हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सब कू थँक्यू है !

आज जुम्मा है, आज जुम्मन फिर आ गया !

शब्बो : सुनो जुम्मन, शादी के बाद भी तुम मेरेकू इतनाईच प्यार करेंगे ना ?

जुम्मन : हौ, यक़ीनन. कब है तुम्हारी शादी? Lol

…महेश बाबू नंतर जुम्मन क्रश झाला आहे…,

अरे जुम्मन तो हौला है, महेश बाबू ईस्टार हैना. दोनू कू साथ में नक्को तोलो मोहतरमा Lol

… शब्बो - जुम्मन ची जोडी …

आता जुम्मनच्या कज्जाग सासूची एन्ट्री होणार आहे आपल्या धाग्यावर. तिचे बारसे करा, तिला काय नाव देऊ ते सुचवा.

अरे खाष्ट सासू साठी कुणीच नाव नाही सुचवले ? ताज्जुब आहे Happy

सध्यापुरते मग तिला “बडी अम्मी” म्हणतो.

सुनो हैदराबादी सास का लतीफ़ा :

- बड़ी अम्मी, कायकू रो रै ?

- बहू कू दुसरी बी लडकीच हुई ना !

- देखो बड़ी अम्मी, ज़माना बदल गया ना अब ? पहेले जैसा नै रहा. लड़का लड़की एक जैसेच. दोनों को एक जैसाच प्यार देना रैता. दोनों कू अल्लग नक्को समझो, लड़की कू भी प्यार दो तुम …

- अरे हौली बला, लड़की तो ऊपरवाले की नेमत मानती मै. बरकत लाती ना लडकी? मेरा ग़म दूसराच है

- वो क्या ?

- अरे खसमपीटी तू समझ नै रई. मेरी बहू कू लड़का नै तो उस को बहू भी नै आती ना ? फिर उसकू सास का दरद कैसे मिलेंगा ? उस दरद कू रो रई मै Proud

बोबटलू म्हणजेच पुपो. फक्त पद्धत वेगळे असते. बाकी जिन्नस सराखेच आहेत.

पोथेरुकुलु उगीच हाईप केलेला प्रकार आहे.

इथे पण कुणी फारसे खाताना, त्याबद्दल बोलताना दिसले नाही कधी. एकदाच कुणाच्यातरी समारंभात होते पोथेरुकुलु. मला फारसे आवडले नाही. (पण मला गोड पदार्थ कमीच आवडतात.)

अरे खसमपीटी तू समझ नै रई. मेरी बहू कू लड़का नै तो उस को बहू भी नै आती ना ? फिर उसकू सास का दरद कैसे मिलेंगा ? उस दरद कू रो रई मै >> Lol

बडी अम्मी Rofl

खसमपीटी म्हणजे विसकटून सांगा.

खसमपीटी म्हणजे विसकटून सांगा….

खसम = नवरा
खसमपीटी = पतीला बदडणारी, मारणारी ! किती मोठा गुन्हा तो Lol sacrilege of the highest order !!

वर ती “हौली” (slow/dumb) आणि “बला” (calamity) आहेच Lol

… शिव्या फार कल्पक आहेत …

बड़ी अम्मी मानते नै, सब कू गाली-गलौज करते उनो Happy

अश्लील नसलेल्या सर्व शिव्या देतील बडी अम्मी. जस्ट वॉच धिस स्पेस !

Pages