तुम्ही या उन्हाळ्यात काय बेत आखताय ...

Submitted by च्रप्स on 23 April, 2022 - 11:45

उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...

समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...

झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...

माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...

विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी राणीची बाग, हॅंगिंग गार्डन, कमला नेहरू पार्क, गिरगाव चौपाटी आणि गेट वे ॲाफ इंडिया फिरून आले.. पुढच्या विकेंडला लोणावळ्याला जाणार आहे

आम्ही नायगाराचा प्लॅन करत होतो. पण तो वॉटरफॉल असल्याकारणाने फक्त फॉल सिजन मध्येच चालू असेल म्हणून कॅन्सल केले. मग आता सॉमरसेटचा प्लॅन करत आहोत.
फॉल वरून आठवले, पिको दे निब्लिना समर मध्ये कसे असेल? हॉट असेल का खूप.

म्हाळसा मी माउंट सोमा प्लॅन करत होतो- तुम्ही भारतात म्हणजे यावेळी आपली भेट नाही बहुतेक >> माउंट सोमा ला तर कट्टप्पा पण येत असतात .. तुम्ही दोघं एकत्रच प्लॅन करून जा.. मी तोपर्यंत इथे मिनी सीशोअर फिरून येते

<< तुम्ही आरजे म्हणून काम करू शकाल. >> काय अभ्यास, काय अभ्यास!! भरत यांचे कौतुक आहे. _/\_

<< वॉटरफॉल असल्याकारणाने फक्त फॉल सिजन मध्येच चालू असेल म्हणून कॅन्सल केले. >> अगदी सुयोग्य विचार केलात.

सॉरी, यावेळी समरमध्ये शाहरुख खान माझ्या घरी येणार आहे, त्यामुळे मलापण कुठे जायला जमणार नाही.

मी माउंट सोमा प्लॅन करत होतो>>आगागा लैच जंगी कार्येक्रम दिसतो. इकडे लोडशेडींग हाये. लै गरमी. मंग आमी पोट्टे कॉन्ट्री काढुन घसा वल्ला करतो.

हो मी पहिल्यांदाच येणार आहे.. राळे ला एक मित्र आहे त्याने सांगितले...
नायगारा फॉल मध्येच बघावा- सुंदर दिसतो...

जनहितासाठी काढला आहे...>> काय बी टेपा लावुन रायले बाबुजी तुमी. मले सांगा काय जनहीत हाये वो यामंधी?

वाह छान धागा.
कालच लेक समरकॅंपला गेली.
तिला सिंगिंग ॲंण्ड डान्सिंगचा खूप शौक आहे,
म्हणून नाही तर मार्शल आर्ट ग्रूपचा कॅंप होता.
आज संध्याकाळी मी हेअरकट आणि दाढी केली हे बघून मित्र म्हणाले की तू सुद्धा जा आता तिथे शाहरूखसारखी एंट्री मारत.
हो, मायबोलीच नाही तर सगळीकडेच मी शाहरूख नावाने फेमस आहे. Happy

असो, पर्सनली मला उन्हाळ्यात फिरायला नाही आवडत. फिरावे तर पावसाळ्यात. तसे वर्षातले तिन्ही सीजन फिरण्यात काही अडचण नसते. पण प्रॉब्लेम बजेट आणि सुट्ट्यांचा असतो.
तरी बायकोच्या वाढदिवसानिमित्त आपले जवळचेच महाबळेश्वर वगैरे फिरून यायचा बेत होता. पण अचानक घराचे मोठे काम निघाले. जवळपास लाखभर रुपये त्यात घुसले. आधीच शाळा सुरू झाल्याने पोरांच्या भरमसाठ फीजने नुकतेच खिसा हलका झालेला तो या खर्चाने फाटलाच. त्यामुळे एक चांगलेच झाले. आता पावसाळ्यात फिरायला जाता येईल. तो धागा मी काढेन. तुर्तास येथील प्रतिसाद पुढच्या वर्षीसाठी समरला जायचे झाल्यास कामी येतील Happy

काय बी टेपा लावुन रायले बाबुजी तुमी. मले सांगा काय जनहीत हाये वो यामंधी?
Submitted by बंडल
>>>> नाव बंडल आहे पण प्रश्न चांगला विचारला आहे तुम्ही...
उदाहरण देऊन समजावतो...
आता सामो जर्मनी जात आहेत.. समजा इतर कोणाचा जर्मनीचा प्लॅन ठरला तर इकडे तिकडे गूगल करण्यापेक्षा इथेच विचारू शकतात...
किंवा म्हाळसा लोणावळा जातायत- समजा कोणी लोणावळा पाहिला नसेल तर इथेच विचारू शकेल काय काय पाहायचे..

आणखी एक म्हणजे नवीन डेस्टिनेशन्स कळतील समर मध्ये फिरायला... हे फार महत्वाचे आहे.. आपल्याला बरीच ठिकाणे माहित नसतात...

