन्ही भाषांमध्ये खूप साम्य आहे. लिपीत तर फारच. अगदी देवनागरी - गुजराती इतका फरक, किंबहुना कमीच, कन्नड - तेलगू लिपीत आहे.

हो होळिगे (ळ्ळि पण असेल) म्हणतात पुपोला. होळिगे मने सुप्रसिद्ध आहे. मी कधी आणली नाहीये अजून, पण एकदा खाल्ली आहे दुसरीकडे. ही पुरणपोळी तूरडाळ वापरून करतात त्यामुळे ती हलकी असते आपल्या पुपोच्या मानाने. पोटाला जड होत नाही. पण मला आपली मराठी पुरणपोळीच जास्त आवडते Happy
आमच्या पोळ्यांच्या बाई उत्तर कर्नाटकातील होत्या. त्या होळिगे न म्हणता उब्बीटु की ओब्बिटु म्हणायच्या.

Pages