हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो Happy ते विसरलोच. सुरमाई बंजारा वगैरे फ्यूजन करतील हे लोक. माशांची इव्होल्यूशन सायकल स्किप करून सुरमाईला उभयचरच नव्हे तर डायरेक्ट माणूस व तो ही बंजारा करून.

हौ, बंजारा हिल्स स्पेशलच है हैद्राबाद मे. ज्युबली हिल्स भी.

जुबली हिल्स बाद मे आया ना, रईस लोगां पेहले बंजारा हिल्समेच आये देखो. तीन तीन ताज हॉटेलां अकेले बंजारा हिल मे, एकदूसरे कनेच. २०२१ मे सर्वे किये तो अकेले बंजारा हिल के प्रॉपर्टी का मार्किट व्हॅल्यू $ 27 Billion आरा ! रहने वालो की net worth और अलगच Happy

बाजूमेच जुबली हिल्स, उधर रेट और पैसा डबल. इसलिये ये दो एरीया बोले तो हैदराबाद की पुरानी रईसी और सुकून Happy

ये दो एरीया बोले तो हैदराबाद की पुरानी रईसी और सुकून>> अरे असं काय करता. ओरि जिनल बेगमे बंजाराहिल्स अबी मौजूद है. थोडा हिस्ट्री बतातुं अनिंद्य भाई लंबा पोस्ट होगा. माफी.

१९८५ मध्ये ग्रॅजुएशन संपवून मी हैद्राबादला गेले. तेव्हा मराठी कम्यु निटी नारायण गुडा, रामकोट बडी चौडी काचिगुडा व मधल्या भागात कॉन्सन्ट्रेट होती. हे पुणेरी मराठी नव्हेत. तर नांदेड व डेक्कन पठार, मराठवाडा इथले लोक्स जास्त करुन. जतकर, दहीभाते, बोरवण कर पळनीट कर असे. व सर्व एकमेकांना ओळख् त. टोपे मास्तर महारास्ठ्र मंड ळात वधुव र सूचक मंडळ चालवत. बॅडमिंटन कोर्ट ब्रिज स्पर्धा होत.
बडी चौडीतू न भाजी घेणे ही उपवर मुलींची पीक अ‍ॅक्टिव्हिटी होती. व पोरे तिथेच मंडरत असत. एका मराठी कुटुंबात सात मुली होत्या.
ममव व लोअर मिडल क्लास परिस्थितीतील सर्व लोक. पळनीट क र वगैरे खानदानी रिच. पण मराठी. एक पुंजका शाह अली बं डा व जवळच्या
भागात होता. मुले वि वेक वर्धिनी शाळेत जात. काचि गुडा लिंगमपल्ली भागात चौकात सावरकर पुतळा होता.

मला एक नोकरीचा कॉल आला तेव्हा मी पहिल्यांदा बस करुन व मग लुना घेउन पंजा गुट्टा परेन्त गेले. व जॉब करत असे. १९८६ ते १९८८. मग
१९८८ मध्ये ज्युबिलि हिल्स चेकपोस्ट मध्ये कॉपीरायटिम्/ग चा जॉब मिळाला. तेव्हा ही नावे कळ ली. नारायण गुडा ते ज्युबिली हिल्स लुना ने जात असे. रोड नंबर २ बंजारा हिल्स तेवा सिंगल लेन मातीचा रोड होता. गाडी बंद पडली की हातात घेउन चालत जावे लागे.

१९८८ मध्येच आम्ही बंजरा हिल्स रोड न बारा ऑपोझिट कमान येथे फ्लॅट घेतला. प्रशस्त टू बी एच के पेंट हाउस. व शिफ्ट झालो. इथून ऑफिस जवळ होते.

