Submitted by च्रप्स on 23 April, 2022 - 11:45
उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...
समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...
झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...
माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...
विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा - हैद्राबाद बेस्ट... शाग
अमा - हैद्राबाद बेस्ट... शाग हाऊस , बावर्ची. आहेच पण जमले तर चार मिनार जवळ शादाब आहे ते ट्राय कराच...
पण रेल्वेने जाणारे दोन तीन
पण रेल्वेने जाणारे दोन तीन महिने अगोदरच ,समर प्लान करू शकतात.
आईची_लेक छान प्रतिसाद. आमरस,
आईची_लेक छान प्रतिसाद. आमरस, सरबत इ मज्जा असते.
)
(असं "समर" का शीर्षक दिलं? मराठीत समर माणसाचे नाव असते किंवा बहुतेक तो युद्धाला समानार्थी शब्द आहे. असं "समर एंजॉय करायला उत्सुक" म्हणजे... कसंतरी वाटतं...
असं "समर" का शीर्षक दिलं?
असं "समर" का शीर्षक दिलं? मराठीत समर माणसाचे नाव असते किंवा बहुतेक तो युद्धाला समानार्थी शब्द आहे. असं "समर एंजॉय करायला उत्सुक" म्हणजे... कसंतरी वाटतं..
>>> मी स्प्रिंग नंतर येतो तो अशा कॉन्टेक्सट ने लिहिले... बदलून उन्हाळा करतो थोड्या वेळाने... समर म्हणजे युद्ध माहित नव्हते...
आणि समर मराठी माणसाचे नाव आहे हेही माहित नव्हते... इकडे समर मुलींचे नाव असते हे पाहिले आहे...
धन्यवाद. हो, समर मुलीचे नाव
धन्यवाद. हो, समर मुलीचे नाव ठेवतात. ५०० डेज ऑफ समर असा सिनेमापण आहे.
मराठीत "समर" नाव एका मालिकेतच ऐकले होते. खरंच मराठी घरात अशी नावे ठेवतात का ते माहिती नाही. पण संग्राम ठेवतात तेव्हा समर ही ठेवत असतील असा विचार केला होता.
'समरां'गणी धारातीर्थी,
'समरां'गणी धारातीर्थी, उन्हाळ्यातील उकाड्याने आलेल्या घामांच्या धारांनी हवालदील असा नवीन अर्थही निघतो.
मी न्यूयॉर्कला जाईन.
किंवा
क्रूज नॉर्वेजियन/अलास्का
किंवा
ह्यूस्टन नासा
किंवा
घरीच !!!
लहानपणी पुस्तकं, कैरी, दडपे पोहे, पन्हं, नवीन स्तोत्रं ,लपंडाव, गच्चीवर झोपणे, आजोळी गुऱ्हाळाला, शेतात ओढ्यावर खेळायला जायचो, वासराला पाणी पाजायचो, लग्नाला जायचो मगं परतीचा मुरमुऱ्याचा चिवडा हाणायचा, काकू आजींचं चांदीच्या ग्लासातून दिलेलं श्रीखंड गिळायचं, मोठं झाल्यानं बिघडलं.
लॉक डाऊण वर्शाच्या समर मध्ये
लॉक डाऊण वर्शाच्या समर मध्ये स्विस मधून बर्निना एक्स्प्रेस घ्यायची त्यातून मिलान मध्ये उतरायचे तिथे दोन तीन दिवस मजा करायची असा अगदी प्लान केलेला. तो ढासळला. आता लेक बिझी झाली आहे. रजा मिळत नाही.
ग्रीस सांतोरिनी पण जायचे आहे कोणी इंट्रे स्टेड असल्यास बघा गृप करुन जाउ. मी फिरून आले की खोलीत गडप टाइप टुरीस्ट आहे. आजिबात त्रास देत नाही.
अॅमस्टर डॅम कधी कधीही रेडी आहे.
नाव मराठीत बदलले, आवडलं.
नाव मराठीत बदलले, आवडलं.
