हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@ मिरची का सालन

हैदराबादी मिरची का सालन बर्‍यापैकी complex डिश आहे. एरवी आपण कोणतीही ग्रेव्ही/वाटण करतांना शेंगदाणे, किंवा खोबरे किंवा तीळ यापैकी एकाचा कूट वापरतो. मिर्च का सालन या एकमेव डिशमधे (मला माहित असलेल्या) हे तीनही घटक एका विशिष्ट प्रमाणात भाजून + कुटून एकत्र टाकलेले असतात. शिवाय चिंच, तळलेला कांदा आणि देठासहितच्या हिरव्या मिरच्यांच्या अंगचा ठसका…. असा काही संगम की wild burst of multilayered flavours on the tongue ! 😍

मला तर खुद्द बिरियानीपेक्षाही मिर्च सालनचे आकर्षण जास्त आहे. फक्त बिरियानी सोबर असावी, तिखटजाळ असली तर मग हे सर्व flavours नीट appreciate करता येत नाहीत.

हे सालन रोटी/ बोटी/ कबाब/ बघारा रैस असे कश्याहीसोबत खाता येते- खातात.

सौ छान करते पण उत्कृष्ट नाही (me not being thankless, just truthful 😄 )

मुंबईत सर्वोत्तम मिर्च का सालन मी फोर्टच्या “खैबर” मधे खाल्ले आहे. बाकी जागी what they served was an apology of मिर्च का सालन. 😏

>>>>>>what they served was an apology of मिर्च का सालन.
हाहाहा मस्त वाक्य Happy
>>>> हे तीनही घटक एका विशिष्ट प्रमाणात भाजून + कुटून एकत्र टाकलेले असतात. शिवाय चिंच, तळलेला कांदा आणि देठासहितच्या हिरव्या मिरच्यांच्या अंगचा ठसका…. असा काही संगम की wild burst of multilayered flavours on the tongue !
ऐकूनच चविष्ट डीश वाटते आहे.

मायबोलीवरची मिरची का सलान ची पाकृ. आता एकदा खर्‍या ( Wink ) मिरच्या वापरून करावी लागणार.

अनिंद्य, हा बाफ आधी हसवून ओठांचे कोपरे वरती करवायचा, आता तोंडाला सुटलेले पाणी पुसण्याकरता ओठांवरून जीभ फिरवायला लावतोय. आता भुकेल्या पोटी इथे यायला धोका आहे Wink

@ rmd

मीठीशाद बोलीचा लेख वाचला. हा त्या सिरीजमधला शेवटचा होता बहुतेक. Thanks for sharing regularly 👍

@ माधव,

…तोंडाला सुटलेले पाणी ….

खाण्यात फार जीव आहे, हे तर होणारच. 😀

तरी आता माबोवरची फोटोसाठीची जागा संपली म्हणून आखडता हात आहे.

Thanks for sharing regularly >>> Anytime! Happy तुम्हाला इंटरेस्ट असेल असं वाटलं म्हणूनच शेअर करत राहिले. आवर्जून पोचपावती दिल्याबद्दल थँक्यू.

माधव, तुम्ही शेयरलेली रेसिपी नीट बघितली मिर्ची का सालन ची. त्या शिमला मिर्ची वापरून केलेल्या सालनला different take on Hyderabadi Mirch Ka Salan म्हणता येईल.

मी काही वर्षांपूर्वी मिरची का सालन केलं आहे घरी. छान लागतं. फक्त दुसर्‍या दिवशी वगैरे (उरलं तर) त्या मिरच्या मुरुन आणखीनच तिखट होतं ते सालन.

दुसर्‍या दिवशी तिखट होतं सालन…..

मोहतरमा,

दूसरे दिनकू reheat करेंगे तो microwave में नक्को करो. पतीले में गर्म पानी कर कू सालन का भगोना आधा डुबाकू सालन गरम करो.