खालील सर्व भाग तुम्ही गुगल मॅप वर चेक करु शकाल.
मसब टेंक हा गर्दीचा भाग सोडला की प्रिमिअम असा रोड नं वन बंजारा हिल्स आहे. इथे ताज होटेल्स व रेड्डी लोकांची घरे आहेत. पंजाबी आहेत
रादर होते आता लोक्स विकून गेले आहेत मोठा इमारती उभ्या आहेत.
रो. नं वन ला काटकोनात साधारण रोड नं १२. तेव्हा हा अगदी शांत( प्रभात रोड लेव्हल) भाग. सुंदर बंगले, गुलमोहराची झाडे. वळण घेउन
पुढे ज्युबि ली हिल्स ला जातो. कमानच्या आतला भाग शेक पेट व्हिलेज. तर रो नं वन १२ व २ च्या मधला भाग म्हण जे बंजारा हिल्स. इथे बरीच वर्शे इमारतींना परवानगी नव्हती. बंगलेच फक्त. व प्रशस्त पुढे मागे बागा जंगले वाले. थोडी दुकाने थोड्या वस्त्या. माझ्या घराच्या शेजारी मिनिस्टर कॉलनी व खाली उतरले की रो नं १३. तिथे अझर राहात असे. व एन टी आरच्या दुसृया बायकोचे घर ही होते. बंजारा ताज ची मागची बाजु.

बंजारा हिल्स जास्त कॉस्मोपॉलिटन होती. खानदानी रईस मुस्लीम्स, पारशी, पंजाबी, तेलुगु. धनराजगीर - टाइप मायनर रॉयल लोक.
फार हिरवी गार स्वच्छ . सुंदर शाळा.
मला साधारण सर्व रोड माहीत आहेत. स्कूटर वरुन पालथे घातले आहेत.

रो.न् बारा पुढे जाउन फिल्म नगर. हे ज्युबिली हिल्स व बं हिल्स च्या मध्ये आहे. तिथे मिळतो व ज्यु बिली हिल्स सुरू होते. फिल्मी लोकांची घरे, स्टु डिओ व सपोर्ट सर्विसेस आहेत. मध्येच टेक डीवर अपोलो कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. खाली उतरले की ज्यु हिल्स.

उजव्या साइडला ४०० एकर चे निझामाचे गार्डन आहे. हा आता जॉ गरस पार्क आहे. रो नं दो न बंजारा हिल्स परेन्त आहे. फार मोठी बाग. खूप छान डेवलप्ड पारक आहे. रो नं २ रो नं १२ ला मिळतो ती एक पार्क शेजारून जाणारी आडवी गल्ली होती फार प्रिटी व इथे एक ज आकाराचा कर्व्ह होता. स्कूटर किंवा का र मधून जाताना मुले जाम एंजॉय करत व खिद ळत. आता हा रो न १२ ला मिळतो तिथे बीआर एसचे गावठी ओफिस आहे. अग्ली तेलुगु आर्किटेक्चर. हे आमच्या डोळ्ञा समोर उभे राहिले आहे. अगली पिंक कलर!!!

रो नं २ बं हिल्स ला आय हॉस्पिटल व अन्न पुर्णा स्टुडिओ आहे.
ज्युबिली हिल्स जास्त करुन मेजर तेलुगु लोक्स. जनरेशनल वेल्थ. प्रचंड मोठे प्लॉट व घरे. आमचे गॅस बुकिन्ग चे ऑफिस इथे होते.
ऑफिस होते.
इथून खाली उतरले की क्रिश्ना न गर. स्वस्तातली मेस मधील रसम राइस थाळी पापड मिळत असे.
रो नं ३६ वरुन खाली उतरले की पुढे डेवलप मेंट झाली. शिल्पारामम हायटेक सिटी आली. त्या पुढे जाउन गिरिश पार्क मध्ये मुलीची शाळा होती. आता ह्याच्या पुढे बंगलओर स्टाइल आयटी च्या इमारती, मॉल्स आय किआ आहे आहे. नानकराम गुडा आहे. फारच डेव्हलप झाले आहे.
पण पुर्वी एक सुरेख ज्यु हिल्स सिक्रेट लेक होते. आता त्या वरुन फ्लाय ओवर झाला आहे.
रो नं १० ब ंजारा हिल्स असाच एक सुरेख रस्ता. इथे दस्त कार कार्यकर्त्या बाईंचे दगडातच कोरलेले घर होते. फार मस्त. उझरा आपा त्यांचे नाव. एक एक बंगला बघण्या सारखा होता

एकेकाळी आमच्या घरातूनही गोळ को डा दिसत असे. व भरपूर वारा. रोड नं १२ टर्निन्गला एस बी आय चे ट्रेनिन्ग सेंटर व घरे आहेत. आठ दहा मजली इमारत. ह्यातून सुरेख गोळकोंडाचा नजारा दिस तो.

