हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>>हा मजेशीर शब्द सामो यांनी कॉइन केलाय
अर्रे त्यात काय कोणीही वापरा. धन्यवाद अनिंद्य.

एमम्पोवर्ड बेगम हे नाव तर मस्तच आहे.
आणि किस्यांमधील फ्रेशनेस सदैव चांगला आहे
तो accent ऐकायला खरंच छान वाटते

ऑडियो होईल तेव्हां होईल, ये नया लतीफ़ा सुनाताऊं :

हैदराबादी फजलू : ये नया फ़ोन लिये क्या तुम ?

हैदराबादी जुम्मन : नया नै है, मेरी गर्लफ़्रेंड शब्बो है ना, १ बरस पहले खरीदी थी उनों ये फोनकू, आज उठाकू ले आया देखो

फजलू: ऐसे कायकू किए ? चोरी से लेना हराम हैना ?

जुम्मन : वो जानकू आफ़त करी ना ! मेरा फ़ोन नै उठाते, नै उठाते बोल के ! आज उठाच लिया फिर Proud Proud

ये एक हैदराबादी क़ब्रिस्तान:

फजलू: कैसा सुकून वाला क़ब्रिस्तान है ना ? एकदम सन्नाटा है इधर कू…

जुम्मन: हौ. मुर्दे भी कितना सुकून से सो रै इधर कू

मुर्दा, जाग कर : अबे हौले, सुकून से क्यों नै सोना रे ? हम लोगां जान दे कू जगा लिए ना इधर Lol

>>>>>बेटा : काय कू बोले तो ? हर एक्साम मे मेरे कू अंडाच देरी ना वो >> Lol

अनिंद्य तुम्हाला मास्टर ऑफ हैदराबादी स्व्याग हा किताब देताना अत्यंत आनंद होत आहे. Happy

>>>> हम लोगां जान दे कू जगा लिए ना इधर Lol
म्हणजे त्या दोघाम्नी आत्महत्या केलेली असते बरोबर?
मला आधी वेगळेच वाटले. अमेरिकेत. किरिस्तावांना, आपल्या प्रेताला, पुरण्याकरता जागा विकत घेउन ठेवावी लागते. मला वाटलेले की हे दोघे जिवंत आहेत व त्यांनी आपल्या आई- वडीलांकरता जीवापाड मेहनत करुन ( जान दे के) जागा घेउन ठेवलेली आहे की काय.

… दोघाम्नी आत्महत्या केलेली असते? ….

अरे नै नै, ख़ुदकुशी नै किए वो लोगाँ. अपनी जान दे को उधर आए ना. The high price to pay for space in graveyard is ‘death’ itself Happy

Pages