समर नाव मराठी मालिकेत मी
समर नाव मराठी मालिकेत मी सुद्धा ऐकले आहे. पण प्रत्यक्षात नाही.
कॉलेजात असताना समरप्रताप सिंग नावाचा माझा एक हिंदीभाषिक मित्र होता.
असो, धाग्याचे नाव मराठी केले हे बरे केले. आता रिलेट होता येतेय धाग्याशी.
आम्ही पण 4-5 मे ला महाबळेश्वर
आम्ही पण 4-5 मे ला महाबळेश्वर जाण्याचा प्लॅन करतोय...माझी लहान मुलगी 2 वर्षांची आहे त्यामुळे थोडा उन्हाचा विचार करतोय..महाबळेश्वरला उन्हाळ्यात कसं weather असतं ..म्हणजे लहान मुलांना घेऊन दुपारी फिरता येईल का?
एक समर नखाते म्हणून
एक समर नखाते म्हणून व्यक्तिमत्व आहे.
पण समर छान वाट्ते. समर इज बीचेस, सँडल स , पोलका डॉट ड्रेसेस, सोनेरी बीअर. गोगो गॉगल्स. मोठी हॅट.
उन्हाळा घरगुती.
हैद्राबादी शब्द धूप कला. किदर जाते धूप कलेमें घरपेइच बैठो सुकूनसे. मशहूर आइसक्रीम खाओ.
रूम थंड करून लोळणे. पहिल्या
रूम थंड करून लोळणे. पहिल्या पावसात गारा वेचणे. आमरस करणे.
( उच्चशिक्षित सुनेचा पहिला उन्हाळा म्हणून कोकणात समुद्रावर गेलेल्या कुटुंबाचा येतानाचा ताम्हिणी घाटातला अनुभव असं काहीतरी मुक्तपीठात गाजलं होतं त्याची आठवण झाली.)
रा.भु, मस्त मेमरी तुझी.
रा.भु, मस्त मेमरी तुझी.
ते ब्रेक खाली बाटली आली ते ना?
धमाल होता तो काळ आणि मुक्त पीठ धाग्यांवरच्या कमेंट्स.चालणारी आमसुलं, वाघाने धरलं असतं तर वगैरे वगैरे.
मूळ धाग्याशी संबंधित:
उन्हाळ्यात जवळपास कुठेतरी आणि जून मध्ये वेगळ्या राज्यात असा आताचा बेत आहे.पण त्यावेळची स्थिती बघून ठरवण्यात येईल.
ब्रम्हे आणि त्यांची लुना
ब्रम्हे आणि त्यांची लुना याशिवाय मुक्तपीठ अधुरं आहे
काय गरज आहे का जायची? ऊन
काय गरज आहे का जायची? ऊन मरणाचं आहे गप्प घरी बसता येत नाही का? दोन वर्षे सगळी टुरिस्ट लोकेशन छान होती. माणसं जिकडे तिकडे जाऊन आता पुन्हा घाण करायला सुरवात करणार.
1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू
1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू झाले
मागच्या वर्षातील सुट्ट्या मरतात
नवीन वर्षात प्रतिमहिना 2 प्रमाणेच मिळतात.
मार्च मध्ये गेट वे ऑफ इंडियावर बोटीत बसून आलो
त्यामुळे इथेच रहाणार
अश्विनीमावशी,
अश्विनीमावशी,
सांतोरिनी माझी पण ईच्छा आहे. बघू केंव्हा योग येतो ते!
तोपर्यंत घरातल्या भिंतिंवर निळे-पांढरे करून - हीच माझी सांतोरिनी - असे करून झालेयः
ताम्हिणी घाटातला अनुभव असं
ताम्हिणी घाटातला अनुभव असं काहीतरी मुक्तपीठात गाजलं होतं >>> जिथे तिथे सगळे आठवण काढत असतात. एव्हढे काय आहे हे पहायला पाहीजे आता. लिंक मिळेल का ?