ज्युबिली बंजारा मध्ये इक्रिसॅट मध्ये काम कर णारी एक्स पॅट मंडळी होती. फ्राउके कादर. नोटेबल. इक्रिसॅट स्कूल होते त्या मुलांसाठी. आय बी वाले. रो, नं १० ब हि. वरच ओफेन बेक री होती जॅम टार्ट मिळ त. रो नं २ वर माउंटन बेकरी. फ्रेशेस्ट ऑफ ब्रेड्स. कोणी ही हिंदु मुस्लीम करत नव्ह ते. मशीदी देवळे होती. ट्रु कॉस्मोपोलिटन लाइफ. द अंग्रेज मध्ये दाखवलेले लेयर्स खरेच होते.

रो नं बारा वरुन खाली उतरऊन राइट घेतले की एअर्पोर्ट चा रस्ता.

अमा बहुत खूब ! जुन्या बंजारा हिल्स आणी एकूणच हैदराबाद की सैर कराए आप. जियो !

हा सर्व भाग नजरेखाली गेला आहे. २०११च्या आधीच्या आठवणी मात्र पुसट आहेत. नल्लागुंटा, गवलीगुडा, बेगमपेट, नामपल्ली आणि बंजारा हिल्स भागात कौटुंबिक स्नेही, आईकडचे नातेवाईक राहायचे. आता पांगलेत/ संपर्क क्षीण झालाय पण जुने-नवे हैदराबाद आवडते ते आवडतेच Happy

बहुत प्यारी पोस्ट लिखे तुम !

… रो नं २ वर माउंटन बेकरी. फ्रेशेस्ट ऑफ ब्रेड्स….

ती बेकरी आता भव्य चकाचक रेस्तरां चे रूप घेऊन खूप लोकप्रिय झाली आहे - सौ आणि त्यांची Girls Gang गेली होती काही महिन्याआधी. त्यांचे हे अपडेट Happy

छान विस्तृत माहिती अमा!
काही गोष्टी ऐकून माहिती होत्या. मराठवाड्याचा आणि हैदराबादचा घनिष्ठ संबंध आहे. निझाम, रझाकार, उस्मानिया विद्यापीठ हे ऐकतच मोठं झालोय. विवेकवर्धिनीत घरची काही वयस्क मंडळी होती. मागच्या पिढीपर्यंत मराठवाड्यावर पुण्यामुंबईपेक्षा हैदराबादचा प्रभाव जास्त होता. जुन्या पिढीचा संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे कल होता. बरेच नातेवाईक तिथं रहायचे किंवा शिक्षणासाठी तिथं जायचे. आता पुण्याला जातात.

घरी सुद्धा 'अरे, 'ताज्जुब' आहे तीन शिट्ट्या होऊनही डाळ शिजली नाही'. असं म्हणणारी माणसं आहेत. काय 'ताज्जुब' आहे बरं Lol

*तअज्जुब - कमाल, आश्चर्य.

बहुत प्यारी पोस्ट लिखे तुम ! >>> +१ मस्त माहिती अमा. मला फक्त नामपल्ली, काचीगुडा, सालार जंग, चार मिनार माहीत होते. नंतर आयटीचा तो एरिया (नक्की नाव लक्षात नाही पण नवीन एअरपोर्ट वरून येणारा मोठा रस्ता जेथे एकदम गावाला मिळतो तेथे जवळ आहे) व बहुधा एकदम दुसर्‍या टोकाला सैनिकपुरा माहीत झाले.

'ताज्जुब' आहे तीन शिट्ट्या होऊनही डाळ शिजली नाही' >>> Happy Happy

मस्त माहिती अमा.
त्या एरीआमधून रात्री जाताना फार छान वाटायचं…

अस्मिता >>> एकेकाळी मराठवाडा हैद्राबाद संस्थानाचा भाग होतं ना?

