हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज मुंबईत ऐकला दादला अस्तुरी फार्स CSMT वर एक्स्प्रेस वेटींग सेक्शन मध्ये, मियां चिडलेला व्याह्यांनी योग्य तो मान न ठेवल्यामुळे आलेल्या निकाह मध्ये, त्यानं प्यार का पंचनामा टाईप एकच लांब मोनोलोग मारला (तुटक मला आठवतोय तसा खालीलप्रमाणे)

"हाऊ नी तो, तुमकू सो दफे बोलेसे प्यारी, तुमरकु जितना जाना मैके जाओ बोल के, फिर भी तुम मेरकु इस्बारी भी निकाह बोल के आंस्वा दिखा के खीच के लाये, क्या तो बी मुंबई अन् क्या तो उने क्या बोलते कुर्ला केते, पान के डब्बे सरिके घरा, इनकू होता नई तो कैकु इत्ते ममेरे, मोसेरे अन् खलेले जमा करते मेरकू नई आता भेजे मे, उपर से बिर्यानी बोल के कैतोबी बगारा चावल खिला देते बिसान, नसीम मैं तूमरकू देक के मोहब्बत मे आया, आईंदा से मेरेको नक्को लाती जाव जान ये कोंडवाडे मे, तुमारकु होना तो अम्मी अब्बु कु पुरा मैना बुला लेव अपने इदर"

जाम मजा, पण नंतर मियाभाई शांत झाले, त्यांचे नसीम वर प्रेम असावे नंतर मजेत खांद्यावर हात ठेऊन बसले गुलुगुल करत अन् मी सटकलो तिथून

@ ऋतुराज

झकास

@ जेम्स,

पान के डब्बे सरिके घरां Happy लेकिन प्यार तो हैच दोनों में

आणि हैदराबाद म्हणजे सर्वच plural, जसे -

बात- बातां कर रै
काम - कामां कर रा

... कैकु इत्ते ममेरे, मोसेरे अन् खलेले जमा करते...

'खलेले' नसेल म्हणाला नसीमचा तो प्रेमळ नवरा. आतेभाऊ-बहिणींसाठी 'फुफेरे' शब्द वापरतात, आत्या फूफी आणि आत्याचे यजमान फूफा.

अर्थात हे फक्त हैदराबादच नाही तर हिंदी-उर्दू जुबान बोलणाऱ्या सर्वच प्रदेशात. नॉन मुस्लिमसुद्धा वापरतात.

<<क्या तो बी मुंबई अन् क्या तो उने क्या बोलते कुर्ला केते, पान के डब्बे सरिके घरा, इनकू होता नई तो कैकु इत्ते ममेरे, मोसेरे अन् खलेले जमा करते मेरकू नई आता भेजे मे, उपर से बिर्यानी बोल के कैतोबी बगारा चावल खिला देते<<< जबरद्स्त... Lol
हे मला अगदी 'सुन मेरी अमिना दिदी... ' या गाण्याटाईप वाटले.
८०-९० च्या दशकात धुळ्याच्या कॉलेजमधे हे गाणे फेमस झाले होते. https://www.youtube.com/watch?v=sVmjJTYae-Y

म्हातारीला काय समजतेय अशा अविर्भावात त्याने पुन्हा तेच उत्तर दिले. ती टिपिकल तेलेगूत म्हणाली की "इतके दिवस फक्त ऑरॅकल शिकतोस? मग जावा कशी शिकणार आणी अमेरिकेत कधी जाणार ? >>> Lol जबरी.

कासवाची पिल्ले बीच वर जन्मली तरी आपसूक समुद्रात जातात तसे हैद्राबादी मुले जन्मली की कधी एकदा अमेरिकेत जातो व टोयोटा कोरोला, नायगारा, लिबर्टी वगैरेचे फोटो घरी पाठवतो असे त्यांना होते.

by चिडकू on 16 August, 2022 - 09:38

ये गाने में भी धूलपेट का जिकर Happy

..... धूलपेट के मांजो से उडाते है पतंग !!! .... व्हेरी हैदराबादी Happy

... कासवाची पिल्ले आणि हैदराबादची मुले...

एक्दम सही बोले तुम. हैदराबादके पोट्टे बचपनसेच बिदेस का सपना संजोतें. अमरिका जाते वो बारे में तो तुम बतायेच, बाकी लोगां दुबई-सौदी के खाबां देखते....

