तुम्ही या उन्हाळ्यात काय बेत आखताय ...

Submitted by च्रप्स on 23 April, 2022 - 11:45

उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...

समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...

झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...

माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...

विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा सर आमच्या कणकवली तालुक्यातले
सर कदी कार ने जातलाव तर नांदगाव तिठ्यार कोनाक पण इचारा टग्या खंय रवता म्हणान, दोन मिंटात घरी आणान सोडतले. पण मेल्यानी आता फ्लायोवर बांदल्यानी तेच्या खालून जावचा लागतला

मी स्वाती ठाकर नावाच्या व्यक्तीचं फेसबुक अकाउंट अनेक माबोकारांच्या फ्रेंडलिस्ट मध्ये पाहिलं आहे. मला मुक्तपीठ वरती ते फेक असावं असं वाटायचं कारण यांच्या प्रतिक्रिया बऱ्याच सेन्सिबाल असतात

अरे व्वा सर आमच्या कणकवली तालुक्यातले
सर कदी कार ने जातलाव >>>> हेलिकॉप्टर व्यत्यय, विसरलात लगेच.. उन्हाळ्यात फिरायचे असल्यास हेलिकॉप्टरला पर्याय नाही. डोक्यावर पंखा चालू राहतो Happy

स्वाती ठकार, विदर्भवाला बबन,ताम्हणी घाटातले पहिला उन्हाळा फेम काका(सरस्वती चंद्र?) आणि डिकीत बसलेली सप्तर्षींची मांजर पण आठवली. लुना फेम ब्रम्हे काकांचा फोटो खूपच फनी होता.
अजूनन एक लेख आठवतोय- एका काकूंच्या मुलाने जुनी भांडी रचून म्युरल बनवलं होतं. तिथेही लोक पेटले होते.

एकदम स्ट्रेसबस्टर व्हायला लागलाय हा धागा.... मागच्या धाग्यावरचे प्रतिसाद मस्त सगळे ..
एके काळी ऑफिसमधे मॅनेजर किंवा तत्सम व्यक्तीशी वाजलं की मी मुक्तपीठ चं पान उघडुन प्रतिसाद वाचत बसायचे... लगेच डोकं शांत आणि मन आनंदी व्हायचं Wink ( हे वाक्य एकदम मुक्तपीठीय्/दवणीय झालंय Wink )

समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय. >> आंबे, आमरस,पन्हं, कैरी डाळ, कराड, घाटावर थंड वारा खात भटकणे, झालंच तर उन्हाळी पापड्या/वाळवणं करायची हौस ( सोशल मिडीयाच्या फोटोपुरती ही ही ही ) करुन घेणे असे प्लॅन आहेत....

त्या बबनने एकदा 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' असं लिहिलं होतं आणि खाली बहुतेक विदर्भ नावाच्या आयडीने 'वेगळा बबन झालाच पाहिजे' असं लिहिलं होतं!! (हे दोन्ही आयडी एकाच माणसाचेही असतील)

मी माझ्या तिन्ही घरांना बाहेरून जिना काढायचा बेत आखतोय. तञांनी मार्गदर्शन करावे.

इथं विदर्भात प्यायला पाणी नाही आणि इथं लोकांना घराला जिने बांधायचे आहेत
ते काही नाही, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
- बबन

माझ्या भाच्याच नाव समर आहे. पण तो एवढा काही गरम नाही.

लुनावाले ब्रह्मेंचा फोटो बघितल्याने लोक "सात्विकरित्या" जाम संतापले आणी मग त्या लेखाने इतिहास घडवला.

>> उन्हाळ्यात फिरायचे असल्यास हेलिकॉप्टरला पर्याय नाही. डोक्यावर पंखा चालू राहतो
चालात सर, कायेव प्रॉब्लेम नाय. फक्त पार्किंग सड्यार करूचा लागतला नायतर तुमचो पंखो माडांक अडाकतलो.