हो, माझेमन. म्हणूनच! निझामाचा प्रभाव गेला तसा शाळांतून हळुहळू उर्दू जाऊन संस्कृत भाषा आली. मागच्या पिढीपर्यंत संस्कृतविषयी फार आस्था नव्हती. आम्हाला मात्र थोडी संस्कृत व बरी मराठी मिळाली. त्याची सुद्धा गंमत आहे पण. Happy
घरीदारीशेजारी मराठवाडा मुक्तीसंग्रामातली लोक होती.

पण पुर्वी एक सुरेख ज्यु हिल्स सिक्रेट लेक होते. आता त्या वरुन फ्लाय ओवर झाला आहे.>> secret नव्हे खरं तर. जिथे जाणे कठीण असे ते "दुर्गम." आणि तलाव / पाणवठा/ मोठा तलाव म्हणजे "चेरुवु". "दुर्गम चेरुवु" त्याचे नाव. (भलत्या ठिकाणी, जाण्यास कठीण असा मोठाच तलाव). हा तीन किमी लांब व पाऊण किमी रुंद, जरा वक्राकार तलाव होता. दुर्गम म्हणजे सिक्रेट ते दुर्गम म्हणजे दुर्गा देवीचा अशा वदंता अहेत. पूर्वी इथे ज्युबिली हिल्स बाजुने जाऊन मग ट्रेक डाउन करत खाली उतरावे लागे. तर दुसर्‍या बाजुने मोठे मोठे खडक ओलांडुन जावे लागे. १९८५ आसपास दोन्हीकडुन बर्‍यापैकी रस्ते झाले. पुढे (२००० साली गेलो तेव्हा) ज्युबिली हिल्स वरुन उतरायला पायर्‍या सुद्धा केल्या. आणि तलावात दोन्ही बाजुने (ज्युबिली हिल्स बाजुने उतरल्यावर) बोटिंग सुरु झाले.
तेव्हा ज्युबिली हिल्स बाजुने तिथे आणखी डेव्हलपमेंट सुरु झाली. पार्क, खडकांच्या मध्ये छोटे स्टॉल्स वगैरे.
एका बाजुला थोडे उतरुन सपाट जागी एक रेस्टॉरंट / फंक्शन हॉल सुरु झाला.
त्या जागेचे एक वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात तिथे अचानक भयंकर वारे सुटे आणि बोटी एका टोकला खेचल्या जात. तिथे उतरुन मग ट्रेक करत वर चढत येणे हाच एक मार्ग असे. त्या रेस्टॉरंट मधुन ही बाजु स्पष्ट दिसत असे.
आता तो एका बाजुने ओलांडायला केबल ब्रिज सुरु झालाय.

गेल्या डिसेंबरात दूषित पाण्यामुळे याच चेरवूतले शेकडो मासे मरून पडल्याचे फोटो स्थानिक पेपरात पाहिले होते.

हे लोकेशन ख़ास आहे. अलिकडे जुना नी पलीकडे मधापुर साइडचा नवा उत्तुंग चकचकीत इमारतींचा भाग, मधला तलावाच पाणी आणि national park चा हिरवागार झाडीयुक्त भाग … stunning juxtaposition of the irrelevants Happy

>>>>>एकेकाळी आमच्या घरातूनही गोळ को डा दिसत असे. व भरपूर वारा. रोड नं १२ टर्निन्गला एस बी आय चे ट्रेनिन्ग सेंटर व घरे आहेत. आठ दहा मजली इमारत. ह्यातून सुरेख गोळकोंडाचा नजारा दिस तो.
क्या बात है!

हैदराबादी ईस्कूल का लंचटाईम सीन है :

मास्टरजी : क्या लाया रे आज तू खाने के वास्ते ?

फजलू : बिरियानी दिए अम्मी आज. गोश्त के साथ में

- मेरे कू देता क्या? आज मैं नै लाया कुच्च बी खाने कू

- हौ. ले लेना

- घर पे अम्मी पूछेंगे ना तेरे कू खाना कौन खाया बोल के ?