आणखी एक म्हणजे नवीन डेस्टिनेशन्स कळतील समर मध्ये फिरायला...>>>>

गुळुंचवाडीला पण जाऊन या एकदा
आणि आता उन्हाळा आहे मस्त तर सोलापूर वगैरे फिरून या

ते सोलापूर विजापूर रस्त्याचे काम झाले का पूर्ण
भयानक रस्ता आहे, एकदाच तिकडून गेलोय, परत गेलो तर परत येईन असे वाटत नाही

आणखी एक म्हणजे नवीन डेस्टिनेशन्स कळतील समर मध्ये फिरायला...>> च्यामारी आशी गोम हाये व्हय. लै भारी आयड्या बघा. पण आमचा समर तर लोडशेडींग मंधीच जातो. आमाले काय फायदा.

ते सोलापूर विजापूर रस्त्याचे काम झाले का पूर्ण
भयानक रस्ता आहे, एकदाच तिकडून गेलोय, परत गेलो तर परत येईन असे वाटत नाही
>>> कल्पना नाही.. मी एक दोन वेळीच गेलोय... मस्त असतो गड्डा...

> बाबुजी गड्डे आवडत असतील तर या समरमंधी आमच्या गावाला याच तुमी. मस्त टॅक्टरवरुन फिरवुन आणतो.
नवीन Submitted by बंडल on 23 April, 2022 -

>>> अमेझिंग... कोणता गाव?

उन्हाळ्यामध्ये सकाळी उन्ह वाढण्याच्या आधी फिरून येणं आल्यावर कोकम किंवा आवळा किंवा लिंबू सरबत पिण ,
नवऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी छान आमरस पुरी बेत करणं आणि माठातल थंड पाणी पिऊन पंखा फुल स्पीड वर चालू ठेवून सुखाची झोप घेणं उन्ह उतरल्यावर फिरून येणं
उन्हाळ्यात थंडावा देणारे कलिंगड , काकडी , ऊसाचा रस ,ताक ,कैरी डाळ , पन्हं ह्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेणं हाच उन्हाळ्याचा प्लॅन
फिरायला आम्ही नेहमी पावसाळ्यात जातो सगळीकडे कस प्रसन्न हिरवगार वातावरण असतं
यंदा वाळ्याचे पडदे आणि कुलर घेण्याचा प्लॅन आहे उन्हाळा सुखद करण्यासाठी

मला तर उलट वाटलेलं की नायगरा बघण्याचा सर्वात मस्त काळ समर चा असावा.
मी ऑक्टोबर ते मे या कालावधीत बरेचदा गेले आहे तिकडे पण नेहमी मला फ्रोजन नायगरा च पाहायला मिळाला आहे. किंवा ते केव ऑफ विंड वगैरे या काळात बंदच मिळालंय

हो भारतात उन्हाळ्यात फिरायला जायचे दिवस गेले आता.
मी फार तर फार वाई महाबळेश्वर ला जाऊ शकते कारण इतर परवडणारी ठिकाणं सहन होत नाहीत आणि सहन होणारी परवडत नाहीत अशी अवस्था आहे.

रीया आगस्ट मध्ये छान असतो नायगारा... झाडांचे कलर्स चेन्ज पण असतात नशीब असेल तर... उन्हाळ्यात गर्दीत रांगेत उभे राहणे फार त्रास...

उन्हाळ्यामध्ये सकाळी उन्ह वाढण्याच्या आधी फिरून येणं आल्यावर कोकम किंवा आवळा किंवा लिंबू सरबत पिण ,
नवऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी छान आमरस पुरी बेत करणं आणि माठातल थंड पाणी पिऊन पाखा फुल स्पीड वर चालू ठेवून सुखाची झोप घेणं उन्ह उतरल्यावर फिरून येणं
उन्हाळ्यात थंडावा देणारे कलिंगड , काकडी , ऊसाचा रस ,ताक ,कैरी डाळ , पन्हं ह्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेणं हाच उन्हाळ्याचा प्लॅन
>>> सुख म्हणजे हेच... वाचूनच किती भारी वाटतेय...

आईची लेक छान
यात उन्हाळ्यातल्या रात्री गारेगार कुल्फीही जोडा
आणि रात्री झोपायला एक मस्त गच्ची वा मोकळा पॅसेज हवा. तो ही बिन मच्छरवाला. मुंबईत असताना हे सुख होते. तिथे मच्छर असा काही प्रकारच नव्हता. ईथे नवी मुंबईत रात्री बाहेर उघड्यावर झोपायचा विचार करू शकत नाही..

तोपर्यंत इथे मिनी सीशोअर फिरून येते
Submitted by म्हाळसा on 23 April, 2022 - 22:34
>>>>

आता वाचली ही पोस्ट. मिनी सीशोअर म्हणजे आमचे दुसरे हक्काचे घरच आहे. तिथला प्रत्येक दगड आणि तलावातला प्रत्येक थेंब माझ्या ओळखीचा आहे. आताचे घर जरा लांब आहे. त्यामुळे ऊठसूठ रोज जाता येत नाही. आधीचे शेजारीच होते. उन्हाळातल्या दर रात्री तिथे जाऊन बसायचो. पण रात्रीचा मच्छरांचा त्रास आहेच तिथेही. फिरू शकता. एका जागी बसले की येतात चावायला Happy

Pages