एक फेसबुक पेज होतं.पण तिथलं
एक फेसबुक पेज होतं.पण तिथलं पण सगळं काढलंय आता.
पण समर छान वाट्ते. समर इज
पण समर छान वाट्ते. समर इज बीचेस, सँडल स , पोलका डॉट ड्रेसेस, सोनेरी बीअर. गोगो गॉगल्स. मोठी हॅट. >>
क्या बात अमा. लिस्टमधली मोठी हॅट नाय मिळाली म्हणून हृतिक आणला पण बाकी लिष्ट पूर्न हाय.... आणि ह्यो आपला कुरडईछाप उन्हाळा...
मुक्तपीठवरची चालणारी आमसुलं
मुक्तपीठवरची चालणारी आमसुलं आठवतात का कुणाला
चालणारी आमसुलं >>> मिसलं
चालणारी आमसुलं >>>
मिसलं बहुतेक ते रत्न.
शाहरूखजी, गुगल करा ना. चार चमचे ताम्हिणी घाट, चिमूटभर मुक्तपीठ घाला त्यात.
प्रत्येक वेळी इंग्रजी-शेमिंग
प्रत्येक वेळी इंग्रजी-शेमिंग करायची गरज नाही.
समर ची vibe उन्हाळा ला नाही.
उद्या ब्रेड ला चपाती म्हणाल.
परवा बीच स्लिपर्स ना चौपाटीचपला म्हणाल.
तेरवा सनड्रेस ला सूर्यझगा म्हणाल.
बिकिनी ला चड्डीचोळी म्हणाल.
कसं वाटलं प्राज्ञ मराठी?
घाटात फुटला घाम असा लेख होता
घाटात फुटला घाम असा लेख होता तो
कोणीतरी निवृत्त काकांनी लिहिला होता
हा लेख, सप्तर्षीचे मांजर, लुनावाले ब्रह्मे, इस्राएल ची यासोना सीसोदा की असंच काहीतरी नावाची बाई, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे वाला बबन
हे सगळं अविस्मरणीय होतं
उगाच बंद झालं
उद्या ब्रेड ला चपाती म्हणाल>>
उद्या ब्रेड ला चपाती म्हणाल>>>>
पाव असा शब्द असताना का म्हणतील चपाती?
कारण पाव हा पोर्तुगीज शब्द
कारण पाव हा पोर्तुगीज शब्द आहे आणि आपण भाषाभिमानी आहोत.
भावानुवाद बरोबर आहे की.
भावानुवाद बरोबर आहे की.
इंग्लीश मधे ब्रेडला जो मान आहे तो हिंदीत रोटीला आणि मराठीत चपाती / भाकरीला.
ब्रेड अॅण्ड बटर, रोजीरोटी.... पण मराठीत दोन वेळची भाकर म्हणतात.
पाव वरून फॉक्सपूर्स मँगोलोडी यू मी पाव हे आठवलं.
आपण भाषाभिमानी आहोत.>>>>
आपण भाषाभिमानी आहोत.>>>>
हे कधीपासून झालं?
परकीय शब्द लिहायला घेतले तर यादी संपायची नाही मराठीत आलेले
अवांतर तरी लिहीते - बिकीनीचे
अवांतर तरी लिहीते - बिकीनीचे भाषांतर आवश्यक नाही कारण ते गावाचे नाव आहे. आपल्याकडे जशी पैठण वरून "पैठणी" असते तसं बिकीनी अटोल गावावरून बिकीनी आहे. तिथे पहिली (का दुसरी) अणुबाँब चाचणी झाली होती. बिकीनी तोकडी म्हणून त्याकाळात अणुबाँब इतकी स्फोटक ! सबब त्या डिझायनरने "बिकीनी" नाव दिले.
इंटरेस्टिंग माहिती
इंटरेस्टिंग माहिती
हे अजिबातच माहिती नव्हते
बरे झाले त्या जागेचे नाव बिकिनी होते, कुठं रशियाला मिळाला असता तर स्टालिनग्राड ठेवलं असतं
आणि मग त्यावर बंदी घातली असती
Pages