- फिकर नक्को करो. उनों पूछे तो कुत्ता खा लिया बोल दूँगा Lol

@ अमितव
@ माधव
@ मानव

मागील पानांवर तुमच्या प्रतिसादांमुळे बोबटलु आणि पोथरेकुलु मिठायांची चविष्ट चर्चा रंगली होती.

नुकताच हैदराबादचा धावता दौरा झाला तेव्हां पाडवा/ उगादी निमित्त विमानतळावर दोन्ही विकायला मांडून ठेवलेल्या होत्या. Out of all places, in Karachi Backarey outlet !

b5143f1f-1b50-46ee-a7fc-7e901ca4845c.jpeg

चांगले पोथरेकुलु शुभ्र आणि जास्त पापुद्रे असलेले अपेक्षित असतात तसे नव्हते. बोबटलु साधे हरबरा डाळीचे पुरण असलेले होते. नाही घेतले. Happy

79f40945-b117-4c18-b911-e131028e6fb7.jpeg

हे फोटो तुमच्यासाठी.

पोथरेकुलू म्हणजे तांदळाच्या पेजेचं आवरण असलेली आणि आत गुळाचं , तुपाचं पुरण असलेली मिठाई ना..?
एकदा मैत्रिणीला तिच्या हैद्राबादच्या मैत्रिणीने दिलेली .. तिने मला दिलेली.. आम्हांला दोघींनाही नाव माहित नव्हतं मिठाईचं..!

मला त्या मिठाईची चव आवडली होती.. मी डिसेंबरला जेव्हा हैद्राबादला गेले होते तेव्हा टॅक्सीवाल्याला पहिला प्रश्न विचारला .. हैद्राबादमध्ये मिठाईचं कोणतं दुकान फेमस आहे ..?? त्याने रेड्डी असं नाव सांगितलं होतं..
परतायच्या आदल्या दिवशी खास रेड्डीचं मिठाईचं दुकान शोधलं आणि दुकानातल्या शोकेसमध्ये पाहून हि मिठाई शोधली आणि विकत घेतली.. तुम्ही फोटो टाकला म्हणून आज नाव समजलं मिठाईचं..!

पुल्ला रेड्डी आहेत इथले प्रसिद्ध मिठाईवाले.
बोबटलुत गुळाचे पुरण असते बहुतकरून. दूध तूप घालुन कुस्करुन खातात. नाहीतर खूप कोरडे वाटते.

चांगले पोथरेकुलु शुभ्र आणि जास्त पापुद्रे असलेले अपेक्षित असतात. >>> हो हो. उगाच राजेशाही करण्याच्या नादात त्यावर सुकामेवा घालतात ते खूप विसंगत वाटले मला. रंग तर बिघडतोच पण पोथरेकुलुची खरी मजा असते ती तो जीभेवर विरघळण्याची. सुक्यामेव्यामुळे तो अनुभवालाच गालबोट लागते. साधे प्लेन पोथरेकुलु सगळ्यात बेष्ट !!

साधे प्लेन पोथरेकुलु सगळ्यात बेष्ट !!

+ १

माधव, एकदम सहमत.

पारंपरिक शुभ्र तलम पोथरेकुलु बेस्टाय. ते तसेच आवडते, उगा सुकामेवा फ्यूजन नक्को Happy

….आमंड हाऊसचे पुथरूकेलु …

हे ट्राय करणार !

Nutty Delights - आख्खे काजू, गूळ आणि चमचाभर शुद्ध तूप इतक्याच किरकोळ भांडवलावर हैदराबाद / तेलंगाना स्पेशल बेल्लम मिठाई (काजूपाक ) करतात. Top class. घरची सर्वोत्तम. त्या खालोखाल बादामघर ची बेस्ट.

ये लो लोगॉं…. जुम्मे के दिन जुम्मन स्पेशल Happy

जुम्मन:

ग़ैर औरत कू हाथ लगाए तो ईमान टूट जाता क्या मौलवी साब ?

जवाब:

ज़माना अल्लग है और ये हैदराबाद है जुम्मन. हाथ लगा के देखेंगा तू हाथॉं पैरां दाताँ सब टूट जाते देखो Proud Proud Proud

Pages