और नवाबां के खानदान के हुंगे तो उनो तुर्की - इरान का रिश्ता चाहते अपने बच्चो के वास्ते

हे आज का स्पेशल :-

English V/S हैदराबादी

Rubber = लब्बड

Lipstick = लीबिस्टिक

Doctor = डाकसाब

Auto (रिक्षा) = आटू - याचं विदर्भ / मराठवाडा व्हर्जन - ऍटो Happy

Glass = गिलास - हे सेम विदर्भ / मराठवाड्यातही

Aeroplane = पलेनां, जो एयर्पोरटां से उडते

Planning = पिलानिंग

जाणकारांनी यादी वाढवावी

एकदा मी आटो तून येत होते तर उतरल्यावर ड्रायवरला पैसे दिले दहा ची नोट जरा खराब झालेली होती तर तो म्हणे.

" दूसरा नोट दे दो अम्मा इस नोट को जरा धक्का लगेसो है.!!!"

मी नोट बदलली आणि त्याच्या विनोद बुद्धीला दाद पण दिली.

अशी केमिस्ट्री इथे मुंब ईत कोण त्याही आटो वाल्या बरोबर जमत नाही.

एकदा स्कूटरने घरी येत होते तर मसब टँक सिग्नल ला थांबलेले.

एक स्कूटरवाला जरा जास्तच पुढे गेला तर पोलिस जो चौकात उभा होत होता व नियंत्रण करत होता.
त्याने त्या स्कुटरवाल्या च्या स्कूटर वरचे डॉक्ट् र चे क्रॉस चिन्ह पाहिले व म्हणे : " अ‍ॅनिमल डॉक्ट र है शायद. "

आता हा संवाद वाचा, ह ह पु वा :-

हैदराबादी १ :- बहुत परेशान लग रै, क्या बात है भाई ?

हैदराबादी २ : -कुच्च नै मिया, नक्को पूछो. छोडो ना क्यातो होता परेशान होके. मैं पागलखाने जारा, भरती होनेकु.

है १ :- कैसी बातां करते तुम. दोस्त से दो बातां बोलते-सुनाते तो जी हलका होजाता कैते.

है २ :- सुनो फिर, अभी परसुं की बात है, एक बेवा से शादी की मैने. मेरे अब्बू ने उसकीच जवान बेटी से निकाह कर लिया बोलो !

है १ : होता ऐसा कभी कभी. ज्यादा दिल पे नक्को लेव तुम.

है २ :- आगे सुनो. अब अब्बू मेरे दमाद बन गये और मेरी बेटीच मेरी अम्मा बन गयी देखो !

है १ :- होता ऐसा कभी कभी. ज्यादा दिल पे नक्को लेव तुम.

है २ :- आगे सुनो. अब्बू के घर एक नई बेटी हुई परसुं , वो तो मेरी बहन हुई और मैं उसकी नानी का शौहर हूं तो वो मेरी नवासी हो गई मिया ! ऐसा किधर होता ?

है १ :- होता ऐसा कभी कभी. ज्यादा दिल पे नक्को लेव तुम.

है २ :- उधर परसुं मेरेकु बेटा हुआ ना वो अपने दादीजान का भाई, मैं अपने बेटे का भांजा और मेरा बेटा अपने दादा मिया का साला भी बन गया देखो !

है १ :- चल भाई, तेरेकु इस्माईलपेट हौलों के हस्पताल छोड देता मैं Happy Happy Happy

हैदराबादी मित्राने पाठवलेले हे एक -

अम्मा :- बेटा, व्हेअर आर यू ? इट इज ऑलरेडी मिडनाईट. कम होम नाऊ

बेटा :- हू इज धिस ?

अम्मा :- अरे मुर्दे, ओ करमजले जलील कहाँ है रे तू ? इत्ति रात होगई ना, किधर मररा रे ?आवरा गर्दी नक्को करो, जल्दी घर कु आ खबीस नई तो पैरां तोड देतउं तेरे

बेटा :- अजी अम्मी तुम है ! इत्ति इज्जत से बात किये तो मैं समझा अब्बू दूसरी शादी कर लिये.. अब्बी आता मैं Happy

He he lol

एक निरीक्षण :-

वरील हैदराबादी बोलीतल्या संवादातला “खबीस” हा शब्द मराठीतल्या “खवीस” याच अर्थाने वापरलेला दिसतो Happy

Pages