व्यत्यय, आमचे ईतके हेलिकॉप्टर असताना आम्ही जागोजागी हेलिपॅड बांधले नसेल का?
असो, लहानपणी आम्ही जेव्हा गरीब होतो आणि चाळीत राहायचो तेव्हा असली हेलिकॉप्टरची थेरं परवडायची नाहीत. तेव्हा समुद्रमार्गे वल्हव रे नाखवा करत कोकण फिरायचो.
जिथून सुटायचो त्या आमच्या भाऊच्या धक्क्याचा उल्लेख मागे मी एका लेखातही केलेला.
समुद्रावरचे प्रेम तिथूनच सुरू झाले.
https://www.maayboli.com/node/46466

आमच्या गावामंदी येक जन पुरा दिन शारुक शारुक बोंबलत हिंडतो. आमी पोट्टे घसा वल्ला कराले बसलो की त्यालेबी बलावतो. दोन घोट त्याच्या घशात वतले की लै भारी बाता करतो. कदी सांगतो शारुकने मन्नत वर बलावले, स्वता चपात्या रांधुन जेवाले घातले. कदी सांगतो हॅलीकॅप्टर सर्विसिंगले टाकले म्हणुन पैदल आलो. लै मजा. फुल्ल टाइमपास.

विनोदी प्रतिसाद आहेत. हेलिपॅड, माठ , जिना Lol
उन्हाळी सुट्टी म्हणलं की आजोळी जायचं. वाडयात बरेचजण एकत्र यायचे , मोठी बाग ही होती . भरपूर फुलं गोळा करायची . त्याच्या वाटण्या करायच्या संध्याकाळी बाहेर जाताना डोक्याचा फ्लॉवर पॉट करायला. सकाळी पाणी तापवायल चुलीसमोर आळीपाळीने बसून आठळ्या, वांगी, रताळी काही ना काही भाजून घ्यायच. ते नसेल तर झावळ्याच्या रेषा काढून त्याचे खराटे बनवायचे. म्हणजे ज्येष्ठ बनवायचे आम्ही पोरसोर लगेच कोपीकॅट. दिवसभर धुडगूस, दुपारी पुस्तकं वाचन, तासन्तास व्यापार खेळणं, नाहीतर पत्ते ,कॅरम , नाहीतर आंबे खात बसणं . 5 वाजले की घाटावर जायचं. नदीत डुंबायच, दगड टप्पे खेळायचे, वाळूचे बोगदे बनवायचे. घरातून नेलेले चिरमुरे , भडंग खायचे, चैत्रा गोरीच्या हळदीकुंकवाला पेठेतल्या झाडून सगळ्या घरात जायचं निव्वळ पन्ह आणि आंबेडाळ खायला ( किती हावरट पणा होता) . रात्री घरी येऊन स्तोत्रपठण , पंगती करून जेवण, ते झालं की पत्र्यावर गाद्या टाकून रातराणीचा, जाईचा वास घेत भुताखेतच्या गोष्टी . वळवाचा पाऊस आला की आपापल्या गादया गुंडाळून पडवीत झोपणे.
हे सुखाचं , स्वस्तातलं आता काही नाही राहीलं.
कुठेतरी जाऊन येऊ पण जवळपासच. लेकाला सुट्ट्या नाहीत आता. दोन तीन दिवसच. आधी दवंडी पिटवली की माझं कॅन्सल होतं काही ना काही कारणाने , जाऊन आल्यावर सांगीन.

छान पोस्ट वर्णिता

हे सुखाचं , स्वस्तातलं आता काही नाही राहीलं.
>>>>>
+७८६

उन्हाळ्यात जेव्हा कुठे जाणे होत नाही तेव्हा आम्ही हेलिकॉप्टर असे छताला टांगतो. त्याच्या पंख्याची हवा खायची आता सवयच झाली आहे जणू..

imagescreative-ceiling-fan1.jpg

हा हा हा ,
हे कायप्पावर आलं होतं तेव्हा तुमचीच आठवण आलेली मला.
तुमच्या घरातला पंखा असावा हा म्हणून . Light 1

@ वर्णिता,
हो मला माहीत आहे. तोच फोटो आहे हा. त्यावरची लाईन काढून वापरलाय Proud

मलाही हेलिकॉप्टर असंच उलटं उडवायला आवडतं. वर आलेल्या बुडाच्या सपाट पुष्टबाजूवर बसून मुहब्बते मधल्या सारखे गटार वाजवत गाणे म्हणणे हा आवडता छंद आहे.

मी रोज १०,००० पावले चालण्याचा बेत आखते आहे. गेले ४ दिवस यश आलेले आहे. हा उन्हाळाभर नेम करते आहे. आजही १०,६०० पावले झाली. पण दमछाक होते. सकाळी ५०० व संध्याकाळी ५०० केली पाहीजेत.

Submitted by सामो on 26 April, 2022 - 19:03 >>>>>>>>>>>> उरलेल्या ९००० कधी चालणार ???

Pages