तुम्ही या उन्हाळ्यात काय बेत आखताय ...

Submitted by च्रप्स on 23 April, 2022 - 11:45

उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...

समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...

झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...

माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...

विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Now you have even more of a reason to enjoy your shower time. The word shampoo comes from Hindi, and means ‘to massage’. Derived from the Sanskrit root chapati (चपति), the word initially referred to any type of pressing, kneading, or soothing. The definition was later extended to mean ‘wash the hair’ in 1860, and it was only in the 1950s that its meaning was further extended to refer to the washing of carpets and other materials.

नई चपातीचे पीठ डोक्याला लावत
पण मग चिकट व्हायला लागलं डोकं
मग चिकट च हवं आहे तर फेस का नको
मग शाम्पू आणला

तरी त्यात कंडिशनर नावाचा शाम्पू असतो तो भिकार
त्याला फेस च येत नाही
बळच इतका महाग असतो

Lol

सी नवी माहिती.

आमच्या उन्हाळ्याचे काहीही प्लान नाहीत.. मुलं वैताग आणाणरेत घरात, तो मुकाट सोसायचा.

ब्रेकखाली चेंडू आला होता बहुतेक ताम्हिणी घाटात.

मुक्तपीठ म्हटलं की अजून एक आठवतं ते म्हणजे हिग्ज बोसॉन. मूळ लेखाचा विषय काय होता ते अजिबात आठवत नाही. लेख तसा बरा होता, पण शेवटी लिहिलं होतं की आता इतके नवीन शोध लागलेत, हिग्ज बोसॉन इत्यादी. पण तरी आपण माणुसकी विसरू नये वगैरे वगैरे काही तरी.

आरे हे काय चाललेय मंडळी.
चरस्प सायेबानी लोकाईचे हीत पाहुन धागा काढला आणी तुमी लोके काय चावळुन रायले. आता सायबाले प्रतीसाद उडवत बसाव लागेल बगा.

हो तर ब्रेक खाली चेंडूच ताम्हिणी घाटात, अमेरिकन जावई ज्याला सगळी अमेरिका ओळखते तो लेख आणि ऑल टाइम हिट लुनावले ब्रह्मे, सकाळने ते सदर आणि त्याखाली कमेंट करायची सोय काढली आणि पायावर धोंडा मारून घेतला Proud इथे माबोवर आपण केलाय की टीपी प्रतिक्रिया सकट Proud तो एक बबन असे जो विदर्भावर प्रतिक्रिया देई आणि ती इस्रायली यार्देना की सारदेना??

ती यार्देना सासोन्कर इस्राइल . अरे इथे बरेच मुपी फॅन आहेत की Happy अजून एक भयंकर विनोदी प्रतिक्रिया देणारा आयडी स्वाती ठकार !! Lol "मी हे वाचून केला तत्कार आणि डोळे फिरवून दिला हुंकार " वगैरे काहीही लिहायची पण ते वाचताना फार फनी वाटायचे.

सकाळने ते सदर आणि त्याखाली कमेंट करायची सोय काढली आणि पायावर धोंडा मारून घेतला>>>
धोंडा कसला, हिट झाला मामला तो एकदम
सकाळ ला कल्पनाही नसेल की हे सदर इतकं हिट होईल म्हणून

लोकहो किती अवांतर, मायबोलीचे मुक्तपीठ करत आहात का Happy

धागा विषयावर नेतो.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटले की कोकणातल्या गावाकडे जायचे.
आंबे फणस आणि करवंदे खूप हादडायला मिळायचे मात्र बिना बिकीनीचे शरीर काळे होऊन यायचे.

सर धाग्याचा विषय तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा एकदा वाचा

या उन्हाळ्यात तुम्ही काय बेत आखताय

तुम्ही लहानपणी काय केलं, कुठले डोंगर जाळले हे वाचून काय करायचं आहे लोकांनी?
जरा स्वतःच्या आरत्या गाणं कमी करा आणि धाग्याचा विषयावर पोस्ट टाकायला शिका

म्हणजे जमत असलं तर
नैतर काय पालथा घडा आहेच तुमचा Happy

आशुचॅम्प काढली म्हणजे बंद केली असे म्हणायचे होते. लोल स्वाती ठकार पण जाम जहाल न अर्थहीन कमेंट द्यायची Happy

हिग्ज बोसॉनवाल्या लेखाखाली हिग्ज बोसॉन नावाच्याच आयडीची प्रतिक्रिया होती की अरे माझा काय संबंध? Lol

@धागाविषय
यावर्षी एप्रिलमध्ये चक्राताला (डेहराडूनजवळ) जाऊन आलोय. भर उन्हाळ्यातही थंडीत कुडकुडलो तिकडे.

नई चपातीचे पीठ डोक्याला लावत >> काय मस्करी करता राव ? जेव्हां शांपू नव्हते तेव्हापासून पॅराशूट लावायचे डोक्याला.
चपातीच्या पीठात स्टार्चिज असते. ते केसाला चालते का ?

हा हा तसं, बंद केली या अर्थी
हो ना, फार मोठ्या करमणुकीला मुकला समाज

अजून एक भयंकर विनोदी प्रतिक्रिया देणारा आयडी स्वाती ठकार >>>

या नाही आठवत फारशा

पण ती यार्दोना आठवते आणि नंतर एक आली तीने ओरीजनल यार्दोना इस्त्रायलकर का असं काहीतरी नाव घेतलेलं

जेव्हां शांपू नव्हते तेव्हापासून पॅराशूट लावायचे डोक्याला>>>

डोक्याला पॅरेशूट लावले तर विमानातून काय तेलकट पॅरेशूट घेऊन उडी मारायची का लोकांनी
मुळात एकदा वापरलेले पॅरेशूट आणि गाडीतल्या एअर बॅग्स परत वापरू नये म्हणतात

खखोदेजा

सर तुमच्या कोकणातील गावाचे नाव कळेल काय?
>>>
कोकणात आमची तीन गावे आहेत.
एक आईचे ओसरगाव,
वडीलांची दोन आहेत, जुने साळशी, नवे मौजे येडगाव..
कोणी आहे का तिथले ईथे.. असल्यास गावचा एक स्वतंत्र धागा काढूया Happy

विदर्भात जाणार. विदर्भाचा अनुशेष भरुन निघालाच पाहिजे!
>>>>
उन्हाळ्यात Sad
मी राहिलोय गडचिरोलीला उन्हाळ्यात.. आज जिंवत आहे ते वेळीच पळून आल्याने Happy

मी रोज १०,००० पावले चालण्याचा बेत आखते आहे. गेले ४ दिवस यश आलेले आहे. हा उन्हाळाभर नेम करते आहे. आजही १०,६०० पावले झाली. पण दमछाक होते. सकाळी ५०० व संध्याकाळी ५०० केली पाहीजेत.

समजा, या उन्हाळ्यात विषयांतराचा बेत आखला तर तो विषयाला धरून होईल ना ?

Pages