Microwave या ग्यास पे किए तो overcook हो जाकू मिरची का खीचडा बन जाता देखो 😀

आज जुम्मा हौर बहुत दिनां बाद ये हैदराबादी किस्सा पेश है. नाचीज़ ने खुद लिखावा क़िस्सा है :

जुम्मन रेलवे गारड की नौकरी चाहते तो इंटरव्यू के वास्ते गए. उधर रेड्डीसाब उन कू सवालां पुच्छे.

- एकईच लाईन पे आमने-सामने दो रेलगाड़ी आ रई तो तुम क्या करेंगे जुम्मन?

- ऐसे तो एक्सीडेंट होजाता रेड्डीसाब. मैं लाल सिग्नल दे कू दोनू गाड़ी रुकवा देतुं 😇

- मान लो सिग्नल काम नै कर रा ?

- तो मैं लाल शर्ट कू उतार कू हवा में लहरातुं, उनों मोटरमन लोगां समझ जाते के आगे कू खतरा है

- नै समझे तो क्या करना ?

- मैं लाल पतलून भी निकाल कू हवा में घुमातुं रेड्डीसाब. उनों खतरा जरूर समझ जाते फिर

- फिर भी उनों नै समझे तो क्या करना ?

- मेरे आजू-बाजू जोबी लाल चीज हुंगी उसकू हवा में लहरातुं रेड्डीसाब…. समझ जांगेच उनों

- फिर भी नै समझे तो क्या करना ?

- फिर तो मैं मेरे दोस्त फजलू कू बुलाऊँगा रेड्डीसाब 😇

- कायकू? फजलू जानकार है क्या सिग्नल का ?

-

-

-

-

- नै. उनों आज तल्लक एक भी रेल एक्सीडेंट नै देखा ना, इसवास्तेच !

😁 😁 😁

>>>>>>उनों आज तल्लक एक भी रेल एक्सीडेंट नई देखा ना, इसवास्तेच !
क्या बात है. फारच मस्त किस्स आहे हा तर. Happy कहर आहे.

खूपच मस्त
Lol
तुमच्या तैल विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते.

ओके, मग ठीक. मला वाटले की माझे काही चुकले की काय 🙂

कॉम्प्लिमेंट के वास्ते हौर वो समझाने के वास्ते दोनू का शुक्रिया.
मेहरबानी, करम.

ज़र्रानवाज़ी आप लोगां की 🙏

अगदीच असावा संबंध. कारण नावाजणे = प्रशंसा करणे, खूप स्तुती करणे

आणि

ज़र्रा म्हणजे धूलिकण. क:पदार्थालाही नावाजण्याची कृती = ज़र्रानवाज़ी

(हे माझ्या अल्पमती प्रमाणे, कोश वगैरे नाही बघितले)

यस्तु सञ्चरते देशान् सेवते यस्तु पण्डितान् ।
तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलबिन्दुरिवाम्भसि II

जो वेगवेगळ्या देशांत फिरतो आणि विद्वान लोकांच्या सतत सेवेत, संपर्कात असतो, त्याची बुद्धी तेलाचा थेंब पाण्यावर पडल्यावर ज्याप्रमाणे पसरतो त्याप्रमाणे विस्तारलेली असते

१) वेगवेगळ्या देशांत फिरतो
२) विद्वान लोकांच्या संपर्कात असतो

याबद्दल मला चांगले मार्क येतील.

.. त्याची बुद्धी… धिस नॉट शुअर माझ्याबद्दल 😀

जड नाहीए इतकेच.

हौलेपना हौर बचपना दोनू खतम नै होरा 😀

ओह असा उगम आहे होय तैलबुद्धीचा! मला वाटायचं नियमित तेलपाणी केलेल्या (वेल ऑइल्ड) मशीनसारखी चालणारी बुद्धी!

जुम्मन Rofl

अनिंद्य, जबरी लिहिला आहे किस्सा! एक नंबर! Lol

ऋतुराज _/\_

Pages